Sunday, 23 February 2025

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक

 सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक

-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणेदि. २२ : जनता सहकारी बँकेने प्राप्त केलेला विश्वास ही गौरवशाली बाब आहे. जनता सहकारी बँक ही को-ऑपरेटिव्ह बँक नसून एक मोठा परिवार आहे.  या बँकेने समाजसेवेमध्येही नेहमीच पुढाकार घेतला आहे. बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे श्रेय संस्थापकसंचालक आणि त्या बँकेच्या सदस्यांना जाते. देशात १ हजार ४६५ को-ऑपरेटिव्ह बँका असून त्यापैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात ४६० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

 

            जनता सहकारीमल्टी शेड्यूल्ड बँकेच्या अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभात केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलखासदार मेधा कुलकर्णीजनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीबउपाध्यक्ष अलका पेटकरमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते.

            सहकार मंत्री श्री. शाह म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी दोन संकल्प केले आहेत. २०४७ पर्यंत देशाला पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवणे व २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर बनवण्याचा संकल्प केला आहे. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्राने पुढाकार घेतला आहे. हे संकल्प पूर्ण करत असताना प्रत्येक व्यक्तीला क्षमतेनुसार कामप्रत्येक परिवार समृद्ध बनवणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासात सहभागी करुन घेण्याचे काम सहकार क्षेत्राच्या माध्यमातून होत आहे. सहकार क्षैत्राच्या विकासासाठी सहकारिता मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. सहकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला शिखरावर नेण्याचे काम केले आहे. गेल्या १० वर्षात देशातील ७० करोड गरीबांना घरवीजगॅसपाणीशौचालय,५ लाख रुपयांपर्यंतचा स्वास्थ्य विमा व दरमहा प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य आदी सुविधा देण्यात येत आहेत. परिवाराच्या आणि देशाच्या विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाहीअसे श्री. शाह म्हणाले.

            ते पुढे म्हणालेगेल्या तीन वर्षात सहकार क्षेत्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. केंद्र शासनाने केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांचे क्षेत्रीय कार्यालये बनविण्याचा निर्णय घेतला असून देशातील पहिले कार्यालय पुणे येथे सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले. ही क्षेत्रीय कार्यालये शेड्यूल बँकांना ताकद देण्याचे काम करतील. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी अंब्रेला संघटन काम करत असून या संस्थेमध्ये आत्तापर्यंत ३०० करोड रुपये जमा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अंब्रेला संघटन को-ऑपरेटिव्ह बँकांना मदत करण्यासाठी सक्षम झाली आहे. कोणत्याही को-ऑपरेटिव्ह बँकेला कोअर बँकींगतांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी अंब्रेला संघटन मदत करेल. अंब्रेला संघटनच्या माध्यमातून देशातील अर्बन को-ऑपरेटिव्हजिल्हा सहकारी बँक व स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया क्लिअरिंग हाऊस येत्या दोन वर्षाच्या आत बनेलअशा विश्वास श्री. शाह यांनी व्यक्त केला. सहकारिता मंत्रालयाने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बिझनेस वाढविण्यासाठी अनेक कामे केली आहेत. यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये नवकल्पना राबविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी प्रभातकुमार चतुर्वेदी यांनी अंब्रेला संघटन या संस्थेला देण्यासाठी ५ करोड रुपयांचा धनादेश श्री. अमित शाह यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी श्री. हेजीब यांनी विचार व्यक्त केले. त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि अमृत महोत्सवी वर्षाविषयी माहिती दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश कश्यप यांनी केले. तर अलका पेटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधीसहकार क्षेत्रातील अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.


Saturday, 22 February 2025

*कासव दुकान, ऑफिसच्या काउंटर वर का

 *का


सव दुकान, ऑफिसच्या काउंटर वर का ठेवतात*

समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या श्री क्षेत्र जांबसमर्थ येथील घागरीची चमत्कारिक व विशेष माहिती..pl share

 विशेष लेख(जय जय रघुवीर समर्थ)

 ***     ******************


श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या श्री क्षेत्र जांबसमर्थ येथील घागरीची चमत्कारिक व विशेष माहिती. 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


 समर्थ रामदास स्वामी चरित्रात उल्लेख असलेली हीच ती तुपाची घागर जिच्यातून आजही तूप निघते आहे. परंतु घागर रिकामी होत नाही , सध्या ही घागर श्री समर्थऱामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी श्री क्षेत्र जांबसमर्थ; ता. घणसवंगी; जि. जालना येथील श्रीराम मंदिरात ठेवण्यात आली आहे तिथे ह्या समर्थांनी पावन केलेल्या घागरीचे दर्शन आपणास होईल... जांबेच्या निवासासाठी मोफत भक्तनिवास व मोफत प्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच समर्थांच्या घराण्यातील रामपंचायतन व ज्या मारोती मंदिरात समर्थांना अनुग्रह झाला ते मारोती मंदिर उपलब्ध आहे. ५ किलोमीटर वर ज्या लग्नबोहल्यावरून श्री समर्थांनी पलायन केले तो बोहला आसनगाव येथे उपलब्ध आहे... 


समर्थांच्या  ह्या घागरी बद्दल मिळालेली विशेष माहिती अशी आहे की. ...


श्रीराम नवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला श्री क्षेत्र जांबसमर्थ इथ श्रीरामांचा भंडारा असतो, त्यावेळी गावात पाच सहा लाख लोक जमतात, भगवान श्रीराम व श्री समर्थांचे मुर्तीरुप दर्शन घेऊन भक्त पावन होतात. गावकरी पण पाच सहा लाख लोकांच्या सेवेत तत्पर असतात, तिर्थयात्रींची राहण्याची भोजनाची स्नानाची व्यवस्था अतिशय उत्तमपणे व विनामूल्य गावकरी लोक करीत असतात. व कुठेही काहीच कमतरता दिसत नाही, हा समर्थांचा चमत्कारच नाही का?


ह्या घागरीबद्दल अशी एक परंतु सत्य कथा ऐकायला मिळाली ती अशी. श्री रामदास स्वामींनी श्रीराम नवमी निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन त्याकाळी नुकतेच सुरु केले होते, श्री समर्थांच्या क्रुपेने कुठेच काही कमी पडत नव्हते, पण अचानक वरणभाता वर वाढण्यासाठीचे साजुक लोणकढी तुप संपले, अर्थात श्री समर्थ रामदास स्वामी महान योगी तपस्वी व आपल्या योगसाधनेने काहीपण साध्य करणारे, त्यांनी तुप कमी पडल्याने ह्या वरील घागरीस दोर बांधुन बाजुच्या विहीरीत सोडले व घागरभर पाणी वर ओढले, व सेवेकऱ्यांना सांगितले ह्यातुन पंगतीला तुप वाढायला सुरूवात करा, सेवेकऱ्यांना पाणी तुप म्हणुन कसे वाढायचे हे कोडे पडले, समर्थांनी सेवेकऱ्यांना सांगितले माझा श्रीराम बघुन घेईल पुढे काय करायचे ते तुम्ही तुप वाढायला सुरुवात करा, सेवेकऱ्यांनी पंगतीला पाणी अर्थातच तुप वाढायला सुरुवात केली, त्या घागरीतील पाणी तुपात परिवर्तीत झाले व सगळ्या तीर्थयात्रींचे भोजन होईस्तोवर त्या घागरीतले तुप शेवटपर्यंत संपलेच नाही. शेवटी सर्व पंक्ती उठल्यावर समर्थांनी ती घागर घेतली व परत पाणी आणलेल्या विहीरीत रिकामी केली म्हणजे विहीरीचे पाणी देखील समर्थांनी विहीरीला परत केले. 


आज सुद्धा रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला जेव्हा भंडारा असतो तो घेतल्यानंतर प्रत्येक तिर्थयात्रींला  तिथे संस्थान तर्फे ह्याच घागरीतुन साधारणतः 100 ग्रँम तुप मोफत वाटप केले जाते व आश्चर्य म्हणजे घागरीतले तुप संपतच नाही हा चमत्कार आपण स्वतः अष्टमीच्या दिवशी तिथे उभे उपस्थित राहुन बघु शकतात, अवर्णनीय व नेत्रदीपक असा हा सोहळा चमत्कारिक सोहळा असतो, प्रत्येकाने ह्या सोहोळ्याचा लाभ घ्यावा अशी मी आग्रहपुर्वक विनंती करीत आहे.


श्री समर्थांच्या ह्या चमत्कारिक घागरीची माहिती, श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या समर्थ रामदास  स्वामींच्या मठातील ट्रस्टचे २४ तास सेवेकरी असणारे श्री स्वप्नील रामदासी ह्यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना मला त्यांच्याकडून मिळाली, त्याबद्दल श्री स्वप्नील रामदासींचे आम्ही आभारी आहोत. 


