Sunday, 16 March 2025

जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग राज्यशासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार

 जलयुक्त शिवार  अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग

राज्यशासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार

            मुंबई. दि.9 :- राज्यात जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

            गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये सामाजिक संस्था काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने फौंडेशनला सहकार्य करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाला दिल्या आहेत.

अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन डेटाचे संकलन आणि नियंत्रण

 अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन डेटाचे संकलन आणि नियंत्रण

            या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. फौंडेशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच फौंडेशनमार्फत स्वयंसेवी संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवनी ग्रामीण ॲप संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

 जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहेराज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारण आणि जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी राबविण्यात आला. 2015 साली सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश भूजल पातळी वाढवणेशाश्वत सिंचन सुविधा निर्माण करणे आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी पुनर्भरण करणे हा होता. या अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना जसे की छोटे बंधारेनाला खोलीकरणजलकुंभमातीकामवृक्षारोपण आणि शेततळे यांचा समावेश करण्यात आला. "पाणी अडवापाणी जिरवा" या तत्त्वावर आधारित हे अभियान स्थानिक लोकसहभागाच्या जोरावर राबविण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये यामुळे जलसाठा वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आणि दुष्काळावर मात करण्यास मदत झाली.

आरडब्ल्यूबी भारताच्या जल आव्हानांवर एक किफायतशीर उपाय

            भारतातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी (आरडब्ल्यूबी) समुदाय-नेतृत्वाखालीलतंत्रज्ञान-सक्षम मॉडेल ग्रामीण जलसुरक्षा वाढविण्यासाठी महत्त्वाचा हस्तक्षेप आहे. संमिश्र भू-वापर पुनर्संचयित आणि मूल्यांकन साधन (सीएलएआरटी जीआयएस) आणि एव्हीएनआय ग्रामीण अॅप भूजल पुनर्भरणाची क्षमता असलेल्या जलस्रोतांची ओळख पटवू शकतात आणि शेतकरी स्तरावर भौगोलिक-टॅग केलेल्या प्रतिमा आणि पडताळणीद्वारे जलस्रोत पुनर्संचयित करण्यासाठी अशा हस्तक्षेपांचे निरीक्षण करण्यास सक्षम करू शकतात. म्हणूनचआरडब्ल्यूबी भारताच्या जल आव्हानांवर एक किफायतशीर उपाय आहे.

अमृत सरोवर मॉडेल

 अमृत सरोवर मॉडेल

            अमृत सरोवर हा उपक्रम बराच अंशी "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार" या उपक्रमावर आधारित आहे. अमृत सरोवर मॉडेल भारत सरकारचा जलसंधारण आणि जलाशय पुनरुज्जीवनासाठीचा उपक्रम आहेजो "आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत सुरू करण्यात आला. या मॉडेलचा उद्देश ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुत्थान करून भूजल पातळी वाढवणे आणि पर्यावरण सुधारणा करणे आहे. यासाठी स्थानिक प्रशासनग्रामपंचायती आणि नागरिकांची सक्रिय भागीदारी घेतली जाते. मनरेगा आणि अन्य सरकारी योजनांच्या मदतीने जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे जलसंधारणासह शेती आणि पशुपालनालाही चालना मिळेलतसेच ग्रामीण भागातील जलस्वावलंबन वाढेल.

अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन डेटाचे संकलन आणि नियंत्रण

 अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन डेटाचे संकलन आणि नियंत्रण

            या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन तांत्रिक सहाय्यासहप्रकल्प व्यवस्थापन कक्ष मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. फौंडेशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच फौंडेशनमार्फत स्वयंसेवी संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवनी ग्रामीण ॲप संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग राज्यशासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार

 जलयुक्त शिवार  अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग

राज्यशासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार

            मुंबई. दि.9 :- राज्यात जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

            गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये सामाजिक संस्था काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने फौंडेशनला सहकार्य करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाला दिल्या आहेत.

विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार

 विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार

मुंबईदि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६  या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे.  विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणा बाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगीनियमांच्या पालनाबाबत  तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील. याबाबत तक्रारी आल्यास व कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल.

राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये कार्यवाही करताना प्रमाणित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार सर्व प्रार्थनास्थळांवर तसेच इतर ठिकाणी भोंगे वाजविण्याबाबत ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.

आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे.  तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापर करण्यावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi