Sunday, 4 May 2025

सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

 सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची

- रिची मेहता

‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र

 

मुंबई, दि. ४ : सिनेमामध्ये एखाद्या  विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असतेअसे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता मध्ये बोलत होते.

 

रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानकविषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटककाल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकतासत्यता ही ठळकपणे  बघणाऱ्यांच्या लक्षात येते,  हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटनाप्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे.

 

सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो.  सिनेमामध्ये विषयपात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक  सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते  वेगळ्या पद्धतीने येतातदोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतोअसे रिची मेहता यांनी सांगितले.

 

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे

 समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने

स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे

 

मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएसंर्सने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

             बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५  दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

 यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती  एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचनानियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजेअसेही त्यांनी सांगितले.

शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजेअसेही यावेळी सांगितले.

विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख  विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून  सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करतायोग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेतअसेही त्यांनी सांगितले.

तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेतत्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहेअसे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

 

मुंबईदि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटअर्थात 'वेव्हज् २०२५या जागतिक परिषदेच्या निमित्ताने लोकराज्य’ आणि महाराष्ट्र अहेडच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्हजपरिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूसिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्यचे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डेसंचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळेउपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

 

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  'वेव्हज'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

 

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनासिंहस्थ कुंभमेळाअन्नसुरक्षाजलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास

 वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास

 

मुंबईदि. २ :- जिओ वर्ल्ड सेंटर येथील दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) २०२५ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अल्लू अर्जुन मंचावर येताच या स्वप्ननगरीत चैतन्य सळसळले. टीव्ही  नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सूत्रसंचालन केलेले 'टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्सहे बहुप्रतिक्षित 'परस्परसंवादीसत्र प्रसिद्धीचे वलयअस्तित्व आणि चैतन्य या विषयातील एक हृदयस्पर्शी मास्टरक्लास बनले.

 

कथाकथनात भारताच्या वाढत्या जागतिक कथनतंत्रातील दीपस्तंभ म्हणून अल्लू अर्जुन यांनी या शिखर परिषदेचे कौतुक केले. "भारताकडे नेहमीच चैतन्य होते. आताआपल्याकडे वेव्ह्ज मंच आहे," याकडे त्यांनी लक्ष वेधताना "वेव्हज भारतासाठी सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी एक संधी असेल" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्याने सहा महिन्यांच्या विश्रांती घेण्यास  भाग पडलेल्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताचा उल्लेख केल्याने हे संभाषण अधिक भावनिक झाले. "तो विराम हा एक आशीर्वाद होता," हे नमूद करताना ते म्हणाले, "यामुळे मी माझी दृष्टी धाडसाकडून मतितार्थाकडे वळवली. मला जाणवले की स्नायू कमजोर होत असतानाप्रभुत्व वाढले पाहिजे. अभिनय ही माझी नवीन सीमा बनली."

 

त्यांनी दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबतच्या आगामी प्रकल्पाची माहिती दिली आणि त्याला "भारतीय भावनेत रुजलेला दृश्य देखावा" असे संबोधले. "आम्ही आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा देशी चैतन्याशी मिलाफ करत भारतासाठी आणि भारताकडून जगासाठी एक चित्रपट देत आहोत," असे सांगताना त्यांच्या डोळ्यात उत्कटता दिसली.

 

या संभाषणात निरंतर विकसित होणाऱ्या उद्योगात तग धरून राहण्याच्या आव्हानांचाही समावेश होता. "प्रत्येक भाषेत प्रतिभावान तरुण कलाकार उदयास येत आहेत. प्रामाणिक राहिले पाहिजेकामाबाबत आस असली पाहिजे आणि अष्टपैलू असले पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. "हा फक्त एक उद्योग नाहीतर सर्जनशीलतालवचिकता आणि उत्क्रांतीची युद्धभूमी आहे" असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

त्यांच्या जीवनाविषयी ते माहिती सांगताना उपस्थितांचा श्वास रोखला. अर्जुन यांनी त्यांच्या  कुटुंबातील आजोबा अल्लू रामलिंगय्यावडील आणि निर्माता अल्लू अरविंद आणि काका आणि आजीवन प्रेरणास्थान चिरंजीवी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "मी स्वतः घडलेलो नाही" हे कबूल करताना "मी माझ्या सभोवतालच्या लोकांच्या मार्गदर्शनानेपाठिंब्याने आणि महानतेने घडलो. मी भाग्यवान आहे" असे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

त्यांच्या ऊर्जेविषयी विचारले असताते म्हणाले की हे सर्व चाहत्यांसाठी आहे. "जेव्हा दिवे मंद होतात आणि टाळ्यांचा कडकडाट कमी होतोतेव्हा तुम्हीच मला उचलता. तुम्हीच मला आठवण करून देता की मी हे का करतो. माझी ऊर्जा... तुम्हीच आहात."

 

ईशान्य भारतात सिनेमाची 'आव्हाने आणि भवितव्य' विषयावरील चर्चेत आसाममधील चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी ईशान्य भारत हे प्रतिभेचे भांडार -

 ईशान्य भारतात सिनेमाची 'आव्हाने आणि भवितव्यविषयावरील चर्चेत

आसाममधील चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी

ईशान्य भारत हे प्रतिभेचे भांडार - जानू बारुआ

आसामला आपल्या चित्रपटांना चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी मंचांची गरज - जतीन बोरा

 

मुंबई, 1 मे 2025 :-मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित  जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या "ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य" या शीर्षकाखाली पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.

 

या पॅनेलमध्ये जानू बरुआजतीन बोरारवी शर्माऐमी बरुआहाओबम पाबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांच्यासारखे नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा समावेश होता, सर्वांनीच ईशान्येतील चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

या चर्चेत या प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांना भेडसावणाऱ्या  अपुऱ्या उत्पादन पायाभूत सुविधाभाषिक अडथळेमर्यादित बाजारपेठ उपलब्धता आणि संस्थात्मक पाठबळाचा अभाव यांच्यासह अनेक समस्यांवर विशेष भर देण्यात आला. या अडचणी असूनहीपॅनेल सदस्यांनी ईशान्य भारत चित्रपट निर्मितीतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक कथाकथनासाठी एक सुपीक भूमी असल्याबाबत सहमती व्यक्त केली.

 

ईशान्य भारत म्हणजे प्रतिभेचे भांडार असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते जानू बारुआ यांनी व्यक्त केले. या प्रदेशातील चित्रपट निर्माते उल्लेखनीय निर्मिती करत आहेत. या प्रदेशातील सांस्कृतिक गुंफण आणि अकथित कथांच्या विपुलतेवर त्यांनी भर दिला. अनेक युवा प्रतिभांचा उदय होत असल्याने ईशान्येकडील सिनेमाचे भवितव्य उज्ज्वल आहेअसे त्यांनी नमूद केले.

 

ईशान्येकडील चित्रपटांची प्रादेशिक सीमांच्या पलीकडे असलेली मर्यादित पोहोच आसाममधील लोकप्रिय अभिनेते जतीन बोरा यांनी अधोरेखित केली. डिजिटल वितरणाच्या गरजेवर ते म्हणाले, "आसामला आपल्या चित्रपटांना अधिक चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गरज आहे." त्यांनी प्रादेशिक चित्रपटांना अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यात मदत करण्यासाठी अशा मंचांच्या निर्मितीला पाठिंबा देण्याचे आवाहन सरकारला केले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही प्रादेशिक चित्रपट परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले आणि मजबूत वितरण नेटवर्कशिवायसर्वोत्कृष्ट चित्रपटदेखील राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी संघर्ष करतात असे सांगितले.

 

रवी सरमा यांनी या प्रदेशातील सर्जनशील पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची तातडीची गरज असल्याचे सांगितले. प्रादेशिक उद्योगाच्या वाढीसाठी आर्थिक पाठबळ आणि विपणन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ईशान्येकडे लाखो सुंदर आणि अद्वितीय कथा आहेतअसे ते म्हणाले.

 

अभिनेत्री-दिग्दर्शिका ऐमी बरुआ यांनी भाषिक विविधता जपण्यामध्ये  सिनेमा महत्वाची  भूमिका बजावतो असे सांगितले.. "आपल्या भाषांना शतकानुशतकांचा मौखिक इतिहास आहे. चित्रपट हे त्यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे," असे त्यांनी नमूद केले.

 

चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांनी या प्रदेशातील तळागाळातील चित्रपट निर्मितीबद्दल माहिती दिली. अनेक कथाकार आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असल्याचे सांगितले.

 

पॅनेल सदस्यांनी पारंपरिक अडथळे दूर करण्यासाठी धोरणात्मक सुधारणाप्रादेशिक सहकार्य आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा धोरणात्मक वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व भागधारकसरकारी संस्थाखागी गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय स्टुडिओना ईशान्य भारतातील चित्रपटसृष्टीची हा ऐकण्याचे आणि त्यांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

0000

महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी बायकॉन कंपनीस राज्य शासन सहकार्य करेल

 महाराष्ट्रात गुंतवणूकसाठी बायकॉन कंपनीस

राज्य शासन सहकार्य करेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २ : औषध निर्मिती  प्रकल्पाच्या माध्यमातून  बायकॉन लिमिटेड  महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहेही स्वागतार्ह बाब असून यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले .

 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित  "वेव्हज २०२५  दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये "बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा  श्रीमती किरण शॉ मुजुमदार यांच्या समवेत आयोजित भेटी  दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य शासनाचे अधिकारी  बायकॉन व्यवस्थापन समितीसोबत प्राथमिक चर्चा करतील. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने बायकॉनला सर्व सहकार्य करण्यात येईल,  असे सांगितले.

 

यावेळी औषध उत्पादन निर्मि मध्ये बायकॉन गुंतवणूक करायला उत्सुक आहे. इन्सुलिन निर्मिती मध्ये लवकरच बायकॉन जगातील अव्वल कंपनी होणार आहे. या दृष्टीने बायकॉनला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असून पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्याचे किरण शॉ मुजुमदार यांनी सांगितले

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी ‘सिडको’चा करार

 युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी सिडकोचा करार

सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.

उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस’ आणि गोदरेज’ यांच्यासोबत करार

उद्योग विभाग आणि प्राईम फोकस’ तसेच गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले.

 ‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल.

तर गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) 600 रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प 2027 मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये 1900 रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा 2030 पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 2500 रोजगार निर्मिती होईल.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन यांनीप्राईम फोकसच्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी तर गोदरेज च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली.

Featured post

Lakshvedhi