Thursday, 6 March 2025

राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार,pl share

 राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ५ : राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणा-या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टम कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित

 छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.५: छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्यमंत्री यांच्यासाठी आयोजित छावा चित्रपटाचा शोप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपणनराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमहिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेराज्यमंत्री माधुरी मिसाळविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेखासदार सुनील तटकरेप्रफुल्ल पटेलमाजी मंत्री दिलीप वळसे पाटीलमाजी राज्यमंत्री विद्या ठाकूरविधिमंडळ सदस्यमुख्य सचिव सुजाता सौनिकज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्रशौर्यवीरताचातुर्यअतुलनीय विद्वता जनसामान्यांपर्यंत संपूर्ण देशभर छावा चित्रपटाच्या कलाकार आणि सर्व टीमने पोहोचविली. ११ भाषा अवगत असणारे छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडितकवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केलामात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छावा चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि इतर कलाकारप्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचे  छावा पुस्तक देवून अभिनंदन करण्यात आले.

अभिनेते संतोष जुवेकर यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

Wednesday, 5 March 2025

*केंद्र सरकारने पॅन कार्डची नवीन आवृत्ती PAN 2.0 जारी करण्याची घोषणा केली आहे परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. सरकार स्वतः नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा: कोणत्याही फोन, मेसेज किंवा मेलला प्रतिसाद देऊ नका किंवा पॅन कार्ड नूतनीकरणासाठी कोणतीही माहिती किंवा OTP देऊ नका. नाही म्हणजे नाही. सावधगिरी बाळगा, सायबर फसवणूक टाळा.* *हा मेसेज इतर ग्रुपवरही पाठवा.*

 *केंद्र सरकारने पॅन कार्डची नवीन आवृत्ती PAN 2.0 जारी करण्याची घोषणा केली आहे परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. सरकार स्वतः नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा: कोणत्याही फोन, मेसेज किंवा मेलला प्रतिसाद देऊ नका किंवा पॅन कार्ड नूतनीकरणासाठी कोणतीही माहिती किंवा OTP देऊ नका. नाही म्हणजे नाही. सावधगिरी बाळगा, सायबर फसवणूक टाळा.*

*हा मेसेज इतर ग्रुपवरही पाठवा.*


कंपनीतील दुर्घटनांसंदर्भात कायद्यात सुधारणा करणार

 कंपनीतील दुर्घटनांसंदर्भात कायद्यात सुधारणा करणार

- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 5 : कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांसंदर्भात कामगारांच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजू तोडसामनाना पटोलेकिशोर जोरगेवारहिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला.

कामगार मंत्री फुंडकर म्हणालेकंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी तेथे जाऊन याप्रकरणी तपासणी करतात. तपासणीअंती अहवाल सादर करतात. कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबतगट विमा व उपदानाची रक्कम लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल.सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईलअसेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले

जीबीएस आजाराबाबत व्यापक जनजागृती राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन

 जीबीएस आजाराबाबत व्यापक जनजागृती

राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

            मुंबईदि. 5 : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नसून शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास होतोअसे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या आजाराबाबत राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

‘जीबीएस’ आजाराबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीरमनोज जामसुतकर,चेतन तुपेसिद्धार्ध शिरोळेनाना पटोले यांनीही सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेराज्यात पुणे जिल्ह्यात 9 जानेवारी 2025 रोजी पहिला जीबीएस चा संशयित रुग्ण आढळला. 3 मार्च 2025 पर्यंत 222 संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 193 रुग्णांचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत जीबीएस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही. जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हा आजार समाविष्ट करण्यात आला असून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

पुणे येथे नियमित सर्वेक्षण सुरू असून बाधित भागातील 89 हजार 514 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्यात भेट दिली आहे. बाधित भागातील विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रभावित भागातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. राज्यात विविध माध्यमांद्वारे या आजाराविषयी माहिती देण्यात येत असूनलक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई

 शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी

समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई

- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईदि. 5 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी एका 26 वर्षीय महिलेला 11 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईलअसे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य मोहन मते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

लक्षवेधी सूचनाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणालेअशा प्रकरणी डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्याकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे कायाबाबत तपासणी करण्यासाठी 26 मार्च 2010 च्या शासन निर्णय अन्वये जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत सदर प्रकरणाचे संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.

पिण्याच्या पाण्यातील नमुन्यांमध्ये हानिकारक घटक आढळलेल्या ठिकाणी 'शुद्धीकरण प्रकल्प' -

 पिण्याच्या पाण्यातील नमुन्यांमध्ये

हानिकारक घटक आढळलेल्या ठिकाणी 'शुद्धीकरण प्रकल्प'

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. ५ : राज्य शासन पाण्याच्या स्त्रोतापासून पाण्यातील रासायनिक घटकांच्या तपासणीसाठी पाणी नमुन्यांची तपासणी करते. या नमुन्यांमध्ये शरीरास हानिकारक घटक आढळलेल्या पाणी नमुन्यांच्या ठिकाणी विविध उपायोजना करीत असते. राज्यात नांदेड जिल्ह्यात नायट्रेट बाधित पाणी नमुने आढळलेल्या ६८२ गावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. बाधित पाणी नमुने आढळलेल्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प (आर.ओ प्लॅन्ट) उभारण्याची कार्यवाही शासन करेलअशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

भुजलामध्ये वाढत असलेल्या नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणालेकेंद्र शासन रँडम पद्धतीने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करीत असते. तर राज्य शासन पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतातील पाणी नमुने तपासते. राज्य शासनाच्या नमुन्यांमध्ये ११.६२ टक्के नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण आढळले आहे. नायट्रेटचे प्रमाण रोखण्यासाठी युरियाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीवर भर द्यावा लागेल. तसेच उद्योगांमधून येणाऱ्या दूषित पाण्याबाबत एचटीपी प्लांट बसविण्याच्या सूचना देण्यात येतील. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत उद्योगपर्यावरण व कृषी विभाग यांची संयुक्त बैठकही घेण्यात येईल. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन विविध उपयोजनांची अंमलबजावणी करत आहे.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोलेसुधीर मुनगंटीवारडॉ नितीन राऊतप्रशांत बंबसमीर कुणावरआदित्य ठाकरेडॉ संजय कुटे यांनी सहभाग घेतला.


Featured post

Lakshvedhi