Thursday, 1 May 2025

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; दि ५ मे रोजी फेर परीक्षा होणार राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून खुलासा

 एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी;

दि ५ मे रोजी फेर परीक्षा होणार

राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून खुलासा

 

मुंबई, दि. ३० : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

त्यामुळे या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दि. ५ मे २०२५ रोजी होणार आहेअशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४,२५,५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. २७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजीमराठी व उर्दू माध्यमांतून एकूण 27837 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने  तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता२१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून 27837 उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावीअसे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.


लालबाग येथे घुमणार ढोल ताशाचा आवाज महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल पथकांच्या सादरीकरणाचा ढोल गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम

 लालबाग येथे घुमणार ढोल ताशाचा आवाज

महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल पथकांच्या सादरीकरणाचा

ढोल गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम

 

मुंबई दि. ३० : महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाचा ढोलगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम दि१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते १०:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडलालबागमुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमात राज्यभरातून दहा विविध ढोल ताशांचे पथक आपली कला सादरीकरण करतील. महिला पथकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

    ढोल गर्जना या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा आढाव

 अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला आढावा

 

मुंबई, दि. 30 : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

 

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या कीमौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा. जैन आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाअंतर्गत कर्जासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करून देण्यात यावी.  कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात यावे. कर्ज वसुली संदर्भात धोरण आखण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तक्रारींसाठी १८२२५७८६ हा टोल फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचवावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिली.

 

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हाजी जात असून त्यांच्या प्रवासाचे नियोजनसोयी सुविधा आणि सुरक्षिततेची सोय करावी अशा सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.

 

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती महाराष्ट्र शासन सोबत काम करणार

 मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाव्यक्ती

महाराष्ट्र शासन सोबत काम करणार

सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांची माहिती

 

मुंबईदि. 30 : मानसिक आरोग्य क्षेत्रात मूलभूत सुधारणांची गरज लक्षात घेता शासन आता या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक आणि सचिव विरेंद्र सिंह यांनी सांगितले. मानसिक आरोग्य यासंदर्भात जी. टी. रुग्णालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

            यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधीमानसोपचारतज्ज्ञअधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध विभागातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

प्राथमिक आणि सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज व्यक्त करून सचिव निपूण विनायक म्हणाले कीराष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाशी जोडून राज्य शासन मूल्यमापन करण्याचे काम करणार आहे. तसेच या क्षेत्रात क्षमता बांधणी महत्वाची असून त्यामध्ये शिक्षकपोलीस यांच्यासह शासकीय मानसोपचार तज्ज्ञ यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलेपरीक्षार्थी विद्यार्थीयुवक यांच्यासह समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांसाठी मानसिक आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सचिव विनायक यांनी सांगितले.

 

             बैठकीमध्ये शासकीय रुग्णालयमानसोपचार केंद्रपुनर्वसन केंद्रसंस्थाना येणाऱ्या विविध अडचणी शासकीय पुनर्वसन केंद्र उभारणेमनोरुग्णालयांचा दर्जा सुधारणे यासह शासकीय संस्थांमधील कर्मचारीनर्सेस व इतर स्टाफ यांच्या प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या प्राथमिक स्तरावर सोडवण्याविषयीही चर्चा करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून

स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली

                                           - राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिकसामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ कायदेशीर सुधारणा नव्हेतर समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली,  असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेले अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे नुकतेच करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक  म्हणून राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.  चर्चासत्रात माजी आमदार भाई गिरकरमाजी खासदार मनोज कोटकबार्टीचे महासंचालक  सुनिल वारेॲङ माधवी नाईकडॉ. मेधा सोमय्या आणि  रश्मी जाधव उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या कीडॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक व्यक्ती नव्हे तर एक विचार होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे शोषितवंचितमागास आणि विशेषतः महिलांच्या हक्कासाठीचा संघर्ष होता. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली असून वारसा हक्कविवाहघटस्फोटपुनर्विवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.

बाबासाहेबांचे ठाम मत होते कीशिक्षित स्त्री म्हणजे परिवर्तनाची खरी शक्ती. आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला.  आज  स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रातप्रशासकीय सेवांमध्येसामाजिक चळवळीतव्यवसायात आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेतते केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टी आणि कार्यामुळेच आहे. या साऱ्या संघर्षातजिच्या मूक साथीनं बाबासाहेब आज बोधीसत्त्व ठरलेती म्हणजे माता रमाई. रमाईंचा त्यागत्यांची सहनशीलताबाबासाहेबांसाठी त्यांनी घेतलेली कष्टांची वाट हे सगळं आपल्याला विसरता येणार नाही, असेही श्रीमती. मिसाळ यांनी सांगितले.

राज्यशासन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना राबवत आहे. महिलांचे आर्थिकसामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे या सर्व योजनांचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला आज नव्या क्षितिजांकडे वाटचाल करत आहेत. पण अजूनही प्रवास पूर्ण झालेला नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितरित्या सलोख्याने काम करणे गरजेचे असल्याचेही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी प्रमुख वक्त्यांनी संविधानातील महिलांच्या हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत करण्यात आली. उद्घाटकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांविषयीच्या कार्याचा गौरव केला आणि संविधानामध्ये महिलांसाठी केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींबाबत प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन  योजना ठोकळे,  समिता कांबळे आणि  क्रांती कुंदर यांनी केले.  दरम्यान मी रमाई या नाट्यप्रयोगाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईंच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे प्रकाशन

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबईदि. २९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिकसमितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावेसदस्य योगीराज बागुलज.वि. पवारडॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

'जनताहे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० ते १९५६ पर्यंत प्रकाशित झाले होते. 'जनताहे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे ६ खंड प्रकाशित केले आहेत.

 

खंडांमध्ये काय असणार

 

'जनताखंड ७ - या खंडात १२ फेब्रुवारी १९३८ ते २८ जानेवारी १९३९ पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

'जनताखंड ८ - या खंडात ४ फेब्रुवारी १९३९ ते २७ जानेवारी १९४० पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

'जनताखंड ९ - या खंडात ३ फेब्रुवारी १९४० ते १ फेब्रुवारी १९४१पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.


उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा

 उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील 

वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार;

८ हजार ९०५ मेगावॅट वीज निर्मिती

 

मुंबई दि.२९ :- राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभागमहाजेनकोमहाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेतअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजलसंपदा ( विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन  मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणालेउदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील  वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेतीउद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल.  राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्यामहाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या  तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅटकोडाळी येथे २२० मेगावॅटवरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅटनिवे  येथे १२०० मेगावॅट आणि  येथे वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी.जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेमहानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि अभय हरणे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi