Friday, 28 February 2025

कोयना परिसर पर्यटन हब बनविणार

 कोयना परिसर पर्यटन हब बनविणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा कायापालट करणार

 

     मुंबईदि. 28 : सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटन विषयक कामांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीसंचालक बी. एन. पाटीलअधिक्षक अभियंता बोरसे तर दूरदृश्य प्रणाली द्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले कीकोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असूनयेथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.

  कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्य स्थिती श्री. देसाई यांनी जाणून घेतली. श्री. देसाई म्हणालेया ठिकाणी पाच व्ही.व्हीआयपीपाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या रिसॉर्टच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असल्याने स्थानिक स्तरावर सोडविण्यात यावेत.

 कोयनानगर येथील नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रकल्पाच्या कामांमधील अडीअडचणींचा आढावाही पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.

   या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईलअसा विश्वास पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

****

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

 आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

            मुंबईदि. 28 : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत. लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका 2025 च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमउपायुक्त डॉ.प्राची जांभेकरनगरसेविका हर्षिता नार्वेकरवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेपच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीजागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. यानिमित्त झेप फाउंडेशनने 500 पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या कीजिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

०००

महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या "महाराष्ट्राचा महा फेस्टिवल"च्या तयारीचा

 महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या "महाराष्ट्राचा महा फेस्टिवल"च्या तयारीचा

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 28 : महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे "महाराष्ट्राचा महा फेस्टिवल" चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

 

यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीसंचालक बी. एन. पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

पर्यटनवाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाबळेश्वरमधील महा फेस्टिवलसाठी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामांच्या जबाबदाऱ्यांविषयी श्री. देसाई यांनी निर्देश दिले. फेस्टिवल दरम्यान पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नयेस्वच्छतावाहतुकीचे नियोजनयेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यासंदर्भात तसेच महोत्सवाच्या कामांसाठी जिल्हा आणि स्थानिक स्तरावर नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

ग्रामीण भागातील रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य

 ग्रामीण भागातील रस्ते व शाळांच्या विकासासाठी

न्यु डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य

बँकेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. 28 : न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक डॉ डी.जे पांडियन यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँकेच्या शिष्टमंडळांसोबत विविध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्तेअन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासाकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेराज्याला १ हजार अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे. यासाठी राज्यात गतिमान दळणवळणाची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. तसेच शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी पायाभूत व्यवस्थाही उभी करावी लागणार आहे. यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँक राज्याला भरघोस आर्थिक मदत देईलअशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

 

नवीन शैक्षणिक धोरण राज्याने अवलंबिले आहे. या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास करण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी उन्नत होऊन राज्याला वेगाने विकसित करण्यासाठी हातभार लागणार आहे. शाळांचा विकास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्त्यांचीही गरज आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात येणार आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

 

 शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 'सीएम श्री इन्स्टिट्यूशनहा शाळांच्या सर्वांगीण विकासासाठीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजनाग्रामविकास विभाग राज्यात ग्रामीण भागात सिमेंट काँक्रीट रस्ते विकास प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

 

 बँकेच्या शिष्टमंडळात बँकेचे भारतीय प्रदेश कार्यालयाचे महासंचालक डॉ. पांडियन यांच्या समवेत पब्लिक सेक्टर विभागाचे महासंचालक युरी सुरकोव्हसीनियर प्रोफेशनल बिंदू माधव पांडाप्रिन्सिपल प्रोफेशनल बिन्तेश कुमार, ' मित्रा 'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओलग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

