Monday, 28 April 2025

वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य

 विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल

                                               - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • वाढवण बंदरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार
  • पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई
  • बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य

 

मुंबईदि. 28 : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहे. त्यामध्ये रस्तेरेल्वेबुलेट ट्रेनजलमार्ग आदींसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या इकोसिस्टीम'मुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॉटेल फोर सीजन येथे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट - 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सीएनबीसी टीव्ही 18 वृत्तवाहिनीच्या संपादक शिरीन भान यांनी घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरू आहे. या ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. सागरी किनारा रस्ताअटल सेतूविविध मेट्रो मार्गांची कामे ही त्यातली ठळक उदाहरणे आहेत. या सर्व विकास कामांमुळे मुंबईत गुंतवणूक 50 बिलियन डॉलरपर्यंत जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणारे आहेत. यासोबतच पुणे येथील नवीन विमानतळशिर्डीनागपूर विमानतळाच विकासनदी जोड प्रकल्पबुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

सागरी किनारा रस्ता विरारपर्यंत वाढविण्यात येत आहे. वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टपेक्षा तीन पट मोठे आहे. या बंदराला प्रवेश नियंत्रित असलेल्या महामार्गाने नाशिकपर्यंत जोडण्यात येऊन पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. वाढवण बंदराजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच या परिसरात चौथ्या मुंबईचेही निर्माण करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी तसेच पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी धरण व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. यावर राज्य शासन काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाडा निश्चितच दुष्काळमुक्त होणार आहे. समृद्धी महामार्ग नंतर राज्यात नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे नेहमी भविष्यासाठी रेडी असणारे राज्य आहेअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री म्हणालेराज्यात गुंतवणूकदारांना सोयी सुविधा मिळण्यासाठी व गतीने गुंतवणूक येण्यासाठी इज ऑफ डुईंग बिजनेस मध्ये राज्य मोठी झेप घेत आहे. 2029 मध्ये महाराष्ट्र 'इज ऑफ डुईंग बिजनेसमध्ये पहिला असेल. गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना सिंगल विंडो सिस्टीममुळे उद्योग स्थापन करण्यास सुलभता येत आहे.

            दळणवळणाच्या सोयी सुविधांचा होणाऱ्या विकासामुळे राज्यात मालवाहतूक गतीने करण्यात येत आहे. नागपूरपर्यंत आठ तासांमध्ये जवाहरलाल नेहरू बंदरापासून जाता येते. वाढवण बंदरामुळे यामध्ये आणखी गतिमानता येणार आहे. नागपूर येथे कार्गो हब विकसित करण्यात आले आहे. यासोबतच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कार्गो हब विकसित करण्यात येत आहेअशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विकासाचा आलेख मांडला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच अटल सेतू यामुळे तिसरी मुंबई निर्माण होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणालेया भागात नवीन एज्युसिटी निर्माण करण्यात येत आहे. जगभरातील विविध नामांकित विद्यापीठे या परिसरात शैक्षणिक दालन उघडणार आहे. त्यासोबतच हेल्थ सिटीइनोवेशनन सिटीचे निर्माणही करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे कृषी क्षेत्राचे 16000 मेगावॅटची वीज पूर्णपणे सौर उर्जेवर निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात 21 टक्के राज्याची क्षमता असून 2030 पर्यंत ती 52 टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे 3000 रोहित्र सौर ऊर्जेवर आणण्यात आल्या आहे. सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी राज्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये महाराष्ट्र हे देशाची राजधानी आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न

 केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत

सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न

 

मुंबईदि. 28 : देशातील सागरी मासेमारीच्या संधीआव्हाने आणि समस्या या विषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे झाली. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसायपशुसंवर्धन व ग्रामविकास मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंह यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

            या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एस.पी.सिंग बाघेलकेद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री जॉर्ज कुरियनकर्नाटकचे मत्स्यव्यवसाय मंत्री मनकाला वैद्यआंध्रप्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री किनजारापू अत्चान नायडूगोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री निलकांत हालरनकरगुजरातचे मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तमभाई पटेलकेंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव अभिजित लिख्वीसह सचिव नितू प्रसाद आदींसह 9 राज्य व 4 केंद्रशासित प्रदेशातील मत्स्यव्यवसाय सचिवआयुक्तसंचालक व अधिकारी उपस्थित होते.

            केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव श्री लिख्वी यांनी बैठकीचे महत्व विषद करताना सांगितले कीदेश आज जगात मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसायाचा मोठा सहभाग आहे. तसेच निर्यातीमध्येही मत्स्यव्यवसाय आघाडीवर आहे. देशातील मत्स्योत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय असून त्यासाठी आजचही ही बैठक महत्वाची आहे. यावेळी सह सचिव श्रीमती प्रसाद यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देशाच्या मत्स्यव्यवसायाची माहिती सादर केली.

            या उद्घाटनप्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचादेशातील विविध राज्यातील मत्स्योत्पादक लाभार्थ्यांनालाभ देण्यात आला. त्यामध्ये टर्टल एक्स्लुडरचे वाटप 5 लाभार्थ्यांना करण्यात आले. वर्सोवाअंधेरी येथील देवेंद्र गजानन काळेपनवेल कोळीवाडा येथील किरन पांडुरंग भोईर यांना लाभ देण्यात आला. मासेमारी विमा योजनेचा लाभ 8 लाभार्थ्यांना देण्यात आला. क्लायमेट रेजिलेंट कोस्टल फिशिंग व्हिलेजचे प्रमाणपत्र अर्नाळाता. वसईजि. पालघर या गावास देण्यात आले. तर रणजीत काळेवर्सोवामुंबईसंतोष खंदारेमेढामालवणकांचन चोपडेकरमालवण यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. याशिवाय मच्छिमार सहकारी संस्था व मच्छिमार उत्पादक संस्थांचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच मलाड येथील राफ्टेक सोल्युशनव प्रा.लि. यांना उत्कृष्ट स्टार्टअप प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एफआयडीएफ अंतर्गत प्रकल्प असलेल्या जिलानी मरिन प्रोडक्टरत्नागिरीया फिश प्रक्रिया उद्योगासखोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौका तयार करण्यासाठी कुलाबामुंबई येथील राजू चौहान यांना आणि श्रीम्प हॅचरीज उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मंडन ॲक्वा फिशरीज सहकारी संस्थेस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध उपक्रमांची सुरुवातही करण्यात आली. त्यामध्ये सागरी मत्स्यगणनाटर्टल एक्स्लुडर योजनासागरी मत्स्यगणनेसाठी मत्स्यव्यवसाय विभागांना टॅबलेटचे वाटप यांचा समावेश आहे.

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार

 मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचे भव्य आयोजन;

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. २८ : मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असूनया कार्यक्रमाचे १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकरकेंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे.

उद्योग मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले कीमुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर हे मुंबईला म्हटले जाते.  भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक  दादासाहेब फाळके यांनी  याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई ही देशात अग्रगण्य शहर आहे. त्याचबरोबरगेल्या  तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई एक नंबरला राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावीहा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऔद्योगिक व पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेतत्या जागतिक पातळीवर जाव्यातयासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले कीया कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारीतसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडटॉलीवूडमराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियनमहाराष्ट्र पॅव्हेलियनतेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य  संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रांतील परिसंवादराउंड टेबल कॉन्फरन्सआणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

"हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऔद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे," असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

000

लोकसेवा हक्क अधिनियम हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना

 लोकसेवा हक्क अधिनियम हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीलोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने काम करायचे असते. लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असे आपण म्हणतो या वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आहे. हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे. वर्धा, यवतमाळ आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातही काम केले जावे. हा कायदा  प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा हा पाया अधिक मजबूत होऊन या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सेवा मिळाव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसेवा हक्क अधिनियम हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना

 लोकसेवा हक्क अधिनियम हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीलोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने काम करायचे असते. लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असे आपण म्हणतो या वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आहे. हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे. वर्धा, यवतमाळ आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातही काम केले जावे. हा कायदा  प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा हा पाया अधिक मजबूत होऊन या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सेवा मिळाव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा,pl share

 शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न


 


मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


                 सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, आयोगाचे नवनियुक्त ब्रँड अॅम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माजी राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रीय, राज्य सेवा हक्क आयुक्त, कोकण बलदेव सिंह, पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यासह प्रशासनातील ज्येष्ठ वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.


          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सध्या १००० पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. अजून ३०६ सेवा या ऑनलाइन आणायच्या आहेत तर 125 सेवा ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांना 15 ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात.


            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मूलभूत अधिकार संविधानात समाविष्ट केले हे मूलभूत अधिकार सर्वांना मिळाले पाहिजेत. गेल्या १० वर्षात तंत्रज्ञानाच्या गतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून या सेवा अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मंत्रालयात चेहरा पडताळणी ॲपमुळे देखील निम्मी गर्दी कमी झाली आहे. जीवनामध्ये ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या सर्व सेवा व्हॉटसॲप वर तसेच सर्व माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी कमी होऊन लोकांचे जीवनमान सुसह्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

 चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 महेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार

 

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्यमहेश्वर येथील राजवाडाइंदोर येथील वास्तूशिल्पकाशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दारवृक्षसंवर्धन याबाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली. हे काम दिनांक १५ मे२०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे२०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभीत आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

                                                          00000


Featured post

Lakshvedhi