Thursday, 20 March 2025

गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई करणार

 गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २० : कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्तेचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईलअसा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.

श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणालेअहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २२४ रोजी दोन समाजामध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मारहाणीत रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच मारहाणीत जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अहिल्यानगर येथील खागी रुग्णालयात दाखल केलेल्या एका इसमाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगाराला अटकही केली. मात्र न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली. श्रीगोंदा शहरातील प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येन कोणालाही सोडण्यात येणार नाहीअसेही गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.

ट्रेड सर्टिफिकेट' प्राप्त न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा

 'ट्रेड सर्टिफिकेटप्राप्त न केलेल्या वाहनांची 

विशेष तपासणी मोहीम राबवा

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १९ : केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक आणि उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्रीव्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठानशोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

प्रितपाल सिंग अँड असोसिएटगुरुग्राम यांनी मेसर्स ओला इलेक्ट्रीक मोबालिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटरउभारण्यात आले असल्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

मंत्री सरनाईक यांच्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्यपश्चिमपूर्व)बोरीवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत ट्रेड सर्टिफिकेटबाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ई-रक्तकोषद्वारे गरजू रुग्णांना मिळणार रक्त उपलब्धतेची माहितीwww.eraktkosh.mohfw.gov.in

 ई-रक्तकोषद्वारे गरजू रुग्णांना मिळणार रक्त उपलब्धतेची माहिती

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

            मुंबईदि. २० : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठारक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावीयासाठी केंद्र शासनाने www.eraktkosh.mohfw.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले असून या पोर्टलवर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्धतेची माहिती वेळेत मिळणार आहे. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन आंबाडेकरराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रेसर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

 सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेरक्ताशी निगडीत थॅलेसिमियाहिमोफिलीयासिकलसेल व इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी रक्त उपलब्धतेविषयक अनुषंगिक माहिती www.eraktkosh.mohfw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आणि ई-रक्तकोष संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत व तात्काळ रक्त उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होणार आहे. सर्व नागरिकांनी या ई-रक्तकोष या संकेतस्थळाचा उपयोग करून जास्तीत जास्त रुग्णांना मोफत आणि तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

राज्यामध्ये शासकीयनिमशासकीयसामाजिक संस्थाकार्पोरेशनखासगी अशा एकूण 395 रक्तपेढ्यांचे/रक्तकेंद्र आहेत. वारंवार रक्ताची गरज असणारे थॅलेसेमियासिकलसेलहिमोफिलियाकॅन्सर या रुग्णांसोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. तसेच या संकेतस्थळाद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र रक्तपेढीरक्त शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयेसामाजिक संस्थाकार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

0000

राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक

 राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक

- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. २० : राज्यात ३५८ तालुक्यांमध्ये १०० तालुका क्रीडा अधिकारी पदे मंजूर असून इतर तालुक्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे कार्यभार आहे. पद निर्मितीचा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर विचाराधीन असून लवकरच तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सर्व संबंधित सदस्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईलअसे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सदाशिव खोतशिवाजीराव गर्जेविक्रम काळेकृपाल तुमानेउमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.भरणे म्हणालेतालुका क्रीडा संकुल येथे सुविधा अपुऱ्या आहेतही वस्तुस्थिती आहे. तथापि लवकरच तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांमध्ये संरक्षण भिंतइनडोअर हॉलविद्युतीकरणड्रेनेज व्यवस्थारेन वॉटर हार्वेस्टिंगक्रीडा साहित्य आदी सुविधा निर्मितीचे अंदाजपत्रक तयार केले जाईल तसेच राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी क्रीडा मंडळे चांगले काम करीत असतील तेथे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांना देण्याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. शासकीय इमारतींच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासंबंधीचा दर हा २०१४ सालचा आहे. हा दर बदलण्याची शिफारस करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

0000

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परताव्याबाबत पडताळणी करणार,pl share

 कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना

डिझेल परताव्याबाबत पडताळणी करणार

मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. २० : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीकरिता डिझेल लागते. कोकणासह राज्यातही फवारणी करताना डिझेलची आवश्यकता असते. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परतावा देण्याबाबत पडताळणी करण्यात येईलअसे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या डिझेल परताव्याबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शेखर निकमसदस्य मनीषा चौधरी यांनीही सहभाग घेतला.

मंत्री भुसे म्हणालेकेंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये प्रति वर्ष मदत करते. तसेच राज्यशासन नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला ६ हजार अशाप्रकारे एकूण १२ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येते. यातही वाढ करण्यात आली आहे. कोकणात ११४ कोटी रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत वितरित करण्यात आले आहे. तर नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत निधी देण्यात आला असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

परवानगीच्या हद्दीबाहेर वाळू उपसा केल्यास

 परवानगीच्या हद्दीबाहेर वाळू उपसा केल्यास 

दंडात्मक कारवाई

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

           

मुंबईदि. २० : राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये वाळू उपशाच्या ठिकाणी पाहणी मोहीम राबविण्यात येईल.  परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात किंवा ठरवलेल्या हद्दीबाहेर वाळू उपसा केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

  याबाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य जयंत पाटीलअमित देशमुखरणधीर सावरकरप्रशांत बंबअस्लम शेखविश्वजीत कदमआशिष देशमुखहेमंत ओगले यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

             मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेलवकरच नवीन वाळू धोरण आणले जाणार असून हे वाळू धोरण  विविध राज्यातील वाळू धोरणांचा अभ्यास करून तयार करण्यात आले आहे. प्रतिक्रियांसाठी हे धोरण सार्वजनिक करण्यात आल्यानंतर त्यावर २८५ पेक्षा जास्त सूचना आल्या आहेत.  राज्यामध्ये मागणीवर आधारित वाळूचा पुरवठा करण्यात येणार आहे. पुढच्या दोन वर्षामध्ये नदीतून नाही तर दगड खाणीवरून एम सँण्ड तयार करण्यात येईल. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी  प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असूनत्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईलअसेही  मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

               मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेघरकुल बांधणाऱ्यांसाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात सेक्शन पंपाद्वारे प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन होणाऱ्या सर्व सक्शन पंपावर कारवाई करण्याचे आदेश कोकण आयुक्तांना दिले आहेत. यानंतरही वाळू उत्खनन सुरू राहिल्याचे निदर्शनास आले तर संबंधित तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईलअसे  मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे -

 उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या 

सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे

 सार्वजनिक आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

 मुंबईदि. 20 : रक्तदानाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी प्रमाणात असतो.त्यामुळे गरजू रुग्णांना उन्हाळ्याच्या कालावधीत देखील रक्त पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी उन्हाळ्यात देखील रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला दिलेल्या भेटी दरम्यान सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रेभायखळासर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहीसे कमी असल्याने रक्त संकलन कमी होतेपरंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅन्सर पेशंटहिमोफिलियाथॅलेसेमियासिकलसेल तसेच गर्भवती महिला या सगळ्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या कालावधीत गरजू रुग्णांची रक्ताची निकड लक्षात घेताजास्तीत जास्त रक्तदात्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानासाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

00000

Featured post

Lakshvedhi