Friday, 7 March 2025

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला

 Copy paste 

*🔱श्रीदत्तात्रेयांचे शिष्य🔱*


*श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.* 


१) *यदुराजा* - ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला. मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना, त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते. त्याने पाचहीं पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना _जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल_ असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता. वडिलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला. त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले. त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच *यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.* यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.


२) *परशुराम* - ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या _आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा_ असे वर मागितले. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते. ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते. तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती. एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता. अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली, त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यपऋषींना दान केली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे. याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना केली. *श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली.* श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद *श्री दत्तभार्गव संवाद* म्हणून प्रसिद्ध आहे. *त्रिपुरारहस्य* नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजिवित्व बहाल केले. *आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे,* अशी श्रद्धा आहे.


३) *आयुराजा* - सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता, त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्रीदत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्रीदत्तात्रेय बसलेले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघेही धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसही शिजवलेले होते. अशा स्थितीत पाहूनही आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, _'अरे, मी तर असा दुराचारी आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही.'_ तरीही आयुराजा तेथून हालला नाही. तेव्हा श्रीदत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला हाकलून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, _कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुध असा पुत्र मला द्या._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.


४) *पुरुरवा* - पुरुरवा राजाचेही गोत्र अत्रि हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कुरुप होता, तो राजपुत्र होता. परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते. सर्वजण त्याची निर्भत्सना आणि चेष्टा करीत असत. तो युवराज झाला.  त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना, एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला. त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की, _जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लिला आहेत._ श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्रीदत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली. त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदररूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी गेला.


५) *कार्तवीर्य सहस्रार्जुन* : कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले, महाराणी शीलधारा याज्ञवल्य त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी _पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल_ असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर्य सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला, तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले, _दत्तप्रभूच्या आशिर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत_ असेही गर्नमुनींनी सुचवले, हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती. तो श्रीदत्तात्रेयांचे आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. _मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा_ असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले. पण तरीही दृढ़ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला. काही काळाने दत्तप्रभूंनी  त्याचे दोन्ही हात क्रोधाद्मीने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिता. त्याची श्रद्धा तसूभरहीं ढळली नाही. त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला. याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. त्याला एक हजार हात प्रदान केले. म्हणूनच कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्विप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाड़का शिष्य होता. त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले.


६) *अलर्क* : राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले. त्याने काशिराजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्काला अतिशय दुख झाले, अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावरील संदेश त्याने वाचला. _सर्व संकटाचे मूळ कारण कामना अहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे. ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत,_ तो उपदेश वाचून राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला. श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, _आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ_ असे त्याने सुबाहूला विनविले, सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे. त्याने अलर्काला सांगितले की _तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर,_ या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.


७) *प्रल्हाद* : भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना माहीत आहे. हिरण्यकशपू या दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परम भक्त होता. तो सतत 'नारायण नारायण' असा जप करीत असे. प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकशपूने फार प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच परिणाम होईना, उलट त्याचे नारायण प्रेम वाढतच होते. हिरण्यकशपूने त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, कड्यावरून खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडविले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी कुठे आहे तुझा नारायण, या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकशपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकशपूचा अंत केला, विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले. त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा अनला, त्याने नीतिनियमाने राज्य केले, त्याला विष्णूने दर्शन दिले, पण त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने श्रीदत्तात्रेयांची उपासना केली. श्रीदत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले,


८) *सांस्कृती* : सांस्कृती हा सुद्धा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे, त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूनी दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देष्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की _अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचारण कसे असते ? तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला *'अवधूतोपनिषद'* आणि *‘जाबालदर्शनोपनिषद'* असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे. *सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज, भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे.* 


 श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रियांपासून अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण *श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.* अत्यंत भाग्यवान अशा सर्व श्रीदत्तात्रेयांच्या शिष्यांचे चरणी विनम्र अभिवादन. 