MTDC Offers 50% Discount for Women Tourists on International Women’s Day – Tourism Minister Shambhuraj Desai Mumbai, Feb 28: Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has announced a 50% discount for women tourists staying at MTDC tourist resorts across the state from March 1 to 8, 2025, on the occasion of International Women’s Day. Various tourism initiatives will also be conducted under this scheme. This initiative is part of the "Aai" Women-Centric/Gender-Inclusive Tourism Policy, Tourism Minister Shambhuraj Desai informed. Tourism Minister Desai stated, "MTDC has implemented the 'Aai' women-centric tourism policy to make travel safer, more convenient, and more memorable for women tourists. In 2024, this special Women's Day discount received a tremendous response, benefiting over 1,500 women tourists. Based on this positive response, the scheme will be continued in 2025 as well." Women tourists can avail themselves of the discount by booking through www.mtdc.co. Women’s Participation in Tourism Sector State Minister Indranil Naik emphasized the government's efforts to increase women's participation in the tourism sector. He stated that MTDC operates women-run tourist accommodations in Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, and Kharghar (Navi Mumbai). These facilities are entirely managed by women, handling resort management, security, taxi services, housekeeping, and hospitality. This initiative has created employment opportunities for women in the tourism industry. 30-Day Special Discount for Women Tourists The 50% discount will be available not only from March 1 to 8, 2025, but also on 22 other selected days throughout the year, totaling 30 days of benefits. The specific dates for these additional days will be announced on MTDC’s website. Special Initiatives for Women Tourists MTDC will also provide stall facilities for women self-help groups at tourist destinations. Additionally, heritage walks, adventure tourism, educational tours, and tourism guidance training will be organized, with opportunities for women guides and water tourism trainers. Special games and entertainment activities will also be held for women. Ensuring Safe & Inclusive Tourism for Women - Principal Secretary Dr. Atul Patne Dr. Atul Patne, Principal Secretary of the Tourism Department, stated, "Creating a safe and inclusive tourism environment for women travelers is a key objective of MTDC. The 'Aai' policy will provide more opportunities and encouragement for women tourists." Safe & Enjoyable Tourism Experience for Women – MD Manojkumar Suryawanshi MTDC’s Managing Director Manojkumar Suryawanshi added, "Since March 8 is a holiday, a large number of women tourists are expected to travel. This initiative will be a great opportunity for them." Women travelers are encouraged to grab this exclusive offer and enjoy their trips with a 50% discount. Bookings can be made online at www.mtdc.co from March 1 to 8, 2025. 0000

 MTDC Offers 50% Discount for Women Tourists on International Women’s Day

– Tourism Minister Shambhuraj Desai

Mumbai, Feb 28: Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has announced a 50% discount for women tourists staying at MTDC tourist resorts across the state from March 1 to 8, 2025, on the occasion of International Women’s Day. Various tourism initiatives will also be conducted under this scheme. This initiative is part of the "Aai" Women-Centric/Gender-Inclusive Tourism Policy, Tourism Minister Shambhuraj Desai informed.

Tourism Minister Desai stated, "MTDC has implemented the 'Aai' women-centric tourism policy to make travel safer, more convenient, and more memorable for women tourists. In 2024, this special Women's Day discount received a tremendous response, benefiting over 1,500 women tourists. Based on this positive response, the scheme will be continued in 2025 as well."

Women tourists can avail themselves of the discount by booking through www.mtdc.co.

Women’s Participation in Tourism Sector

State Minister Indranil Naik emphasized the government's efforts to increase women's participation in the tourism sector. He stated that MTDC operates women-run tourist accommodations in Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, and Kharghar (Navi Mumbai). These facilities are entirely managed by women, handling resort management, security, taxi services, housekeeping, and hospitality. This initiative has created employment opportunities for women in the tourism industry.

30-Day Special Discount for Women Tourists

The 50% discount will be available not only from March 1 to 8, 2025, but also on 22 other selected days throughout the year, totaling 30 days of benefits. The specific dates for these additional days will be announced on MTDC’s website.

Special Initiatives for Women Tourists

MTDC will also provide stall facilities for women self-help groups at tourist destinations. Additionally, heritage walks, adventure tourism, educational tours, and tourism guidance training will be organized, with opportunities for women guides and water tourism trainers. Special games and entertainment activities will also be held for women.

Ensuring Safe & Inclusive Tourism for Women - Principal Secretary Dr. Atul Patne

Dr. Atul Patne, Principal Secretary of the Tourism Department, stated, "Creating a safe and inclusive tourism environment for women travelers is a key objective of MTDC. The 'Aai' policy will provide more opportunities and encouragement for women tourists."

Safe & Enjoyable Tourism Experience for Women – MD Manojkumar Suryawanshi

MTDC’s Managing Director Manojkumar Suryawanshi added, "Since March 8 is a holiday, a large number of women tourists are expected to travel. This initiative will be a great opportunity for them."

Women travelers are encouraged to grab this exclusive offer and enjoy their trips with a 50% discount. Bookings can be made online at www.mtdc.co from March 1 to 8, 2025.

0000– Tourism Minister Shambhuraj Desai

Mumbai, Feb 28: Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) has announced a 50% discount for women tourists staying at MTDC tourist resorts across the state from March 1 to 8, 2025, on the occasion of International Women’s Day. Various tourism initiatives will also be conducted under this scheme. This initiative is part of the "Aai" Women-Centric/Gender-Inclusive Tourism Policy, Tourism Minister Shambhuraj Desai informed.

Tourism Minister Desai stated, "MTDC has implemented the 'Aai' women-centric tourism policy to make travel safer, more convenient, and more memorable for women tourists. In 2024, this special Women's Day discount received a tremendous response, benefiting over 1,500 women tourists. Based on this positive response, the scheme will be continued in 2025 as well."

Women tourists can avail themselves of the discount by booking through www.mtdc.co.

Women’s Participation in Tourism Sector

State Minister Indranil Naik emphasized the government's efforts to increase women's participation in the tourism sector. He stated that MTDC operates women-run tourist accommodations in Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, and Kharghar (Navi Mumbai). These facilities are entirely managed by women, handling resort management, security, taxi services, housekeeping, and hospitality. This initiative has created employment opportunities for women in the tourism industry.

30-Day Special Discount for Women Tourists

The 50% discount will be available not only from March 1 to 8, 2025, but also on 22 other selected days throughout the year, totaling 30 days of benefits. The specific dates for these additional days will be announced on MTDC’s website.

Special Initiatives for Women Tourists

MTDC will also provide stall facilities for women self-help groups at tourist destinations. Additionally, heritage walks, adventure tourism, educational tours, and tourism guidance training will be organized, with opportunities for women guides and water tourism trainers. Special games and entertainment activities will also be held for women.

Ensuring Safe & Inclusive Tourism for Women - Principal Secretary Dr. Atul Patne

Dr. Atul Patne, Principal Secretary of the Tourism Department, stated, "Creating a safe and inclusive tourism environment for women travelers is a key objective of MTDC. The 'Aai' policy will provide more opportunities and encouragement for women tourists."

Safe & Enjoyable Tourism Experience for Women – MD Manojkumar Suryawanshi

MTDC’s Managing Director Manojkumar Suryawanshi added, "Since March 8 is a holiday, a large number of women tourists are expected to travel. This initiative will be a great opportunity for them."

Women travelers are encouraged to grab this exclusive offer and enjoy their trips with a 50% discount. Bookings can be made online at www.mtdc.co from March 1 to 8, 2025.

0000

अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर एमटीडीसी का महिला पर्यटकों को 50% की छूट

 अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर एमटीडीसी का महिला पर्यटकों को 50% की छूट

– पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 28 फरवरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (MTDC) ने अंतर्राष्ट्रीय महिला दिवस (8 मार्च) के अवसर पर महिला पर्यटकों के लिए 1 से 8 मार्च 2025 तक अपने पर्यटक निवासों में 50% छूट देने की घोषणा की है। इस योजना के तहत विभिन्न पर्यटन गतिविधियों का भी आयोजन किया जाएगा। यह पहल "आई" महिला केंद्रित / लैंगिक समावेशी पर्यटन नीति का हिस्सा हैजिसकी जानकारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ने दी।

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ने कहा, "एमटीडीसी ने महिलाओं के लिए 'आईमहिला केंद्रित पर्यटन नीति लागू की है ताकि उनके लिए यात्रा को अधिक सुरक्षितसुविधाजनक और यादगार बनाया जा सके। 2024 में महिला दिवस विशेष छूट योजना को जबरदस्त प्रतिक्रिया मिली थी और 1500 से अधिक महिला पर्यटकों ने इसका लाभ उठाया। इसी सकारात्मक प्रतिक्रिया को ध्यान में रखते हुएयह योजना 2025 में भी जारी रहेगी।" महिला पर्यटक www.mtdc.co पर जाकर इस छूट का लाभ उठा सकती हैं।

पर्यटन क्षेत्र में महिलाओं की भागीदारी

राज्यमंत्री इंद्रनील नाइक ने कहा कि राज्य सरकार पर्यटन क्षेत्र में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने बताया कि नागपुरछत्रपति संभाजीनगर और खारघर (नवी मुंबई) में एमटीडीसी के महिला संचालित पर्यटक निवास पूरी तरह से महिलाओं द्वारा प्रबंधित किए जाते हैं। यहां रिसॉर्ट प्रबंधनसुरक्षाटैक्सी सेवासफाई और होटल सेवाओं की सभी जिम्मेदारियां महिलाओं के पास हैं। इससे पर्यटन क्षेत्र में महिलाओं के लिए रोजगार के नए अवसर पैदा हुए हैं।

महिला पर्यटकों के लिए 30 दिन की विशेष छूट

महिलाओं को केवल 1 से 8 मार्च 2025 के बीच ही नहींबल्कि वर्ष के अन्य 22 दिनों में भी 50% की छूट मिलेगी। इस प्रकारमहिला पर्यटकों के लिए कुल 30 दिनों की विशेष छूट उपलब्ध होगी। इन 22 दिनों की जानकारी MTDC की वेबसाइट पर घोषित की जाएगी।

महिला पर्यटकों के लिए विशेष पहल

एमटीडीसी के पर्यटन स्थलों पर महिला स्वयं सहायता समूहों (Self-Help Groups) के लिए स्टॉल लगाने की सुविधा दी जाएगी। इसके अलावाहेरिटेज वॉकसाहसिक पर्यटनशैक्षिक यात्राएं और पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण का आयोजन किया जाएगाजहां महिला गाइड और जल पर्यटन प्रशिक्षकों को अवसर दिए जाएंगे। साथ ही महिला पर्यटकों के लिए विशेष खेल और मनोरंजन गतिविधियां भी आयोजित की जाएंगी।

महिलाओं के लिए सुरक्षित और समावेशी पर्यटन – प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे

पर्यटन विभाग के प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे ने कहा, "महिला यात्रियों के लिए सुरक्षित और अनुकूल पर्यटन वातावरण बनाना एमटीडीसी का प्रमुख उद्देश्य है। 'आईनीति महिला यात्रियों को अधिक अवसर और प्रोत्साहन देगी।"

महिलाओं के लिए सुरक्षित और आनंददायक पर्यटन अनुभव – प्रबंध निदेशक मनोजकुमार सूर्यवंशी

एमटीडीसी के प्रबंध निदेशक मनोजकुमार सूर्यवंशी ने कहा, "8 मार्च को अवकाश होने के कारण बड़ी संख्या में महिला पर्यटक बाहर घूमने जाएंगी। यह योजना उनके लिए एक शानदार अवसर साबित होगी।"

महिला पर्यटकों के लिए यह एक विशेष अवसर है। 50% की छूट के साथ पर्यटन का आनंद लें और इस विशेष ऑफर को न चूकें! से मार्च 2025 के बीच www.mtdc.co पर ऑनलाइन बुकिंग करें और योजना का लाभ उठाएं।

0000

राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

 राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे

- केंद्रीय खनिकर्म सचिव व्ही. एल.कांथा राव

राज्यातील खनिज क्षेत्रांच्या ई-लिलाव कार्यान्वयनासाठी बैठक

 

मुंबईदि. 28 :  महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाचे काम उत्कृष्ट असून मार्चपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक खाण नव्याने कार्यरत होणार असून आगामी वर्षात विदर्भातील सात नवीन खाणी सुरू होतील राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेनंतरची सर्व अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल.  कांथा राव यांनी दिले.

            हॉटेल ताज येथे खनिकर्म विभागातर्फे खनिकर्म विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल.कांथा राव  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्याचे खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव  डॉ.इकबाल सिंह चहलविभागाचे  महासंचालक डॉ.टी.आर.के. रावखनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोकेकेंद्र सरकारराज्य सरकार आणि भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारीखनिकर्म क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.

      केंद्रीय सचिव व्ही. एल. कांथा राव म्हणाले की,2015 मध्ये प्रमुख खनिजाच्या खणक्षेत्राचे इ - लिलाव पद्धतीने वाटप सुरू झाल्यानंतरमहाराष्ट्र राज्याने आजअखेर एकूण 40 खाणक्षेत्राचा यशस्वीपणे ई-लिलाव केला असूनत्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातचालू वर्षात एका खांणपट्ट्यातून उत्खनन आणि खनिजाची वाहतूक सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकणार आहे.

            यावेळी खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा.यामुळे उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेत वेग येईल आणि शासनाला महसूल वाढीस मदत होईल, असे सांगितले. खनिकर्म विभागातील कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, राज्यातील खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी दिलेल्या सूचनांवर गांभीर्याने विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे केंद्रीय सचिव व्ही. एल.कांथा राव यांनी सांगितले.

           खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहल यांनी खनिकर्म विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची यावेळी माहिती सादर केली. खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी मांडल्या.


Featured post

Lakshvedhi