Friday, 25 April 2025

अवयवदानास नवे आयाम,अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार ,pl shareजिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ

 अवयवदानास नवे आयाम

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  • अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान
  • अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र
  • जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ
  • अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार

 

मुंबईदि. 24 : राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गतीपारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. यावेळी आमदार श्रीमती देवयानी फरांदेसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळेवैद्यकीय अधिकारीमानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.आबिटकर यांनी अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Center-ZTCC) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा तातडीने निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय प्राधिकरण समित्यांनी जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्याही सूचना मंत्री श्री.अबिटकर यांनी दिल्या.

 

 यावेळी अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. 'शासकीय रुग्णालयामध्ये अवयव दानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत चालू करण्यात आलेला फेलोशिप इन क्रिटीकल मेडीसीनहा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नियोजन सुयोग्यरित्या करण्यात यावी अशी सूचनाही मंत्री श्री. अबिटकर यांनी दिल्या.

अवयवदानासाठी जनजागृतीसन्मान व सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबद्दल मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. 1 मे महाराष्ट्र दिनीजिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

अतितातडीच्या परिस्थितीत अवयवदान व शवविच्छेदन प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचनाही मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi