Friday, 11 April 2025

-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय,आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

मुंबईदि. ११ : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

             पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किंमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान १० शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-ट्रान्सीट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावाअशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या .

             मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसध्या वापरत असलेल्या ई-बसमेट्रो आणि ई-ट्रान्सीट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रो सोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रान्सीट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासह हेस-एजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, बस रॅपीड ट्रान्सीट (बीआरटी) यांना एकत्र करून एक हाय कपॅसिटी मास ट्रान्सीट रुट (एचसीएमटीआर) अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई-ट्रान्सीट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंत्रालयात प्रवेशासाठी डीजीप्रवेश ॲपवर नोंदणी करा मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही

 मंत्रालयात प्रवेशासाठी डीजीप्रवेश ॲपवर नोंदणी करा

मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही

 

            मुंबईदि. ३ : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीअभ्यागत यांना १ एप्रिल पासून डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालय बाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षा विषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करावे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे.

ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला कवेळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहेत्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई शहर समितीमार्फत १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत सुलभ प्रक्रियेने जात वैधता प्रमाणपत्र

 समता पंधरवड्यानिमित्त विशेष जात पडताळणी मोहीम

माटुंगा येथे ९ एप्रिलला मार्गदर्शन कार्यशाळा

   

मुंबई, दि. ०३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ९ एप्रिल २०२५ रोजी माटुंगा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई शहर समितीमार्फत १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत सुलभ प्रक्रियेने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ११ ते ४ या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र, पडताळणी समिती, मुंबई शहर, पंचशील एम १ तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा मुंबई - १९, या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी, शासकीय सेवेतील अर्जदार यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून याबाबत चर्चासत्र ही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये समितीकडील प्राप्त प्रकरणांतील त्रुटीयुक्त प्रकरणात अर्जदार यांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. संबंधित अर्जदारांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.

केंद्राकडे प्रलंबित रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तात्काळ मंजूर करावा - रोजगार हमी

 केंद्राकडे प्रलंबित रोजगार हमी योजनेचा निधी

राज्यास तात्काळ मंजूर करावा

                                                    - रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

 

नवी दिल्ली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यासाठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली.

कृषी भवन येथे श्री गोगावले यांनी  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री चौहान यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान त्यांनी राज्यात रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची  माहिती दिली तसेच राज्यासाठीचा प्रलंबित निधी मिळावा, अशी मागणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे आणि संदिपान भुमरे हे उपस्थित होते.

        रोहयो मंत्री श्री. गोगावले म्हणाले, ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि विकसित भारत’ संकल्पनेला गती देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला निधी त्वरित मिळणे आवश्यक आहे. या मागणीला केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री. चौहान यांनी याबाबत आश्वासत केले आहे. केंद्राकडे प्रलंबित असलेला कुशल घटकांसाठीचा 2 हजार 600 कोटी रुपयांचा निधी  आणि अकुशल घटकांसाठी (मजुरी ) 1 हजार 200 कोटी रुपयांचा निधी या महिन्याच्या 12 एप्रिलपर्यंत राज्याला उपलब्ध करून दिले जाईल. यासोबतच, राज्याला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही श्री चौहान यांनी भेटी दरम्यान दिले असल्याचे श्री. गोगावले यांनी सांगितले.  या निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास श्री. गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राला 10 कोटी मनुष्यदिवसांचे ‍निधी सहाय्य मिळत असून यावर्षी राज्याला रोजगार हमी अंतर्गत 13.50 कोटी मनुष्यदिवसांचे अर्थसहाय्य मिळालेले आहे. यासाठी आभार व्यक्त करून पुढील वर्षी अधिकच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी विनंती श्री. गोगावले यांनी यावेळी केली.

तसेच, रोजगार हमी योजनेतील व्यक्त‍िगत लाभांची मर्यादा 5 लाख रूपयांहून 10 लाख रुपयांपर्यंत करण्याची मागणीही रोजगार हमी मंत्री श्री गोगावले यांनी योवळी केली, या मागणीचा विचार सकारात्मकपणे केला जाईल असेही केंद्रीय मंत्री श्री.  चौहान यांनी सांगितले असल्याचे श्री. गोगावले यांनी सांगितले.

 

मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांसाठी उपाययोजना निश्चित कराव्या

 मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांसाठी 

उपाययोजना निश्चित कराव्या

- पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. ३ : मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात तपासात कुपोषित बालके आढळणेही बाब चिंताजनक असून यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील १० दिवसात अहवाल सादर करावाअसे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आल्याने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अँपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी स्तरावर वजन आणि उंची नोंदीत पोषण ट्रॅकर अँपवर अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद झाली.

नोंद झालेल्या अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामधून १,१५९ बालके तीव्र तर ३,०९६ मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले. तर माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये अतितीव्र कुपोषित ४५० आणि मध्यम तीव्र कुपोषित ४०७ बालके आढळली. या संख्येचे अधिकृत प्रमाणिकरण करण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असूनमुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू असून तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

000

आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राज्यातील प्रकल्प,अलिबाग आणि सिंधुदुर्ग,अमरावती, वाशिम आणि धाराशिव

 आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राज्यातील प्रकल्प

अलिबाग आणि सिंधुदुर्ग शासकीय सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. अमरावतीवाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा स्तरावर आहेत. गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी उत्कृष्ट केंद्राचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हब आणि सात स्पोक प्रस्तावित आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे. साताराचंद्रपूर शासकीय रुग्णालय आणि सर जे.जे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. तसेच अवयवदान प्रत्यारोपण संबंधित संस्था निर्माण करण्यात येणार आहेत.


क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त,अभिवादन






 क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

 

मुंबई, दि. ११ : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित अधिकारीकर्मचारी आदींनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले.

००००


 

वृत्त क्र. १५५०

 

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.११ : महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकासउद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळेकक्ष अधिकारी घनश्याम जाधवराजेंद्र बच्छावनितीन राणेविजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं


 

वृत्त क्र. १५४९

 

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त

विधान भवनात अभिवादन

 

 

मुंबईदि. 11 : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगीमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवीवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदानेकक्ष अधिकारी प्रदीप टिबेविजय काळे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000


 

Tribute Paid to Mahatma Jyotirao Phule on His Birth Anniversary

 at Mantralaya

Mumbai, April 11: On the occasion of Mahatma Jyotirao Phule’s birth anniversary, Minister for Skill Development and Entrepreneurship, Mangal Prabhat Lodha, paid floral tribute to his portrait at the Mantralaya.

 

On this occasion, Sachin Kawale, Under Secretary of the General Administration Department; Section Officer Ghanshyam Jadhav; Rajendra Bachhav; Nitin Rane; Vijay Shinde, along with other officers and staff of the Mantralaya, also paid their respects by offering flowers to the portrait of Mahatma Phule.

0000

 

महात्मा जोतिराव फुले जयंती पर मंत्रालय में अभिवादन

मुंबई, 11 : महात्मा जोतिराव फुले की जयंती के अवसर पर कौशल्य विकास एवं उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा ने मंत्रालय में उनकी प्रतिमा पर पुष्प अर्पित कर श्रद्धांजलि दी।

इस अवसर पर सामान्य प्रशासन विभाग के अवर सचिव सचिन कावळेकक्ष अधिकारी घनश्याम जाधवराजेंद्र बच्छावनितीन राणेविजय शिंदे सहित मंत्रालय के अन्य अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे और उन्होंने भी महात्मा फुले की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर अभिवादन किया।

0000


 

Tribute Paid to Mahatma Jyotirao Phule on His Birth Anniversary

at Vidhan Bhavan

Mumbai, April 11: On the occasion of the birth anniversary of the great social reformer and visionary Mahatma Jyotirao Phule, Meghna Talekar, Secretary of the Maharashtra Legislature Secretariat, paid floral tribute to his statue at Vidhan Bhavan today.

On this occasion, Rajesh Taravi, Joint Secretary (Committees) and Special Duty Officer of the Legislature Secretariat; V. S. Page Parliamentary Training Centre Director Nilesh Madane; Section Officers Pradeep Tibe and Vijay Kale, along with other officers and staff, also offered rose flowers at the statue of Mahatma Phule and paid their respects.

0000

 

महात्मा जोतिराव फुले जयंती पर विधान भवन में अभिवादन

मुंबईदि. 11 : महान समाजसुधारक और क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले की जयंती के अवसर पर आज महाराष्ट्र विधानमंडल सचिवालय की सचिव मेघना तळेकर ने विधान भवन स्थित उनकी प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर श्रद्धांजलि दी।

इस अवसर पर महाराष्ट्र विधानमंडल सचिवालय के सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवीवि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र के संचालक निलेश मदानेकक्ष अधिकारी प्रदीप टिबेविजय काळे समेत अन्य अधिकारी और कर्मचारियों ने भी महात्मा जोतिराव फुले की प्रतिमा पर गुलाब पुष्प अर्पित कर अभिवादन किया।

0000

 


 

Chief Minister Devendra Fadnavis Pays Tribute to

Mahatma Jyotirao Phule on His Birth Anniversary


        Mumbai, April 11: Chief Minister Devendra Fadnavis paid heartfelt tribute today to Krantisurya Mahatma Jyotirao Phule on the occasion of his birth anniversary. At the official residence 'Sagar', CM Fadnavis offered a floral tribute to the portrait of Mahatma Phule and respectfully remembered his contributions.

       On this occasion, officials and staff members present also paid their respects to Mahatma Phule.

000

 

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती पर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का अभिवादन


        मुंबई, 11 अप्रैल: क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले की जयंती के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज उन्हें विनम्र अभिवादन अर्पित किया। सागर शासकीय निवासस्थान पर मुख्यमंत्री श्री फडणवीस ने महात्मा फुले की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर श्रद्धांजलि दी।

         इस अवसर पर उपस्थित अधिकारियों और कर्मचारियों ने भी महात्मा फुले को श्रद्धा पूर्वक अभिवादन किया।

००००


Featured post

Lakshvedhi