शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी
समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 5 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी एका 26 वर्षीय महिलेला 11 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य मोहन मते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
लक्षवेधी सूचनाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, अशा प्रकरणी डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्याकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी 26 मार्च 2010 च्या शासन निर्णय अन्वये जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत सदर प्रकरणाचे संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment