Sunday, 4 May 2025

सामजिक भावना आणि विचार मांडण्याचे लघुपट हे प्रभावी माध्यम

 सामजिक भावना आणि विचार मांडण्याचे लघुपट हे प्रभावी माध्यम

- दिग्दर्शक वयाचेच्लाव गुज़

·         ‘Connecting Creators, Connecting Countries’ चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : लघुपट हे मनोरंजनाचे माध्यम नाही तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावी मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे,असे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक वयाचेच्लाव गुज़ यांनी व्यक्त केले.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘Connecting Creators, Connecting Countries’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

 

श्री. गुज़ म्हणालेसामजिक जीवनात आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्येकाच्या मनात एक लघुपट (शॉर्ट फिल्म) तयार असतोफक्त त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज असते. डिजिटल माध्यमामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली  आहे.आजच्या तरुण कलावंतांमध्ये लघुपट निर्मितीकडे अधिक कल वाढला आहे. लघुपटाचे यश विषयापेक्षा त्यामागील भावना आणि आशय प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात असते असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले.

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम

 कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून

समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम

-  माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन

·         आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन

 

मुंबईदि. ३ : समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावेअसे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

मुंबईत सुरू असलेल्या 'वेव्हज २०२५या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूसहसचिव पृथुल कुमारइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशनप्रमोटिंग लोकल कल्चरसस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

माहिती व प्रसारण राज्यमंत्री श्री मुरुगन म्हणालेकम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजाच्या भावनातेथील संस्कृतीकलासाहित्यखानपान यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. वेव्हजच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून माहिती व मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरणसंस्कृतीवर्धनग्रामीण विकासासाठी काम होत आहे याचे समाधान वाटते. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेतअसे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यानंतर कम्युनिटी रेडिओशी संबंधित विविध विषयांवर दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या आर्थिकदृष्ट्या विकासाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये देशातील विविध विद्यापीठातील विषयतज्ज्ञांनी तसेच विविध कम्युनिटी रेडिओच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

----- ०००-----

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल - डिबेरा रिचर्ड्स · टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल विषयावर परिसंवाद

 स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती

जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल

- डिबेरा रिचर्ड्स

·         टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल विषयावर परिसंवाद

 

मुंबई, दि. ३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्वाची बाब आहे.त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर  प्रभावशाली  ठरतेअसे मत  ज्येष्ठ निर्मितीतज्ञ श्रीमती डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित "वेव्हज २०२५दृकश्राव्य मनोरंजन समिट"मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात श्रीमती रिचर्ड्स बोलत होत्या.  या परिसंवादात केलेय डेकेवीन वज्झडिबेरा रिचर्ड्स ,केयटीलीन यार्नलजस्टीन वाररोके हे तज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.

"मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील  अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रमरोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

 यामध्ये प्रामुख्याने  ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहेअसे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी,  किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतीलऐकतील, यामध्ये महत्वाची ठरणारी गोष्ट आहे ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जाकारण आशय जितका‌ आकर्षकउपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईलत्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईलत्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे मत व्यक्त झाले.

त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडीगरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे आवश्यक आहे. याठिकाणी हे ठळकपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे की स्थानिक पातळीवर जे प्रभावीलक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ञांनी व्यक्त केले.

‘आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

 वृत्त क्रमांक : ६१

‘आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात

भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. 3 :- भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेतमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानेफिक्की आणि सीआयआयच्या सहकार्यानेकेवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला.

त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले कीतंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या  क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या नमुन्याचे अनुसरण करेल.

"चित्रपट आणि मनोरंजन विश्वात  पूर्णपणे नवीन असा उपक्रम सुरू करणे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनविण्याचा प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टिकोन असल्याचे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी  मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकासइंटर्नशिपशिष्यवृत्तीस्टार्टअपना  निधीपुरवठा  आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.

