Saturday, 1 March 2025

अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

 अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

 

मुंबई, दि. 28 : अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.

मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणा-या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी, ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हयाला  इष्टांक निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्याने निर्धारित इष्टांक पूर्तता केली आहेत्यांची अतिरिक्त  मागणी असल्यास वाढीव इष्टांक देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांची  इष्टांक पूर्तता झालेली नाहीत्यांचा उर्वरित इष्टांक इतर इच्छुक जिल्ह्यांना हस्तातंरित करण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय मागणीइष्टांक पूर्तता याची माहिती सादर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.  

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला प्राप्त इष्टांक आणि त्याची आतापर्यंत झालेली अमंलबजावणी याची माहिती घेऊन जिल्ह्यांकडून असलेली वाढीव मागणी याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 जागतिक महिला दिनानिमित्त’

'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 

मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्तमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  तर दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 6शुक्रवार दि. 7शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

महासंचालनालय समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिवसजगभरात साजरा केला जातो. याअनुषंगानेच महिला सबलीकरणत्यांच्या हक्कांचे संरक्षणलहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाया आणि अशा अनेक योजनाधोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजना आणि निर्णयांबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.


नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत

गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. 28 : नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन 'एज्युसिटीनिर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एज्यूसिटीउभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 'पॉवर हाऊस'सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुक क्षेत्राचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.

 नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोनवीन विमानतळआंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शिष्टमंडळात गव्हर्नर यांच्यासमवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्लाकेनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीकयाले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च मायकल क्रेअरपेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयीकौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

0000

Friday, 28 February 2025

महाकुंभ प्रयागराज 2025 आज महाशिवरात्रि अंतिम

 *महाकुंभ प्रयागराज 2025 आज महाशिवरात्रि अंतिम स्नान शानदार वीडियोग्राफी स्पाइसजेट के पायलट कैप्टन समर सेंगर और मोहित द्वारा अद्भुत दृश्य हर हर गंगे*👌👌🚩


पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार

 पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प एकंदरीतच राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हे बंदर सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठे असून20 मीटर खोल असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर परिसरात एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील.

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना

 राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात श्री.फडणवीस म्हणाले कीजगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँकासोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की2000 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्रअटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत आहे. मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले कीआजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबईनवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईवरील भार कमी होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले

व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून "आपले सरकार"च्या 500 सेवा मिळणार

 व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून "आपले सरकार"च्या 500 सेवा मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटनव्हॉट्सअॅप चॅटबॉटभूखंड प्रदान,

उद्योजक संग्रहालयए.आय.हब संदर्भातही घोषणा

 

मुंबईदि. 28 : महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने "आपले सरकार" पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्रव्हॉट्सअँपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहताआता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात "व्हॉट्सअँप गव्हर्नन्स" चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

बीकेसी येथे मुंबई टेक वीक 2025 चा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

फिनटेक आणि ‘एआय’ क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतोतेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीवॉररूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायचीत्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉररूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे मेट्रोकोस्टल रोडअटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळालीअसे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi