Wednesday, 30 April 2025

थायलेसेमिया मुक्तीसाठी ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान थायलेसेमिया मुक्तीसाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा

 थायलेसेमिया मुक्तीसाठी 

एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान

थायलेसेमिया मुक्तीसाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. 29 : थायलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृती ही सर्वात महत्वाची आहे. तसेच या आजाराविषयीच्या तपासण्याही होणे गरजेचे असल्याने थायलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा. तसेच या आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे अभियान’ 8 मे 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थायलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

 

            थायलेसेमिया रुग्णांचा राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ . महेंद्र केंद्रेअवर सचिव अविनाश जाधव यांच्यासह परभणीचे थायलेसेमिया प्रतिसाद केंद्राचे डॉ लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.  

            थायलेसेमिया हा एक अनुवंशिक अजार असून याविषयी पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीयासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे. या आजाराची कारणे आणि लक्षणे याविषयी लोकांना माहिती द्यावी. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी  आशा सेविकांना प्रशिक्षण द्यावे. राज्यात विविध विभागांचे समन्वयक नेमण्यात आलेले आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करावे. तसेच याविषयी केलेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यात यावा. गरोदर मातांची सिकलसेलसह थायलेसेमियाची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सीएसआर फंड मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सध्या अस्तित्वास असलेल्या 104 या टोल फ्रि कमांकावरही या आजाराविषयीची माहिती  व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, याकरिता संकेतस्थळ तयार करावेअशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.


पहलगाम आतंकवादी हमले में मृतकों के परिजनों को 50 लाख रुपये की आर्थिक सहायता –,जिन परिवारों में रोजगार की समस्या है, उन्हें सरकारी नौकरी देने का निर्णय

 पहलगाम आतंकवादी हमले में मृतकों के परिजनों को 50 लाख रुपये की आर्थिक सहायता

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की घोषणा

मंत्रिमंडल बैठक में श्रद्धांजलि अर्पण

 

मुंबई, 29 अप्रैल – जम्मू-कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले में मारे गए महाराष्ट्र के नागरिकों के परिजनों को राज्य सरकार की ओर से 50 लाख रुपये की आर्थिक सहायता दी जाएगी। यह घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज मंत्रिमंडल की बैठक में की। बैठक की शुरुआत में मृतकों को श्रद्धांजलि अर्पित की गई।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि राज्य सरकार मृतकों के परिजनों की शिक्षारोजगार और पुनर्वसन की दिशा में विशेष ध्यान देगी। उन्होंने स्पष्ट किया कि जिन परिवारों में रोजगार की समस्या हैउन्हें सरकारी नौकरी देने का निर्णय उन्होंने अपने विशेषाधिकार का उपयोग करते हुए लिया है।

मुख्यमंत्री ने जानकारी दी कि मृतकों में से जगदाळे परिवार की बेटी को सरकारी नौकरी देने का निर्णय एक दिन पूर्व ही लिया गया था।

000

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य,थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय

 पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना 

पन्नास लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली

 

मुंबईदि. २९ : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडेरोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहेत्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जाहीर केला होता.

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 वृत्त क्र. 1806

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

-  राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर

 

मुंबई29 : ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावाअसे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी केले.

 

निर्मल भवन येथे ऊर्जा विभागातर्फे २८ एप्रिल ते १२ मे२०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तयारीचा आढावा घेताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे - बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महावितरणचे उपसचिव नारायण कराडसह सचिव उद्धव डोईफोडेमुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे संचालक अरविंद बाधिकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि विद्युत निरीक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

सेवा पंधरवड्याची शपथ  विभागाच्या प्रत्येक कार्यालयात घेण्यात यावी. पंधरवड्याच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सोयीसुविधांनी सुसज्ज करावेजेणेकरून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी  वेळेत सोडवण्याची कार्यपद्धती अधिक प्रभावी करावीअसे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार

 परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार

– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर

 

मुंबईदि. 29 : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर नेता येईलअसे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी केले.

 

निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंचे संवर्धन व विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्रीमती साकोरे - बोर्डीकर यांनी घेतलात्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवीसहायक संचालक अमोल गोटे व दुरदृश्य प्रणालीद्वारे परभणी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

परभणी जिल्ह्यात असलेल्या सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावे. चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावे. तसेच धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा भूसंपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावेअशी सूचनाही राज्यमंत्री श्रीमती साकोरे - बोर्डीकर यांनी केली.

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा

 वृत्त क्र. 1808

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा

- मंत्री डॉ. अशोक वुईके

 

   मुंबईदि. 29 : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेअंतर्गत 5% थेट निधी पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशासाठी पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावेअसे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

  मंत्रालयात मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा 5% थेट निधीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेराज्य

पेसा संचालक शेखर सावंत तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  मंत्री डॉ. वुईके म्हणालेपेसा कायदा 24 डिसेंबर 1996 अस्तित्वात आला आणि महाराष्ट्र राज्याचे यासंदर्भातील नियम 2014 साली लागू करण्यात आले. विभागाच्या एकूण आदिवासी घटक योजना निधीपैकी ५% निधी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती होणे आवश्यक असून ग्रामपंचायत स्तरावरील पेसा समित्यांची पुनर्रचना करावी असे त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

या बैठकीत पेसा कायदा 1996 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पेसा नियमांची अंमलबजावणीतसेच पेसा 5% थेट निधी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणी प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.


मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार

 मुंबईत होणारी वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी दावोस’ ठरणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

 

मुंबईदि. २९ : मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

‘वेव्हज २०२५’ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव नविन सोनाउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.अन्बळगन पी.एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महतत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे.तसेच मीडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओजप्रोडक्शन हाऊसेसटेक कंपन्यांची भागीदारीची दारे खुली होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi