Saturday, 15 March 2025

मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अनुदान वाढवण्यावर विचार

 मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अनुदान वाढवण्यावर विचार

कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

 

            मुंबईदि . 12 : राज्य शासनाने 'मागेल त्याला शेततळेयोजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत नियम 260 च्या मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सांगितले.

            विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारीशशिकांत शिंदेप्रवीण दरेकर, विक्रम काळेसदाशिव खोतराजेश राठोडकृपाल तुमानेसत्यजित तांबेशिवाजीराव गर्जेअमोल मिटकरीपंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये आपली भूमिका मांडली होतीत्यास मंत्री श्री.कोकाटे यांनी उत्तर दिले.


8मार्च महिला दिन, बांदा महिला विभाग



 

Friday, 14 March 2025

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगलेला होळी उत्सव !

 राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगलेला होळी उत्सव !

जिंतुर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत मोहक नृत्य सादर करत होळीच्या रंगात रंग भरले.

या अनोख्या उत्सवात राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सहभाग घेतला. बंजारा समाजाच्या भगिनींच्या आग्रहास्तव त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.

पारंपरिक लेंगी गीतेनृत्य आणि रंगोत्सवाच्या जल्लोषात होळी साजरी झाली. यावेळी राज्यमंत्र्यांनी समाजातील सकारात्मक बदल आणि एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत हा सांस्कृतिक सोहळा अधिक रंगतदार केला.

000000

 

 

 

सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड



 सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयकार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड

 

मुंबईदि. १४: राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोतअशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.

ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियासमवेत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी पत्नी सौ. लतामुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदेस्नुषा वृषालीनातू रूद्रांश यांच्यासह कार्यकर्तेमाध्यमांचे प्रतिनिधीपोलिस यांच्यासोबत धुळवड साजरी केली.

धुलीवंदन हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पध्दतीने आणि नैसर्गिक रंगांच्या साथीने साजरा करावा असे आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसगिक रंगांचा वापर करावा. पर्यावरणाचा समतोल राखणे आपले कर्तव्य असून काल होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो अशी भावना व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात सणांची परंपरा असून राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचेसमृद्धीचे सप्तरंगाची उधळण होवो अशा शुभेच्छा दिल्या. विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी सरकारच्या विकासाच्या विविध रंगात सहभागी व्हावेअसे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबरच त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.

परंपरेनुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील आनंदआश्रम येथे जावून धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राला रंग लावून त्यांना अभिवादन केले. तसेच आनंदाश्रम येथे जमलेल्या असंख्य शिवसैनिक आणि नागरिकांसोबत धुळवड साजरी 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

 मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबईदि. ११ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असूनसंपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.  यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणालेमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते कासू या टप्प्याचे काम मार्च २०२५ पर्यंत तर कासू ते इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३१९ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले असूनउर्वरित ३५.३५ कि.मी. लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. मोठे पूल व उड्डाणपूल वगळता उर्वरित काम मे २०२५ पर्यंत आणि संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ अखेर पूर्ण होणार आहे.

पनवेल-इंदापूर-झाराप-पात्रादेवी या मार्गावरील काम वेगाने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी केली जाईल. चिपळूण येथील बहादूर शेख चौकातील उड्डाणपुलाच्या गर्डर लॉचिंगदरम्यान १६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रीकास्ट काँक्रीटचा भाग कोसळला. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराला ५० लाख व अभियंत्याला २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे असे श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले

शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासं

 शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज

मिळण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

•          जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाची माहिती बँकांना द्यावी

 

मुंबईदि. ११ - शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँकावित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावीअसे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

देवस्थान इनाम वर्ग ३ (दुमाला)भोगवटा वर्ग २रेघेखालील कुळप्रकल्पाकरिता राखीव इ. धारण प्रकार असणाऱ्या शेतजमिनीवर अल्प मध्यम व दीर्घ मुदत तसेच व्यावसायिक कर्ज वाटप करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसलेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलअपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठेउपसचिव संजय धारुरकरसत्यनारायण बजाजसातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटीलबँकेचे संचालक तथा माजी आमदार प्रभाकर घार्गेराजेंद्र राजुपुरेप्रदीप विधातेबँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.

            देवस्थान इनाम वर्ग ३ (दुमाला)भोगवटा वर्ग २रेघेखालील कुळप्रकल्पाकरिता राखीव इ. धारण प्रकारच्या जमिनी तारण ठेवता येत नसल्याने या जमिनधारकांना विविध बँकावित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

कर्ज मिळण्यासाठी इनाम जमिनी तारण ठेवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्रभोगवटा वर्ग २ च्या जमिनी तारण ठेवणेकर्ज थकित झाल्यास त्या जमिनी विक्री करणेबोजा चढविण्याचे अधिकार बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद असून तथापि यासंबंधी बँकांना या संबंधी माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास येणाऱ्या अडचणी दूर होऊन सुलभता यावीयासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निर्दशनास आणावीअशा सूचना यावेळी श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने योजनांची अंमलबजावणी करावी

 लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने योजनांची अंमलबजावणी करावी

जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. ११ : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. सर्व विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रशासन उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योग्य समन्वय साधून योजना तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी करावीअसे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील सभागृह परिषद येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिलेशेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळेपारनेर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दातेनेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघेसंगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळश्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुतेअकोल मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटेअहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरअहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले कीजिल्हा परिषदेअंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी काही आरोग्य उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास येत आहेत. अशा उपकेंद्रांची माहिती घेऊन ती हस्तांतरित करावीत. तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांचा आढावा घ्यावा. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने बैठकीचे आयोजन करून टँकरचे नियोजन करावे.

जिल्ह्यातील ज्या प्रशासकीय विभागांचे प्रलंबित विषय आहेत. ते मार्गी लावण्यासाठी त्या विभागांच्या मंत्रीमहोदयांकडे बैठका घेऊन विषयांचा निपटारा करण्यात येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय आढावा बैठका घ्याव्यात. या बैठकांच्या माध्यमातून योजना प्रकल्पांची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावीअसे श्री.विखे-पाटील यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूलग्रामविकासनगरविकासकृषीसार्वजनिक आरोग्यक्रीडासार्वजनिक बांधकामजलसंधारण आदी विभागांच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

Featured post

Lakshvedhi