Tuesday, 6 May 2025

वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्वपूर्ण अभिप्राय

 उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे

प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेतचार दिवसांत वेव्हज 2025 ने विचारकौशल्य आणि महत्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्च-स्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होताज्यामुळे जगभरातील विचारवंतउद्योगधुरीनधोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रेविभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारेशिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.

वेव्हजची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजनएव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रडिजिटल मीडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात एक हजारहून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसहशिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली - अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.

पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानीटेड सॅरंडोसकिरण मजुमदार-शॉनील मोहनशंतनू नारायणमार्क रीडॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योगजाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवीमोहनलालहेमा मालिनीअक्षय कुमारनागार्जुनशाहरुख खानदीपिका पदुकोणअल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होतेआभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.

वेव्हज 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंगफरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईम द्वारे पंचायत बनवणेए आर लेन्स डिझाइन करणेए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.

वेव्हज मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारणडिजिटल मीडियाओटीटीए आयसंगीतबातम्यालाइव्ह कार्यक्रमॲनिमेशनगेमिंगआभासी निर्मितीचित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटागुगलॲमेझॉनएक्सस्नॅपस्पॉटीफायडी एन ई जीनेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्कीसी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.

वेव्हज बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावलेमहाराष्ट्र शासनाने 'माध्यम आणि मनोरंजनक्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपटसंगीतरेडिओव्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होतेज्यामध्ये 3,000 हून अधिक बीटूबी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणूनन्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे 'देवी चौधराणीचित्रपटाची घोषणाजो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि 'व्हायलेटेडचित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.

महाराष्ट्र शासनाने वेव्हज मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आलेतर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.

वेव्हज २०२५,महाराष्ट्र सरकारने केले माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार ·

 वेव्हज २०२५

 प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ

महाराष्ट्र सरकारने केले माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात

८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

·         जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज जाहीरनामा

·         क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार

·         वेव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित

 

मुंबईदि. 5 :- वेव्हज अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्यामाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत  उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शकउद्योग धुरीणस्टार्टअप्सधोरणकर्तेशिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोततंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली.  प्रदर्शनेपॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासहया कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलतातंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी  प्रारंभ झाला. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृतीसृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहेअसे प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मितीडिजिटल आशयगेमिंगफॅशनसंगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहेअसे प्रधानमंत्री म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचेगुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हेतर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.

संस्कृती विसरू नका

 संस्कृती विसरू नका

संस्कृती आणि मूल्य ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असतानाआपल्या परंपरानीतिमूल्य विसरता कामा नये. स्मार्टडिजिटल व भविष्यकाळासाठी सज्ज होण महत्त्वाच असलं तरी आपले संस्कार आणि मूल्य यांचा विसर पडू देऊ नकाअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

   मनात सतत रेंगाळणारे विचार जर व्यक्त झाले नाही तर ते मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. यासाठी एक सोप्पा उपाय म्हणजे  मनातील त्रासदायक विचार एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे किंवा ते लिहून मोकळ होणे. ही पद्धत मनावरचा भार हलका करते आणि मन:स्वास्थ्य टिकवते. आनंदी आणि समाधानी जीवनासाठी इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशीच तुलना करा. सतत आपल्याकडे काय नाही याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षाआपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवल्यास आयुष्य अधिक समृद्ध होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

   मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहेआधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा डिजिटल युगात संवाद ,टेक्नोसॅव्ही व्हा,,शिकण थांबवू नका – आयुष्यभर विद्यार्थी राहा

 धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा

- प्रभू गौर गोपाल दास

 

मुंबईदि. ५ : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असलीतरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईलसोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले.

टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते.

टेक्नोसॅव्ही व्हा

सध्या जग वेगाने डिजिटल दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोनकृत्रिम बुद्धिमत्ताक्लाउड संगणकआणि इंटरनेट यांसारखी तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात टेक्नोसॅव्ही’ होण ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. विविध ऑनलाईन कोर्सेसमोबाइल अ‍ॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकण आता पूर्वीपेक्षा अधिक सोप झाले आहेअसेही प्रभू गौर गोपाल दास यांनी सांगितले.

शिकण थांबवू नका – आयुष्यभर विद्यार्थी राहा

प्रभू गौर गोपाल दास म्हणालेशिकण ही एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते.

वय कितीही असोनवीन कौशल्य शिकणेभाषा आत्मसात करणे किंवा एखादा छंद जोपासणे यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. वृद्धापकाळातही अल्झायमर आणि डिमेन्शियासारखे आजार टाळण्यासाठी मेंदूला वर्कआउट देणे गरजेचे आहे. डिजिटल युगात विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे हे अधिक सुलभ झाले आहे.

मानसिक आरोग्य सांभाळा

दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यानवाचनमनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायामसंतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा  अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते.


'इज ऑफ लिव्हिंग'मध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे राहील : प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार,महाराष्ट्र ‘आय गॉट’वरही प्रथम येईल

 महाराष्ट्र ‘आय गॉट’वरही प्रथम येईल - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले कीमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करणारे महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ‘आय गॉट’ वर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आपले राज्य पहिल्या तीनवरून प्रथम क्रमांक प्राप्त करेल. प्रशासनाने अधिक गतीमान सेवा देण्यावर भर द्यावा. आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या मूल्यमापनातूनच एकंदरीत कामाचे मोजमाप होत असते महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक बदलाला सामोराही जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील हे बदल स्वीकारून आपले काम अधिक गतीमान पद्धतीने करतील, असा विश्वास ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.

'इज ऑफ लिव्हिंग'मध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे राहील : प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार

            प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवगत करून अधिकारी व कर्मचारी काम करत आहेतच पण काळानुरूप आपल्या सेवा 'इज ऑफ लिव्हिंग' असल्या पाहिजेत. त्या अधिकाधिक लोकामिभुख असाव्यात यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक,टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे

 अधिक गतिमान, प्रशासनासाठी

‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक

- उपमुख्यमंत्री अजित पवार

"टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे उद्घाटन

 

             मुंबई, दि. ५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने  आयोजित केलेला 'टेक वारी': महाराष्ट्र  टेक लर्निंग वीक' हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश टेक वारी’ उपक्रमाच्या  माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

          मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारप्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमलाप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स 'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन' 'कृत्रिम बुद्धिमत्ता'', विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेकअशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून  सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीटेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.

बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन,निकालाची वैशिष्ट्ये

 बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

--

आवड आणि कल पाहून पुढील मार्ग निश्चित करावेत

दादाजी भुसे यांचे आवाहन

• बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.88 टक्के

• मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 ने जास्त.

 

मुंबईदि. : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थीत्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी दि. 5 मे 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणालेबारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतीलअसा विश्वास आहे. तथापिही परीक्षा हे अंतिम ध्येय नाहीयामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावेअसेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञानकलावाणिज्यव व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के)कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के)मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के)छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के)अमरावती 1,32,814 (91.43 टक्के)पुणे 2,21,631 (91.32 टक्के)नाशिक 1,44,136 (91.31 टक्के)नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून 6,76,972 मुले तर 6,25,901 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,49,932 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 4,07,438 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,80,902 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1,64,601 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान शाखेतील 7,15,595 विद्यार्थी (97.35 टक्के)कला शाखेतील 2,81,606 (80.52 टक्के)वाणिज्य शाखेतील 2,77,629 (92.68 टक्के)व्यवसाय अभ्यासक्रम 24,450 (83.26 टक्के) तर आयटीआय मधील 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (82.03 टक्के).

 

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.38

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 92.38 इतकी आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेतअसे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावेअसे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi