Monday, 5 May 2025

जागतिक सृजनशील सहयोगात भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण वेव्हज बझार : 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद

 जागतिक सृजनशील सहयोगात

भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण

वेव्हज बझार 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद

 

मुंबईदि.4 :- जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हजछत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपटसंगीतरेडिओव्हीएफएक्स आणि अॅ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍मेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेलेकरार करण्याचे काम अजूनही सुरू असतानाकाही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे.

 

वेव्हज बाजारामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी  झालेल्या  चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळालीबाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केलीज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली.

भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजेपेट्रिना डी'रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केलाउभय देशांमधील पर्यटनसांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.

 

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल

 अभिनय  जितके प्रामाणिकपणे कराल,

तितके ते उत्तम होईल

 अभिनेता आमिर खान

 

मुंबई, दि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून अभिनयाची कला या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

 आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे - "तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल".

तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असे, की "मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही."

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट 'तारे जमीन पर' असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

"भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते".

चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की "चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल".

मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे - "जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका".

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला.

ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा

 ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश

शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकतेयाचे उदाहरण देताना त्यांनी ब्युटी अँड द बीस्टहे शिल्प सादर केले. "सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणीअशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेतजी प्राण्यांची कातडी वापरतातत्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत," असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला.

याबरोबरच त्यांनी सायलंट म्युझिक या शिल्पाची ओळख करून दिली. "ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते," असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे.

शिल्पकलमध्ये  रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतोबॅलन्सिंग कलात्रिमितीय पेंटिंगआर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल

 शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास

संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल

कलादिग्दर्शक पी.एम. विचारे

 

डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरापरिसंवाद

 

मुंबईदि. 4 : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटनाप्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.  शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होतेअसे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा'  या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंगदिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीताअहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्राहालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले.

जनरेटिव्ह ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र

 जनरेटिव्ह एआयमुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल

जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र

 

मुंबई दि. 4 :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव एआयमुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025  समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये "जनरेटिव्ह एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग" या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.  या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला.

एआयचा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे.  या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणेउत्पादकता वाढवणेजुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ  या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेतअसे या चर्चा सत्रात सांगण्यात आले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह एआय (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवरवेगवेगळ्या वेळाना आणि  विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरणशिफारसीआणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहतास्टोरीबोर्डिंगटीआरपी विश्लेषणजुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही एआयच्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी एआय’ केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हेतर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर,कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय - ब्रियना याऱ्हौसे

 कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील

बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

 

मुंबईदि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षणउद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे.अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ऍनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाहीते कृत्रिम दिसेलनैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचे या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमीया विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसेअमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जीअस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय - ब्रियना याऱ्हौसे

विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पनासंशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतीलअसे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक - संजय खिमेसरा

देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणेनवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेलअसे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहेधोका नाही - प्रमिता मुखर्जी

अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्हप्रक्रियात्मक कामेडेटा ट्रान्सफरप्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहेपण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवेअसे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले.


उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा - ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

 उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून

व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा

- ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

'स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत' चर्चासत्र

 

मुंबईदि. ४ : नवीन 'स्टार्टअप्स'च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात 'क्लाऊड सर्विसप्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीतअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 'लोकल टू ग्लोबल'पर्यंत न्यावाअसे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले.

 

'स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदतयासंदर्भात 'वेव्हज २०२५या जागतिक परिषदेत 'वेव्हजएक्सचर्चासत्र झाले. यावेळी ॲमेझॉन वेब सर्विसेसचे उद्योग विषयतज्ज्ञ महेश्वरन जी. यांनीही मार्गदर्शन केले.

 

आजच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगांना अनेक संधी आहेत. आपला कंटेंट चांगला असेल तर उद्योगांनी वेगवेगळ्या क्लाऊड सर्विसेसच्या सहाय्याने आपल्या क्षेत्राचा विस्तार करावा. त्यासाठी बाजारात 'क्लाऊड सर्विसेस'च्या विविध प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांनी आपला कंटेंट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावाअसा सल्ला श्री. पद्मनाभन यांनी दिला.

 

श्री. महेश्वरन यांनी क्लाऊड सर्विसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. त्यात सॉफ्टवेअर व अप्लायन्सेसलिंकमीडिया कनेक्टमीडया लाईव्हमीडिया कन्वर्टमीडिया पॅकेजमीडिया टेलरव्हिडिओ सर्विसडेडलाईन थिंकबॉक्सडेडलाईन क्लाऊडॲमेझॉन क्लाऊड फ्रंटअमेझॉन एफएसएक्सडीसीव्ही यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या माध्यमातून कंपनी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली आहेअसेही त्यांनी सांगितले.

 

स्टार्टअपच्या प्रगतीसाठी इकोसिस्टीम तयार होत आहे. नवीन उद्योगांचा खर्च कमी करणेत्यांना डेटा ॲनालिसिस उपलब्ध करून देणेत्यांच्या कंटेंटचे मूल्यवर्धन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध होत असून याचाही वापर नवीन स्टार्टअप यांनी करणे गरजेचे आहेअसे श्री. महेश्वरन यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi