Tuesday, 11 March 2025

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

 पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २८ : राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहेअसे सांगून महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीराज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार ३० हजारांवर रोजगानिर्मिती होऊ शकेल. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाने तयार करावी. विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.

दोन हजार पेट्रोल पंपांचे नियोजन

राज्यात दोन हजार पेट्रोल पंप वाढविण्याचे नियोजन असून पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीससार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ‘ना हरकत’ परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १६६० पंप मंजूर केले. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्यानेएक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी इंधन कंपन्यांच्या अडचणीसमस्यांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसह सचिव अजित देशमुखबीपीसीएल चे सुंदर राघवनराज्य प्रमुख राकेश सिन्हामुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.आनंद बंगसमन्वयक संतोष निरेंदकरएचपीसीएल चे बी.अच्युत कुमारमुकूंद जवंजाळ आदी उपस्थित होते.

-----

बी.सी.झंवर/विसंअ/

अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

 अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

 

मुंबई, दि. 28 : अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.

मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणा-या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी, ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हयाला  इष्टांक निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्याने निर्धारित इष्टांक पूर्तता केली आहेत्यांची अतिरिक्त  मागणी असल्यास वाढीव इष्टांक देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांची  इष्टांक पूर्तता झालेली नाहीत्यांचा उर्वरित इष्टांक इतर इच्छुक जिल्ह्यांना हस्तातंरित करण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय मागणीइष्टांक पूर्तता याची माहिती सादर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.  

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला प्राप्त इष्टांक आणि त्याची आतापर्यंत झालेली अमंलबजावणी याची माहिती घेऊन जिल्ह्यांकडून असलेली वाढीव मागणी याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

बालस्नेही पुरस्कार २०२४

 बालस्नेही पुरस्कार २०२४

उत्कृष्ट जिल्हाधिकारी :

नाशिक विभाग - श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.

नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.

पुणे विभाग - श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.

अमरावती विभाग - श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.

छत्रपती संभाजी नगर विभाग - दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.

उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :

पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.

नाशिक विभाग -            श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.

अमरावती विभाग - श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.

नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.

उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :

पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.

नागपूर विभाग - श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर

कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण

 उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :

अमरावती विभाग - श्री. गिरीष पुसदकर, अकोला

नागपूर विभाग - श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.

पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.

कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.

नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.

उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष

कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी

नाशिक विभाग- नंदुरबार.

नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी

अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.

पुणे विभाग- कोल्हापूर.

उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :

कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर

नाशिक विभाग- धुळे

अमरावती विभाग- बुलढाणा

नागपूर विभाग- गडचिरोली

पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर,  धाराशीव.

उत्कृष्ट खुले निवारागृह :

नाशिक विभाग-आस्था    नाशिक,  कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई


 

उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :

छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे,       परभणी.

अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती

कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड

नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.

उत्कृष्ट काळजी वाहक :

नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक

पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृहसांगली .

छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.

उत्कृष्ट समुपदेशक : अनिता निकम,ठाणे.

उत्कृष्ट बाल कल्याण समिती :

नागपूर विभाग - चंद्रपूर, अमरावती विभाग - यवतमाळ, कोकण विभाग - रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग -  धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग - छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी.  पुणे विभाग -  पुणे CWC-2, सातारा.

उत्कृष्ट बालगृह :

नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय,  नागपूर

छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.

अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती

पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृहकराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर

कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्पउल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.

उत्कृष्ट विशेषगृह :

छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.

अमरावती विभाग- सुर्योद्य बालगृह, अकोला.

नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.

पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी  संस्था, पंढरपूर

कोकण विभाग- MDC  होम मानखुर्द, मुंबई उपनगर.

उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :

नागपूर विभाग-  शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.

नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.

छत्रपती संभाजी नगर विभाग-  जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर

पुणे विभाग-  दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली

कोकण विभाग-             निरीक्षणगृह / बालगृहलांजा, रत्नागिरी.

उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :

कोकण विभाग - भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.

नाशिक विभाग - आधार आश्रम, नाशिक

छत्रपती संभाजी नगर विभाग - जीवन आशा ट्रस्ट ,परभणी

पुणे विभाग - जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.    


 

उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :

१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशनपुणेश्री. नागनाथ यमपल्लेजिल्हा शल्य चिकित्सकऔंध पुणे


बालस्नेही पुरस्कार २०२४’ चे वितरण राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम

 बालस्नेही पुरस्कार २०२४ चे वितरण

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ४ :  बालकांना सुरक्षितसक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने बालस्नेही पुरस्कार २०२४  समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरराज्यमंत्री पंकज भोयरआमदार संजय केळकरआमदार मनीषा कायंदेमहिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जेआयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरेआयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैनशिक्षण अधिकारी माधुरी भोसलेसदस्य नीलिमा चव्हाणजयश्री पालवेसायली पालखेडकरसंजय सिंगलचैतन्य पुरंदरेआदिसह जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी,  विभागीय आयुक्तपोलीस अधिकारीविविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या कीमहिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर  देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असूनआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

            यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीआयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून  त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.

बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षणआरोग्यसंरक्षणमूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

 बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारीउत्कृष्ट विशेषगृहउत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रमउत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारीउत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सीपोलीस अधीक्षकउत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्वसहायक पोलीस आयुक्तउत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपोलीस निरीक्षकउत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयपोलीस उपनिरीक्षकउत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्षसहाय्यक पोलीस निरीक्षकउत्कृष्ट बाल कल्याण समितीपोलीस हवालदारउत्कृष्ट बालगृहपोलीस शिपाईबालस्नेही पुरस्कारपोलीस अंमलदारउत्कृष्ट परिविक्षा अधिकारीउत्कृष्ट खुले निवारा गृहउत्कृष्ट काळजी वाहकउत्कृष्ट समुपदेशकउत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत -

 उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे

गतीने पूर्ण करावीत

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई, दि. ४ : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलआमदार मोनिका राजळेपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तसेच त्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करुन वेळेत कामांची पूर्तता करण्याचे सूचित केले.

यावेळी शेवगाव, पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदारसरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा. गावातील शाळाप्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातपाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. 

बैठकीत शेवगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगावबोधेगावशहरटाकळी या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत चाकण औद्योगिक वसाहत व १९ गावातील पाणीपुरवठा योजनाच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा  घेण्यात आला.

0000

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन ,pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

 खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाहीयासाठी काळजी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.


Featured post

Lakshvedhi