Wednesday, 26 February 2025

पर्यावरण रक्षणासाठी सह्याद्री वनराईचे काम प्रेरणादायी

 पर्यावरण रक्षणासाठी सह्याद्री वनराईचे काम प्रेरणादायी

 अभिनेते आणि सह्याद्री वनराई फाउंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी मंत्रालयामध्ये राज्यमंत्री जयस्वाल यांची भेट घेऊन सह्याद्री देवराई या संस्थेच्या उपक्रमाबाबत चर्चा केली. यावेळी सह्याद्री देवराईचे काम प्रेरणादायी असल्याचे श्री. जयस्वाल म्हणाले. राज्यातील विविध देवस्थांनांनी देवराई विकसीत करणे आणि प्रसाद म्हणून वृक्ष देणे याविषयी चर्चा करण्यात आली. राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीप्रत्येक देवस्थानास देवराई विकसीत करण्यासाठी पत्र लिहावेयात्रा व तीर्थस्थळ विकास निधीमधून वृक्ष संवर्धनासाठी खर्च करावा अशा सूचना देवस्थान ट्रस्टना देण्यात याव्यात. जिल्हा नियोजनचा निधी पर्यावरण संवर्धनासाठी राखीव करण्याची तरतूद सामाजिक वनीकरण विभागाने करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानात वाढीचा प्रस्ताव सादर करावा

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह

अनुदानात वाढीचा प्रस्ताव सादर करावा

- राज्यमंत्री आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. 25 : कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्यासाठी महत्वाची असून या योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

 मंत्रालयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी बैठक झाली. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीउप सचिव राजश्री पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीऊस तोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणारी रक्कम आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान रक्कम यातील तफावत दूर करणे गरजचे आहे. वाहन परवान्याची शासन निर्णयामध्ये असलेली अट शिथील करण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. अनुदानासाठी अर्ज करण्याची सध्याची 30 दिवसांची मुदत वाढवून ती 1 वर्षापर्यंत करावी. तसेच आणखी एक वर्षापर्यंत विलंब माफ करण्याचा अधिकार शासनाकडे असेल. योजनेमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावभ्रमिष्ट यांमुळे मृत्यू झाल्यास मदत देता यावी यासाठी आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन तसा योजनेत समावेश करावापात्रतेमध्ये शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ देण्याची तरतूद करावीयोजनेत सून आणि नातवंडांचाही समावेश करावाविषबाधेमुळे मृत्यूखेरीज इतर कारणांने झालेल्या मृत्यूमध्ये व्हीसेराची असलेली अट शिथील करण्यात यावी. अशा सूचनाही श्री. जयस्वाल यांनी केल्या.

कृषी योजनांचा लाभ देताना देण्यात आलेले साहित्य विकल्यास भविष्यात कोणत्याही योजनेस पात्र राहणार असे हमी पत्र लाभार्थ्यांकडून भरुन घेण्यात यावे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात यावी. त्यामुळे कालापव्यय टाळता येईल. प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी मॉल उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी. समृद्धी महामार्गालगत शेतकरी बाजार उभारता येतील का याची चाचपणी करावी. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मदत दिली जाते. त्याप्रमाणेच सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास मदतीचा प्रस्ताव वन विभागाने तयार करावा. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसास नोकरी देण्याची तरतूद करण्याचा प्रस्तावही सादर करावाअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे

  

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी

औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २५ : हत्तीरोग दूरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

 

आरोग्यभवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक झाली. बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकरसंचालकडॉ. बबिता कमलापूरकरसहसंचालकआरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग)डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेहत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा. घरीकार्यालयात किंवा शाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येणारी औषधे सेवन करावी. त्यामुळे निश्चितपणे आपण हत्तीरोगावर मात करू शकता. आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करून हत्तीरोगापासून आपला बचाव करावाअसेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यातील पालघरनांदेडगडचिरोलीभंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असूनत्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषध देण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसीअल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दूरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील काळात राज्‍यातील १८ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांतून हत्‍तीरोगाचे दूरीकरण करण्‍यात यश आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर, फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा

 ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर, फार्मा क्षेत्रासाठी

एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी

उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 25 : ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटरला चालना देऊनऔषधनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन एपीआय उद्योगाला आवश्यक त्या सुविधांना प्राधान्य देण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या पुढाकाराने ठाणे क्षेत्र विकासासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशीउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताप्रधान सचिव नविन सोनाऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लागृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायरपाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमाहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीयाउद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

            मित्राच्या माध्यमातून ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेतील विविध मुद्यांचा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. ठाणेनवी मुंबई परिसरात आयटी व डेटा सेंटर वाढविण्यासाठी चालना देणे त्यासाठी एमआयडीसीमध्ये विशेष भुखंड निश्चित करून समर्पित डेटा सेंटर पार्क विकसीत करणे याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योग विभागाने यासंदर्भात डेटा सेंटर पार्कसाठी अधिसूचना काढण्याच्या कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

औषधनिर्मिती लागणारे एपीआय (ॲक्टिव्ह फार्मसिटीकल मॉलिक्युल) उद्योग ठाणे भागात मोठ्या प्रमाणावर असल्याने या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ड वर्ग उद्योगांसाठी लागू असलेल्या सवलती एपीआय उद्योगांना लागू कराव्यातएमआडीसीने भुखंड द्यावेत आदी विषयांवर चर्चा झाली. एमएमआर क्षेत्रात ३० लाख नवीन घरांची निर्मिती यासंदर्भातही याबैठकीत चर्चा झाली.

