Thursday, 13 March 2025

पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारक' होणार

 पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारकहोणार

- मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई दि. १३ : पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईलअशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हरियाणा राज्यातील पानिपत येथील 'कालाअंबपरिसरात लवकरच 'मराठा शौर्य स्मारकउभारले जाईलअशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

  

या यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. रावल म्हणाले कीहरियाणा राज्यातील 'कालाअंबयेथे लवकरच या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा यांचा भव्य पुतळा उभा केला जाईल. तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालयदृकश्राव्य कार्यक्रम व आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी मी स्वत: समन्वयक म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्यात येतील.

 

सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार अफगानिस्तानापर्यंत झाला होता. मराठा शौर्य वीरांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अटक पासून ते कटक पर्यंत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला गेला. १७६१ साली  अहमदशाह अब्दाली विरुद्ध झालेल्या पानिपत रणसंग्रामामध्ये मराठा वीरांनी झुंज दिली. या लढाईत मराठा साम्राज्याची अपरिमित अशी हानी झाली मात्र इतिहासामध्ये ही लढाई त्यागबलिदानराष्ट्रप्रेमलढाऊ वृत्तीराष्ट्राकरिता संपूर्ण समर्पण या करिता संस्मरणीय आहे. तसेच या युद्धातील मराठा वीरांच्या बलिदानाला नमन करण्याच्या उद्देशाने हे मराठा शौर्य स्मारक होत आहेअसेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन




 रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे

मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

मुंबईदि. 13: रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टीटर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेअधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

            गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्तीस्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

अशी असणार जेट्टी टर्मिनल इमारत

80 मीटर बाय 80 मीटर350 लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटरबर्थिग जेट्टीअप्रोज जेट्टीअग्नीसुरक्षा प्रणालीसीसीटीव्ही यंत्रणागार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी  भूगर्भ चाचणी करण्यात आली आहे

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखतविषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक, डॉ. कैलास

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात 

संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणीया विषयावर  फलोत्पादन विभागाचे संचालकडॉ. कैलास मोतेयांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात संचालक डॉ. मोते यांची मुलाखत मंगळवार दि.१८ मार्च २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असूनमहासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिकेभाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

 होळीधुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबईदि. १३ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी होळी तसेच धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

होलिकापूजन तसेच प्रेमस्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करोया शुभकामनेसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या. तसेच होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशाद्वारे केले आहे.

00000

Governor Radhakrishnan greets people on Holi, Dhulivandan

 

            Mumbai, March 13:The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan has greeted the people on the occasion of Holi and Dhulivandan.  In his message, the Governor has said:"Heartiest greetings to all on the joyous occasion of Holikavandan, Dhulivandan and Rangotsav. May the festival of colours fill the life of all with love and affection and may it end hatred. While wishing the people a happy Holi, I appeal to all to remain conscious about protecting the environment.”

00000

 

 

 

 

 


One minute walk


 

मृद व जलसंधारण कामांच्या स्थळ पडताळणीसाठी ॲप व वेबपोर्टलशासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०३१२१५४३२३१६२६ असा आहे. 0000

 मृद व जलसंधारण कामांच्या स्थळ पडताळणीसाठी ॲप व वेबपोर्टल

- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबईदि. १२ : राज्यात मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसारमहाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल अॅप व वेब पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुर्वी  कृषी विभागजलसंधारण विभागजिल्हा परिषदवन विभागरोजगार हमी विभागभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात मृदसंधारण व जलसंधारण कामे करण्यात आली. या कामांच्या डिजिटल नोंदणी आणि पडताळणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मुख्य उद्दिष्टे:

1. MRSAC, नागपूर यांच्याकडील नोंदींची पडताळणी – उपग्रह इमेजरीच्या आधारे मृदसंधारण व जलसंधारण संरचनांचे मॅपिंग करून त्या संरचनांची प्रत्यक्ष पाहणी करणे.

2. नवीन संरचनांची नोंदणी – शिवार फेऱ्यांद्वारे अद्याप नोंद न झालेल्या व सध्या सुरू असलेल्या नवीन संरचनांची माहिती गोळा करणे.

3. संरचनांचे व्यवस्थापन व सुधारणा – संरचना दुरुस्तीनवीन संरचना बांधणीनाला खोलीकरणगाळ काढण्यासंबंधी माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदवणे.

तांत्रिक सुविधा :

विशेष मोबाईल अॅप – केवळ नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्धजिल्हानिहायतालुकानिहाय व गावनिहाय डिजिटल माहिती.

Geofence तंत्रज्ञान – उपग्रह आधारित स्थळ नोंदणी व पडताळणीसाठी.

कार्यपद्धती :

गाव पातळीवर शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने संरचनांची पडताळणी. मोबाईल अॅपद्वारे थेट डिजिटल नोंदणी करणे.

या निर्णयामुळे मृदसंधारण व जलसंधारण क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार असूनभविष्यातील जलसंधारण धोरणांसाठी अचूक माहिती मिळणार आहे.

हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०३१२१५४३२३१६२६ असा आहे.

0000

राज्यातील ९ कोटीपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध

 राज्यातील ९ कोटीपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध

- महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई,  दि. १२ – राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख सातबारा ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले आहे तिथे 100 टक्के ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. म.वि.प.  नियम 260 नुसार मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

राज्यात 42 लाख 34 हजार फेरफार ऑनलाईन पद्धतीने दिल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले, की,  यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली आहे. राज्यातील  सव्वाचार हजार गावांमधील कोणत्याही सातबाराची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे. ही एक अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे

मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोळीवाड्यांची परिस्थितीतेथील घरे याची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कोळीवाड्यांच्या विकासाची कार्यवाही करण्यात येईल.

महसूल विभाग सक्षमपणे काम करत असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi