Monday, 5 May 2025

ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश

 ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश

शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकतेयाचे उदाहरण देताना त्यांनी ब्युटी अँड द बीस्टहे शिल्प सादर केले. "सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणीअशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेतजी प्राण्यांची कातडी वापरतातत्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत," असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला.

याबरोबरच त्यांनी सायलंट म्युझिक या शिल्पाची ओळख करून दिली. "ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते," असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे.

शिल्पकलमध्ये  रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतोबॅलन्सिंग कलात्रिमितीय पेंटिंगआर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.


शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल

 शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास

संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल

कलादिग्दर्शक पी.एम. विचारे

 

डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरापरिसंवाद

 

मुंबई, दि. 4 : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटनाप्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.  शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होतेअसे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा'  या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंगदिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीताअहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्राहालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले.

जनरेटिव्ह ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र

 जनरेटिव्ह एआयमुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल

जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र

 

मुंबई दि. 4 :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव एआयमुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025  समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये "जनरेटिव्ह एआय स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग" या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.  या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला.

एआयचा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे.  या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणेउत्पादकता वाढवणेजुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ  या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेतअसे या चर्चा सत्रात सांगण्यात आले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह एआय (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवरवेगवेगळ्या वेळाना आणि  विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरणशिफारसीआणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहतास्टोरीबोर्डिंगटीआरपी विश्लेषणजुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही एआयच्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी एआय केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हेतर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

 कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील

बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

 

मुंबईदि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षणउद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे.अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ऍनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाहीते कृत्रिम दिसेलनैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याच या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमीया विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसेअमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जीअस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय- ब्रियना याऱ्हौसे

विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पनासंशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतीलअसे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक - संजय खिमेसरा

देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणेनवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धीप्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेलअसे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहेधोका नाही - प्रमिता मुखर्जी

अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्हप्रक्रियात्मक कामेडेटा ट्रान्सफरप्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहेपण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवेअसे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले.

००००

टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक",५ ते ९ मे दरम्यान प्रशिक्षणाची टेकवारी,टेक वारी' म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय

 टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" चे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी

५ ते ९ मे दरम्यान प्रशिक्षणाची टेकवारी

अपर मुख्य सचिव व्ही.राधा

 

              मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठीप्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"  दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेनसायबर सुरक्षाकार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या

 अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक  दि.५ मे २०२५ रोजी  सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी  दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

            'टेक वारीम्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी  होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून 'टेक वारीही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या 'टेक वारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेनसायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापनआरोग्यदायी जीवनशैलीध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या

https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80

या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPRपाहता येतील.

पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती  येथे 'प्रभावी व तणावमुक्त जीवनया विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह६ वा मजला येथे "विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान" या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३)७ वा मजला येथे"शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे" या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह६ वा मजला "कृत्रिम बुद्धिमत्ता" याविषयी नवी दिल्लीचे  माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.

             मंगळवारी दि.६ मे २०२५ सकाळी ११:३० ते १२:३० परिषद सभागृह६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह६ वा मजला येथे "भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे" या विषयावर  डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे "प्रवास पाककृतींचा" या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये "इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)" या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह६ वा मजला येथे "ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी" नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.

            बुधवार दि.७ मे २०२५ तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह६ वा मजला येथे 'सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे 'आरोग्यदायी जीवनशैली'या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत 'फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणेया विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे.  दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे 'स्मार्ट बैठक आयोजित करणे'या विषयावर  झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारीमेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.

            गुरुवार दि.८ मे २०२५ – चौथ्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत "शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर" या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारविभागीय आयुक्त नागपूरच्या विजयलक्ष्मी बिदरीनाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे "जीवन संगीत" या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजलासमिती कक्ष क्रमांक ३ येथे 'कृत्रिम बुद्धिमत्ता'या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे 'डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती'या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशनइन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.

            शुक्रवार दि. ९ मे २०२५  पाचव्या दिवशी सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे "स्टार्टअप डेमो डे" या विषयी व्याख्यान होणार आहे. सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकरसुची गुप्ताराहुल मुलाने यांचे "डिजिटली सजग बना" या विषयी व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरां आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या ज्ञानाची वारी या सांस्कृतिक कार्यक्रमाने 'टेक वारीचासमारोप होणार आहे दुपारी १२.३०  ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे.

            फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच  विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.

०००

परिवर्तनशील ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’उपक्रमात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व

 परिवर्तनशील ईट राईट स्ट्रीट फूड हबउपक्रमात

महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व

- अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम

  • देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचालित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू

 

मुंबई, दि. 4 : प्राप्त संधी आणि प्रशिक्षण यांच्या आधारे तळागाळातील सक्षमीत महिला स्वयं सहायता गटातील महिला देशातील अन्न सुरक्षा मानकांना परिभाषित करू शकतातयाचे माहिम सीफूड प्लाझा हे एक उत्तम उदाहरण आहे.  महाराष्ट्र ईट राईट स्ट्रीट फूड हब या परिवर्तनशील उपक्रमात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे,  अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचलित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनबृहन्मुंबई विभाग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानेमाहिम रेतीबंदर येथे स्वयं सहायता गटाच्या सदस्य असलेल्या महिलांकडून भारतातील पहिले संपूर्णपणे महिलाकडून संचालित ईट राईट स्ट्रीट फूड हबसुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 मे रोजी माहिम येथे आयोजित करण्यात आला. राज्यमंत्री श्री. कदम यांच्याहस्ते महिला स्वयं सहायता गटांच्या एकूण 153 महिलांना  प्रमाणपत्रे  प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकरबृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न)  मंगेश माने उपस्थित होते.

येथील महिलांकडून तयार अन्नपदार्थ हे फक्त स्वच्छ व चविष्ट नसून त्यामध्ये  कोकणची पारंपरिक खाद्य संस्कृती खोलवर रुजलेले असल्याचे सांगत राज्यमंत्री कदम यांनी स्वयं सहायता गटांच्या सर्व महिलांचे स्वच्छतेची उच्च मानके राखल्याबद्दल गौरवोद्गार काढले. माहिम सीफूड प्लाझामधील खाद्यपदार्थ स्टॉल्सना राज्यमंत्री श्री. कदम यांनी भेटी दिल्या.  तसेच अस्सल कोळी पदार्थांचा आस्वाद घेत महिला उद्योजकांशी संवाद साधला.

माहिम सीफूड प्लाझा दर बुधवारशुक्रवारशनिवार आणि रविवार सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतो. स्वयं सहायता महिला बचत गटाच्या 153 महिलांद्वारे पूर्णपणे व्यवस्थापितप्रत्येक स्टॉलवर कठोर स्वच्छता नियमांचे पालन केले जाते. येथील महिलांनी ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहेज्यामध्ये ऑडिट आणि तपासणीद्वारे अन्न सुरक्षा मानकांचे संपूर्ण पालन सुनिश्चित केले जातात.

राज्यमंत्री श्री.कदम यांनी यावेळी हबच्या यशस्वी प्रमाणीकरणासाठी योगदान दिलेल्या प्रमुख व्यक्तींना देखील सन्मानित केले. ज्यामध्ये बीएमसी जी-उत्तर वॉर्डचे समुदाय संघटक दक्षिता पवार आणि अनिकेत पाटेरेसमुदाय विकास अधिकारी अनिकेत पाच्छरकर आणि अजिंक्य पाच्छरकरसहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

0000

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू App सुरू करणार; सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत ४० हून अधिक विद्यमान IT App समाविष्ट करण्यात येणार

 निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू App सुरू करणार;

सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत

४० हून अधिक विद्यमान IT App समाविष्ट करण्यात येणार

 

 

मुंबई, दि. ४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीनवापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे. हे नवीन ‘ECINET’ नावाचे एकाच ठिकाणी सेवा देणारे व्यासपीठ आयोगाच्या ४० हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सचे एकत्रीकरण व पुनर्रचना करणारे ॲप असेल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ECINET मध्ये आकर्षक युजर इंटरफेस (UI) आणि सोपी युजर एक्सपीरियन्स (UX) असेलजे सर्व निवडणूक संबंधित सेवांसाठी एकच व्यासपीठ पुरवेल. अनेक अ‍ॅप डाऊनलोड करणेवेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवणे यांचा त्रास यामुळे कमी होईल.

हा उपक्रम मार्च २०२५ मध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकार झाला. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते.

ECINET वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवरून संबंधित निवडणूक माहिती पाहण्याची सुविधा देईल. ही माहिती अधिक अचूक राहण्यासाठी केवळ अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांद्वारेच ती प्रविष्ट केली जाईल. अधिकाऱ्यांकडून माहिती प्रविष्ट केल्यामुळे ती विश्वसनीय राहील. मात्रकोणताही वाद निर्माण झाल्यासअधिकृत फॉर्ममध्ये भरलेली प्राथमिक माहिती ग्राह्य धरली जाईल.

ECINET मध्ये मतदार सहाय्य अ‍ॅपमतदान टक्केवारी अ‍ॅप, CVIGIL, सुविधा २.०, ESMS, सक्षम आणि KYC अ‍ॅप यांचा समावेश असेलजे मिळून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. ECINET मुळे जवळपास १०० कोटी मतदार व निवडणूक यंत्रणेतील सुमारे १०.५ लाख बूथ स्तर अधिकारी (BLOs), सुमारे १५ लाख राजकीय पक्षांचे बूथ स्तर प्रतिनिधी (BLAs), ४५ लाख मतदान कर्मचारी१५,५९७ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), ,१२३ मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) यांना फायदा होणार आहे.

ECINET ची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे आणि सुलभ वापरसुरळीत कार्यक्षमता व मजबूत सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर चाचण्या घेतल्या जात आहेत. हे व्यासपीठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ३६ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनत्यांच्यातील ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी व ४,१२३ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर आणि निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी प्रसिद्ध ७६ प्रकाशनांतील ९,००० पानांची तपासणी करून विकसित करण्यात येत आहे.

ECINET द्वारे पुरवण्यात येणारा डेटा लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० व १९५१मतदार नोंदणी अधिनियम १९६०निवडणूक संचालन नियम १९६१ व भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या कायदेशीर चौकटीतच राहील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

Featured post

Lakshvedhi