Thursday, 27 February 2025

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी

 ग्रामीण भागात हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. २७ : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठाशाश्वत स्वच्छता यासोबतच हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्यातील दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनापाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई.रविंद्रनभूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात जलजीवन निशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्या माध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोनबाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये ‘हर घर जल’ अंतर्गत १०० टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट पूर्ण करावे. शाळाअंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावीअसेही त्यांनी सांगितले.

००००

दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची नागपूरमध्ये 1 हजार 740 कोटींची गुंतवणूक

 दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची

नागपूरमध्ये 1 हजार 740 कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार

 

मुंबईदि. 27 : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान 1 हजार 740 कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. 

कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली असून यामुळे 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवीन अध्याय सुरू करत असूनकंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणूकीसाठी पुढे येत राहतीलअसा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवारह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी इयान लीवरिष्ठ सल्लागार कॅ. शिवाजी महाडकरसंचालक मनोजित साहउपव्यवस्थापक नीरज हांडा उपस्थित होते.

ह्युसंग कंपनीविषयी:

ह्युसंग समूह ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्सकेमिकल्सअवजड उद्योगमाहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी कार्बन फायबरअरामिड फायबरटायर कॉर्डऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्नहाय-स्ट्रेंथ इंडस्ट्रियल यार्न आणि फॅब्रिक्स यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

ह्युसंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.ची हरियाणामुंबईपुणे आणि चेन्नई येथे कार्यालये आहेत.

पुणे येथील प्रकल्प 2015 पासून कार्यरत असून येथे 350 कर्मचारी आहेत. या कंपनीची ₹845 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरिक -शेंद्रा येथे ही कंपनी 2018 पासून कार्यरतअसून येथे 500 कर्मचारी काम करत आहेत. याठिकाणीही कंपनीची वार्षिक उलाढाल ₹1 हजार 650 कोटी रुपयांची आहे.

000

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

 

मुंबई दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणीया विषयावर  फलोत्पादन विभागाचे संचालकडॉ. कैलास मोतेयांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

 

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 1, सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4 आणि बुधवार दि.5 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके, भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे. ही उत्पादने नाशवंत असून त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी ‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये माहीतीसाठी, https://cetcell.mahacet.org/

 राज्य सीईटी सेलच्या सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

मुंबईदि. 27 : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात  येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  परीक्षांचा  सराव करता  यावा यासाठी   'अटलउपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेया उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो. आणि या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर  त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल आणि शैक्षणिक वाटचालीत पुढे जाण्यास प्रोत्साहन  मिळेल. त्यामुळे या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सायकोमेट्रिक टेस्टद्वारे  विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम" हे केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसूनविद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअरला प्रोत्साहन देणारा आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सहभाग असून कलावाणिज्यविज्ञानअभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विद्याशाखांचा समावेश आहे. यासाठी विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी  केली  आहे. यामध्ये ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी सराव करता यावा आणि विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकमाहिती उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

अधिक माहीतीसाठीhttps://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत

 वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत


- वेल्श नॅशनल डे निमित्त राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा


 


मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि नाविन्यपूर्ण शक्तीचे केंद्र आहे. येथे भागीदारीसाठी मोठी संधी आहे. वेल्श सरकारच्या तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी असलेल्या स्वारस्याचे महाराष्ट्र स्वागत करीत असून वेल्शसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे, अशा शब्दात राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी वेल्श सरकारच्या सेंट डेव्हीड डे (वेल्श नॅशनल डे) निमित्त शुभेच्छा दिल्या.


सेंट डेव्हीड डे निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात वेल्श सरकारला शुभेच्छा देताना श्री.रावल बोलत होते. वेल्श सरकारचे कॅबिनेट सचिव जेरेमी माइल्स, वेल्श सरकारचे भारतातील प्रमुख मिचेल ठाकर आदी यावेळी उपस्थित होते.


            राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणाले, सेंट डेव्हिड डे हा सेवा, समर्पण आणि समुदायाच्या चीरस्थायी मूल्यांचे प्रतीक आहे. प्रगती आणि विकासासाठी आमची सामायिक वचनबद्धता आम्हाला सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करते. महाराष्ट्र आणि वेल्श एकत्र काम करून विकासाबरोबरच नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो आणि अधिक समृद्ध भविष्यासाठी योगदान देऊ शकतो, असा मला विश्वास आहे.


सेंट डेव्हिड डे साजरा करताना कार्डिफ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने मला आनंद आणि वैयक्तिक संबंधाची भावना असून माझ्यासाठी हा प्रसंग विशेष महत्त्वाचा असल्याचे श्री.रावल यांनी सांगितले. कार्डिफ विद्यापीठात असताना मी आत्मसात केलेल्या तत्त्वांनी माझ्या दृष्टीकोनाला आकार दिल्याचे त्यांनी नमूद केले. आज सेंट डेव्हिड डे साजरा करीत असताना महाराष्ट्र आणि वेल्शमधील संबंधांना जोपासण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

 मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात पदांना मान्यतादोन वसतीगृहे आणि

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईदि. 20 : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली.

मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रलोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकेंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादवमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरेकुलसचिव डॉ. प्रसाद कारंडेप्रा. मनिषा करणेअनिल कुमार पाटीलप्रभात कुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. वीरेंद्र कुमार म्हणालेसंविधान अमृत महोत्सव हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संविधान  जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षणसर्वाना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत आरक्षण अशा तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिकआर्थिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरदोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहीर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे आभार मानले. विद्यापीठामार्फत लवकरच या अनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी आपल्या उदबोधनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

0000

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार

 छत्रपती शिवाजी महाराजांचे

आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

·         लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

 

आग्रादि. 20 : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईलअशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'शिवजन्मोत्सव भारतवर्ष काया कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेलउत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्यायविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारफतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहरआग्र्याच्या महापौर हेमलता कुशवाहआग्रा जिल्हा पंचायत अध्यक्षा डॉ. मंजू भदौरियामाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेआमदार परिणय फुके यांच्यासह  छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशलया चित्रपटाचे निर्माते नितीन विजनकार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते.

आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेआग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिलीस्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासकमहिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते.  महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी जागे केले. समाजातील विविध छोट्या घटकांनाबारा बलुतेदार जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. जे देवदेश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्याने जगात आदर्शवत असे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. देशाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि जाज्वल्य इतिहास समोर आणल्याबद्दल छावा चित्रपटाचे निर्माते अभिनंदनास पात्र असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबऱ्या वाचून आपण प्रभावित झाल्याचे सांगून केंद्रीय मंत्री बघेल म्हणालेया उपक्रमामुळे राष्ट्रभावना निर्माण होण्यास मोठी मदत होईल. महाराजांच्या शौर्य आणि धाडसामुळे या पुढील काळात आग्रा हे शिवाजी महाराजांच्या नावानेही ओळखले जाईल . तसेच मुंबई -आग्रा हा महामार्ग या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जावाअशी सूचनाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून, पाठबळातून हा अनोखा कार्यक्रम साकारल्याचे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणालेमहाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर महानाट्य तयार होऊ शकते इतके ते प्रेरणादायी आहेत. आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतलेला दिवस हा युक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

            श्री योगेंद्र उपाध्याय यावेळी म्हणालेआग्रा येथे महाराजांना कैदेत ठेवलेली जागा निश्चित करण्यासाठी अनेक इतिहासकारांशी विचार विमर्श केला.त्यातून रामसिंगची कोठी असलेली जागा निष्पन्न झाली. या जागेवर महाराजांचे भव्य स्मारक व्हावे. आग्रा येथे आयोजित जन्मोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून अभिनेते विकी कौशल म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर एक विचारधारा व वैश्विक प्रेरणा आहे. आघाडीवर राहून नेतृत्व करणारे ते अत्यंत द्रष्टे नेते होते. समकालिन राजांपेक्षा महाराज वेगळे होते. ते माझे सुपरहिरो आहेत. छावा चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचा विचार जगात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. विजन म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. आमदार परिणय फुके यांनी आभार मानले. प्रारंभी महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा पूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगावर आधारित नाट्याचेही सादरीकरण झाले. कोल्हापूर येथील पथकाकडून महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली

कार्यक्रमापूर्वी येथील महिला भगिनींनी औक्षण करत मुख्यमंत्र्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. या अनोख्या स्नेहपूर्ण स्वागताने मुख्यमंत्री भारावले. तसेच या कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या चैतन्य तुपे या मुलाने व त्याच्या आई-वडीलांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या सुटकेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.

0000


 


Featured post

Lakshvedhi