Thursday, 17 April 2025

देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू

 देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू

-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. १६ : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी  देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणेआयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरूकुलसचिवप्राध्यापकविविध विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते. तसेच वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे या शुभारंभ कार्यक्रमास सहभागी झाले होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार (Massive open online course - MOOC) तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असूनत्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक(आयकेएस – इंडियन नॉलेज सिस्टीम- जेनेरिक) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामध्ये  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमुंबई विद्यापीठशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश 

शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी

 शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने

व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी

-पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १६ : शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची मोठी जबाबदारी आहे. आपले महत्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावाअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकमव्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटीलसरव्यवस्थापक (प्रशासन) आनंद ऐनवाडसरव्यवस्थापक (मालमत्ता) नितीन यादवसरव्यवस्थापक (खरेदी) देविदास भोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणालेमहासंघाची स्थापना १९५८ मध्ये झालेली असून महासंघाच्या उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. महासंघाने व्यवसाय वाढविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघ हा पणन महासंघाचा घटक असल्याने महासंघाने राज्य शासन आणि खरेदी विक्री संघ यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे. यासाठी खरेदी विक्री संघाला एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास जागवावा.

ज्या राज्यांमध्ये पणन महासंघाचे काम चांगले आहे त्या राज्यांच्या कामाचा अभ्यास करण्याची सूचना करून मंत्री श्री. रावल यांनी आपल्या राज्यातील शेतीमालाची विक्री होण्यासाठी इतर राज्यांना येथे निमंत्रित केले जाईल असे सांगितले. ते म्हणालेपणन महासंघ आणि तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघामार्फत जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी होईल यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या योजनांमधून व्यवसाय मिळविता येईल का त्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

महासंघाच्या मालमत्ता सुस्थितीत ठेवून शक्य त्या ठिकाणी त्या भाडेतत्वावर द्याव्यातआठवडी बाजारांसाठी जागा मिळवून देण्यात महासंघाने समन्वयकाची भूमिका बजावावीयाद्वारे महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मालमत्तांचा सुयोग्य वापर होण्यासाठी पणन महामंडळ आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्यात येईलअसेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक श्री. डुबे पाटील यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पणन महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघाकडील ५११ पदांपैकी केवळ १०४ पदे कार्यरत असून इतर पदांची भरती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या गोदामांची तसेच इतर मालमत्तांची दुरुस्ती होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात या वर्षी सोयाबीनची सर्वाधिक खरेदी झाली असून देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. यामध्ये राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी महासंघाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले.

                                                        

युरोपियन युनियन परस्पर व्यापार वृद्धीसाठी सहकार्य

 महाराष्ट्र-युरोपियन युनियन परस्पर व्यापार वृद्धीसाठी सहकार्य

- राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून युरोपियन युनियन सोबत कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची आणि व्यापाराची अधिक संधी आहे ते क्षेत्र निश्चित करण्यात यावे. यासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभाग युरोपियन युनियनला मदत करेलअसे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी युरोपियन युनियन चेंबर्सच्या प्रतिनिधींना सांगितले.

युरोपियन युनियन चेंबर्स (भारतीय हितधारक) यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मंत्री श्री.रावल बोलत होते. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेयुरोपियन युनियन चेंबर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जीसंचालक डॉ. रेणू शोमे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणालेमहाराष्ट्रात कृषी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या परस्पर सहकार्याने व्यापाराची क्षेत्र निश्चित झाली की त्या विभागासोबत सविस्तर चर्चा करता येईल. यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईलअसेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

            महाराष्ट्राची कृषी उत्पादनांची विविधता आणि गुणवत्ता युरोपियन बाजारासाठी आकर्षक आहे. महाराष्ट्रात हापूस आंबाडाळिंबद्राक्षेकांदाहळदतांदूळ आणि गहू यांसारख्या विविध आणि उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांचे उत्पादन होते. ही विविधता युरोपियन संघ देशांतील विविध ग्राहकांच्या गरजांना पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेषतः कोकणातील हापूस आंबा आणि पुण्याची द्राक्षे युरोपियन बाजारात विशेष मागणी असलेल्या उत्पादनांमध्ये गणले जातातअसेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी नमूद केले.

कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती द्यावी

 कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती द्यावी

-          जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,दि. 16 :- कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला  सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या कामास  गती द्यावी.  30 जून पर्यंत या कामाची निविदा निघेल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावेअशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगेकुकडीवडजमाणिकडोह धरणांच्या प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार शरददादा सोनवणेजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेमुख्य अभियंता हणमंत गुणालेअ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पिंपळगाव जोगे कालवा 1 ते 47 मधील अस्तरीकरणदुरुस्ती व गळती प्रतिबंधक उपाय योजना करुन हे काम  प्राधान्याने सुरु करावे. माणिकडोह जलाशय बुडित बंधाऱ्याचे काम सुरु करण्याबाबत प्रकल्प आराखडा तयार  करावा. तसेच मीना पुरक कालावा व मीना शाखा कालवा विशेष दुरुस्तीसाठी आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावीअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.  बैठकीत जुन्नर तालुक्यातील कुकडी  प्रकल्प व इतर धरणातील गाळ काढणेबाबतही  चर्चा करण्यात आली.

00000

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे !!

 *कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे !!* 


बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो.


एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व देखील असतात, जे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करतात.


*जाणून घेऊया कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय फायदे आहेत आणि तो बनवण्याची पद्धत कशी आहे.* 


*कढीपत्त्यातील पोषक घटक -*

कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन सी इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.


*कढीपत्ता चहाचे फायदे -* 

1. कढीपत्ता दक्षिण भारतात जास्त वापरला जातो. मात्र, आता बहुतांश लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. कढीपत्त्याचा उपयोग फक्त फोडणी देण्यासाठीच केला जात नाही, तर या औषधी वनस्पतीपासून बनवलेला एक कप चहा देखील आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो.


2. कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्यात सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असतात, जे आतड्याची हालचाल सुधारतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते.


बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब आदी समस्याही कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने कमी होतात.


3. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही कढीपत्ता चहाचे सेवन करू शकता. कढीपत्ता चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.


4. कढीपत्त्यात उच्च पातळीचे फिनॉलिक्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण करतात. अँटिऑक्सिडंटमध्ये असलेले घटक शरीराला संसर्ग, जळजळ इत्यादीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आजारांपासून दूर राहायचे असेल तर एक कप कढीपत्त्याचा चहा नियमित घ्या.


5. तुम्ही गरोदरपणातही या चहाचे सेवन करू शकता. हा चहा प्यायल्याने तुम्हाला उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान हा चहा प्या, तुम्हाला उलट्या, मळमळ असा त्रास होणार नाही.


6. कढीपत्त्याचा सुगंध किंवा वास मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतो. तणाव दूर करून मन आणि मेंदू शांत होतो. दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल तर थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी एक कप कढीपत्ता चहा प्या.


कढीपत्ता चहा कसा बनवायचा -


कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी सुमारे 20-25 ताजी कढीपत्ता पाने घ्या. त्यांना पाण्याने स्वच्छ करा. चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा.


आता त्यात कढीपत्ता टाका. थोडावेळ असेच झाकून ठेवा. गोडवा हवाच असल्यास थोडा गुळ वापरा, साखर नको. काही मिनिटांतच पाण्याचा रंग बदलू लागेल. चहा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमागरम पिण्याचा आनंद घ्या.


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*(कॉपी पेस्ट)*


 *

महाराष्ट्र-युरोपियन युनियन परस्पर व्यापार वृद्धीसाठी सहकार्य

 महाराष्ट्र-युरोपियन युनियन परस्पर व्यापार वृद्धीसाठी सहकार्य

- राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून युरोपियन युनियन सोबत कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची आणि व्यापाराची अधिक संधी आहे ते क्षेत्र निश्चित करण्यात यावे. यासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभाग युरोपियन युनियनला मदत करेलअसे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी युरोपियन युनियन चेंबर्सच्या प्रतिनिधींना सांगितले.

युरोपियन युनियन चेंबर्स (भारतीय हितधारक) यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मंत्री श्री.रावल बोलत होते. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेयुरोपियन युनियन चेंबर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जीसंचालक डॉ. रेणू शोमे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणालेमहाराष्ट्रात कृषी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या परस्पर सहकार्याने व्यापाराची क्षेत्र निश्चित झाली की त्या विभागासोबत सविस्तर चर्चा करता येईल. यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईलअसेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

            महाराष्ट्राची कृषी उत्पादनांची विविधता आणि गुणवत्ता युरोपियन बाजारासाठी आकर्षक आहे. महाराष्ट्रात हापूस आंबाडाळिंबद्राक्षेकांदाहळदतांदूळ आणि गहू यांसारख्या विविध आणि उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांचे उत्पादन होते. ही विविधता युरोपियन संघ देशांतील विविध ग्राहकांच्या गरजांना पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेषतः कोकणातील हापूस आंबा आणि पुण्याची द्राक्षे युरोपियन बाजारात विशेष मागणी असलेल्या उत्पादनांमध्ये गणले जातातअसेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी नमूद केले.

00000

महाराष्ट्र सायप्रससोबत निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक

 महाराष्ट्र सायप्रससोबत निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक

-         मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे कृषीमालफळे आणि फुलांचे केंद्र असूनयेथून विविध उच्च दर्जाची शेतीउत्पादने सायप्रससारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास उत्तम संधी आहे. या पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र सायप्रससोबत कृषीमाल निर्यात क्षेत्रात व्यावसायिक सबंध वाढविण्यास उत्सुक आहेअसे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीइंडियन मर्चंट्स चेंबर आणि सायप्रसचे मानद वाणिज्यदूत विराज कुलकर्णी यांच्यासोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडेसायप्रसचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले,   सायप्रस ही मध्य पूर्वेतील एक लहान परंतु महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्च उत्पन्नावर आधारित आहे. अलीकडील काळात येथे दर्जेदार कृषी उत्पादने आणि प्रक्रिया अन्नपदार्थांची मागणी झपाट्याने वाढत असल्याने  सायप्रससोबत व्यावसायिक संबंध वृद्धिंगत केल्यास नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला. येत्या काळात महाराष्ट्रात व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सायप्रसला निमंत्रित करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi