Saturday, 19 April 2025

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार

  

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार

– आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

 

मुंबई19 : राज्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृहवसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात महिला व बालविकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा अनधिकृत संस्थांवर एक वर्ष कारावास अथवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.

 

अनधिकृतपणे संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवणे,  त्यांच्यावर शारीरिकमानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असूनबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. कलम 42 नुसारकोणत्याही संस्थेला नोंदणी प्रमाणपत्राशिवाय बालकांची देखभाल करण्याची परवानगी नाही. अशा संस्थांचे संचालन करणाऱ्यांवर एक वर्षाचा कारावास किंवा किमान एक लाख रुपयांचा दंडकिंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहेअसे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

 

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात अशी अनधिकृत बालक संस्था आढळल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अथवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावाअसे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. बालकांवरील शोषण रोखण्यासाठी समाजाने सजग राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त गुंडे यांनी केले आहे.

राज्याचा कौशल्य विभाग काळाची गरज ओळखून मार्गक्रमण करत आहे - ,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या

 राज्याचा कौशल्य विभाग काळाची गरज ओळखून मार्गक्रमण करत आहे

- राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्ण यांचे प्रतिपादन

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप

मुंबई. दि.१९: काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहेही आनंदाची बाब आहे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वर्धापन दीन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाविभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मामहाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरएआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सितारामराज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरेव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका  माधवी सरदेशमुखकौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.

            राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले कीरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने AI तंत्रज्ञानअभियांत्रिकीवाणिज्य आणि मीडिया या क्षेत्रात कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ केला आहेहे अतिशय आनंददायक आणि उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात आपल्या पारंपरिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन आपण नवी पिढी घडवली पाहिजेत्यासाठी आपल्या शिक्षकांनीही नवी संकल्पना समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर या दृष्टिकोनातून योगदान देत असल्याबाबत त्यांचेही अभिनंदन करतो असेहीराज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेला 'स्किल इंडिया हा उपक्रम या संकल्पात महत्वाचा भाग आहे. जागतिक कौशल्य आत्मसात करताना परदेशी भाषा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. राज्याच्या कौशल्य विभागाने जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याचेही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावीअसे आवाहनही यावेळी राज्यपालांनी केले. जगात आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) कौशल्यभारतीय मूल्ये आणि एकात्मिक शैक्षणिक प्रणालीवर भर देत आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होऊ शकते. यासंदर्भात रतन महाराष्ट्र विद्यापीठाने आधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स( AI ), रिअल इस्टेटसेवा क्षेत्रआणि  औद्योगिक व्यवस्थापनात हजारो  विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला आहेही अतिशय जमेची बाजू असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे आमचे ऊर्जास्त्रोत असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने विद्यापीठ नव्या उंचीवर जाणार असल्याचेही लोढाजी म्हणाले.

रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर यांनी यावेळी  विद्यापीठात सुरू असलेल्या कोर्सेसची तसेच मुंबईनवी मुंबईपुणे आणि नागपूर केंद्रात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या विद्यापीठात शिक्षित झालेला स्नातक जगाच्या कानाकोपऱ्यात आपले भवितव्य घडवायची क्षमता ठेवतो. राज्यशासनाच्या वतीने लवकरच अद्ययावत सुविधांसह पनवेल इथे विद्यापीठाची भव्य वास्तू उभारण्यात येणार असल्याची माहितीही  कुलगुरू डॉ. पालकर यांनी यावेळी दिली.

राज्यातल्या युवकांना जर्मनीत काम करण्याची संधी कौशल्य विभागाने मिळवून दिली असून विविध स्तरावर यावर उपक्रम राबवण्यात येत असल्याचे कौशल्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिवआयुक्त श्रीमती मनीषा वर्मा यांनी स्पष्ट केले. रतन टाटा महाराष्ट्र विद्यापीठात थिअरी बरोबरच प्रशिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक उद्योगक्षेत्राकडून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठी मागणी निर्माण होणार आहे. परदेशी कंपन्यांसोबत कराराच्या प्रक्रिया पूर्णत्वाला जात असून हे विद्यापीठ जगात एक ब्रँड म्हणून नावाजले जाईलअसा विश्वास वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या सांगता समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श प्राध्यापक संदीप जैनआदर्श युवा प्राध्यापक अनिरुद्ध चव्हाणप्रशासकीय उल्लेखनीय कार्य मीना श्रीमाळीग्रंथपाल मीनाक्षी पाटील तर संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे पारितोषिक दीप्ती जाधव यांना देण्यात आले.  उत्कृष्ट स्टार्ट अप गटात एक लाख रुपयांचे पारितोषिक वैष्णवी कोठावडे यांना दुसरे दोन लाखांचे पारितोषिक साक्षी पारेख यांना तर तीन लाखांचे पाहिले पारितोषिक विष्णुदास विश्वकर्मा यांना राज्यपालांचे हस्ते देण्यात आले.

0000

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार,pl share

 बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबई दि.१९:- बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतीलअसा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितलेपनीर हा  खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र  काही ठिकाणी बनावट पनीर अथवा चीज ऍनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल.

अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसारविक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंटहॉटेलकॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्सडिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी  कोणत्याही प्रकारची  तडजोड केली जाणार नाही.

रेस्टॉरंटहॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास  आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२)(e) नुसारग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेचअन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसारअन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहितीतसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेचहॉटेलरेस्टॉरंटफास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासूनपनीरच्या ऐवजी अॅनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यासकिमान १० आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन घाडी-जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६नियम व नियमन २०११ तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल.

विभागीय सह आयुक्त (अन्न) आणि सहा आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊनपनीरच्या ऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करत असल्यासत्याबाबत मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याबाबत तसेच कायद्यातील तरतुदींबाबत अवगत करावे. यासोबतचग्राहकांमध्ये याबाबत जनजागृती करावी.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे

परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ

 परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ

 

मुंबई, दि.१७ : महाराष्ट्रातील नर्सिंग क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन विद्यार्थिनींना प्रातिनिधीक स्वरुपात हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

 

मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यमंत्री माधुरी मिसाळवैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमारआयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते.

 

राज्य शासनाने जनरल नर्सिंग मिडवाईफरी  (जीएनएम)  आणि ऑक्सीलरी नर्स मिडवाईफरी (एएनएमअभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्याचे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ही योजना शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे.

 

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणालेही डिजिटल प्रमाणपत्रे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. यामुळे प्रमाणपत्राची ऑनलाइन पद्धतीने खात्री करणे सुलभ होणार आहे. नोकरी देण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता येणार आहे. तसेचबनावट प्रमाणपत्रे देण्याच्या प्रकारांना यामुळे आळा बसेल.

 

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून नर्सिंग क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. दरवर्षी सुमारे २० हजाराहून अधिक विद्यार्थी जनरल नर्सिंग मिडवाईफरी (जीएनएम) व ऑक्सीलरी नर्स मिडवाईफरी (एएनएम) अभ्यासक्रम पूर्ण करतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना केवळ छापील प्रमाणपत्रे दिली जात होती. मात्रआता त्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्रे मिळणार आहेत.

 

या उपक्रमामुळे डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा देणारे महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ हे राज्यातील पहिले शैक्षणिक मंडळ ठरले आहे.


वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

 वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

 

मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषद आणि व्हेज बाजाराविषयी

 

भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश. भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्याने होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेने बहरत चालले आहे. आज या क्षेत्राकडे नीट पाहिले तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनेही मोठी उसळी घेतल्याचे दिसते. यामागचे कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवाप्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्याने नव्याखिळवून ठेवणाऱ्यासर्वसमावेशकतेची जाणीव करून देणाऱ्या आशयाची वाढती मागणी करत असलेला देशातला तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षक वर्ग. त्यामुळेच तर आता भारतासाठी हे क्षेत्र केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून मर्यादित राहिलेले नसूनहे भारतासाठी सांस्कृतिक अभिव्यक्तीआर्थिक विकास आणि जागतिक पटलावर आपला प्रभाव पाडण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम झाले आहे. लवकरच मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) होणार आहे. येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान महाराष्ट्रातमुंबई इथे ही शिखर परिषद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेच या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद जागतिक पटलावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब असलेला एक मंच ठरणार आहे आणि वेव्हज बाजार हा या शिखर परिषदेअंतर्गतचाच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खरे तर गेल्या अनेक दशकांपासून मी या क्षेत्रातच जगतोवावरतो आहे. या इतक्या प्रदीर्घ काळातील माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो ती म्हणजे कथात्मक मांडणीत लोकांना एकत्र आणण्याचीत्यांना प्रेरित करण्याची आणि एकुणात परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असते. याच पार्श्वभूमीवर वेव्हज आणि वेव्हज बाजाराच्या माध्यमातून भारताने जागतिक मनोरंजन क्षेत्रासाठी एका व्यापक सहकार्यपूर्ण भागीदारीचे आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

खरे तर वेव्हज बाजार ही ऑनलाइन बाजारपेठेसाठी आखली गेलेली एक क्रांतिकारक संकल्पना आहे. ही ऑनलाइन बाजारपेठ म्हणजे जागतिक मनोरंजन परिसंस्थेअंतर्गतचे व्यावसायिक तज्ज्ञउद्योग - व्यवसायआणि कलाकारांना परस्परांसोबत जोडून देणारे माध्यम ठरणार आहे. या बाजारपेठेअंतर्गत या क्षेत्रातील परस्पर सहकार्य सुलभ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. याद्वारे या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांना नव्या संधी शोधण्याची आणि सहकार्यपूर्ण भागीदारी स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. या बाजारपेठेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनव व्यवसाय केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 27 जानेवारी २०२५ रोजी या अभिनव बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन केले होते. आर्थिक क्षेत्रात दावोस शिखर परिषदेचे स्थान आहेतेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्या दृष्टीने वेव्हज बाजार महत्त्वाचे साधन ठरणार आहे.

वेव्हज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंतमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सुमारे ५५०० खरेदीदार२००० पेक्षा जास्त विक्रेते आणि जवळपास १००० प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे. भविष्यात या संकेतस्थळाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीची एक सर्वसमावेशक बाजारपेठ आणि परस्पर संपर्काच्या केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देणे हा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनेच संकेतस्थळाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोफाइलिंग म्हणजेच त्या त्या व्यक्तींची व्यावसायिक ओळख करून देण्याची तसेच मागणीनुसार जुळवणी करून देण्याच्या तंत्रज्ञानाचीही जोड दिली गेली आहे. या माध्यमातून ऑनलाइन संकल्पना मांडण्याचे सत्रऑनलाइन बीटूबी बैठका (विविध व्यावसायिक प्रतिनिधींच्या बैठका)वेबिनार या आणि अशाच प्रकारच्या इतर महत्त्वाच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.

ही बाजारपेठ म्हणजे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या अवकाशातील चित्रपटदूरचित्रवाणीअॅनिमेशनगेमिंगजाहिरातवर्धित वास्तव (एक्स्टेंडेड रिअॅलिटी)संगीतध्वनी संयोजननभोवाणी या आणि अशा विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. हे व्यासपीठ विक्रेते आणि खरेदीदारांतील दुवा ठरेल आणि त्याद्वारे व्यावसायिकांना आपली कौशल्ये सुलभतेने सादर करण्याचीत्यांच्या संभाव्य ग्राहकांसोबत थेट संपर्क साधण्याची आणि उपयुक्त सहकार्यपूर्ण भागीदारीची संधी उपलब्ध करून देत राहील.

एखादा चित्रपट दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्मिती भागीदाराच्या शोधात असेलएखादा जाहिरातदार योग्य व्यासपीठाच्या शोधात असेलएखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराच्या शोधात असेल किंवा एखादा कलाकार आपल्या कलाकृतींना जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित असेलतर अशा सर्वांसाठी वेव्हज बाजारपेठेचा हा मंच म्हणजे परस्पर संपर्कसहकार्य आणि व्यवसायवृद्धीचे बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी जागा किंवा बाजारपेठ असणार आहे.

एका अर्थाने वेव्हज बाजार ही एकप्रकारची समन्वित बीटूबी बैठकांची अभिनव बाजारपेठ आहेजिने जागतिक मनोरंज क्षेत्रातील परस्पर संपर्क व्यवस्थापरस्पर सहकार्यपूर्ण भागीदारी व्यवस्थाआणि विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा अगदी क्रांतिकारकरीत्या बदलला आहे. या बाजारपेठेने चित्रपटदूरचित्रवाणीसंगीतगेमिंगअॅनिमेशनजाहिरात तसेच वर्धित वास्तव (एक्स)आभासी वास्तव (व्हीआर) यांसारख्या जिवंत अनुभूती देणाऱ्या तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ व्यावसायिकांना एकत्र आणणारा मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि याद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रांसाठीच्या आशय सामग्रीचे सूचीकरणत्याचा शोध आणि संबंधित व्यवहारांसाठीचाही एक व्यापक मंच उपलब्ध झाला आहे. चित्रपट वितरणासाठीचा मंचाच्या शोधात असलेले निर्मातेनव्या संकल्पना मांडू पाहणारे गेम डेव्हलपर किंवा लायसन्सिंग संधींच्या शोधात असलेले साऊंड डिझायनर अशा सगळ्यांसाठी वर्गवारीनुसार सूचीकरणसुरक्षितपणे सादरीकरणे पाहण्याची दालने आणि संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देत ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करणारी बाजारपेठ म्हणून वेव्हज बाजार उदयाला येणार आहे.

