Friday, 25 April 2025

सभापती प्रा.राम शिंदे यांचेकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती... • समिती पध्दतीच्या माध्यमातून सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance प्रभावी होणार...

 सभापती प्रा.राम शिंदे यांचेकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे

प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती...

 

• समिती पध्दतीच्या माध्यमातून सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance

   प्रभावी होणार...

 

मुंबई, दि. 24  :महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

 

 (अ) संयुक्त समित्या : -

एक : अंदाज समिती (विधानपरिषद नियम 208)

  (1) श्री.श्रीकांत भारतीयवि.प.स.

  (2) श्री.सदाशिव खोतवि.प.स.

  (3) श्री.हेमंत पाटीलवि.प.स.

  (4) श्री.सतिश चव्हाणवि.प.स.

  (5) श्री.राजेश राठोडवि.प.स.

  (6) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

 

दोन : लोकलेखा समिती (विधानपरिषद नियम 207)

  (1) श्री.कृपाल तुमानेवि.प.स.

  (2) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) ॲड. अनिल परबवि.प.स.

  (5) रिक्त

        विशेष निमंत्रित

   श्री.परिणय फुकेवि.प.स.

 

तीन : सार्वजनिक उपक्रम समिती (विधानपरिषद नियम 209)

  (1) श्री.निरंजन डावखरेवि.प.स.

  (2) श्री.चंद्रकांत रघुवंशीवि.प.स.

  (3) श्री.शिवाजीराव गर्जेवि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (5) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

चार : पंचायत राज समिती (विधानपरिषद नियम 212)

  (1) श्री.परिणय फुकेवि.प.स.

  (2) डॉ.मनिषा कायंदेवि.प.स.

  (3) श्री.विक्रम काळेवि.प.स.

  (4) श्री.जयंत आसगावकरवि.प.स.

  (5) श्री.सचिन अहिरवि.प.स.

        विशेष निमंत्रित

   श्री.योगेश टिळेकरवि.प.स.

 

पाच : रोजगार हमी योजना समिती (विधानपरिषद नियम 213)

  (1) श्री.योगेश टिळेकरवि.प.स.

  (2) श्री.किशोर दराडेवि.प.स.

  (3) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

  (4) रिक्त 

  (5) रिक्त

   

 

सहा : उपविधान समिती (विधानपरिषद नियम 206)

  (1) श्रीमती उमा खापरेवि.प.स.

  (2) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (3) श्री.जयंत आसगावकरवि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

  (5) रिक्त

 

सात : अनुसूचित जाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 210)

  (1) श्री.अमित गोरखेवि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

आठ : अनुसूचित जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 211)

  (1) श्रीमती उमा खापरेवि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडीवि.प.स.

  (3) श्री.राजेश राठोडवि.प.स.

  (4) श्री.सुनिल शिंदे वि.प.स.

 

नऊ : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214)

  (1) श्री.ज्ञानेश्वर म्हात्रेवि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (3) श्री.धीरज लिंगाडेवि.प.स.

  (4) श्री.सचिन अहिरवि.प.स.

 

दहा : महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 अ)

  (1) श्रीमती चित्रा वाघवि.प.स.

  (2) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (3) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

  (4) रिक्त

 

 

 

अकरा : इतर मागासवर्ग कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 ब)

  (1) श्री.विक्रांत पाटीलवि.प.स.

  (2) श्री.पंकज भुजबळवि.प.स.

  (3) श्री.सचिन अहिरवि.प.स.

  (4) रिक्त

 

बारा : अल्पसंख्याक कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 क)

  (1) श्री.वसंत खंडेलवालवि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडीवि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

तेरा : मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)

  (1) श्री.संजय केनेकरवि.प.स.

  (2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकरवि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

(ब) विधानपरिषदेच्या समित्या :- 

 

एक : *विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती (विधानपरिषद नियम 195)      

                     

समिती प्रमुख

  (1) प्रा. राम शिंदेमा. सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद तथा समिती प्रमुख.

                         

सदस्य

  (2) श्री.देवेंद्र फडणवीसमा.मुख्यमंत्री

  (3) श्री.एकनाथ शिंदेमा. उप मुख्यमंत्री        

  (4) श्री.अजित पवारमा. उप मुख्यमंत्री

  (5) श्री.चंद्रकांत (दादा) पाटील,मा. संसदीय कार्य मंत्री.

  (6) श्री.अंबादास दानवेमा.विरोधी पक्ष नेता

  (7) श्री.प्रविण दरेकरवि.प.स.

  (8) श्री. सतेज पाटीलवि.प.स.

  (9) श्री. विक्रम काळेवि.प.स.

 

   विशेष निमंत्रित

  (1) डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हेमा.उप सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद.

  (2) ॲङ. अनिल परबवि.प.स.

  (3) श्री. अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) श्री. हेमंत पाटीलवि.प.स.

  (5) श्री.श्रीकांत भारतीयवि.प.स.

  (6) श्री. प्रसाद लाडवि.प.स.

 

*पत्रक भाग क्रमांक 69/77 नुसार दिनांक डिसेंबर, 2024 रोजी सदरहू समिती गठित करण्यात आली आहे. 

 

दोन : विशेष हक्क समिती (विधानपरिषद नियम 245) - 

  

(1) समिती प्रमुख

श्री. प्रसाद लाडवि.प.स. सदस्य       

  (2) श्री.राजहंस सिंहवि.प.स.

  (3) श्री.विक्रांत पाटीलवि.प.स.

  (4) श्री.परिणय फुकेवि.प.स.

  (5) डॉ. मनिषा कायंदेवि.प.स.

  (6) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (7) श्री.धीरज लिंगाडेवि.प.स.

  (8) ॲड.अनिल परबवि.प.स.

  (9) रिक्त

  (10) रिक्त

  (11) रिक्त

 

तीन : विनंती अर्ज समिती (विधानपरिषद नियम 238 (1)) 

  

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हेमा.उप सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद.  

 

   सदस्य

  (2) श्री.अमरीशभाई पटेलवि.प.स.

  (3) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (5) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

 

चार : आश्वासन समिती (विधानपरिषद नियम 221 (1))

  (1) समिती प्रमुख                    

श्री.प्रविण दरेकरवि.प.स. सदस्य    

  (2) श्रीमती चित्रा वाघवि.प.स.

  (3) श्री.धर्मगुरु राठोडवि.प.स.

  (4) श्री.कृपाल तुमानेवि.प.स.

  (5) श्री.विक्रम काळेवि.प.स.

  (6) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (7) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

  (8) श्री.अरुण लाडवि.प.स.

  (9) रिक्त

 

पाच : नियम समिती (विधानपरिषद नियम 218)


चिल्ड्रेन्स एड् सोसायटीला आवश्यक सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध -

 चिल्ड्रेन्स एड् सोसायटीला आवश्यक सहकार्य करण्यास

जिल्हा प्रशासन कटिबद्ध

-मुंबई शहर  जिल्हाधिकारी आंचल गोयल

 

मुंबई, दि.24 :- प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून सेवा करण्याची संधी असते. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबदल  जिल्हा प्रशासन संवेदनशील असून यासंस्थेस आवश्यक ते सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या उमरखाडी येथील निरीक्षणगृह/बालगृह येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बालगृहातील मुलांसमवेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  जिल्हाधिकारी श्रीमती गोयल पुढे म्हणाल्या की, "पंडित दीनदयाळ यांच्या एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व तसेच मानवाकडून जीवनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या संधीचे महत्त्व सांगून त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यावरील अनुभवाचे कथन केले.

यावेळी या सोसायटीकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व बालनिरीक्षणगृहातील मुलांकडून करण्यात येत असलेल्या कौशल्याभिमूख कामकाजाची माहिती  घेऊन परिसराची पाहणी केली.

या प्रसंगी मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळेजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलारडोंगरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ठाकूरतसेच संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारीजिल्हा महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

धुळे एमआयडीसीसाठी जागेची अडचण दूर करणार

 धुळे एमआयडीसीसाठी जागेची अडचण दूर करणार

- महसूल मंत्री बावनकुळे

अनधिकृत खनिज उत्खननावर कारवाईचे आदेश

मुंबईदि. २४ : धुळे एमआयडीसी विस्तारासाठी रावेर शिवार येथील २०७७ एकर जागा वनविभागाच्या अडचणी दूर करून हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेचया जागेवर होत असलेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाई दंड वसुलीचे तसेच आवश्यकता वाटल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले.

धुळे एमआयडीसीच्या विस्तारासाठी मौजे रावेर शिवार येथील २०७७ एकर जागा फूड पार्कटेक्सटाईल पार्कइलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलआमदार अनुप अग्रवालअतिरिक्त मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर यांची उपस्थिती होती. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

धुळे जिल्ह्यातून सात महामार्ग जातात. जिल्हात विकासकामांना चालना मिळत आहे. तथापि या विकासात उद्योग वाढीस लागणेही गरजेचे आहे. यासाठी सध्या असलेल्या एमआयडीसीचा विस्तार होणे आवश्यक आहे. लोकहिताच्या दृष्टीने रावेर येथील जागा एमआयडीसीकरिता उपलब्ध करुन देण्याची मागणी मंत्री श्री.रावल यांनी केली.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून धुळे एमआयडीसीसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाईल. धुळे येथील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे फूड पार्कटेक्सटाईल पार्क आणि इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कसारख्या प्रकल्पांना गती मिळेलअशी अपेक्षा आहे.

अनधिकृत खनिज उत्खननावर कारवाईचे आदेश

सद्यस्थितीत मौजे रावेर शिवारातील या जागेवर काही सोसायट्यांच्या माध्यमातून विनापरवाना गौण खनिज उत्खनन आणि शर्तभंगाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर दंड आकारावा आणि वसुलीसाठी नोटिसा बजावाव्यातअसे स्पष्ट आदेश महसूलमंत्र्यांनी दिले. यामुळे अनधिकृत कारवायांना आळा बसेल आणि जागेचा योग्य वापर सुनिश्चित होईल.

औद्योगिक विकासाला चालना

धुळे एमआयडीसीच्या विस्तारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. फूड पार्कमुळे शेती आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळेलतर टेक्सटाईल आणि इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कमुळे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल.

वनविभागाच्या अडचणी दूर झाल्यानंतर लवकरात लवकर जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभाग यांच्यात समन्वय साधला जाईल. तसेचअनधिकृत खनिज उत्खनन प्रकरणी तपास तीव्र करून कायदेशीर कारवाईला गती दिली जाणार आहे. या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. स्थानिक नागरिक आणि उद्योजक याकडे उत्साहाने पाहत असूनलवकरात लवकर प्रकल्प कार्यान्वित व्हावाअशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भिवंडीजवळील बापगाव येथील जागा मल्टी मॉडेल हबसाठी पणन मंडळाला देण्याचा निर्णय

 भिवंडीजवळील बापगाव येथील जागा मल्टी मॉडेल हबसाठी

 पणन मंडळाला देण्याचा निर्णय

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश

 

मुंबईदि. २४ : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील पणन महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा अतिक्रमणमुक्त करुन त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब करण्याचा पणन विभागाचा प्रस्ताव असून यासाठी आणखी जागेची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव १५ दिवसात सादर करावाअसे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिले.

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलसहकार व पणन विभागाचे अधिकारीठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

 

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेबापगाव येथील जागेवर मल्टी मॉडेल हब करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता असून पणन मंडळाने जागेची मागणी केली आहे. ही जागा सध्या पणन मंडळाच्या ताब्यात असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या ठिकाणी ५२ झोपड्या आणि १७८ इतर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करावी.

 

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेअतिक्रमण काढण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी सर्वच विभागांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच या परिसरात आणखी काही शासकीय आणि खासगी जमीन आहे. ही जमीन देखील पणन मंडळास देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणीचा सकारात्मक विचार करत पणन मंडळास देण्यात येणाऱ्या जागेचे पणन मंडळाने संरक्षण करावे. त्याबरोबरच त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब उभारण्याबाबत प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे आदेशही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल - 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली - 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान

 महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

 

- 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली

- 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान

- मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावालष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद

- मंत्रालयात विशेष कक्षमहाराष्ट्र सदनातूनही समन्वय

 

मुंबईदि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन विशेष विमानाची व्यवस्था पर्यटकांसाठी केली होतीत्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यानआणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतीलतर करात्याचा खर्च राज्य सरकार देईलअसे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतलीतेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालयमुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असूनमहाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धामजम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असूनत्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणाऱ्या विशेष विमानात अकोलाअमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असूनगरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

००००

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी' निर्माण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला

'मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीनिर्माण करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी

 

मुंबईदि. २४: भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेसोबतच रोजगार निर्मितीवर भरसौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा. अशा शहरांच्या निर्मितीसाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीनिर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्याचे सूचित करीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजगभरातून लोक मुंबईमध्ये विमाने आणत असतात. त्यामुळे पार्किंगची चांगली सुविधा या विमानतळावर उपलब्ध असायला पाहिजे. यासोबतच विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर असावी. विमानतळाला रस्तेरेल्वेमेट्रो आणि जलवाहतुक कनेक्टिव्हिटीची कामे वेळेत पूर्ण करावीत.

नैना प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी. या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणारे रस्त्यांची रुंदी भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन निर्धारित करण्यात यावी. भविष्यात सुरू होणाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. यापुढे पायाभूत सोयी सुविधा निर्मितीच्या कामांबाबत निविदेमध्येच कालावधीची सक्ती करण्यात यावी. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना कुठलेही काम जास्त कालावधीसाठी रेंगाळणे योग्य नाही. त्यामुळे कामांचा कालावधी हा निश्चित करण्यात यावाअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मेट्रो स्टेशन पासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याबाबत नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाहीयाची काळजी घ्यावी. सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. घरकुल आणि गृहनिर्माणच्या बाबतीत कामे दर्जेदार करण्यात यावी. याबाबतही कालावधीची मर्यादा ठेवावी. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत कार्यवाही करावी. नवी मुंबई परिसरात क्रीडा सुविधांचे कामे सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये क्रीडा सुविधांचा चांगला विकास होत आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम पूर्ण करण्यात यावेअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथिगृह येथे सिडकोच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलअप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवराअप्पर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्तासिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिडकोची भविष्यातील प्रस्तावित कामे

कमर्शियल कॉम्प्लेक्सबिझनेस सेंटर आणि शॉपिंग मॉल समाविष्ट असलेले 270 हेक्टर जागेवर एरोसिटी155 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क खारघर389 हेक्टर वरील इंटरग्रेटेड लॉजिस्टिक पार्क102 हेक्टर जागेवर एज्युसिटी आणि 105.5 हेक्टर जागेवर मेडिसिटी.

००००

महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देणार,पशूसंवर्धन विभागाला पर्यायी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा

 महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबीबुरुड समाजास देणार

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

पशूसंवर्धन विभागाला पर्यायी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा

 

मुंबई दि. २४ – महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी तीन गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदीर आणि विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

 

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेमहसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेबुरुड समाजाने सामाजिक कामासाठी जागा मागितली आहे. ही जागा ही जिल्हा परिषदेची असून ती पशूसंवर्धन विभागाला २००८ साली देण्यात आली आहे. ती जागा पशुसंवर्धन विभागाने विकसित केलेली नसून सध्या ही जागा बुरुड समाजाला आवश्यक असल्याने त्यांना देण्यात यावी. त्याच्या बदल्यात रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड शहरात महसूल विभागाची उपलब्ध असलेली जागा पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आदेशही मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

 

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणालेपशुसंवर्धन आणि महसूल विभागाने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतला हे महत्त्वपूर्ण आहे. विकासाच्या दृष्टीने असे निर्णय योग्य ठरतात. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

 

जागेची अदलाबदली आणि बुरुड समाजाला अटी शर्तींवर जागा उपलब्ध करुन देण्याबाबत असे दोन प्रस्ताव सादर करण्यात यावेतअशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 

Featured post

Lakshvedhi