Thursday, 24 April 2025

महाराष्ट्र-अर्जेंटिना यांच्यात व्यापार व सहकार्याच्या अमर्याद संधी

 महाराष्ट्र-अर्जेंटिना यांच्यात व्यापार व सहकार्याच्या अमर्याद संधी

-         पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 23 : महाराष्ट्र आणि अर्जेंटिना यांच्यात कृषीपर्यटनऊर्जामाहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहेअसे प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

 

अर्जेंटिनाचे महावाणिज्य दूत डॅनियल क्वेर यांनी मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. उप महावाणिज्य दूत मारिया सिल्विना कोस्टापणन कार्यकारी संचालक संजय कदम आदी यावेळी उपस्थित होते.

 

मंत्री जयकुमार रावल यांनी अर्जेंटिनाशी वाढत्या व्यापार आणि सहकार्याच्या संधींबाबत सकारात्मक दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले कीकृषी उद्योग आणि कृषी विपणन क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात. अर्जेंटिनाची आधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता आणि महाराष्ट्राची उत्पादनशक्ती एकत्र आल्यास मोठ्या व्यापार संधींचा फायदा होऊ शकतो. नवीकरणीय ऊर्जाऔषधी उद्योगमाहिती तंत्रज्ञानतसेच सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांतही दोन्ही बाजूंनी सहकार्य वाढवले जाईल. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी बाजारपेठ मिळविण्याचा मार्ग खुला होईल.

अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध फुटबॉल संस्कृतीचा उल्लेख करताना मंत्री रावल म्हणालेअर्जेंटिना फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. अर्जेंटिनातील उद्योगांना महाराष्ट्र राज्यातही पर्यटन व खेळ क्षेत्रात सहकार्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. अर्जेंटिनासाठी महाराष्ट्रात गुंतवणूकव्यापार आणि सहकार्याचे दालन उघडे आहेअसे सांगून त्यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

महाराष्ट्र - जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होणार

 महाराष्ट्र - जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होणार

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 23 : जिबूती व महाराष्ट्र यांच्यात केवळ व्यापाराचे नव्हेतर परस्पर विश्वासाचे संबंध आहेत. हा विश्वास दृढ करूया आणि एकत्रितपणे वाढ आणि समृद्ध भविष्यासाठी काम करूयाअसे आवाहन करुन महाराष्ट्र - जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होईलअसा विश्वास राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

 

जिबूतीचे मानद वाणिज्यदूत विशाल मेहता आणि इंडो-जिबूती चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींनी मंत्री रावल यांची भेट घेतली. यावेळी इंडो-जिबूती ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेजिबुती मध्ये अनेक संधी आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे कार्य वेगाने चालू आहे. शेती क्षेत्रात कृषी पदवीधर युवकांना रोजगाराच्या तसेच कृषी, विज्ञानबांधकाम, यासह विविध क्षेत्रात काम करण्याची संधी या देशात आहे. मुंबईत सध्या 100 हून अधिक परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय चेंबर कार्यरत आहेत. भारताची भक्कम आर्थिक प्रगती पाहून अनेक देश मुंबईत आपली कार्यालये सुरू करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नव्या व्यापार संधींवर चर्चा करण्यासाठी संवादाचा प्रारंभ केला आहे.

 

महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले कीभारताच्या एकूण जीडीपीमध्ये सुमारे 15 टक्के महाराष्ट्राचे योगदान आहे. मागील दशकात भारतात येणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 'एक्स्पोर्ट प्रिपेअर्डनेस'मध्ये देशात अव्वल आहे. राज्यात तीन हजारहून अधिक मोठ्या औद्योगिक युनिट्स50 हजार पेक्षा जास्त एमएसएमई आणि 20 हून अधिक औद्योगिक कॉरिडॉर आहेत.

 

महाराष्ट्र-जिबूती स्ट्रॅटेजिक बिझनेस कौन्सिलची स्थापना व दर सहामाही बैठक व्हावीइंडो-जिबूती चेंबरमध्ये महाराष्ट्र ट्रेड फॅसिलिटेशन डेस्क तयार करावागुंतवणूक व व्यापार वृद्धीसाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना करावीक्षेत्रनिहाय बैठकानिर्यातीला प्रोत्साहन मिळावेअसेही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी नमूद केले.

सीसीआय’ने राज्याच्या समन्वयाने कापूस खरेदीसाठी कार्यवाही करावी

 सीसीआय’ने राज्याच्या समन्वयाने कापूस खरेदीसाठी कार्यवाही करावी

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 23 : राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यात येतो. ही खरेदी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन करण्यात यावीतसेच खरेदीची तारीख आणि उद्दिष्ट आधीच जाहीर करून राज्याच्या समन्वयाने कार्यवाही करावीअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

 

शेतकऱ्यांना कापूस विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पणन मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री अमित देशमुखसंजय बनसोडेअमित झनक यांच्यासह ‘सीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्तामहाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासो धुळज यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कापसाच्या मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने कापूस आयात केला जातो. तसेच राज्यात लांब तंतूच्या कापसाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे लांब तंतूच्या दर्जेदार कापसाच्या उत्पादनासाठी तसेच कापसाचे प्रती एकर उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावेअशी सूचना पणन मंत्री रावल यांनी यावेळी दिली.

ज्या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन अधिक आहे तेथे खरेदी केंद्र सुरू करावे तसेच जेथे कमी उत्पादन आहे तो तालुका त्याच जिल्ह्यातील जवळच्या केंद्रास जोडावाअशी अपेक्षा उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. त्यावर असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, असे श्री.गुप्ता यांनी सांगितले. ‘सीसीआय’च्या ॲपमध्ये खरेदीबाबतची सविस्तर माहिती दिली जात असल्याचे सांगून पुढील हंगामात 1 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू होईलअशी माहिती त्यांनी दिली

पहलगाम हल्ला: मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी, अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात

 पहलगाम हल्ला: मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशीअडकलेल्या पर्यटकांसाठी आणि राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात

 

नवी दिल्ली, 23 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठीमहाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसारमृतांपैकी चार पार्थिव मुंबईलातर दोन पार्थिव पुण्याला दिल्लीमार्गे पाठविण्यात येणार आहेत. तसेच नातेवाईकांशी महाराष्ट्र सदन येथील राजशिष्टाचार विभागातील अधिकारी सतत संपर्कात आहेत.

 

या हल्ल्यात जखमी झालेले चार पर्यटक सुखरूप असूनत्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेचजम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 308 पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र सदन सर्वतोपरी मदत आणि समन्वयासाठी कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन,pl share

 कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी

केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन

- वन मंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. 23 : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. 

  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक बोलत होत. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरउपसचिव विवेक होसिंगकोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर.एम. रामानुजमविभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, शिष्टमंडळातील दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजनपत्रकार मिलिंद लिमयेवन्य जीव अभ्यासक संतोष महाजन आदी यावेळी उपस्थित होते. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिश्वासअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

दापोली तालुक्यात रानडुकरमाकड व वानरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून आता माकडे व वानरेही गावात येऊन घरातील वस्तूंचेही नुकसान करत असल्याचै श्री. महाजन यांनी सांगितले.

कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे व वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

            रानडुकरांमुळे फळबागा तसेच भातशेतीचे नुकसान होते. त्यांचा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी. तसेच शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्रहे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार परवाने देण्याचे निर्देशही वन मंत्री श्री. नाईक यांनी यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी श्री. महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी. तसेच साळिंद्र प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश यामध्ये करण्याची मागणी केली.

००००

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

 काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी

विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई, दि. 23 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असूनइंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल.

उद्यासाठीच आणखी एका विमानाचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असूनत्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होते आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य शासन करणार आहे, असे एक्सच्या सीएमओ महाराष्ट्र या हॅण्डलवर नमूद करण्यात आले आहे.

सोबत : विमानातील प्रवाशांची यादी



संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठा वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे

 संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर

उपलब्ध जलसाठा वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे

-         जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. २३ :-  पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. टंचाई संदर्भातील परिस्थितीचा अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन याबाबत उपाययोजना कराव्यातअशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या

उन्हाळी हंगामाच्या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले,  संभाव्य टंचाई काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणाऱ्या गावांचा अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावा. पाण्याची गळती कमी करण्यासाठी उपाययोजना आखून त्यानुसार कार्यवाही करावी. पिण्याचे पाणी उचलणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना मंजूर पाणीप्रत्यक्ष उचलेले पाणी याबाबत अवगत करावे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहानगरपालिकेचे आयुक्तनगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेण्यात यावी. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी पाणी जपून वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणालेधरणातील बॅक वॉटरचा सर्व्हे करावा. हा सर्व्हे अचूक होण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. कालवा सल्लागार समितीने ठरविल्याप्रमाणे उन्हाळी हंगामात पाणी सोडण्याचे नियोजन करावे. साठवण तलाव व कॅनॉलच्या सभोवताली असणारी अतिक्रमणे काढावीत. पाणी वापराबाबतचे १५ जुलै पर्यंतचे नियोजन केले आहे त्यानुसार कार्यवाही करावी.

या बैठकीत गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठापुढील काळात पिण्यासाठीसिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी याचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला. प्रकल्पनिहाय उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावीअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.

०००००

Featured post

Lakshvedhi