या बाजारपेठेच्या माध्यमातून भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जात विक्रेते आणि खरेदीदारांना त्यांच्यासाठीचा योग्य भागीदार आणि संधी शोधण्याच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या सुविधांचा अंतर्भाव केला आहे. चित्रपट स्टुडिओअॅनिमेशन हाऊसपॉडकास्ट निर्मातेमार्केटिंग यंत्रणा यांसारख्या विक्रेत्यांना आपल्या सेवा आणि त्यांच्याकडची आशय सामग्री जागतिक गुंतवणूकदारवितरक आणि भागीदारांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे खरेदीदारांसाठीदेखील उच्च गुणवत्तेचेआधुनिक काळाशी सुसंगत प्रकल्प या बाजारपेठेमुळे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याच वेळी गुंतवणूकदारांसाठीदेखील सहनिर्मितीच्या करारांची आणि व्यापक व्यावसायिक संधींची दारे खुली झाली आहेत. इथे आवर्जून उल्लेख करायला हवी अशी गोष्ट म्हणजे या व्यासपीठाला या उद्योग क्षेत्राशी संबंधित विशिष्ट उपक्रमसादरीकरणे पाहण्याची दालनेगुंतवणूकदारांबरोबरच्या बैठका - चर्चा आणि कलाकृतींच्या थेट प्रक्षेपण सत्रांसारख्या लाइव्ह स्क्रीनिंगसारख्या उपक्रमांशी जोडले गेले आहेयामुळे या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ आभासी संवादाच्या पलीकडे जात खऱ्या अर्थाने उपयुक्त असलेले करार आणि व्यवहार प्रत्यक्षात साकारले जातील याचीच सुनिश्चिती झाली आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात वेव्हज शिखर परिषद होणार असून त्यावेळी हा वेव्हज बाजारही साकारला जाणार आहे. यानिमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल बाजारपेठेवर नोंदणी केलेल्या काही निवडक प्रतिनिधींना या बाजारपेठेत आपल्या संकल्पना मांडण्याचीया उद्योग क्षेत्रातील विविध घटकांसोबत संपर्क प्रस्थापित करण्याचीआघाडीच्या भागधारकांसोबत प्रत्यक्ष करार आणि व्यवहार पूर्णत्वाला नेण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनव दृष्टिकोनामुळे वेव्हज बाजार केवळ एक व्यासपीठ म्हणून मर्यादित राहिलेले नाहीतर ते अधिक स्मार्टपरस्परांशी अधिक जोडलेले आणि जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मनोरंजन क्षेत्राच्या दिशेने सुरू झालेली चळवळच ठरले आहे.

एक कलाकार म्हणूनआम्ही कायमच आव्हानात्मकप्रेरणादायी आणि चौकटीपलीकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या अवकाशाच्या शोधात असतो. वेव्हज हा अशाच प्रकारच्या अवकाशाच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. दूरदृष्टीने सुरू केलेल्या या वाटचालीचा आपणही एक भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. ही परिषद आपल्या परस्परांशी संपर्काच्याकलाकृतींच्या निर्मितीच्या आणि मांडणीच्या पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणेल. हा बदल केवळ भारतापुरता मर्यादित नसेल तर त्याचा प्रभाव अवघ्या जगात दिसेल. ही परिषद म्हणजे भारतासाठीचा लगान’ क्षण आहे. जगभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एकतेचाधैर्याचा आणि एका अशा दृष्टिकोनाचा क्षण आहेज्याचा प्रतिध्वनी आपल्या सीमांच्याही पलीकडे ऐकू येत राहील.

 

लेखक : आमिर खान, अभिनेता आणि निर्माते

(सौजन्य: पी आय बीमुंबई)

००००

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात विविध उपक्रम राबवणार - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव

 पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात

 विविध उपक्रम राबवणार

-  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत

पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव

 

मुंबई दि.16: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजेखऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईलहा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे शासनाच्या सर्व  विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

           राज्यात 22 ते 25 एप्रिल2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मादिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलमहिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेदीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन  उपस्थित होते.

          दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या महोत्सावासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत. मानव कल्याण यासंदर्भातील  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा  होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीत दिली.  

         पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन आदि बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगटअंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय  योजना पोहचवण्यासाठी या महोत्सवात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवात महिला व बाल विकासशालेय शिक्षणग्रामविकाससांस्कृतिक कार्यआदिवासी विकासपर्यावरण, पर्यटन या विभागाकडूनही या महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे.

              मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या कीशासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी  यशस्वी करावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

                                                              0000

संध्या गरवारे/विसंअ/



वंदना थोरात/विसंअ


विशेष लेख :

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

 श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

-  सभापती प्रा.राम शिंदे

 

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीता.जामखेडजि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावातसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणेत्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्यायाबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..


Featured post

Lakshvedhi