 श्री स्वप्नील रामदासींचा भ्रमणध्वनी क्रमांकः-9146519609 असा आहे. आपण त्यांना केव्हाही फोन करुन तिथली माहिती घेऊ शकतात, तसेच तिथ निवासाची व भोजनाची देखील विनामुल्य पण उत्कृष्ट सेवा आपणास श्री स्वप्नील रामदासी ह्यांना फोन करुन आपण मिळवु शकतात. 


माहिती टंकलेखनः श्री दीपक कुळकर्णी. 


विशेष आभारः श्री स्वप्नील रामदासी. श्री क्षेत्र जांबसमर्थ.


जय जय रघुवीर समर्थ. 🚩🚩


जय श्रीराम समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत

 ०००


 

वृत्त क्र. 687

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये

लवकरात लवकर लागू करावेत

 

महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय

प्रणाली स्थापन करावी

 

कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,

एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये

 

सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा

जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई, दि १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीसकारागृहेन्यायालयेअभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीला केंद्रीय गृह सचिवमहाराष्ट्राचे मुख्य सचिवमहाराष्ट्राचे पोलिस महासंचालकपोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालकराष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसेच केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले कीमोदी सरकार देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्यायव्यवस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे आणि एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये.

महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्यांच्या धर्तीवर एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली विकसित करावीअसे त्यांनी सुचवले. तसेच७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. पोलिससरकारी वकील आणि न्यायपालिका यांनी समन्वय साधून दोषींना शक्य तितक्या लवकर शिक्षा व्हावीयासाठी प्रयत्न करावेत.

गृहमंत्र्यांनी सांगितले कीसंगठित गुन्हेगारीदहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवली पाहिजेजेणेकरून या तरतुदींचा गैरवापर होऊ नये. तसेचकारागृहेसरकारी रुग्णालयेबँका आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदविण्याची प्रणाली विकसित करावी.

गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रला CCTNS 2.0 आणि ICJS 2.0 प्रणाली स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआरचे हस्तांतर सहज करता यावे यासाठी CCTNS प्रणाली विकसित करावीअसे सुचवले.

गृहमंत्र्यांनी असेही सांगितले कीपोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. तसेचराज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता आहे.

गृहमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले कीप्रत्येक पोलीस उपविभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅन्स उपलब्ध असाव्यात आणि फॉरेन्सिक तज्ञांची भरती वेगाने करावी. यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील फिंगरप्रिंट ओळख प्रणालीला 'राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली (NAFIS)' शी जोडावेअसेही निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. तसेचनवीन फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हेगारांकडून जप्त केलेली संपत्ती त्वरित मूळ मालकाकडे परत करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले.

गृहमंत्र्यांनी पोलीस ठाण्यांचे सौंदर्यीकरण आणि सुधारणांवर भर देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

गृहमंत्र्यांनी सांगितले कीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा दर पंधरवड्याला एकदा आढावा घ्यावातर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांनी आठवड्याला एकदा याचा आढावा घ्यावा.

००००


गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

 गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

 

नवी दिल्ली14 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. या कायद्यांची राज्यात अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहेत्यासाठी निर्माण करावयाच्या संस्थात्मक आणि पायाभूत सुविधांची स्थिती काय आणि किती प्रकरणे दाखल झाली याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. भारतीय न्यायसंहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता असे हे तीन कायदे आहेत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्यप्रदेशउत्तरप्रदेशउत्तराखंड आणि हरयाणा या राज्यांकडून आढावा घेतला होता. आज महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. 27 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन रुजू झाल्या असूनपुढच्या 6 महिन्यात संपूर्ण नेटवर्क तयार होईल. ज्या गुन्ह्यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहेअशा प्रकरणात आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच न्यायवैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. यातून गुणवत्तापूर्ण पुरावे उपलब्ध होणार आहेत. राज्य पोलिस दलाच्या 2 लाखांच्या फोर्सपैकी 90 टक्के प्रशिक्षण पूर्ण झाले असूनउर्वरित 10 टक्के प्रशिक्षण सुद्धा 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

 

आरोपींना वारंवार कोर्टात हजर करावे लागू नयेयासाठी नवीन कायद्यान्वये कारागृहात साक्षीसाठी क्युबिकल्स उभे करुन ते न्यायालयाशी ऑनलाईन जोडून देण्यात येणार आहेत. प्रत्येक कोर्टाचे विशिष्ट क्युबिकल असणार आहेत. 6 ते 8 महिन्यात हेही काम आम्ही पूर्ण करणार आहोत. पोलिस वाहनसुरक्षेवरील ताण आणि न्यायालयातील गर्दी यामुळे कमी होणार आहे. नवीन कायद्यानुसारवारंवार न्यायालयात तारखा मागता येणार नाहीयाची तरतूद असल्याने सरकारी वकिलांना त्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. अतिशय चांगले मार्गदर्शन बैठकीत मिळाले असून हे तिन्ही कायदे लागू करण्यासंदर्भात अधिक वेगाने आम्ही काम करुअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

26/11 चा अपराधी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिलायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी अतिशय आभारी आहे. आम्ही गेल्यावेळी तहव्वूर राणाची ऑनलाईन साक्ष घेतल्यानेच या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झाला. मुंबईवरील हल्ल्याच्या घटनेत अंतिम न्यायाची वेळ आता आली आहे. हा खटला मुंबईत चालणार असल्याने त्याला मुंबईतच आणले जाणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राणाला मुंबईतील कारागृहात ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहे काअसा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणालेकसाबला आम्ही मुंबईतील जेलमध्ये ठेऊ शकतोतर तहव्वूर राणा आहे कोण?

नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही., जेष्ठ नागरीक/(senior citizthi)pl share

 नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

 शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे.  प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.  झोपेचा त्रास होईल या भीतीने वडील रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात.  पाणी प्यायले तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावे लागेल, असे त्यांना वाटते.  त्यांना काय माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण आहे.  खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशयाच्या बिघडलेल्या कार्याची समस्या नाही.  हे वयाबरोबर वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते, कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास सक्षम नाही.

 अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो.  हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो.  म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते.  जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते.  हे पाणी पुन्हा रक्तात येते.  जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते.  हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

 त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा शौचाला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात.  त्यानंतर जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा शौचास जावे लागते.

 आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?

 दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, असे उत्तर मिळते.  श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते.  यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते.  जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते...

 यामुळेच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना नेहमी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते.  या अवस्थेत ते झोपेतच मरतात.

 सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे.

 आणखी एक गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटते ती म्हणजे झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री लघवीला उठल्यानंतर पुन्हा प्यावे.

 नोक्टुरियाला घाबरू नका.  भरपूर पाणी प्या, कारण पाणी न प्याल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.

 तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे.  मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर तो बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल.  अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ.

 मी तुम्हाला विनंती करतो की हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा.

 ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा.

 आरोग्य समस्या काय आहे यावर डॉ. बन्सल यांचा एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा हा लेख  आहे.. *Nocturia*.


ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, वाचायला चुकवू नका. आणि ज्यांना याची गरज असेल त्यांना पाठवा.🤝❤️👏🌹🙏🏻

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य

 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य





-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात

 

स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून  फडणवीस

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  तारा भवाळकर

 

नवी दिल्ली, दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहेअसे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित  करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकरमावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणेअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबेकार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळेकोषाध्यक्ष प्रकाश पागेसंमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणालेमराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.  या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुकेअमृताते पैजा जिंकेअसे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहेअसेही श्री मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी  वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहेअसे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत  नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली.  मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणालेमराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहेसौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेतसमानता आणि समरसता आहेमराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्तीभक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वरसंत तुकारामरामदाससंत गाडगे महाराजतुकडोजी महाराजगोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.

गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराजसंभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडकेलोकमान्य टिळकवीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केलाजनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणालेमराठी साहित्याने समाजातील वंचितशोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुलेसावित्रीबाई फुलेमहर्षि कर्वेडॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने  समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत  विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.

देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणालेभाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देतेविकासाशी जोडते,  भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील  उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.

मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेलअसे सांगून प्रधानमंत्री म्हणालेसाहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलनसाहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.  मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावेयुवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावेअसे आवाहन त्यांनी केले. 

शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेजगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसीऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये  मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी  दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होतेआपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा  होऊनलोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली.  संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली.  कलासाहित्यसंस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतातत्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईलअसेही श्री.फडणवीस म्हणाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  भवाळकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्यामराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरसंत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असूनती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली  असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते.  या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारीजोडणारी गोष्ट असली पाहिजेतोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातूनसाहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणालेसंत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला  समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान  अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहेते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.नहार म्हणालेदिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.

प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमिका अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधवविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेमाजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेलोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर,  विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

0000


 

Featured post

Lakshvedhi