Tuesday, 6 May 2025

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू App सुरू करणार; सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत ४० हून अधिक विद्यमान IT App समाविष्ट करण्यात येणार

 निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू App सुरू करणार;

सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत

४० हून अधिक विद्यमान IT App समाविष्ट करण्यात येणार

 

 

मुंबई, दि. ४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीनवापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे. हे नवीन ‘ECINET’ नावाचे एकाच ठिकाणी सेवा देणारे व्यासपीठ आयोगाच्या ४० हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सचे एकत्रीकरण व पुनर्रचना करणारे ॲप असेल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ECINET मध्ये आकर्षक युजर इंटरफेस (UI) आणि सोपी युजर एक्सपीरियन्स (UX) असेलजे सर्व निवडणूक संबंधित सेवांसाठी एकच व्यासपीठ पुरवेल. अनेक अ‍ॅप डाऊनलोड करणेवेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवणे यांचा त्रास यामुळे कमी होईल.

हा उपक्रम मार्च २०२५ मध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकार झाला. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते.

ECINET वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवरून संबंधित निवडणूक माहिती पाहण्याची सुविधा देईल. ही माहिती अधिक अचूक राहण्यासाठी केवळ अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांद्वारेच ती प्रविष्ट केली जाईल. अधिकाऱ्यांकडून माहिती प्रविष्ट केल्यामुळे ती विश्वसनीय राहील. मात्रकोणताही वाद निर्माण झाल्यासअधिकृत फॉर्ममध्ये भरलेली प्राथमिक माहिती ग्राह्य धरली जाईल.

ECINET मध्ये मतदार सहाय्य अ‍ॅपमतदान टक्केवारी अ‍ॅप, CVIGIL, सुविधा २.०, ESMS, सक्षम आणि KYC अ‍ॅप यांचा समावेश असेलजे मिळून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. ECINET मुळे जवळपास १०० कोटी मतदार व निवडणूक यंत्रणेतील सुमारे १०.५ लाख बूथ स्तर अधिकारी (BLOs), सुमारे १५ लाख राजकीय पक्षांचे बूथ स्तर प्रतिनिधी (BLAs), ४५ लाख मतदान कर्मचारी१५,५९७ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), ,१२३ मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) यांना फायदा होणार आहे.

ECINET ची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे आणि सुलभ वापरसुरळीत कार्यक्षमता व मजबूत सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर चाचण्या घेतल्या जात आहेत. हे व्यासपीठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ३६ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनत्यांच्यातील ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी व ४,१२३ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर आणि निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी प्रसिद्ध ७६ प्रकाशनांतील ९,००० पानांची तपासणी करून विकसित करण्यात येत आहे.

ECINET द्वारे पुरवण्यात येणारा डेटा लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० व १९५१मतदार नोंदणी अधिनियम १९६०निवडणूक संचालन नियम १९६१ व भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या कायदेशीर चौकटीतच राहील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

0000


मुनावळे येथे शिवसागर जलशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण

 मुनावळे येथे शिवसागर जलशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण करण्यात आले. पर्यटन महोत्सवला सहकार्य करणाऱ्या क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्ष मनीषा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजपानचे कौन्सीलेट जनरल यमाशीता सान,  व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी,  संचालक डॉ.बी.एन.पाटीलजिल्हाधिकारी संतोष पाटील,  पर्यटन महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मृणाल कुलकर्णीनवेली देशमुखसमन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते.


पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना

 पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेउद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतातमात्र पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणूकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पुढील ५ वर्षात करण्यात येईल.

मुंबई येथे आयोजित वेव्हज परिषदेमुळे क्रिएटर्स इकॉनॉमिमध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेलअसा विश्वास व्यक्त करताना आपल्या सांस्कृतिक विविधता कंटेन्ट क्रिएटर्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत. पर्यटकाला स्थानिक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिल्यास पर्यटक त्या त्या भागाकडे वळेल आणि पर्यटनाला चालना मिळेलअसा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमहाबळेश्वर निसर्गाने समृद्ध असून पर्यटनाची अमर्याद क्षमता इथे आहे. मुनावळे येथे जलपर्यटनालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पर्यटकांना इथल्या निसर्गासोबत इथल्या कलासंस्कृतीइतिहास आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. इथल्या भूमीपुत्राला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या कुटुंबासोबत भूमातेची सेवा करण्याची संधी मिळेल. तीन दिवसात महोत्सवला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने लोकाभिमुख योजनांना चालना देण्यासोबत गड-किल्ले संवर्धनाला चालना देण्याचे कार्य केले. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी देखील प्रयत्न होत आहेत. भिलार येथे पुस्तकांचे गावमांघर येथे मधाचे गाव आहे.  इथे सर्वोत्तम स्ट्रॉबेरी उत्पादन होतेवेण्णा लेकचे सौंदर्य आहेलोकसंस्कृतीचे विविध रंग आहेत. हे सर्व एकाच ठिकाणी आणण्याचे काम महापर्यटन उत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. अत्यंत नेटके नियोजन आणि सुरक्षित पर्यटन यामुळे हा महापर्यटन उत्सव  वैशिष्ट्यपूर्ण ठरला. महाबळेश्वरला नवे आणि सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकसित कारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणालेमहाबळेश्वर हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. महापर्यटन उत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने महोत्सवाचा विस्तार करून पुढल्यावर्षी अधिक पर्यटक येतील याचा प्रयत्न व्हावा. पर्यटन क्षेत्रातील अभिनव कल्पना या महोत्सवात पाहायला मिळाल्या. परदेशातील पर्यटनाच्या उत्तम संकल्पनादेखील पर्यटन विभागाने स्वीकाराव्यात अशी सूचना त्यांनी केली.

प्रास्ताविकात पर्यटनमंत्री शंभुराज देसाई म्हणालेमहापर्यटन उत्सवाचा हा पहिलाच प्रयत्न होता. महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता राज्यातील प्रत्येक विभागात दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. या माध्यमातून त्या विभागातील पर्यटनस्थळेवैशिष्ट्ये याचे ब्रँडिंग करण्यात येईल. पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मुनावळे येथील पर्यटन सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यात यश येईल. कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तीन दिवसाच्या महापर्यटन महोत्सवात ७५ हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्रछायाचित्र प्रदर्शनखाद्य जत्रामहाराष्ट्राचा बाज असलेले कार्निव्हल परेडलेझर आणि ड्रोन शोहेलिकॉप्टर राईडकिल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनखाद्य जत्रालेझर आणि ड्रोन शोलोककला अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही श्री. देसाई म्हणाले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा

 पर्यटनाला चालना देण्यासाठी 

वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन
  • महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप

 

सातारा दि. ४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी.  आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारा महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५’ चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेपर्यटन मंत्री शंभूराज देसाईउद्योग मंत्री उदय सामंतसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसलेआ. सचिन पाटीलआदी उपस्थित होते.

पर्यटन महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचे सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचे आहे. शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर मिलाफ महाबळेश्वर येथे पाहायला मिळतो. निसर्गाने सुंदर पश्चिम घाट आपल्याला दिला आहे७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला आहेअनेक सुंदर, पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्याकडे आहेतहे सौंदर्य देश-परदेशात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि हा महोत्सव त्यादृष्टीने महत्वाचा आहे.

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक

 अधिक गतिमान, प्रशासनासाठी

‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक

- उपमुख्यमंत्री अजित पवार

"टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे उद्घाटन

 

             मुंबई, दि. ५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने  आयोजित केलेला 'टेक वारी': महाराष्ट्र  टेक लर्निंग वीक' हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश टेक वारी’ उपक्रमाच्या  माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

          मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारप्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमलाप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स 'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन' 'कृत्रिम बुद्धिमत्ता'', विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेकअशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून  सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीटेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो

 ‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो

— देबजानी घोष

 

मुंबई, दि. 5 : ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतोअसा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.

'टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताहअंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात 'विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञानया विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला उपस्थित होत्या. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देबजानी घोष म्हणाल्या, "सध्या जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्राकडे  तज्ज्ञकृषी उपकरणेप्रशिक्षित कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे राज्य अन्नधान्याच्या जागतिक निर्यातीत आघाडीवर राहू शकते. नवीन तंत्रज्ञानसुधारित बियाणंड्रोनसिंचन प्रणाली यांचा वापर करून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमता वाढवता येईल.

२०२० ते २०३० हे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआयपर्व असणार आहे. कृषीआरोग्यऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात ‘एआय’च्या साहाय्याने मूलभूत बदल घडवता येऊ शकतात. बायोटेक म्हणजे जीवशास्त्र आणि ‘एआय’ यांचा संयोग आहे. बायोटेक म्हणजे जीवन नव्याने घडविणे होय. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया म्हणजे ‘आयआयटी’ मुंबईसारखी शिक्षणसंस्थास्टार्टअप इकोसिस्टमउद्योगजगतडिजिटल इकॉनॉमीग्रीन एनर्जी आणि प्रगत धोरणे यामुळे राज्य देशाच्या ‘जीडीपी’मध्ये मोठा वाटा उचलू शकते. असेही त्यांनी सांगितले.

आर. विमला यांनी सांगितले कीफक्त ‘एआय’वर अवलंबून राहून चालणार नाहीतर विज्ञान आणि ‘एआय’ व इतर आघाडीच्या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने उद्योग आणि कृषी क्षेत्रात ठोस योजना आखून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा

 कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा

– मंदार कुलकर्णी

 

 मुंबईदि. 5 : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभगतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहेअसे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

   टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मंदार कुलकर्णी बोलत होते.

   मंदार कुलकर्णी म्हणालेगुगलडॉक्ससारख्या डिजिटल साधनांद्वारे फाईल तयार करणेती सुरक्षित जतन करणे आणि थेट ईमेलद्वारे पाठवणे शक्य होते. त्यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण अधिक वेगाने होते आणि वेळेची बचत होते. डिजिटल साधनांचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ करता येते. मायक्रोसॉफ्ट कोपायलट हा एक एआय-संचालित डिजिटल सहायक असूनतो विविध कार्यालयीन कामकाजात मदतीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

 डेटा विश्लेषणासाठी पिव्होट टेबल्स सारख्या सुविधांचा वापर करून मोठ्या प्रमाणातील डेटा वर्गवारीनुसार सादर करता येतो. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना श्री. कुलकर्णी म्हणालेवैयक्तिक माहितीशासकीय कागदपत्रे किंवा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित बॅकअप व विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरणे अत्यावश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

***

Featured post

Lakshvedhi