Monday, 21 April 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात 626 अर्ज

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात 626 अर्ज

 

नागपूरदि.20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात एकूण 626 निवेदने स्वीकारली.

 

महिला व बाल विकास विभागाच्या पिंक ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपूरच्या विविध भागातील नागरिकांनी येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस या मुख्यमंत्री सचिवालयात गर्दी केली होती. श्री फडणवीस यांना दिव्यांगमहिलाविविध सामाजिक संस्थाविद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या सांगून निवेदन दिले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्री यांनी समस्या सोडवण्याबाबत आश्वस्थ केले. दुपारी 12 ते दरम्यान या जनता दरबारात जवळपास हजार नागरीक सहभागी झाले होते तर 626 निवेदन प्राप्त झाली आहेत.

 

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगलमनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरीनागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिनाजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह ऊर्जा विभागसार्वजनिक बांधकामभूमि अभिलेखसमाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी सहयोगनगर, जाधववाडी येथ्ील जागृत म्हसोबा व असारा मंदीराच्या भंडा-याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी सहयोगनगर, जाधववाडी येथ्ील जागृत  म्हसोबा व असारा मंदीराच्या भंडा-याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



Sunday, 20 April 2025

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा

 स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा

-         पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई,दि.१७ : स्वच्छ भारत मिशन हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जिव्हाळ्याचा उपक्रम आहे. आपले राज्य या अभियानात देशात पहिल्या पाच क्रमांकात यावे यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या क्षेत्रातील कामे नियोजनबद्धपणे व वेळेत पूर्ण करावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

            निर्मल भवन येथे स्वच्छ भारत मिशन आढावा बैठक झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेजल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचे संचालक ई. रविंद्रन  उपस्थित होते. दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर  म्हणाल्या कीराज्यात स्वच्छता दूत नेमले जाणार असून त्यांना प्रशिक्षण देऊन कामासाठी सज्ज केले जाईल. जे अधिकारी उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार केला जाईल. जे अधिकारी उद्दिष्टांप्रती गंभीर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलअसा  इशारा त्यांनी दिला.

राज्यातील स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि गावागावांत स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी शासन कटिबद्ध असूनयेत्या काळात या अभियानाला अधिक गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

१०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत निश्चित उद्दिष्ट २५ एप्रिल २०२५ पर्यंत १००% पूर्ण करावे.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल म्हणून घोषित करावीत. पीएम जनमन अंतर्गत शिल्लक ४४५ गावेसंसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उर्वरित ८३ गावे एप्रिल २०२५ पर्यंत हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करावीत. हागणदारी मुक्त गावांची पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावे.सर्व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करावे. गोबरधन प्रकल्प व सिटीझन ॲप वरील प्रलंबित अर्ज ३० एप्रिल २०२५ पर्यंत निकाली काढावीत. हागणदारी मुक्त झालेल्या गावांमध्ये कचरा संकलनासाठी महिला बचतगटांची नेमणूक व वापरकर्ता शुल्क निश्चिती ३१ मे २०२५ पर्यंत ग्रामसभेच्या माध्यमातून करावी.

जिल्ह्यातील उर्वरित हागणदारी मुक्त गावांना जिल्हातालुका व पंचायत स्तरावरील अधिकारी व सल्लागार यांना दत्तक देणे व आवश्यक कामांचे तात्काळ नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावणार

 आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या

प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावणार

                                                         - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         सुविधा-लाभांच्या सनियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ट्रॅकिंग प्रणाली आणखी मजबूत करा

·         अॅग्रीस्टॅकच्या अद्ययावतीकरण आणि वापराबाबत यंत्रणा उभारा

·         वैद्यकीय महाविद्यालयांच्या भविष्यातील विस्तारासाठी किमान २० एकर जागा राखीव ठेवा

 

            मुंबई, दि. १७ :- राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले.    

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक झाली. या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला.

            राज्यातील नागरिकांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या १३८ इंटिग्रेटेड सेवा ३१ मे २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच उर्वरित ३०६ अधिसूचित सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात. याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात मुख्य सचिवांनी परिपत्रक काढावे, असे निर्देशही त्यांनी दिले.   

            सेवा हक्क अधिनियमासंदर्भात पुढील प्रक्रिया राबविताना कोणकोणत्या नवीन सेवा अधिसूचित करता येतील, याबाबत १५ सप्टेंबरपर्यंत माहिती द्यावी. सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही महाआयटीने करावी. एका अर्जाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेता यावा यादृष्टीनेही प्रक्रियेत बदल करावा. ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आपला महाराष्ट्र देशात अव्वल व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Pink e रिक्षा

 





अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

 अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

 

मुंबईदि १५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ (ता. दौंड जि. पुणे) येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तीकरित्या मोहिम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. या मोहिमेमध्ये संबंधीत ग्रामपंचायत प्रतिनिधी सुध्दा घ्यावेतअसे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कामगार विभागाने बैठक आयोजित करणे तसेच पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील अल्कली अमाइन्स कंपनीमध्ये नुकताच झालेला स्फोट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात उद्योग विभागपर्यावरण विभाग आणि कामगार विभाग यांची बैठक कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आमदार राहुल कुलकुरकुंभ एमआयडीसीमधील संबंधित अधिकारीरासायनिक उद्योग प्रतिनिधीपर्यावरण विभागकामगार विभागसंबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. कुरकुंभ परिसरात बहुसंख्य रासायनिक उद्योग कार्यरत असल्याने संभाव्य अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक असल्याचे मत मंत्री ॲड.फुंडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी त्वरित उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी एमआयडीसी परिसरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले कीजे उद्योग प्रदूषित पाण्याची निर्मिती करताततेच उद्योग सीईटीपी चालवतातयामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राहात नाही. याबाबत धोरणात्मक फेरआढावा घेऊन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यातअसे निर्देश मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिले.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी फायर ऑडीट संबधित महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम२००६ अंतर्गतचे नियम तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी उद्योग विभागासोबत समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

कामगार विभागाकडे प्रदूषण नियंत्रण व सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नसल्याने कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले.


थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार -

 थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. 15 : थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले .

निर्मल भवन येथे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र बाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी  सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या म्हणणे थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.या उपक्रमांद्वारे थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवूनमहाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे.

जनजागृतीचे विशेष अभियान

थॅलेसेमिया आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरांपर्यंत विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जाणार आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल.

थॅलेसेमिया आजाराचे निदानव्यवस्थापन आणि समुपदेशन यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना विशेष कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गावागावांपर्यंत या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवता येईल.

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी या आजारावरील सविस्तर माहितीच्या सादरीकरण केले.

०००००००

Featured post

Lakshvedhi