*🙏!! ॐ नमो भगवते श्रीगुरुदत्तात्रेयाय !!🙏*

Copy paste

Thursday, 6 March 2025

सांगोला व मंगळवेढ्यातील चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान लवकरच देण्यात येणार

 सांगोला व मंगळवेढ्यातील चारा छावणी चालकांना

प्रलंबित अनुदान लवकरच देण्यात येणार

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील

 

मुंबईदि. 6 : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात एप्रिल २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत १४६ चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या  चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान लवकरच वितरित करण्यासंदर्भात राज्य कार्यकारी समितीला निर्देश देण्यात येतीलअसे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत  सदस्य  बाबासाहेब देशमुख यांनी  लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना श्री. जाधव- पाटील बोलत होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील म्हणाले की,  सांगोला तालुक्यातील १४६ आणि मंगळवेढा तालुक्यातील ६१ चारा छावण्यांसाठी अनुक्रमे ₹२०.८६ कोटी आणि ₹१२.०७ कोटी इतक्या सुधारित अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चारा छावणीसंदर्भातील प्रलंबित अनुदानाबाबतचा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात  येणार आहे.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून करण्यात येणाऱ्या खर्चास राज्य कार्यकारी समितीची मान्यता आवश्यक असते. त्यासाठी हा सुधारित प्रस्ताव या समितीकडे पाठवला आहे.

यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश समितीला देण्यात येतील. राज्य कार्यकारी समितीच्या मंजुरीनंतर निधी वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. असेही मदत व पुनर्वसन मंत्री  जाधव- पाटील यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य सर्वश्री समाधान आवताडेसुभाष देशमुखनाना पटोलेसुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन

 पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे 

शासनाच्या विचाराधीन

- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 6 : पुणे शहरजिल्हाच नव्हेतर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेअशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून रुग्णालय गोरगरिबांचे मोठे अशास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी 5.50 लाख इतके रुग्ण बाह्य रुग्ण म्हणून येताततर आंतर रुग्ण 60 हजारपेक्षा जास्त दाखल होतात. या रुग्णालयात दाखल होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता येथे रुग्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

ससून रुग्णालयाबाबत सदस्य सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सिद्धार्थ शिरोळेभीमराव तापकीरनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्याससून रुग्णालयात औषधांची कमतरता नसून 12 कोटी 84 लाख रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे अधिकची औषध खरेदीसाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात उपकरणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. रुग्णालयात 155 अति दक्षता विभागातील खाटा आहेत. बाल रुग्णांसाठी यामधील काही खाटा राखीव ठेवण्यात येत वेगळा कक्ष सुद्धा ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर अधिवेशन संपल्यानंतर पुणे शहरातील लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याचे आयोजन करून त्यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. ससून रुग्णालयातील वर्ग 4 ची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडे मागणी पत्र पाठवून पदभरती बाबत कार्यवाही करण्यात येत आहे. ससूनमध्ये व्हील चेअर उपलब्ध असून उपयोग करण्यासाठी मनुष्यबळची व्यवस्था करण्यात येत आहे. ससूनमध्ये स्वच्छतेची काम होत नसल्यास संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येईल. रुग्णासोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची चांगली व्यवस्था करण्यात येईल. रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येईलअसेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

0000

बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देणार

 बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना

मुंबईतच हक्काचे घर मिळवून देणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. : रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्य रहिवाशाला केंद्रबिंदू मानून गृहनिर्माण प्रकल्पबाबत शासन निर्णय घेत आहे. गोळीबारखार (पूर्व ) भागात रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. शिवालिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाने डिसेंबर 2030 पर्यंत योजनेतील उर्वरित 5281 सदनिकांचे काम पूर्ण करण्याचा स्तंभालेख (बार चार्ट) दिला आहे. त्यानुसार विकासाचे काम पुढील पाच वर्षात पूर्ण करून घेण्यात येईल.

या बार चार्टनुसार काम पूर्ण न झाल्यास संबंधित विकासकावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अभय योजनारखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील भाड्याबाबत आणि बार चार्टप्रमाणे काम करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात येईल. खार (पूर्व) मधील झोपडपट्टीधारकांवर दाखल पोलीस गुन्हे कमी करण्याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणालेझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पात्र अधिकृत झोपडपट्टी धारकांच्या गृहनिर्माण प्रकल्पात पार्किंगची तरतूद करण्यात आलेली आहे. विकासकाने पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टीधारकांना फेब्रुवारी 2024 पर्यंतचे एकूण 20.50 कोटी रुपयांचे भाडे अदा केलेले आहेत. तसेच विकासकाने 1226 झोपडपट्टी धारकांच्या भाड्यापोटी एकूण 18.81 कोटी रुपयांची रक्कम प्राधिकरणाकडे जमा केली आहे. न्यायालयासमोर बारा चार्ट प्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्याचे सांगितले आहे. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करून देण्याची विकासकाची जबाबदारी आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल असेही देसाई यांनी सांगितले.

0000

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला

चौराहा एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 

मुंबई, दि. ६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनातील कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकारी कविता सादर करणार आहेतअशी माहिती एनसीपीएच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. सुजाता जाधव यांनी दिली. हा कार्यक्रम ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द पर फॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे होणार आहे.

कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिककौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधामुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योगऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदननॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी कविता सादर करणार आहेत.

 ‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली असूनही काव्यसंध्या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एनसीपीए’च्या पेज टू स्टेज या उपक्रमाचा एक भाग म्हणूनसाहित्याला मंचावर सादर करण्याच्या संकल्पनेतून ‘चौराहा’ पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचे  त्यांनी सांगितले.

०००

मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 मिरा-भाईंदर मतदारसंघातील

विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. ६ : मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला. इंद्रप्रस्थ येथे संभाजी महाराजांच्या नावाचे उद्यान करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

सुरुची शासकीय निवासस्थानी मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबितप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटीलमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता  भगवान चव्हाणमिरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद शिंगटेसहायक संचालक (नगररचना) पू.म.शिंदेतहसीलदार सचिन चौधरी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळीहिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनघोडबंदर किल्ल्यापासून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत व शहरातील अंतर्गत रस्त्याबाबतसाई पॅलेस हॉटेल ते ठाकूर मॉल रस्ता कामांचाअंतर्गत पाणी पुरवठा योजना सद्यस्थिती (सुर्या प्रकल्प योजनेअंतर्गत)सीबीएसई शाळा सुरू करण्याबाबतचेना रिवर फ्रंट कामांबाबत- घोडबंदर खाडीकिनारा विकसित करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला.

दिव्यांगांना मीरा - भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देणार

इतर महानगरपालिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांप्रमाणे मिरा-भाईंदर महानगरपालिकेतही सुविधा देण्यात याव्यातअसे निर्देशही श्री. सरनाईक यांनी दिले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू राहणार

 नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयभाईंदरकरिता उत्तन येथील शासकीय जागा निश्चित करण्यात आली असून तिथे तात्पुरत्या स्वरूपाचे कार्यालय सुरू करुन लायसन्स देणंवाहन नोंदणी व अनुषंगिक सर्व कामे त्या कार्यालयातून सुरू करावीत. परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू ठेवावे. असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

यावेळी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व इतर विकास कामांबाबतही आढावा घेण्यात

काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार

 काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची

पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. ६ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवामुंब्रा व विटावा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करुन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईलसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्राकळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्राकौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये दोन जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थानमधून २४० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

कळवामुंब्रादिवा भागासाठी ५० एम.एल.डी, संपूर्ण ठाणे महानगरकरिता १०० एम.एल.डी पाण्याच्या प्रस्ताव महापालिकेने दिला होतात्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच एमआयडीसीच्या बारावी धरणातून महानगराला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त ५० दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे. एमआयडीसी विटावा भागात रात्री १२ ते ५ यावेळी पाणीपुरवठा बंद करते. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री १२ ते ५ या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतीलतर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईलअसा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य रईस शेखदिलीप लांडे यांनीही सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi