Friday, 11 April 2025

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा

 बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत

सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

 

मुंबईदि. ८ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामागारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते. बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी ९० दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावीअसे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज दिले.

            मंत्रालयात ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए कुंदनग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेविकास आयुक्त (असंघटीत कामगार) तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.

            कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणालेग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडाळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. गावपातळीवर ग्रामविकास विभागाने २०१७ मध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक ९० दिवसाचे प्रमाणपत्र देतो. मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशीत करावे.

            बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नयेयाबाबत दक्षता घेण्यात यावी. मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविण्यात यावी. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेतमात्र नोंदणीअभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजेअशा सूचनाही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी दिल्या.  

--

ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

 ग्रामपंचायतपंचात समितीजिल्हा परिषद सदस्यांना

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

राज्यातील ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या परंतु जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावीअशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती.

त्यानुसार ग्राम पंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या एक ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर अध्यादेश जारी होईपर्यंत झालेल्या सर्वसाधारण निवडणुका अथवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि त्या अनुषंगिक बाबींसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.

यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास तात्पुरती मुदतवाढ अध्यादेश२०२५ काढण्यास मान्यता देण्यात आली.

खाजगी अनुदानित आयुर्वेद, युनानी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

 खाजगी अनुदानित आयुर्वेदयुनानी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

राज्यातील खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट-बक व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा मुदतीनुसार निश्चित वेतनवाढीचा लाभ मिळणार असूनत्यांच्या आर्थिक व सेवाविषयक स्थैर्यात वाढ होणार आहे. वेतनामध्ये येणारी कुंठितता टळणार आहे.

वित्त विभागाच्या दि. ०१ एप्रिल २०१००५ जुलै २०१० व ०६ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने या योजनेत लागू केल्या जातील.

ही योजना आयुष संचालनालयमुंबईच्या अधिपत्याखालील संबंधित खाजगी अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शासन मंजूर पदावरील पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल.

या योजनेचा लाभ देताना संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा भरती ही संस्थेमार्फत प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार करण्यात आलेली आहे की नाहीतसेच त्यांची पात्रता तपासण्याची जबाबदारी आयुष संचालनालयाची राहणार आहे.

या निर्णयामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीला दिलासा मिळाला आहे.

--0

Thursday, 10 April 2025

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा सांस्कृतिक संबंध परिषदेने मित्र देशांमध्ये भारतीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे

 भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा

सांस्कृतिक संबंध परिषदेने मित्र देशांमध्ये भारतीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. ९ : गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे जागतिक पटलावर महत्व वाढले असून देशोदेशींचे राष्ट्रप्रमुख भारताशी व्यापारसंयुक्त उपक्रम यांसह शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सांस्कृतिक विविधता भारताचे बलस्थान असून सांस्कृतिक संबंध परिषदेने विविध देशांमध्ये भारताच्या सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करून विविध देशांशी संबंध आणखी दृढ करण्यात योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.   

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), मुंबई येथे संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते.

अलीकडेच चिलीचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर येऊन गेले. भारतीय संस्कृती व परंपरांबद्दल आपण वाचले असून येथील सांस्कृतिक विविधता आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायची असल्याचे त्यांनी आपणास सांगितले असे नमूद करुन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने देशाचे परराष्ट्र संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे राज्यपालांनी सांगितले.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने अनेक देशांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून भारतात उच्च शिक्षण घेण्यास सहकार्य केले याबद्दल आनंद व्यक्त करून देशोदेशींचे हे सर्व माजी विद्यार्थी आज त्यांच्या देशात भारताचे सांस्कृतिक राजदूत झाले आहेत. भारतीय शिष्यवृत्तीमुळे अफगाणिस्तान सह अनेक मित्र देशातील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना आदिती भागवत यांच्या 'लय की कहानीया नृत्याधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाजसेविका व कला इतिहासकार फिरोजा गोदरेजमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. रवींद्र कुलकर्णीराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेप्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स राहुल बर्हतभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू पृथियानीराज्यपालांचे उपसचिव एस राममूर्तीविविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूतआयसीसीआर शिष्यवृत्ती प्राप्त विविध देशांचे विद्यार्थी आदी  उपस्थित होते.

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा

 नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही

देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ९ : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला विशेष जनसुरक्षा कायदा हा देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे पत्रकार किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाहीत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही. हा कायदा व्यक्तींसाठी नसून देशविघातक कृत्ये करणाऱ्या संघटनांविरुद्ध असल्याची नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

विशेष जनसुरक्षा कायद्यासंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत चर्चा करून पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहलमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहपोलिस महासंचालक रश्मी शुक्लाविशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह राज्यातील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यातील तरतुदीबद्दल पत्रकार संघटनांमध्ये काही शंका होत्या. १२ संघटनांनी एकत्र येत पत्रकार अभिव्यक्ती मंच स्थापन केला होता. या शंकांचे निरसन व्हावे व हा कायदा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती उपयुक्त आहेयाची माहिती पत्रकारांना व्हावीयासाठी बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पत्रकार संघटनांच्या शंकांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीदेशात यापूर्वीच तेलंगणासह इतर चार राज्यांनी तसेच केंद्र शासनाने जनसुरक्षा कायदा केला आहे. या चार राज्यांपेक्षा महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा अधिक संरक्षित आहे. अनेक माओवादी संघटनांना देशातील अनेक भागात बंदी आहे. त्यामुळे या संघटनांनी महाराष्ट्रात त्यांचे मुख्यालय हलविले आहे. माओवादी संघटनांच्या फ्रंटल ऑर्गनाझेशन हे आता शहरी भागात राहून कार्य करत आहेत. त्यामुळे आता जर हा कायदा केला नाही तर भविष्यात अनेक अडचणींना महाराष्ट्राला सामोरे जावे लागेल.

या प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यासंदर्भात जनतेमध्ये स्पष्टता यावीयासाठी विधीमंडळात कायद्याचा प्रस्ताव मांडतानाच तो संयुक्त समितीकडे पाठवून त्याबद्दल जनसुनावणी घेण्याची भूमिका मांडली. या प्रस्तावित कायद्यामध्ये पत्रकार संघटनांच्या काही सूचना असतील तर त्यावरही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच कायद्यातील तरतुदीत स्पष्टता येण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

एखाद्या संघटनेने देशाच्या सुरक्षेला बाधा येईलअसे बेकायदेशीरपणे कृत्य केल्यास किंवा माओवादी संघटनेची विचारधारा पुढे नेण्याचे कृत्य केल्यास अशा संघटनेविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या सल्लागार समितीपुढे सुनावणी झाल्यानंतरच कारवाईची त्यात तरतूद आहेत्यामुळे कोणतेही सरकार त्याचा दुरुपयोग करु शकत नाही. या समितीपुढे संघटनेचे कृत्य आंतरिक सुरक्षेविरुद्ध असल्याचे पोलिसांना सिद्ध करावे लागेल. ते सिद्ध झाले तरच त्या संघटनेविरुद्ध बंदी घालण्याची कारवाई होईल. त्यानंतरच कारवाईचे अधिकार प्राप्त होतील. हा कायदा कोणत्याही व्यक्तींविरुद्ध किंवा पत्रकारांविरुद्ध नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय मराठी  पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुखबृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टचे सचिव इंदरकुमार जैनमुंबई पत्रकार परिषदेचे संदीप चव्हाणमंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेराज्य अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशीप्रेस क्लबचे सौरभ शर्माअनुराग कांबळेमुंबई हिंदी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजकुमार सिंहबृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे मारुती मोरेपुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशन काळेमुंबई क्राईम रिपोर्टर संघटनेचे अध्यक्ष विशाल सिंहमहाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्रकोषाध्यक्ष सौरभ शर्मामराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईकटीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे महासचिव पंकज दळवीमनोज हलवाई यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/


महसूल विभाग हा शासनाचा चेहरा शेवटच्या घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी एकत्रितपणे काम करावे

 महसूल विभाग हा शासनाचा चेहरा

शेवटच्या घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी एकत्रितपणे काम करावे

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. ९ : महसूल विभागाच्या विविध योजनांचा थेट ग्रामीण जनतेशी संबंध असून जनतेच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना गतिशील आणि पारदर्शकपणे काम करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल यंत्रणेने एकत्रितपणे काम करावेअसे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महसूल विभागामार्फत सर्वसामान्यांशी संबंधित असणाऱ्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्तेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानजिवंत सातबारा योजनासलोखा योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना गावपातळीवर प्रत्यक्ष राबविणाऱ्या महसुली यंत्रणेशी मंत्री श्री. बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेराज्य शासन गतिशीलपणे आणि पारदर्शकपणे वाटचाल करीत असून  कोणाच्याही चुकीमुळे याला हानी पोहोचणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. पारदर्शकपणे काम करताना अनवधानाने झालेल्या चुका माफ केल्या जातील परंतु जाणीवपूर्वक केलेल्या चुकांना पाठीशी घातले जाणार नाहीअसे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेनुकत्याच पुणे येथे झालेल्या महसूल विभागाच्या दोन दिवसीय परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त योग्य ती कार्यवाही करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी रस्तावीज आणि पाणी मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर पुढील एक वर्षात एकही सुनावणी प्रलंबित राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावीअसे सांगून महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत राज्यात १६०० शिबिरे होणार आहेत या माध्यमातून सर्वांना लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नुकत्याच जाहीर झालेल्या वाळू धोरणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याची सूचना करून गरिबांच्या घरकुलांना वाळू मिळालीच पाहिजेअसे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

प्रत्येक अधिकाऱ्याने इतरांना मार्गदर्शक ठरेल असे एक नाविन्यपूर्ण कार्य करण्याचे आवाहन करून मंत्री श्री. बावनकुळे यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीरपणे गौरव केला जाणार असल्याचे सांगितले. विविध माध्यमांमधून येत असलेल्या नकारात्मक बातम्यांबद्दल बोलतानात्यातून आपली चूक निदर्शनास आल्यास ती दुरुस्त करावी अथवा बातमी चुकीची असल्यास त्याचे तातडीने खंडन करावेअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोल्हापुरातील शेंडा पार्क मधील जागेची अदलाबदल करण्याची तयारी कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

 कोल्हापुरातील शेंडा पार्क मधील जागेची अदलाबदल करण्याची तयारी

कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी

- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. ९ : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथील जागा आयटी पार्क आणि दंत महाविद्यालयासाठी देण्याची मागणी केली जात होती. तथापिही जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी यांच्या ताब्यात आहे. ही जागा हस्तांतर करून विद्यापिठास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात यावाअसे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगेकृषी विद्यापीठ राहुरीचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेकोल्हापूर शहराच्या विकासासाठी शेंडापार्क येथील जागेची अदलाबदल करण्यास महसूल विभागाची तयारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात असेल आणि त्यांची तयारी असेल तर त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा.

कृषी विद्यापीठाने आपणास मिळणारी जागा ही शेती आणि संशोधनास योग्य अशी मिळावी आणि जागेच्या अदलाबदलीमध्ये त्या ठिकाणच्या विकासासाठी निधी मिळावाअशी अपेक्षा व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi