Wednesday, 5 March 2025

भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष गुन्हेगारांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

 भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष

गुन्हेगारांना मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईदि. 5 : जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणालेयासंदर्भात मी जालनाच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडीओ बघितल्यावर अंगावर शहारा येतो इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला

चौराहा एक बहुभाषिक काव्यसंध्या !

 

मुंबई, दि. ५ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनातील कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकारी कविता सादर करणार आहेतअशी माहिती एनसीपीएच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. सुजाता जाधव यांनी दिली. हा कार्यक्रम ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द पर फॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे होणार आहे.

कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिककौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधामुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योगऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदननॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी कविता सादर करणार आहेत.

 ‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली असूनही काव्यसंध्या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एनसीपीए’च्या पेज टू स्टेज या उपक्रमाचा एक भाग म्हणूनसाहित्याला मंचावर सादर करण्याच्या संकल्पनेतून ‘चौराहा’ पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचे  त्यांनी सांगितले.

जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार

 जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार

पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई

नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड पिंपळगाव येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहेउमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार

 संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे

यथोचित स्मारक उभारणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 5 : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात  येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये सांगितले.

             सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

            संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची जागा कमी पडत असल्यास या स्मारकासाठी नजीकची आणखी काही जमीन अधिग्रहित करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीछत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, शूर सेनापतीशौऱ्याचे प्रतिक होते. त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक उभारण्याचा मानस आहे. छत्रपती संभाजी महारांजांच्या शौऱ्याविषयी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले “देश धरमपर मिटने वाला। शेर शिवाका छावा था।। महा पराक्रमी परम प्रतापी। एकही शंभू राजा था॥” अशा शब्दात त्यांनी शौर्य वर्णन केले.  

            कर्नाटक येथील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी परिसराची डागडुजी करून याठिकाणाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार त्यास राजी नसल्यास किंवा त्यांना ते शक्य नसल्यास सदर जागेचे महाराष्ट्र शासन स्वतः सुशोभिकरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.  

ई-टेक्सटाइल पोर्टल का दूसरा चरण – वस्त्र उद्योग के लिए डिजिटल क्रांति

 ई-टेक्सटाइल पोर्टल का दूसरा चरण – वस्त्र उद्योग के लिए डिजिटल क्रांति

- वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे

 

मुंबईदिनांक 5: वस्त्र उद्योग विभाग ने वस्त्र उद्योग के लिए अनुदान प्रबंधन प्रणाली को और मजबूत करने के उद्देश्य से ई-टेक्सटाइल पोर्टल के दूसरे चरण को विकसित किया है। यह चरण वस्त्र उद्योग में डिजिटल क्रांति लाने वाला होगाऐसा वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे ने कहा।

मंत्रालय में ई-टेक्सटाइल पोर्टल के दूसरे चरण के मोबाइल ऐप का उद्घाटन और "टेक्सकनेक्ट" मासिक पत्रिका का विमोचन वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर वस्त्र उद्योग विभाग के प्रधान सचिव वीरेंद्र सिंहवस्त्र उद्योग आयुक्त संजय दैनेरेशम संचालनालय के निदेशक विनय मूनउप सचिव श्रीकृष्ण पवाररेशम विभाग की उप सचिव श्रद्धा कोचरेकर और अन्य अधिकारी उपस्थित थे।

मंत्री संजय सावकारे ने बताया कि आईसीआईसीआई बैंक के सहयोग से विकसित इस पोर्टल के माध्यम से अब अनुदान प्रक्रिया को तेज किया जा रहा हैजिससे अधिक पारदर्शिता और विस्तारित सेवाएं उपलब्ध होंगी। इन सेवाओं में तकनीकी वस्त्र उद्योगलघु वस्त्र उद्योगहथकरघारेशम उद्योग और संबंधित घटक शामिल हैं।

दूसरे चरण के उद्घाटन के साथई-टेक्सटाइल पोर्टल अब तकनीकी वस्त्र उद्योगहथकरघा और रेशम उद्योग सहित सभी प्रमुख वस्त्र उद्योगों को बढ़ावा देगा। इस विस्तार के कारण महाराष्ट्र के वस्त्र उद्योग क्षेत्र के सभी भागीदारों को एक तेजपारदर्शी और प्रभावी डिजिटल प्लेटफॉर्म का लाभ मिलेगाऐसा वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे ने कहा।

0000

अनुसूचित जनजाति के छात्रों के लिए आवासीय स्कूलों में कक्षा 1 और कक्षा 2 में प्रवेश के लिए आवेदन आमंत्रित

 अनुसूचित जनजाति के छात्रों के लिए आवासीय स्कूलों में

कक्षा 1 और कक्षा 2 में प्रवेश के लिए आवेदन आमंत्रित

 

मुंबईदिनांक 5 : शैक्षणिक वर्ष 2025-2026 के लिए शहर के प्रतिष्ठित अंग्रेजी माध्यम के आवासीय विद्यालयों में अनुसूचित जनजाति के छात्रों को कक्षा 1 और कक्षा 2 में प्रवेश देने हेतु आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं।

 

एकीकृत आदिवासी विकास परियोजना अधिकारीमुंबई के कार्यक्षेत्र में आने वाले गांवों और बस्तियों के इच्छुक छात्रों को आवश्यक दस्तावेजों सहित अपना आवेदन 31 मई 2025 तक जमा करना होगा।

 

अधिक जानकारी के लिए आवेदक एकीकृत आदिवासी विकास परियोजनाकस्तूरबा नगर पालिका मराठी विद्यालय क्रमांक 2, सभागार हॉल (भूतल)बोरिवली पूर्वमुंबई से संपर्क कर सकते हैंयह जानकारी परियोजना अधिकारी अविनाश चव्हाण ने प्रेस विज्ञप्ति के माध्यम से दी है।

0000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांमध्ये

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ५ : सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावपाड्यांतील इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह  अर्ज दि. ३१ मे २०२५ आहे पर्यंत सादर करावे.अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  कस्तुरबा महानगरपालिकेचे मराठी शाळा क्र.२ सभागृह हॉल तळमजला बोरिवली पूर्वमुंबई येथे संपर्क साधावाअसे प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi