Friday, 25 April 2025

सभापती प्रा.राम शिंदे यांचेकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती...

 सभापती प्रा.राम शिंदे यांचेकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे

प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती...

 

• समिती पध्दतीच्या माध्यमातून सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance

   प्रभावी होणार...

 

मुंबई, दि. 24  :महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

 

 (अ) संयुक्त समित्या : -

एक : अंदाज समिती (विधानपरिषद नियम 208)

  (1) श्री.श्रीकांत भारतीयवि.प.स.

  (2) श्री.सदाशिव खोतवि.प.स.

  (3) श्री.हेमंत पाटीलवि.प.स.

  (4) श्री.सतिश चव्हाणवि.प.स.

  (5) श्री.राजेश राठोडवि.प.स.

  (6) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

 

दोन : लोकलेखा समिती (विधानपरिषद नियम 207)

  (1) श्री.कृपाल तुमानेवि.प.स.

  (2) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) ॲड. अनिल परबवि.प.स.

  (5) रिक्त

        विशेष निमंत्रित

   श्री.परिणय फुकेवि.प.स.

 

तीन : सार्वजनिक उपक्रम समिती (विधानपरिषद नियम 209)

  (1) श्री.निरंजन डावखरेवि.प.स.

  (2) श्री.चंद्रकांत रघुवंशीवि.प.स.

  (3) श्री.शिवाजीराव गर्जेवि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (5) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

चार : पंचायत राज समिती (विधानपरिषद नियम 212)

  (1) श्री.परिणय फुकेवि.प.स.

  (2) डॉ.मनिषा कायंदेवि.प.स.

  (3) श्री.विक्रम काळेवि.प.स.

  (4) श्री.जयंत आसगावकरवि.प.स.

  (5) श्री.सचिन अहिरवि.प.स.

        विशेष निमंत्रित

   श्री.योगेश टिळेकरवि.प.स.

 

पाच : रोजगार हमी योजना समिती (विधानपरिषद नियम 213)

  (1) श्री.योगेश टिळेकरवि.प.स.

  (2) श्री.किशोर दराडेवि.प.स.

  (3) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

  (4) रिक्त 

  (5) रिक्त

   

 

सहा : उपविधान समिती (विधानपरिषद नियम 206)

  (1) श्रीमती उमा खापरेवि.प.स.

  (2) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (3) श्री.जयंत आसगावकरवि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

  (5) रिक्त

 

सात : अनुसूचित जाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 210)

  (1) श्री.अमित गोरखेवि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

आठ : अनुसूचित जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 211)

  (1) श्रीमती उमा खापरेवि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडीवि.प.स.

  (3) श्री.राजेश राठोडवि.प.स.

  (4) श्री.सुनिल शिंदे वि.प.स.

 

नऊ : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214)

  (1) श्री.ज्ञानेश्वर म्हात्रेवि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (3) श्री.धीरज लिंगाडेवि.प.स.

  (4) श्री.सचिन अहिरवि.प.स.

 

दहा : महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 अ)

  (1) श्रीमती चित्रा वाघवि.प.स.

  (2) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (3) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

  (4) रिक्त

 

 

 

अकरा : इतर मागासवर्ग कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 ब)

  (1) श्री.विक्रांत पाटीलवि.प.स.

  (2) श्री.पंकज भुजबळवि.प.स.

  (3) श्री.सचिन अहिरवि.प.स.

  (4) रिक्त

 

बारा : अल्पसंख्याक कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 क)

  (1) श्री.वसंत खंडेलवालवि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडीवि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातववि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

तेरा : मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)

  (1) श्री.संजय केनेकरवि.प.स.

  (2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकरवि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकरवि.प.स.

 

(ब) विधानपरिषदेच्या समित्या :- 

 

एक : *विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती (विधानपरिषद नियम 195)      

                     

समिती प्रमुख

  (1) प्रा. राम शिंदेमा. सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद तथा समिती प्रमुख.

                         

सदस्य

  (2) श्री.देवेंद्र फडणवीसमा.मुख्यमंत्री

  (3) श्री.एकनाथ शिंदेमा. उप मुख्यमंत्री        

  (4) श्री.अजित पवारमा. उप मुख्यमंत्री

  (5) श्री.चंद्रकांत (दादा) पाटील,मा. संसदीय कार्य मंत्री.

  (6) श्री.अंबादास दानवेमा.विरोधी पक्ष नेता

  (7) श्री.प्रविण दरेकरवि.प.स.

  (8) श्री. सतेज पाटीलवि.प.स.

  (9) श्री. विक्रम काळेवि.प.स.

 

   विशेष निमंत्रित

  (1) डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हेमा.उप सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद.

  (2) ॲङ. अनिल परबवि.प.स.

