महाद्भूतम् । हे ऐकण्यासाठी अनेक कोटी जन्म घ्यावे लागतात असे म्हणतात. शक्य तितक्या वेळा ऐकण्याचा प्रयत्न करा. हे ऋग्वेदातील मनुसुक्तम आहे. ऋग्वेदात असे लिहिले आहे की दिवसातून एकदा ऐकल्याने तुमच्या आरोग्यातील कोणतीही कमतरता दूर होऊ शकते. कृपया आपल्या मित्रांसह सामायिक (share)करा.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 20 March 2025
युक्रेन कॉन्सुलेटमुळे दोन्ही देशातील भागीदारी वृद्धिंगत होईल
युक्रेन कॉन्सुलेटमुळे दोन्ही देशातील भागीदारी वृद्धिंगत होईल
- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
- युक्रेनियन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन
मुंबई, दि. १९ : भारत आणि युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय व्यापारामुळे यापूर्वीच मजबूत पायाभूत संरचना निर्माण झाली असून आता या नव्या वाणिज्य दूतावासा (युक्रेन कॉन्सुलेट) च्या उद्घाटनामुळे दोन्ही देशातील व्यापारिक संबंध आणि भागीदारी वृद्धिंगत होणार आहे, असा विश्वास राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी युक्रेन कॉन्सुलेट उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे युक्रेन कॉन्सुलेट उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्रिय सिबिहा, भारतातील युक्रेन दूतावासाचे राजदूत डॉ. अलेक्झांडर पोलिशचुक, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, एमव्हीआयआरडीसी आणि अखिल भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष विजय कलंत्री यांच्यासह वाणिज्यदूत उपस्थित होते.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, देशाच्या मजबूत आर्थिक वाटचालीमुळे, आपला देश असामान्य प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारत ही जगातील एक तरुण, उत्साही आणि ऊर्जावान लोकशाही आहे. ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक क्षेत्रात नवकल्पना, उद्योजकता आणि डिजिटल परिवर्तनात पुढाकार घेत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीच्या प्रवासात मुंबईची भूमिका महत्त्वाची असून त्यामुळेच अनेक देश आपल्या राजनैतिक उपस्थितीची सुरुवात येथे करत आहेत. जागतिक आर्थिक प्रभावाचे प्रतिक असलेल्या मुंबईत युक्रेन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन झाल्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध बळकट होण्यासोबतच सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध वाढण्यासही हातभार लागेल, असेही श्री. रावल यांनी सांगितले.
युक्रेन सध्या जरी युद्धग्रस्त देश असला तरी, आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करण्यास आणि विकासाच्या नवीन संधी शोधण्यास तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केल्यानुसार "भारत तटस्थ नाही; भारत हा शांतीच्या बाजूने आहे." या भावनेला अनुसरून, आम्ही मनःपूर्वक प्रार्थना करतो की संपूर्ण प्रदेशात आणि जगभरात शांती नांदो, जेणेकरून आपली भागीदारी आणखी वृद्धिंगत होईल आणि पुढील पिढ्यांसाठी समृद्धी निर्माण होईल, असेही राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्रिय सिबिहा म्हणाले, मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आमचे वाणिज्य दूतावास उघडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा केवळ राजनैतिक निर्णय नाही, तर भारत आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याचे प्रतिक आहे. भारताचे जागतिक पातळीवरील स्थान असामान्य असून या भागीदारीतून मोठी प्रगती होईल. कोणत्याही देशाचा राजनैतिक विस्तार हा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असते. ऐतिहासिकदृष्ट्या युक्रेन आणि भारत यांचे जवळचे संबंध असून ते संबंध पुढे नेण्यास युक्रेन तयार आहे. शांतता प्रक्रियेत भारताची भूमिका महत्वाची असून त्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी देखील हे वाणिज्य दूतावास महत्वाचा ठरणार आहे, असे मत श्री. सिबिहा यांनी व्यक्त केले.
भारतीय सिनेमा जागतिक लोकप्रिय संस्कृतीचा भाग न्यूझीलँडच्या प्रधानमंत्र्याकडून प्रशंसा
भारतीय सिनेमा जागतिक लोकप्रिय संस्कृतीचा भाग
न्यूझीलँडच्या प्रधानमंत्र्याकडून प्रशंसा
मुंबई, दि. १९ : भारतीय सिनेमाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणाऱ्या राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला न्यूझीलँडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांनी भेट देऊन भारतीय सिनेमाच्या प्रवासाची माहिती घेतली. या संग्रहालयात १०० वर्षांचा इतिहास एकत्रित करण्यात आला आहे. हा वारसा खरोखरच अद्भुत आहे. भारतीय सिनेमा आता संपूर्ण जगभरात पोहोचत आहे. तो जागतिक लोकप्रिय संस्कृतीचा एक भाग होत आहे, असे प्रशंसोद्गार न्यूझीलँडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांनी काढले.
या भेटीप्रसंगी प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांचे स्वागत एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी संग्रहालयाच्या पदाधिकारी जयिता घोष, अभिनेता अनंत विजय जोशी व संग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री लक्सन म्हणाले की, भारतीय सिनेमाची सुरुवात मूकपटांपासून झाली, मग बोलपट आले, आणि आता आधुनिक सिनेमा ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहणे खूपच विशेष वाटते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा, कारण या कामामुळे आपण भारताला जगभरात प्रसिद्ध करत आहात. न्यूझीलँडची चित्रपटसृष्टी देखील मोठी असून अनेक भारतीय सिनेमाचे चित्रीकरण न्यूझीलँडमध्ये होत असते. भविष्यातही अशा अनेक संधी मिळाव्यात, अशी अपेक्षाही प्रधानमंत्री लक्सन यावेळी व्यक्त केली.
या संग्रहालयाची उभारणी केल्याबद्दल अभिनंदन करताना चित्रपटांचा इतिहास जपण्यासाठी सर्व चित्रपटांचे डिजिटायझेशन करत असल्याबद्दल त्यांनी सर्व समुहाचे कौतुकही केले. प्रधानमंत्री लक्सन यांनी यावेळी अभिनेता अनंत जोशी यांच्यासोबत प्रसिद्ध हिंदी गीतावर ठेका धरला.
0000
महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (29.219 किमी) दरम्यान बीओटी (टोल) तत्त्वावर सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (29.219 किमी) दरम्यान बीओटी (टोल) तत्त्वावर सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 19 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (29.219 किमी)दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर विकसित केला जाणार असून त्यासाठी एकूण 4500.62 कोटी रुपये भांडवली खर्च होणार आहे.
पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्त्वांअंतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, या गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी (दळणवळण) वाढवण्याची गरज ओळखली गेली.
सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन, पनवेल सारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीए बंदरातून निघालेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग-48 चा मुख्य सुवर्ण चतुर्भुज (जीक्यू) टप्पा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचायला 2 ते 3 तास लागतात. 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यावर थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यानुसार,कनेक्टिव्हिटीच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्याची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे.
हा प्रकल्प जेएनपीए बंदर (एनएच 348) (पागोटे गाव) येथे सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर (एनएच -48) संपेल, तसेच तो मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाला (एनएच -66) देखील जोडेल.
व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी सह्याद्री पर्वतरांगेत दोन बोगदे खणले जातील, जेणेकरून या वाहनांना डोंगराळ भागात घाटातून प्रवास करावा लागणार नाही, तसेच मोठ्या कंटेनर ट्रकचा वेग वाढेल आणि त्याची सुलभ वाहतूक होईल.
नवीन सहा पदरी ग्रीन फिल्ड प्रकल्प कॉरिडॉरमुळे बंदराचे दळणवळण सुधारेल,तसेच सुरक्षित आणि कार्यक्षम मालवाहतुकीला सहाय्य मिळेल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे आणि आसपासच्या विकसनशील परिसरात विकास आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होतील.
०००
सागरमाला प्रकल्पातील कामे वेगाने,सागरमाला प्रकल्पाअंतर्गत 24 बंदरे सध्या निश्चित केलेली आहेत.
सागरमाला प्रकल्पातील कामे वेगाने
- बंदरे विकास मंत्री नितेश राणे
· पर्यावरणविषयक परवानग्यावेळेत मिळविण्यावर भर
नवी दिल्ली, दि.19 : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण विषयक परवानग्या वेळेत मिळवून सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% टक्के वापर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.
विज्ञान भवन येथे राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. त्यावेळी श्री राणे बोलत होते. या बैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोणोवाल, विविध राज्यांचे बंदरे विकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील बंदरांच्या विकासासाठी राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समिती गठीत झाली असून, या समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
राज्यातील बंदरांसंदर्भात बंदरे विकास मंत्री श्री.राणे म्हणाले, केंद्र शासनाकडून पर्यावरण विषयक परवानग्या शक्य तितक्या लवकर मंजुरी मिळाल्यास कामांना अधिक गती देता येईल.राज्यात सागरमाला प्रकल्पाअंतर्गत 24 बंदरे सध्या निश्चित केलेली आहेत. त्यापैकी 8 बंदरांच्या प्रकल्प मंजुरीसाठी केंद्र शासनाकडून 350 कोटी रूपये निधी प्राप्त होणार आहे, हा निधी राज्याला लवकर मिळाल्यास राज्यातील बंदरांच्या विकासाला गती येईल.
यासह केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे वाढवण बंदर अतिशय महत्वाचा नियोजित बंदर प्रकल्प आहे. हे बंदर पूर्ण झाल्यानंतर विविध रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध होणार असून वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा 26 टक्के वाटा आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहितीही श्री राणे यांनी यावेळी दिली.
००००
भारत आणि न्यूझीलँडमधील पर्यटन संधी रोजगारनिर्मिती नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होईल
भारत आणि न्यूझीलँडमधील पर्यटन संधी रोजगारनिर्मिती
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होईल
- पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन
एअर न्यूझीलंड व एअर इंडिया यांच्यात कोडशेअर भागीदारी,
२०२८ ला भारत आणि न्यूझीलंड थेट विमानसेवा सुरू होणार
मुंबई, दि.१९: न्यूझीलँडची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील परस्पर संबंध वाढून पर्यटन वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती होते. तसेच नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो आणि देशाची प्रतिमा जागतिकस्तरावर उंचावते. न्यूझीलँडमध्ये पर्यटन संधी वाढवून येथील संस्कृतीची माहिती जागतिक पातळीवर पोहचवण्याचा उद्देश असल्याचा न्यूझीलँड चे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सांगितले.
न्युझीलँड चे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन तसेच त्यांच्यासह आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज येथे पर्यटन विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्टार अलायन्सच्या भागीदार एअर न्यूझीलंड आणि एअर इंडिया यांनी भारत-न्यूझीलँड हवाई संपर्क वाढवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार न्यूझीलँडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज येथे करण्यात आला.या करारामुळे भारत आणि न्यूझीलँड अशी थेट विमानसेवा 2028 मध्ये सुरू होईल.
पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन म्हणाले की, न्यूझीलँड मधील पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आमचा विश्वास आहे की पर्यटनाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान असले पाहिजे.नवीन कोडशेअर भागीदारी मुळे १६ मार्गांवर कोडशेअर सेवा उपलब्ध होणार, ज्यामुळे भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवास शक्य होईल.प्रवासी आता दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईहून एअर इंडियाने प्रवास करून सिडनी, मेलबर्न किंवा सिंगापूर येथे एअर न्यूझीलंडच्या विमानांमध्ये बदल करू शकतील आणि ऑकलंड, ख्राईस्टचर्च, वेलिंग्टन आणि क्विन्सटाउन येथे जाऊ शकतील.
पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन म्हणाले की, एअर न्यूझीलँड आणि एअर इंडिया २०२८ पर्यंत भारत आणि न्यूझीलँड दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करणार आहेत. यासाठी नवीन विमानांची उपलब्धता आणि संबंधित मंजुरी आवश्यक असेल.
एअर न्यूझीलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरान म्हणाले की, कोडशेअर करार हे पहिलं पाऊल असून, भविष्यात थेट सेवा कशी असू शकते, यावर आम्ही काम करत आहोत. यामुळे पर्यटन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत होतील."
एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. "एअर इंडिया आपल्या जागतिक नेटवर्कचा विस्तार करत आहे. एअर न्यूझीलँडसोबतच्या नवीन भागीदारीमुळे भारत- न्यूझीलँड प्रवास अधिक सुलभ होईल आणि भविष्यात थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रवासी संख्या वाढवण्यास मदत होईल. न्यूझीलँडच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार२०२४ मध्ये ८०,००० हून अधिक भारतीय पर्यटक न्यूझीलंडला गेले, जी २०१९ पेक्षा २३% जास्त वाढ आहे.भारतीय प्रवासी सहसा ऑफ-पीक (हंगामाबाहेरील) कालावधीत प्रवास करतात, ज्यामुळे न्यूझीलँडच्या पर्यटनाला संधी उपलब्ध होईल.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
000
सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करणार
सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करणार
सीसीटीव्ही यंत्रणा राज्यात बळकट करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्हीचा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी गुगल कंपनीसोबत ' सेंटर ऑफ एक्सलन्सी इन एआय ' करार करण्यात आला आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...