Wednesday, 23 April 2025

भारत विकसित राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत 'एकात्म मानवदर्शन' चा आधार ,दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हीरक महोत्सवाला सुरुवात

 भारत विकसित राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत 

'एकात्म मानवदर्शनचा आधार 

- तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत

पंडित दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शनहीरक महोत्सवाला सुरुवात

 

मुंबई दि. 22 : एकेकाळी भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जात होतामात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शनतत्वज्ञानाचा आधार असल्याचे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल थिरु आर. एन. रवी यांनी केले. माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शनहीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

राज्यपाल आर. एन. रवी म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या 'एकात्म मानव दर्शनतत्वज्ञानात समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या तत्वानुसार राज्यकारभार सुरू आहे. अंत्योदय अर्थात शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली जात आहे. त्यामुळेच भारताचा विकसनशील देश ते विकसित राष्ट्र पर्यंत प्रवास झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतातील परिस्थिती बदलली असून तिथे शांतता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अंत्योदयाचा मार्ग अवलंबून त्यांनी ईशान्य भारतात पायाभूत सुविधा निर्माण करून खऱ्या अर्थाने भारताला जोडण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय 'एकात्म मानवदर्शनहीरक महोत्सवाला सुरुवात झाली. रिजिजू यावेळी म्हणाले कीयाच रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी साठ  वर्षापूर्वी एकात्म मानव दर्शन तत्वज्ञान जनतेपुढे मांडले. या ऐतिहासिक वास्तूत पुन्हा पंडितजींच्या विचारांना आत्मसात करताना मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. पंडितजींचे विचार भारताला शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगात ओळख देत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रिजिजू यांनी सांगितले. 

महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाळ 'एकात्म मानवदर्शनहीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारात राष्ट्रप्रेमासह संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वागीण विकासाचे मर्म जपले गेले आहे. त्यांच्या विचारांचा खजिना जनतेसमोर उघडताना अत्यानंद होत आहे.

 सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ऐतिहासिक सोहळा आयोजित केल्याबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कौतुक केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तपस्येतून देशाला दिशा देणारे विचार मिळाले असून सर्वांनी त्याचा अंगिकार केला पाहिजे.

पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्याने विशेष टपाल कव्हर तयार केले असून राज्यपाल रवी यांच्या हस्ते यावेळी त्याचे प्रकाशन करण्यात आले. 

एकात्म मानव दर्शन या हीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंडित दीनदयाळ उपाध्याय संशोधन संस्थेचे अध्यक्ष अतुल जैनशिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के जैनपोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा पुढील तीन दिवस रुईया महाविद्यालयात सुरू राहणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयलडॉ.कृष्ण गोपालजी, सुनीलजी अंबेकरडॉ.मनमोहनजी वैद्य तसेच सुरेशजी सोनी आणि एल.संतोषजी यांचा या व्याख्यानमालेतील वक्त्यांमध्ये समावेश आहे.

तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी रस्ता, चाकण ते शिक्रापूर सहा पदरी रस्ता

 तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी रस्ताचाकण ते शिक्रापूर सहा पदरी रस्ता

पुणे जिल्ह्यात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३ किमी राज्यमार्गावर तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग व समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गावर सहा पदरी रस्ता विकसित करण्याचा तसेच त्यासाठीच्या ४ हजार २०६ कोटी ८८ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

तळेगाव- चाकण- शिक्रापूर हा रस्ता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील तळेगाव या ठिकाणाहून सुरु होऊन चाकण व पुढे शिक्रापूर या ठिकाणी पुणे-अहिल्यानगर महामार्गास जोडला जातो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ व पुणे-छ.संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता पुणे शहराकरीता "बाह्यवळण"  म्हणून उपयोगी पडणार आहे. या मार्गामुळे अनेक ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.  या रस्ते विकासात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलासह बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून काम बीओटी तत्त्वावर हे काम केले जाणार आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती, वितरण धोरणात सुधारणा

 मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी

प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मितीवितरण धोरणात सुधारणा

मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सदनिकांचे उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या आणि त्यांच्या वितरणाच्या सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाच्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाच्या यापुर्वीच्या १९ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा व  स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी घरांची (सदनिका) मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. यासाठी अशा सदनिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठीन्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली (Task Force) कृती दल स्थापना करण्यात आले होते. या दलाने अहवाल सादर अशा सदनिकांची संख्या वाढविण्यासाठी शासनास विविध शिफारशी केल्या होत्या. त्याबाबतचा शासन निर्णय़ १९ ऑगस्ट २०२४ रोजी काढण्यात आला आहे. या निर्णयातील परिच्छेद क्रमांक १ मधील क्रमांक १० व ११ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार शासकीय जमिनीवरील विनिमय ३३ (१०) उपखंड ३.२ व ३.८ अनुसार झोपड पट्टी पुनवर्सन योजनेच्या विकासकास सार्वजनिक बांधिव सुविधेच्या मोबदल्यात इन-सिटू वाढीव चटईक्षेत्र (incentive FSI) देण्याच्या तसेच समायोजन (Clubbing/Amalgamation)  संबधातील मुद्द्याच्या अनुषंगाने झोपडीधारक यांची अदलाबदल करण्याची आवश्यकता राहणार नाहीअशा तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे.  याबाबतचे सविस्तर शासन शुद्धीपत्रक प्रसिद्धीस देण्यात येणार आहे

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.

कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडासंघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकरकामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वालकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनप्रभादेवीमुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

2024 च्या पुरस्कारासाठी अर्ज

सन २०२४ मधील विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे अर्ज मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ आहे.

पुरस्काराचे स्वरुप -

कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येतेतर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.

पुरस्कार्थींची नावे - 

कामगार भूषण पुरस्कार :

श्रीनिवास कोंडिबा कळमकरमल्टिस्कील ऑपरेटरबजाज ॲटो लिमिटेडबजाजनगरछत्रपती संभाजीनगर.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार :

१) नेहा विलास भांडारकरभारतीय आर्युविमा महामंडळनागपूर,

२) महेश मधुकर सावंत-पटेलसीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोडठाणे

३) चंद्रकांत महादेव कांबळेबजाज ॲटो लिमिटेड,वाळूजछत्रपती संभाजीनगर

४) दादासाहेब सुरेंद्र भंडेस्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर

५) नरेंद्र शंकर गोखलेराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड.

६) विजय रामेश्वर बोराडेहिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांवजि.बुलडाणा

७) सचिन लक्ष्मण पिंगळेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळविभागीय कार्यालयबुलडाणा

८) संदीप सतीश रांगोळेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

९) उमेश रामचंद्र फाळकेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

10) राजकुमार गुलाबराव किर्दतअल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा

11) नामदेव रामसा उईकेसी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि.उर्सेगांवता.मावळजि.पुणे

12) निमीषा नितीन मोहरीरभारतीय जीवन बिमा निगमनागपूर

13) दिगंबर शंकरराव पोकळेकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

14) दत्तात्रय सुखदेव दगडेस्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.निघोजे म्हाळुंगे खराबवाडीता.खेडचाकणपुणे

15) संजय जयसिंग देशमुखथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

16) विकास चंद्रकांत धुमाळमहाराष्ट्र स्कुटर्स लि.सातारा लि.आकुर्डीपुणे

17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसिल्लोडता.सिल्लोडजि. छत्रपती संभाजीनगर

18) प्रविण बबन जाधवगोदरेज ॲण्ड बॉईजमॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडीशिरवळता.खंडाळाजि.सातारा

19) मनोज अनंत पाटीलटाटा स्टील लिमिटेडएम.आय.डी.सी.तारापूरजि.पालघर

20) सुनिता रविंद्र परमणेमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितपोफळीता.चिपळूणजि. रत्नगिरी

21) प्रकाश बाबुराव चव्हाणटाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखलीपुणे

22) शिवराज दादासो शिंदेप्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवडपुणे

23) कविता नरेश भोसलेमुंबई पोर्ट ट्रस्टमुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयवडाळा (पूर्व)मुंबई

24) मनोज देविदास गवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

25) रविंद्र बाबाजी जाधवविचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि.कांदिवली (प)मुंबई

26) मारोती सदाशिव पिंपळशेंडेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर

27) साखरचंद मारुती लोखंडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्यवर्ती कार्यशाळादापोडीपुणे

28) देविदास पंडीत पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

29) किसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह

३०) रविंद्र किसनराव रायकरकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

31) वंदना अशोक मनपेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितऊर्जानगरचंद्रपुर

32) विवेक सर्जेराव रावतेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितइस्लामपुर,ता.वाळवाजि.सांगली

33) देवकी ओमप्रकाश कोकासबिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेडबल्लारपूरपेपर मिल्सचंद्रपूर

34) एकनाथ रमेश उगलेथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळेदि कराड को-ऑप.बँक लिमिटेडकराड

36) संजय दगु गोराडेकिमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबडनाशिक

37) नितीन आनंदराव देडगेवनाझ इंजिनिअर्स लिमिटेडकोथरुडपुणे

38) सुनिल गुंडू दळवीविभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानककोल्हापूर

39) पोपट चंदु रसाळस्टरलाईट टेक्नॉलॉजीछत्रपती संभाजीनगर

40) अजित अनंत कामतेकरराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड

41) गुणवंत वसंतराव भारस्करमहाराष्ट्र राज्यल विद्युत वितरण कंपनी लि.वाशिम

42) नंदकुमार साहेबराव पाटीलगोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेडफिरोजशहा नगरविक्रोळीठाणे

43) संजय दिनकर चव्हाणकिर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडखडकीपुणे

44) सचिन मारुती पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळठाणे आगारजि.ठाणे

45) विजय काशीराम नंदागवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनागपूर रोडभंडारा

46) भारत गोरख मांडेकेबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमाळेगावता.सिन्नरजि.नाशिक

47) शिवाजी नागनाथराव राऊतमेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुजछत्रपती संभाजीनगर

48) अमोल अशोक आळवेकरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकोल्हापूर आगारजि. कोल्हापूर

49) दिपक वसंतराव पाटीलहिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग)ता.निफाडजि. नाशिक

50) विलास मोरेश्वर पंचभाईमहिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसातपूर नाशिक

51) अनंत अशोक शिंदेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळजळगाव

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

'आपलं मंत्रालयगृहपत्रिकेचे प्रकाशन

 

 मुंबईदि. २२  : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल २०२५ च्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिकप्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंहसामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकरसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुलडॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

            'आपलं मंत्रालयगृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या कथाकवितास्वानुभव तसेच पाककलाभ्रमंती या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

हा अंक  https://online.publuu.com/855586/1875618/page/10 व https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:e5191597-43f9-409c-b53e-36c54d8b58c7 या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

Tuesday, 22 April 2025

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे

 १५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये
  • जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी
  • आयुक्तजिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक

मुंबई, दि. २२ : ग्रामीण असो किंवा शहरी भागलोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा तीव्र आहे त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा असे निर्देश देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनजिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करावे असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीमुख्याधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत प्रशासनाने डोळ्यात तेल घालून पाणीटंचाईला तोंड देण्याच्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने पावले टाकून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर्स सुरु आहेत आणि गेल्या वर्षी काय परिस्थिती होतीयाचाही आढावा घेतला.

या बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलराज्यमंत्री मेघना बोर्डीकरउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनाग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवलेनगरविकास प्रधान सचिव डॉ गोविंदराजपाणीपुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे यांची उपस्थिती होती.

सध्या राज्यात १७ जिल्ह्यात ४४७ गावांत आणि १३२७ वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर्स सुरु आहेत. गेल्या वर्षी टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होती. गेल्या वर्षी ५८० गावे आणि २२८१ वाड्यांना टँकर्स सुरु होते अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

फिल्डवर रहा

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीराज्यात काही ठिकाणी पाण्याची टंचाई उद्भवली असून येणाऱ्या दोन महिन्यात प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि बीडीओतहसीलदारग्रामसेवकपोलीस पाटील यांनी सातत्याने फिल्डवर संपर्क ठेऊन आपापल्या भागातल्या टंचाईचा सर्व्हे करावा व योग्य ती पावले तातडीने उचलावी. ज्या जिल्ह्यांनी कृती आराखडा सादर केला नाही त्यांनी दोन तीन दिवसांत सादर करावा असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तात्पुरत्या नळयोजनाना तसेच  तलावांत चर खणण्याच्या कामाला गती द्यावी.

प्रलंबित योजना लवकर पूर्ण करा

जिथे पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा . काही ठिकाणी लोकांना अतिशय दुरून पाणी आणावे लागतेअशा ठिकाणी तत्काळ टँकर सुरु करावेत म्हणजे त्यांचे कष्ट कमी होतील. पाणी टंचाईसंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या येतात त्याकडे गांभीर्याने पाहावेवस्तुस्थिती तपासावी. याबाबत तात्काळ त्या विभागाचे स्पष्टीकरण वर्तमानपत्रे तसेच माध्यमांमध्ये द्यावे. आवश्यकतेप्रमाणे विहिरी अधिग्रहित कराव्यात असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

पाण्याचे प्रमाण कमी झाले कीस्त्रोत दुषित होऊ शकतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासण्याची गरज आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले कीकोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी वाहून नेणारे टँकर्स देखील चांगले आणि स्वच्छ असावेत . त्यांच्यावर जीपीएस लावावे म्हणजे त्यांचा दुरूपयोग टळेल.

हातपंपांची दुरुस्ती हा सुद्धा मोठा विषय असून त्या तसेच इतर पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावांवर वेगाने कार्यवाही होणे गरजेचे आहेअसे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले कीपाण्याचा अवैध उपसा थांबवला पाहिजे. लघु प्रकल्पातून वारेमाप उपसा होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे.


मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; मच्छिमार, मत्स्यसंवर्धकांना पाणी, वीज सारख्या सुविधा, विविध सवलतींचा लाभ होणार

 मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामच्छिमारमत्स्यसंवर्धकांना पाणीवीज सारख्या सुविधा,  विविध सवलतींचा लाभ होणार

राज्यातील मच्छिमार,मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणेच पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  मत्स्यव्यसायातील प्रक्रिया उद्योग वगळता अन्य घटकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि मत्स्य उत्पादनात वाढ साधण्यासाठी राज्यातील मच्छिमारमत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्रासारख्या पायाभूत सुविधा आणि सवलती दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असूनशेतीसह पशुपालनमत्स्यपालनफळभाजी उत्पादन यांसारख्या क्षेत्रांवर ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून आहे. विशेषतः देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या आणि प्रथिनयुक्त अन्नाची गरज भागवणाऱ्या मत्स्य व्यवसायाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ समुद्र किनारा लाभला आहे. तसेच भुजल क्षेत्रामध्ये पाटबंधारे विभागाचे जलाशयतलावजिल्हा परिषदांचे तलावमालगुजारी तलावांसह ४ लाख हेक्टरवर ही जलसंपत्ती आहे. तसेच अडीच लाखांहून अधिक शेततळी आहेत. यामुळे आता राज्यात पारंपरिक मासेमारीपेक्षा शास्त्रोक्त मत्स्यपालनावर भर दिला जात असूनराज्यात मत्स्यबीज संचयन आणि पिंजरा संवर्धन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. कृषी क्षेत्राशी साधर्म्य असूनही मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा नसल्याने मच्छिमार व मत्स्यपालकांना वीज सवलतकर्जविमा आणि उपकरणांवरील अनुदान या सुविधा मिळत नव्हत्या. मात्रआंध्रप्रदेशछत्तीसगडझारखंडबिहार आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी या क्षेत्राला कृषी दर्जा दिल्यामुळे त्यांच्या मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पावले उचलली असूनकृषी दराने वीजपुरवठाकिसान क्रेडिट कार्डबँक कर्ज सुविधाअल्प दरात विमा संरक्षण तसेच सौर ऊर्जा योजनेचा लाभ यांसारख्या सवलती मत्स्यशेतकऱ्यांना मिळणार आहेत. परिणामीग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असूनमत्स्य उत्पादनात भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.

000

Featured post

Lakshvedhi