"या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, ही संस्था उभी करण्यात  आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की आयआयसीटी  (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करूजेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल ," असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब गुगल आणि युट्युब मेटा वाकॉममायक्रोसॉफ्ट  आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA)  यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक  मीडिया अँड एंटरटेनमेंटएनव्हीडिया)संजोग गुप्ता (सीईओस्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेसजिओ स्टार)माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशनअ‍ॅडोब)प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्षगुगल इंडिया)राजीव मलिक (वरिष्ठ संचालकवॅकॉम)संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुखराज्य सरकार आणि आरोग्यसेवा)संदीप बांदीवडेकर (संचालकमेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्समायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालकसार्वजनिक धोरणमेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे  सदस्य आणि नियामक परिषदेचे  सदस्य आशिष कुलकर्णीबिरेन घोषमानवेंद्र शुकुलमुंजाल श्रॉफचैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित  होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्करआयआयसीटीचे सीईओ  निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.

या सत्रादरम्यानआयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टारअ‍ॅडोबगुगलयूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या  जागतिक उद्योग कंपन्यांचा  समावेश होता.

अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्सचित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षणसंशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूआणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.

0000

तंत्रज्ञान, कायदा आणि जागरूकता यांच्या संयोगातून पायरसी विरोधात एकत्रित कारवाई करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

 तंत्रज्ञानकायदा आणि जागरूकता यांच्या संयोगातून

पायरसी विरोधात एकत्रित कारवाई करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

·         "पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण" विषयावर चर्चासत्र

 

मुंबई3 :- वेव्हज 2025 मध्ये, "पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण" या विषयावरील चर्चेत आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी पायरसी एक सीमांत चिंता नव्हे तर समन्वितबहुआयामी प्रतिसादांची आवश्यकता असलेला मुख्य प्रवाहातील धोका असल्याचे मत व्यक्त केले.

मीडिया पार्टनर्स आशियाचे व्यवस्थापकीय आणि कार्यकारी संचालक विवेक कौटो यांनी अनियंत्रित पायरसीमुळे होणारे आर्थिक नुकसान यावर मत मांडले. "ऑनलाइन पायरसीमुळे उद्योगाला 2025 ते 2029 दरम्यान 10% पेक्षा जास्त महसूल गमावावा लागेल अशी शक्यता आहे. "परंतु पायरसी विरोधी प्रभावी अंमलबजावणी केल्यास कायदेशीर व्हिडिओ सेवा वापरकर्त्यांमध्ये 25% तर आशय सामग्री गुंतवणुकीत 0.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊ शकतेज्यामुळे 2029 पर्यंत एकूण मूल्य 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल." विशेषतः भारताची डिजिटल व्हिडीओ अर्थव्यवस्था वाढत असताना त्यांनी हितधारकांना पायरसी संरक्षणापासून संभाव्यतेपर्यंत सर्व शक्यता पुन्हा मांडण्याचे आवाहन केले.

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सच्या सहयोगी संचालक डॉ. श्रुती मंत्री यांनी डिजिटल पायरसी आणि सायबर क्राइम यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. "पायरेसीत अनेकदा ट्रोजनरॅन्समवेअर आणि स्पायवेअर सारख्या द्वेषयुक्त साधनांचा समावेश असतो. खास करून 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते असुरक्षित असतात," असे त्यांनी निदर्शनास आणले. प्रतिबंधाची सुरवात माहितगार ग्राहकांपासून झाली पाहिजे हे नमूद करून त्यांनी व्यापक जनजागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आवाहन केले. त्यांनी 9-10 जुलै रोजी सीबीआय आणि इंटरपोलच्या सहकार्याने आयएसबी द्वारे आयोजित डिजिटल पायरसी विरोधी शिखर परिषदेची घोषणा देखील केली.

डॅझन (DAZN) च्या पायरसीप्रतिबंधक कार्य विभागाचे प्रमुख अनुराग कश्यप म्हणाले की, रणनीती डिटेक्शनडिस्रप्शन आणि डिटरन्स या  तीन ‘D’ वर म्हणजेच शोधअडथळा आणि प्रतिबंध या तीन गोष्टीवर आधारित आहे. आम्ही थेट कार्यक्रम होण्यापूर्वीच अंमलबजावणी सुरू करतो. अदृश्य वॉटरमार्किंग लीक शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतेअसेही त्यांनी पुढे नमूद केले.

