Thursday, 17 April 2025

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि.१७ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२२ एप्रिल २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २२ एप्रिल२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २३ एप्रिल२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २३ एप्रिल२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ एप्रिल२०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑक्टोबर २३  आणि एप्रिल २३   रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची* *राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी* *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक विचार तरुणांपर्यंत* *पोहोचविणे महत्त्वाचे*

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची*

*राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिकशैक्षणिक विचार तरुणांपर्यंत*

*पोहोचविणे महत्त्वाचे*

*- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ*

 

मुंबई, दि.१७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

 

सामाजिक न्यायनगरविकासपरिवहनवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकतीच इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले.

 

यावेळी आमदार भाई गिरकरसहसचिव सोमनाथ बागुलसह आयुक्त प्रसाद खैरनारकार्यकारी अभियंता प्रदीप अहिरेनगरसेविका समिता कांबळेमाजी नगरसेवक शरद कांबळेराहुल कांबळेअशोक कांबळे आदीसहमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमुंबई महानगरपालिकासामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या कीस्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास प्रभावीपणे मांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानऑडिओ-विज्युअल माध्यमेइंटरेक्टिव्ह डिस्प्लेलेझर शो इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जगातील आणि देशातील विविध स्मारकाचा अभ्यास करून आपला इतिहास आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी नियोजन करावे.

 

तसेचस्मारकाच्या मार्गिकास्वच्छता व सुरक्षा व्यवस्था यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामांची गुणवत्ता राखतइलेक्ट्रॉनिक कामे समांतरपणे (फेजनुसार)  सुरू ठेवावी जेणेकरून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेलअसेही त्यांनी सांगितले. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृहग्रंथालयसभागृहविपश्यना केंद्र अशा विविध सभागृहात स्वच्छता आणि सुरक्षा यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये देखभाल दुरुस्तीसाठींच्या उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

यावेळी समितीतील सदस्यकार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या.

०००

राज्यपाल यांच्या हस्ते उद्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

 राज्यपाल यांच्या हस्ते उद्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभ

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

 

मुंबईदि १७ : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरवउत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकजिजामाता पुरस्कार  (महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी) व शिवछत्रपती राज्य पुरस्कार-खेळाडूदिव्यांग खेळाडू व साहसी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२२-२३ व २०२३ -२४ या वर्षासाठीचे पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुलपुणे येथे शुक्रवार१८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेविधानभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलराज्यमंत्री माधुरी मिसाळक्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरआयुक्त हिरालाल सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

पुणेबालेवाडी येथे होणाऱ्या या समारंभात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३ साठी प्रदीप गंधेतर २०२३ -२४ साठी शकुंतला खटावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०१९-२० साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विराज लांडगे (कबड्डी)गणेश नवले (जिम्नॅस्टीक)विराज परदेशी (मॉडर्न पेंटथलॉन)आदित्य गिराम (जलतरण डायव्हिंग) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर २०२०-२१ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जलतरणसाठी कोमल किरवेवुशू क्रीडाप्रकारासाठी मिताली वाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२१-२२ साठी जलतरणसाठी राजश्री गुगळेजिम्नॅस्टीक्स साठी वैदही देऊळकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कारशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कारशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग) या समारंभात खेळाडूंना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी 50 सायबर पोलीस ठाणे; सन 2024 मध्ये फसवणुकीतील 440.37 कोटी रूपये वाचविले

 सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी 50 सायबर पोलीस ठाणे;

सन 2024 मध्ये फसवणुकीतील 440.37 कोटी रूपये वाचविले

 

मुंबईदि. 17: सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. त्यानुसार राज्यामध्ये 50 सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून जिल्हाआयुक्त स्तरावर सायबर लॅबची स्थापना करण्यात येत आहे. कार्यान्वीत झालेल्या लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  तसेच जागतिक स्तरावरील अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उपक्रम महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

 माहे जानेवारी ते ‍‍डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र सायबर कार्यालयातील एनसीआरओ पोर्टल व सायबर हेल्पलाईन 1930 वर एकूण 3 लाख 32 हजार 538 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीच्या रक्कमेपैकी 440.37 कोटी रूपये वाचविण्यात आले आहेत. संगणकलॅपटॉपमोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागल्याने शासनाने नागरिकांची होणारी फसवणूक थांबविण्याच्यादृष्टीने http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक 1930 वर आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नॅशनल क्राईम रिर्पोंटींग पोर्टलवर सन 2024 मध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई शहरात 2,155, पुणे शहरात 125 व ठाणे शहरात 862  सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आर्थिक फसवणूक झालेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये 838 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व 942 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  तसेच संपूर्ण राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये 1,936 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामध्ये 1,967 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.  कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात 5 हजार पोलीसांना सायबर तपास आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहेअसे पोलीस उपमहानिरीक्षकमहाराष्ट्र सायबर यांनी कळविले आहे.

पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती

 पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती

-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि.१७: राज्यातील शेतक-यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणा-या खर्चापैकी 50% ‘मनरेगा’ मधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा ‘मनरेगा’ मध्ये समावेश करण्याबाबत  राज्य शासनामार्फत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी संघटनांच्या बैठकीत सांगितले. तसेचशेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

राज्यातील विविध शेतकरी संघटनांची कृषीविषयक प्रश्नाबाबत मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी आमदार बच्चू कडूशेतकरी संघटनेचे पदाधिकारी ललित पाटील, प्रकाश शिंदे तसेच कृषीसहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            राज्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या कांदाकेळीद्राक्ष अशा पिकांच्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री व केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. राज्यातील शेतक-यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा सहजरित्या लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक ही डिजिटल प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल असे त्यांनी केले.

            कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकरी संघटनांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन या योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेचराज्यातील प्रत्येक पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राची अद्ययावत माहिती शेतक-यांना व कृषी विभागास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येईल असे ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी शेतकरी कर्जमाफीशेतमालाला हमीभावशेतमालाचे आयात-निर्यात धोरण इ. विषयावर सूचना केल्या. 

००००

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

 चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरवस्व.राज कपूर जीवन गौरव आणि

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

महेश मांजरेकरअनुपम खेरकाजोल देवगण,

मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांचा सन्मान

-         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

·         25 एप्रिल 2025 रोजी मुंबईत पुरस्काराचे वितरण

 

मुंबईता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कारचित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कारस्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कारस्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनयसंगीतनिर्मितीदिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहेअशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेतादिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कमस्मृतीचिन्हमानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असूनया पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाखस्मृतीचिन्हमानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनयसंगीतनिर्मितीदिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहेअशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाखस्मृतिचिन्ह व मानपत्रचांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेचसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कममानचिन्हमानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायणअशोक पत्की. सत्यशील देशपांडेपं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोममुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवायसंविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडियामुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरआदर्श शिंदेवैशाली सामंतउर्मिला धनगरनंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असूनसंचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतंनाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असूनसन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातीलअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

0000

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

 श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

-  सभापती प्रा.राम शिंदे

 

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीता.जामखेडजि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावातसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणेत्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्यायाबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..

००००

Featured post

Lakshvedhi