००००

स्वयं उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनविणार : पीयूष गोयल

 स्वयं उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनविणार : पीयूष गोयल


केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. गोयल म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखले जात आहे. देशात राज्याला पुढे नेणारा नेता म्हणून त्यांची इतिहासात ओळख निर्माण होईल. राज्यातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे सर्व सहकार्य मिळेल. पुढील काळात सागरी किनारा मार्ग हा उत्तर मुंबई ते विरार पर्यंत आणण्यात येईल. तसेच उत्तर मुंबई ते नवीन विमानतळ दरम्यान वाहतुकीसाठी दोन नवे मार्ग मुख्यमंत्री श्री. फडणवीस निर्माण करत आहेत. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा निश्चय असल्याचेही गोयल यांनी सांगितले.


प्रास्ताविकात आमदार श्री. दरेकर म्हणाले की, गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास अभियानातून एक चळवळ उभी राहिली आहे. यातून मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. यापूर्वी अपुऱ्या जागेमुळे मुंबईतील मराठी माणूस हा पालघर, वसई, कसारापर्यंत गेला. मात्र स्वयं पुनर्विकासमुळे मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाणार नाही. त्यांना जास्त क्षेत्रफळाची जागा मिळेल. स्वयं पुनर्विकास साठी हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुरू करावे, असेही श्री. दरेकर यांनी सांगितले.


आमदार योगेश सागर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री यांनी पुनर्विकासित श्वेतांबरी संस्थेच्या सदनिकांची पाहणी केली. मुंबईचे चित्र बदलेल

स्वयं पुनर्विकासच मुंबईचे चित्र बदलेल

 स्वयं पुनर्विकासच मुंबईचे चित्र बदलेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         स्वयं पुनर्विकासासाठीच्या प्रीमियमचे व्याज तीन वर्षांसाठी माफ

 

मुंबईदि. 25 : चारकोपमधील श्वेतांबर गृहनिर्माण संस्थेचा स्वयं पुनर्विकास पाहून मुंबईचे चित्र स्वयं पुनर्विकासच बदलू शकतोअसा विश्वास निर्माण झाला आहे. स्वयं पुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबईकर उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मार्च २०२६ पर्यंत येणाऱ्या स्वयं पुनर्विकास प्रस्तावांसाठी स्वयं पुनर्विकासासाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवरील तीन वर्षापर्यंतचे व्याज रद्द करण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावी वाटप कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल,  मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रविण दरेकरमाजी मंत्री आमदार योगेश सागरआमदार निरंजन डावखरेआमदार प्रसाद लाडचित्रा वाघभाई गिरकरस्नेहा दुबेशिवाजीराव नलावडेमुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकरठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणेमुंबई म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह श्वेतांबर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

चारकोप येथील राजे शिवाजी मैदानात झालेल्या कार्यक्रमात श्वेतांबरा संस्थेच्या सभासदाना सदनिकेच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीगेल्या २५-३० वर्षात मुंबईतील मराठी व मध्यमवर्गीय कुटुंबाना मुंबईबाहेर जाण्याची वेळ आली. मात्रस्वयं पुनर्विकासमुळे मुंबई शहरातील मराठी मध्यमवर्गीयांना आपल्या जीवनात परिवर्तन होणार असल्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

स्वयं पुनर्विकासासाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवरील व्याज माफी ही मार्च २०२६ पर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना तीन वर्षासाठी लागू असेल. याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीस्वयं पुनर्विकास संदर्भातील जेवढ्या सेवा आहेत त्या सर्व सेवा लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित करून ऑनलाईन देण्यात येतील. स्वयं पुनर्विकासासाठी सिंगल विंडो प्रणाली अधिक सक्षम करण्यात येणार असून ती मानवी हस्तक्षेप विरहित असेल. आहे. त्यातून सर्व परवाने व सुविधा डिजिटली देण्यात येतील. जोपर्यंत स्वयं पुनर्विकास हा ऑटो मोडवर जात नाहीतोपर्यंत त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. स्वयं पुनर्विकासात खोडा घालणाऱ्याची नोकरी राहणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

चाळीचा क्लस्टर पुनर्विकास करावा - मुख्यमंत्री

स्वयं पुनर्विकासबरोबरच चाळी व झोपडपट्टी यांच्या क्लस्टर पुनर्विकास हाती घ्यावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. स्वयं पुनर्विकास व क्लस्टर पुनर्विकास यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात येणार असून या समितीने सुचविलेल्या शिफारसी पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या गृहनिर्माण धोरणात समाविष्ट करण्यात येतीलअशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

वेळकाढून जरूर वाचा.. _B+_ लघु कथा

 *वेळकाढून जरूर वाचा.. _B+_ 

✨ लघु कथा  - - १*

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.


*✨ लघु कथा ..२.*

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.


*✨ लघु कथा  - -३.*

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा... माझ्याजवळ दोन काठया असताना.


*✨ लघु कथा  - - ४.*

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.


*✨लघु कथा  - -५.*

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, "ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात."


*✨लघु कथा  - -६.*

वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाताऱ्या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान..

माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय...


*✨लघु कथा  - -७.*

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले .

   

*✨लघु कथा  - -८.*

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५०००चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला, लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.

त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.


*✨ लघु कथा  - -९.*

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला. ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावत-पळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.


*✨  लघु कथा  -१०.*

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाई च्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा मात्र गालात हसत होता.

 

*सकारात्मक रहा...*

*सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अशावेळी अशा सकारात्मक लघु कथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे.!!* 🙏


🚩🚩 राम कृष्ण हरी  🚩🚩

Featured post

Lakshvedhi