जिओ हॉटस्टारचे लीगल प्रमुख आणि या  कायद्याशी संबंधित बाबींचे तज्ज्ञ अनिल लाळे यांनी कठोर अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले. "सर्वात मोठा प्रतिबंधक उपाय म्हणजे म्हणजे पायरसी करणाऱ्यांवर खटला चालवणे. कायद्याच्या अंमलबजावणीत नेमकी फट कुठे आहे हे ओळखणे आवश्यक असून वरवरची कारवाई करणे थांबवले पाहिजे," ते म्हणाले. प्रतिबंध हा प्रतिक्रियात्मक ऐवजी सक्रियपणे करणे आवश्यक आहेअसे त्यांनी सांगितले.

आनंद अँड आनंद असोसिएट्सचे प्रवीण आनंद यांनीतंत्रज्ञान आणि न्यायिक सुधारणा या दोन्हीमध्ये उपाय त्यावर आहेयावर मुद्द्यावर भर दिला.  "एआयब्लॉकचेन आणि वॉटरमार्किंग सारखी साधने महत्त्वपूर्ण आहेत. परंतु मेटल डिटेक्टर सारख्या उपायांसह कॅमकॉर्डिंग करणे कठीण होईल असे देखील करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी वेळीच कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे," ते म्हणाले.

परिसंवादातील सहभागी वक्त्यांनी. तंत्रज्ञानकायदेअंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सार्वजनिक जागरूकता डिजिटल आशयाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करणारी संयुक्त आघाडी तयार करण्याच्या गरजेबाबत सहमती व्यक्त केली. WAVES 2025मध्ये अशा चर्चांद्वारेमीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अशा महत्त्वाच्या समस्यांवर करण्याजोग्या उपायांवर प्रकाश टाकला जात आहे.

0000

गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळात डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल · ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर

 गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळात

डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल

·         बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र

 

मुंबई दि. ३ :- गेमिंग हे करमणुकीचे  माध्यम आहे. मनोरंजनासोबतगेमिंग आता केवळ करमणूक नसून डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरत आल्याचे मत वेव्हज २०२५ मध्ये आयोजित वेव्हजएक्स या चर्चासत्रात मान्यवर  तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५  समिटमध्ये वेव्हजएक्समध्ये ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ञ दीपेन पारीखओथमान अलहोकैल (othman alhokail), शिवानंद पारे यांनी सहभाग घेतला.

गेमिंग हे आता केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाहीतर ते जगातील सर्वात प्रभावशाली  कंटेंट फॉर्म बनले आहे. भारतातही गेमिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे.भारतात सध्या ५० कोटींपेक्षा अधिक मोबाईल गेमर्स आहेत. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गेमिंगमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे.

UPI मुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचे युग सुरु झाले आहे. डिजिटल परिवर्तनात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली असून UPI मुळे डिजिटल व्यवहार सुलभ झाला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आता डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होत आहे.

भारत हा गेमिंग उद्योगासाठी एक अतुलनीय संधी आहे. भारतात उच्च कार्यक्षमतेचे स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे सर्व घटक उत्कृष्ट गेम डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार होणारे गेम्स जागतिक स्तरावरही लोकप्रिय होतील  असे मत चर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.


जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा

 वृत्त क्रमांक : ६४

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत

फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा

 

मुंबई दि. ३ : जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज" स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

 

डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स 'क्रिएटोस्फेअर्स'मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी२ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

 

हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियापुणे)

रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्टदिल्ली विद्यापीठ)

कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटीपंजाब)

 

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)

रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता)

कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)

 

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि म्युसेओकॅमेराचे संस्थापक संचालक आदित्य आर्यप्रिंटमेकरचे उपप्राचार्य आनंदमॉय बॅनर्जी यांनी तर हँड-पेंटेड पोस्टर्स स्पर्धेसाठी चित्रपट निर्माते आणि व्हिसलिंग वूड्सचे प्राध्यापक शरद राज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 

Featured post

Lakshvedhi