Friday, 25 April 2025

गुणवत्तापूर्ण काम करण्याला प्राधान्य द्यावे

 गुणवत्तापूर्ण काम करण्याला प्राधान्य द्यावे

-        राज्यमंत्री इंद्रनील नाईक

 

मुंबई, दि.२४ : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधिक  गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिल्या.

 

 सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मंत्रालयात परिषद सभागृह येथे राज्यमंत्री श्री.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे राज्यमंत्री श्री.नाईक यांनी सांगितले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचाप्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi