Wednesday, 16 April 2025

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात विविध उपक्रम राबवणार - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव

 सुधारित बातमी

वृत्त क्र. 1604

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात

 विविध उपक्रम राबवणार

-  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत

पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव

 

मुंबई दि.16: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजेखऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईलहा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे शासनाच्या सर्व  विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

           राज्यात 22 ते 25 एप्रिल2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मादिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलमहिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेदीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन  उपस्थित होते.

          दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या महोत्सावासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत. मानव कल्याण यासंदर्भातील  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा  होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीत दिली.  

         पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन आदि बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगटअंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय  योजना पोहचवण्यासाठी या महोत्सवात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवात महिला व बाल विकासशालेय शिक्षणग्रामविकाससांस्कृतिक कार्यआदिवासी विकासपर्यावरण, पर्यटन या विभागाकडूनही या महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे.

              मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या कीशासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी  यशस्वी करावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील मासिक व साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील

मासिक व साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

 

            मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे मार्च २०२५ मध्ये २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गुढीपाडवा (भव्यतम)७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी होळी विशेष१९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव२१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २५मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आले असल्याचे वाशी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा)यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या महावीर लॉटरी सेंटरकोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. 50 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक 11 / 1590 या श्रीगणेश एंटरप्रायजेसमुंबई यांचेकडून -विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत. 

मार्च- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १९३४८ तिकीटांना रू. १,६३,१३,५००/- व साप्ताहिक सोडतीतून ५५७०२ तिकीटांना रू. १,९९,७२,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या  कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

 श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

-  सभापती प्रा.राम शिंदे

 

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीता.जामखेडजि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावातसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणेत्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्यायाबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..


महाज्ञानदीप’ ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात

 महाज्ञानदीप’ ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ

देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू

-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. १६ : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी  देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणेआयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरूकुलसचिवप्राध्यापकविविध विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते. तसेच वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे या शुभारंभ कार्यक्रमास सहभागी झाले होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार (Massive open online course - MOOC) तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असूनत्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक(आयकेएस – इंडियन नॉलेज सिस्टीम- जेनेरिक) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामध्ये  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमुंबई विद्यापीठशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.

0000

शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी

 शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने

व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी

-पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १६ : शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची मोठी जबाबदारी आहे. आपले महत्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावाअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकमव्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटीलसरव्यवस्थापक (प्रशासन) आनंद ऐनवाडसरव्यवस्थापक (मालमत्ता) नितीन यादवसरव्यवस्थापक (खरेदी) देविदास भोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणालेमहासंघाची स्थापना १९५८ मध्ये झालेली असून महासंघाच्या उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. महासंघाने व्यवसाय वाढविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघ हा पणन महासंघाचा घटक असल्याने महासंघाने राज्य शासन आणि खरेदी विक्री संघ यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे. यासाठी खरेदी विक्री संघाला एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास जागवावा.

ज्या राज्यांमध्ये पणन महासंघाचे काम चांगले आहे त्या राज्यांच्या कामाचा अभ्यास करण्याची सूचना करून मंत्री श्री. रावल यांनी आपल्या राज्यातील शेतीमालाची विक्री होण्यासाठी इतर राज्यांना येथे निमंत्रित केले जाईल असे सांगितले. ते म्हणालेपणन महासंघ आणि तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघामार्फत जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी होईल यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या योजनांमधून व्यवसाय मिळविता येईल का त्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

महासंघाच्या मालमत्ता सुस्थितीत ठेवून शक्य त्या ठिकाणी त्या भाडेतत्वावर द्याव्यातआठवडी बाजारांसाठी जागा मिळवून देण्यात महासंघाने समन्वयकाची भूमिका बजावावीयाद्वारे महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मालमत्तांचा सुयोग्य वापर होण्यासाठी पणन महामंडळ आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्यात येईलअसेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक श्री. डुबे पाटील यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पणन महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघाकडील ५११ पदांपैकी केवळ १०४ पदे कार्यरत असून इतर पदांची भरती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या गोदामांची तसेच इतर मालमत्तांची दुरुस्ती होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात या वर्षी सोयाबीनची सर्वाधिक खरेदी झाली असून देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. यामध्ये राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी महासंघाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले.

                                                        

Abhay Scheme for Property Tax Recovery in Municipalities and Industrial Areas

 Abhay Scheme for Property Tax Recovery in Municipalities and Industrial Areas

The Cabinet has approved the implementation of the "Abhay Scheme" for recovery of overdue property taxes with a penalty waiver to increase collection. The meeting was chaired by Chief Minister Devendra Fadnavis.

Under this scheme, a penalty of 2% per month will be waived for overdue property taxes in municipalities and industrial areas. This will help reduce the increase in outstanding dues, as penalties often exceed the original tax amount, leading to delayed payments. The scheme will also allow the authorities to waive such penalties.

Previously, there was no provision to waive such penalties under the existing laws. Now, the Cabinet has approved an amendment to the law to introduce such a provision.


Changes in Lease Rules for Properties under Municipalities and Industrial Areas

 Changes in Lease Rules for Properties under Municipalities and Industrial Areas


The Cabinet has approved changes in the lease rules for properties under municipal corporations, municipalities, and industrial areas. A notification will be issued regarding new rates. The meeting was chaired by Chief Minister Devendra Fadnavis.


New rules for leasing and renewing properties under municipal corporations, municipalities, and industrial areas were finalized on November 6, 2023. Based on these rules, standard procedures will be applied to the transfer of properties across the state. The Maharashtra Municipal Corporations, Municipalities, and Industrial Areas (Real Property Transfer) (Amendment) Rules, 2025 will be drafted.


The classification of properties includes residential, educational, charitable, public, commercial, and industrial. As per the new rules, the lease rate for residential, educational, charitable, and public properties will not be less than 0.5% of the current market value (ready reckoner). Similarly, for commercial and industrial properties, the rate will not be less than 0.7% of the market value.


The valuation of properties, lease rates, and security deposits will be determined by a five-member committee under the leadership of the respective district collector. Suggestions and objections will be invited, and the final notification will be issued afterward.

Featured post

Lakshvedhi