  (3) श्री. अशोक ऊर्फ भाई जगतापवि.प.स.

  (4) श्री. हेमंत पाटीलवि.प.स.

  (5) श्री.श्रीकांत भारतीयवि.प.स.

  (6) श्री. प्रसाद लाडवि.प.स.

 

*पत्रक भाग क्रमांक 69/77 नुसार दिनांक डिसेंबर, 2024 रोजी सदरहू समिती गठित करण्यात आली आहे. 

 

दोन : विशेष हक्क समिती (विधानपरिषद नियम 245) - 

  

(1) समिती प्रमुख

श्री. प्रसाद लाडवि.प.स. सदस्य       

  (2) श्री.राजहंस सिंहवि.प.स.

  (3) श्री.विक्रांत पाटीलवि.प.स.

  (4) श्री.परिणय फुकेवि.प.स.

  (5) डॉ. मनिषा कायंदेवि.प.स.

  (6) श्री.संजय खोडकेवि.प.स.

  (7) श्री.धीरज लिंगाडेवि.प.स.

  (8) ॲड.अनिल परबवि.प.स.

  (9) रिक्त

  (10) रिक्त

  (11) रिक्त

 

तीन : विनंती अर्ज समिती (विधानपरिषद नियम 238 (1)) 

  

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हेमा.उप सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद.  

 

   सदस्य

  (2) श्री.अमरीशभाई पटेलवि.प.स.

  (3) श्री.अमोल मिटकरीवि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (5) श्री.सुनिल शिंदेवि.प.स.

 

चार : आश्वासन समिती (विधानपरिषद नियम 221 (1))

  (1) समिती प्रमुख                    

श्री.प्रविण दरेकरवि.प.स. सदस्य    

  (2) श्रीमती चित्रा वाघवि.प.स.

  (3) श्री.धर्मगुरु राठोडवि.प.स.

  (4) श्री.कृपाल तुमानेवि.प.स.

  (5) श्री.विक्रम काळेवि.प.स.

  (6) श्री.अभिजीत वंजारीवि.प.स.

  (7) श्री.मिलिंद नार्वेकरवि.प.स.

  (8) श्री.अरुण लाडवि.प.स.

  (9) रिक्त

 

पाच : नियम समिती (विधानपरिषद नियम 218)


महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल - 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली - 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान - मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद - मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय

  

महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

 

- 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली

- 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान

- मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावालष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद

- मंत्रालयात विशेष कक्षमहाराष्ट्र सदनातूनही समन्वय

 

मुंबईदि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन विशेष विमानाची व्यवस्था पर्यटकांसाठी केली होतीत्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यानआणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतीलतर करात्याचा खर्च राज्य सरकार देईलअसे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतलीतेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालयमुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असूनमहाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धामजम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असूनत्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणाऱ्या विशेष विमानात अकोलाअमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असूनगरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

००००

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

 भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

मुंबई दि. २४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिरप्रभादेवीमुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून,   मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल२०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल२०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवीछत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि यशवंत नाट्य मंदिर-माटुंगा येथे उपलब्ध आहेत.

            भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

अवयवदानास नवे आयाम,अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार ,pl shareजिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ

 अवयवदानास नवे आयाम

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  • अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान
  • अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र
  • जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ
  • अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार

 

मुंबईदि. 24 : राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गतीपारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. यावेळी आमदार श्रीमती देवयानी फरांदेसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळेवैद्यकीय अधिकारीमानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.आबिटकर यांनी अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Center-ZTCC) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा तातडीने निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय प्राधिकरण समित्यांनी जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्याही सूचना मंत्री श्री.अबिटकर यांनी दिल्या.

 

 यावेळी अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. 'शासकीय रुग्णालयामध्ये अवयव दानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत चालू करण्यात आलेला फेलोशिप इन क्रिटीकल मेडीसीनहा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नियोजन सुयोग्यरित्या करण्यात यावी अशी सूचनाही मंत्री श्री. अबिटकर यांनी दिल्या.

अवयवदानासाठी जनजागृतीसन्मान व सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबद्दल मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. 1 मे महाराष्ट्र दिनीजिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

अतितातडीच्या परिस्थितीत अवयवदान व शवविच्छेदन प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचनाही मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी केली.

गुणवत्तापूर्ण काम करण्याला प्राधान्य द्यावे

 गुणवत्तापूर्ण काम करण्याला प्राधान्य द्यावे

-        राज्यमंत्री इंद्रनील नाईक

 

मुंबई, दि.२४ : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधिक  गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिल्या.

 

 सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मंत्रालयात परिषद सभागृह येथे राज्यमंत्री श्री.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे राज्यमंत्री श्री.नाईक यांनी सांगितले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचाप्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

००००

Featured post

Lakshvedhi