Sunday, 4 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार ---- परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

----

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता

एज्यू सिटीच्या माध्यमातून पूर्ण होईल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २ :- सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय  चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतीलअसेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगनसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेजगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहेनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेप्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वासगुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये गोदरेजचे नाव अग्रगण्य आहे. गोदरेज कडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक

 भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. २ : भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेला बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विस्तारीत करत असताना स्पॉटीफायसारखी संगीत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी निश्चितच सहाय्यक ठरणार असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित "वेव्हज २०२५  दृकश्राव्य मनोरंजन समिट " मध्ये स्पॉटीफाय ग्लोबलच्या मुख्य सार्वजनिक व्यवहार अधिकारी आणि व्यवसाय अधिकारी डस्टी जेनकिन्स यांच्यासोबत स्पॉटीफाय इंडियाच्या एमडी अमरजित सिंग बत्रा आणि गव्हर्नमेंट अफेयर्स इंडियाच्या संचालक विनीता दीक्षित यांची भेट घेतलीत्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ पी.अनबळगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासुमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आणि  संबंधित अन्य  अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीस्पॉटीफायने संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. भारतीय संगीत आणि कलाकारांना विस्तृत व्यावसायिक व्यासपीठाची संधी स्पॉटीफाय सोबत प्राप्त होईल,ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 डस्टी जेनकिन्स म्हणाल्या कीस्पॉटिफाय गेली सहा वर्षे भारतात कार्यरत आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि आम्ही येथील समृद्ध संगीत परंपरेशी आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

गेल्या वर्षी स्पॉटिफायने जागतिक स्तरावर संगीत उद्योगाला १० अब्ज अमेरिकी डॉलर वितरित केले. जसे आपण ऑलिंपिकमध्ये खेळाडूंना स्टार्सप्रमाणे गौरवतोतसेच आम्हाला भारतातील संगीत कलाकारांसाठीही असा आदर आणि ओळख निर्माण करायची आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला विविध माध्यमातून पाठिंबा दिला आहे आणि आम्ही ही भागीदारी भविष्यातही सुरू ठेवू इच्छितोअसे सांगून डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की,  लोकांमध्ये असा समज आहे की टेलर स्विफ्ट स्पॉटिफायवर सर्वात जास्त फॉलो केलेली कलाकार आहे. मात्रखरे पाहता भारताचा अरिजीत सिंग हा स्पॉटिफायवर सर्वाधिक फॉलो केलेला कलाकार आहे – हे भारतीय संगीताच्या जागतिक प्रभावाचे उदाहरण आहे.

तसेच भारत सरकार कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून 'इज ऑफ डुइंग बिझनेससुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे. भारतीय संगीताचा जागतिक स्तरावर गौरव व्हावाअशी इच्छा असल्याचे  डस्टी जेनकिन्स यांनी यावेळी सांगितले.

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 

मुंबईदि. २ : सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज परिषदेदरम्यान सदिच्छा भेट घेतली.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेक्रिएटिव्ह उद्योगांतर्गत येणाऱ्या गेमिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गेमिंगबाबतची बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सौदीबरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत.  गेमिंग आणि ई-स्पोर्ट संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून या क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन प्रिन्स फैसल बिन बदर बिन सुलतान अल सऊद यांनी सौदीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. सौदीच्या विकासात ई-स्पोर्ट आणि सॅव्ही गेम यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई देशांमध्ये गेमिंगचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात महाराष्ट्रासोबत काम करण्यास सौदी उत्सुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

वेव्हज २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

 वेव्हज २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह

साहससमानतेचा उत्सव

 

        मुंबईदि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठीएकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने  उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्‍यमांची भूमिका महत्त्वाची आहेकारण हे माध्‍यम  महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतोअसेही त्यांनी सांगितले.

बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये "प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात एका कथेची नवीन पटकथा लिहिणे " या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोनइटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली  बियांका बाल्टीमाजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.

रोना-ली शिमोन यांनी सांगितले कीचित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावेधैर्याने व  एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाहीतर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.

एरिअन हिंगस्ट हिने  पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला  प्रवास सांगितला.  लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्‍यमांकडून मिळणारी कमी प्रसिध्‍दी  आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावतमहिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसेयामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.


फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान,एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी

 एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी

नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार

 

मुंबईदि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीवेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

वेव्हज परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार  (MoUs) केलेले आहेत. यामध्ये  सगळ्यात महत्त्वाचाएनएसईने (NSE) वेव्हज निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्याया दृकश्राव्य  क्षेत्रातल्या आहेतया कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार  केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीनवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गतपरदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत.  त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे.  देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस  नवी मुंबईमध्ये  सुरू होत आहे.

यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहेज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहेज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल.  ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.

 पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान

फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचेमात्र जे लोकं जाऊ शकत नाहीतत्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेलतर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्सकंटेंट वापरआपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळेहे शक्य झाले आहे आणि मुंबईही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पॅव्हेलियनला भेट दिली

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पॅव्हेलियनला भेट दिली

 

मुंबईदि. १ : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज - २०२५ जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

 

 भारत पॅव्हेलियनमध्ये  हरियाणापंजाबराजस्थानमध्यप्रदेशआंध्र प्रदेशतेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. याशिवाय करमणूक  क्षेत्रातील नेटफ्लिक्सजिओयू ट्यूबमेटा,स्टार्टअप,  विविध मनोरंजन  आणि वृत्त वाहिन्याचित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत .

 

सर्जनशीलतासुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

 यावेळी श्री.फडणवीस यांनी विविध पॅव्हेलियनला भेट देऊन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

Making India AI Ready माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत


Making India AI Ready

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती;

‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

 

मुंबईदि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

 

             वेव्हज परिषदेत वेव्हज एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले.

 

            ‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले कीया माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.

 

             ‘एआय’ तंत्रज्ञानरिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सदर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi