Monday, 5 May 2025

डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा आवश्यक,अचूक माहिती संकलित करणे गरजेचे

 डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी

अचूक डेटा आवश्यक

- एम. ए. पार्थसारथी

'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' परिसंवाद

 

मुंबई, दि. ४ : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणेयोग्य नियोजनयोजना आणि मूल्यमापन आवश्यक आहेअसे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.

 

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंगया विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.

 

श्री. पार्थसारथी म्हणालेसामजिक संशोधनातून  माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धतीजनगणनासर्वेक्षणसंभाव्यतेवर आधारितनिश्चित माहितीनिवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते.

 

डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाहीतर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोधनियोजनअंमलबजावणीआणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीयखासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगटलिंगआवडीनिवडीऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहेअसेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले.

 

अचूक माहिती संकलित करणे गरजेचे

 

ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजनावैयक्तिक माहितीआवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जातेदुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते.


सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

 सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

- रिची मेहता

‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र

 

मुंबई, दि. ४ : सिनेमामध्ये एखाद्या  विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असतेअसे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता मध्ये बोलत होते.

 

रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानकविषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटककाल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकतासत्यता ही ठळकपणे  बघणाऱ्यांच्या लक्षात येते,  हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटनाप्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे.

 

सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो.  सिनेमामध्ये विषयपात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक  सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते  वेगळ्या पद्धतीने येतातदोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतोअसे रिची मेहता यांनी सांगितले.

 

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे

 समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने


स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे


 


मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएसंर्सने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.


             बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.


 यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.


विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.


मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करता, योग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.


तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेत, त्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहे, असे सांगितले.

वेव्हज – 2025 मध्ये स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय : विषयावर परिसंवाद

 वेव्हज – 2025 मध्ये स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित


अभिजात चित्रपटांचा व्यवसाय : विषयावर परिसंवाद


 


अभिजात चित्रपट सामूहिक सांस्कृतिक


अस्मिता आणि वारशाचे प्रतिबिंब


- अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम


 


मुंबई, दि.4 :- "भारतीय लोकांना जुन्या आठवणीत रमायला आवडते. एकीकडे जुनी पिढी त्यांच्या तरुणपणातील जादू पुन्हा जगायचा प्रयत्न करत आहे. जुने अभिजात चित्रपट निखळ मनोरंजनापेक्षाही आपल्या सामूहिक सांस्कृतिक अस्मिता आणि वारशाचे प्रतिबिंब आहेत. चित्रपट पुनर्संचयित करणे ही एक बारीकसारीक तपशिलांबाबत जागरुक राहण्याची प्रक्रिया आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, आपण मूळ संकल्पनेशी प्रामाणिक राहू शकतो. असे पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो, अहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.


वेव्हज -2025 - जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये आज स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय या विषयावर परिसंवदाचे आयोजन करण्यात आले होते.


चित्रपट प्रकाशन आणि वितरण क्षेत्रातील दिग्गज कमल गिआनचंदानी यांनी सांगितले की, भारत सरकारच्या नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली, ज्याचा उद्देश चित्रपटविषयक खजिन्याचे जतन करणे, डिजिटायझेशन करणे आणि पुनर्संचयित करणे हा आहे.. हे आव्हान खूप मोठे आहे, विशेषतः तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे तसेच डिजिटल डेटा जतन करण्याच्या वाढत्या जटिलतेमुळे चित्रपट रील्सवर परिणाम होतो . मात्र तरीही, ही जबाबदारी तातडीने आणि समर्पित भावनेने पार पाडायला हवी ", असे मगदूम यांनी सांगितले.


शहजाद सिप्पी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या उत्क्रांतीचा मागोवा घेत, मागील दशकातील कथात्मक मांडणीच्या शैलीतले वेगळेपण उपस्थितांसमोर मांडले आणि अभिजात सिनेमांच्या अद्वितीय वारशाची जाणिव उपस्थितांना करून दिली. त्या काळी चित्रपट निर्मिती ही एक वेगळीच कला होती आणि आजचे प्रेक्षकही त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, वेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.



 

अभिजात चित्रपट सामूहिक सांस्कृतिक

अस्मिता  आणि वारशाचे प्रतिबिंब

- अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम

 

मुंबईदि.4 :- "भारतीय लोकांना जुन्या आठवणीत रमायला आवडतेएकीकडे जुनी पिढी त्यांच्या तरुणपणातील  जादू पुन्हा जगायचा  प्रयत्न करत आहेजुने अभिजात  चित्रपट निखळ मनोरंजनापेक्षाही आपल्या सामूहिक सांस्कृतिक अस्मिता  आणि वारशाचे प्रतिबिंब आहेत.   चित्रपट पुनर्संचयित करणे ही एक बारीकसारीक तपशिलांबाबत जागरुक राहण्याची  प्रक्रिया आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासहआपण मूळ संकल्पनेशी प्रामाणिक  राहू शकतो. असे पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोअहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

वेव्हज -2025 - जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये आज स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय या विषयावर परिसंवदाचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपट प्रकाशन आणि वितरण क्षेत्रातील दिग्गज कमल गिआनचंदानी यांनी सांगितले की, भारत सरकारच्या नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली,  ज्याचा उद्देश चित्रपटविषयक खजिन्याचे जतन करणेडिजिटायझेशन करणे आणि पुनर्संचयित करणे हा आहे.. हे आव्हान खूप मोठे आहेविशेषतः तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे तसेच डिजिटल डेटा जतन करण्याच्या वाढत्या जटिलतेमुळे चित्रपट रील्सवर परिणाम होतो . मात्र तरीहीही जबाबदारी तातडीने आणि समर्पित भावनेने पार पाडायला हवी ", असे  मगदूम यांनी सांगितले.

शहजाद सिप्पी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या उत्क्रांतीचा मागोवा घेतमागील दशकातील कथात्मक मांडणीच्या शैलीतले वेगळेपण उपस्थितांसमोर मांडले आणि अभिजात सिनेमांच्या अद्वितीय वारशाची जाणिव उपस्थितांना करून दिलीत्या काळी चित्रपट निर्मिती ही एक वेगळीच कला होती आणि आजचे प्रेक्षकही त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेतमात्रचित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूकवेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.


भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक

 भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर

उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक

-         केंद्रीय राज्यमंत्री डॉएलमुरुगन

 

मुंबईदि.4  :- भारत हा मोशन पिक्चर असोसिएशनसोबत भागीदारी वाढवून जागतिक स्तरावर सुरक्षित सर्जनशील उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले

मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या अर्थात वेव्हज् 2025 च्या तिसऱ्या दिवशीमोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीएभारताच्या चित्रपटदूरदर्शन आणि ओटीटी क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल सादर केलाया अहवालाच्या प्रकाशन समारंभाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉएलमुरुगन आणि एमपीएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन उपस्थित होते.

डॉमुरुगन यांनी एमपीएच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर वाढता प्रभाव मान्य केलाभारतीय कथा भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रभाव पाडू शकतात हे आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांनी सिद्ध केले आहे, असे डॉमुरुगन म्हणाले. धोरणेनिर्मिती प्रोत्साहन आणि मजबूत बौद्धिक संपदा संरक्षणाद्वारे सर्जक-प्रथम परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिलाअलीकडील पायरसीविरोधी सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल युगात कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

चार्ल्स रिव्हकिन यांनी भारताच्या मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वपूर्ण क्षण असलेल्या या काळात एमपीएच्या भारतासोबतच्या सातत्यपूर्ण भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केलाभारताची सर्जनशील अर्थव्यवस्था अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे आणि या प्रवासाला पाठिंबा देणे एमपीएसाठी अभिमानास्पद आहे, असे रिव्हकिन म्हणाले. भारतीय चित्रपटदूरदर्शन आणि ओटीटी उद्योगांनी 26 लाख रोजगारांना आधार दिला आणि वार्षिक आर्थिक उत्पादनात 60 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवले.

०००००

जागतिक सृजनशील सहयोगात भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण वेव्हज बझार : 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद

 जागतिक सृजनशील सहयोगात

भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण

वेव्हज बझार 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद

 

मुंबईदि.4 :- जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हजछत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपटसंगीतरेडिओव्हीएफएक्स आणि अॅ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍मेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेलेकरार करण्याचे काम अजूनही सुरू असतानाकाही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे.

 

वेव्हज बाजारामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी  झालेल्या  चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळालीबाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केलीज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली.

भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजेपेट्रिना डी'रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केलाउभय देशांमधील पर्यटनसांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.

 

प्रमुख करारविषयक घोषणा

प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहु-वार्षिक सहयोगाची घोषणा ही वेव्हज  बझार मधील मुख्य आकर्षण होती. या करारात 240 हून अधिक देशांमधील स्ट्रीमिंगचा समावेश आहेयामध्ये 28 सबटायटल भाषा आणि 11 डब केलेल्या आवृत्त्या असतील. ‘देवी चौधराणी'व्हायोलेटेडया चित्रपटाच्या लाँचची घोषणा ही वेव्हज बझारचे उद्दिष्ट सिद्ध करणारी आणखी महत्त्वाची घटना होतीप्रभावी पदार्पणासह वेव्हज बझारने केवळ सर्जनशील सहयोगाचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाहीतर देशाच्या सीमेपलीकडे जाऊन कथाकथन आणि उद्योग जगतातील परिवर्तनाच्या नवयुगाचा पाया रचला आहे.

 

०००००

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल

 अभिनय  जितके प्रामाणिकपणे कराल,

तितके ते उत्तम होईल

 अभिनेता आमिर खान

 

मुंबई, दि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून अभिनयाची कला या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

 आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे - "तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल".

तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असे, की "मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही."

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट 'तारे जमीन पर' असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

"भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते".

चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की "चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल".

मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे - "जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका".

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला.

0000

 

Featured post

Lakshvedhi