Friday, 21 February 2025

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल

 नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा

वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल

कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईककामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदननवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदेकामगार विभागाचे अधिकारीविविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईलअसेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगरनगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावाअसेही त्यांनी सांगितले.

000

महाराष्ट्र शासनाचे 13 वर्षे मुदतीचे 1,500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 13 वर्षे मुदतीचे

1,500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या 1500 रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २५ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

  यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

 कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी२०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 12 वर्षे मुदतीचे 1,500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 12 वर्षे मुदतीचे

1,500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या 1500 रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २५ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

  यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

 कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी२०२५  पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी२०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २० : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २५ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी २०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

             शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

****

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २० : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २५ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

        यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ फेब्रुवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

       कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ फेब्रुवारी २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट २७ आणि फेब्रुवारी २७ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे

आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा

 आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा

- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण

मुंबईदि. 20 : आयुर्वेद व योगाभ्यास यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची निर्मिती केली. या आयुष मंत्रालयाच्या कार्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.    

            एनसीपीए येथील जमशेद भाभा थिएटर येथे आयोजित धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप कार्यक्रमात श्री. जाधव बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य. राजेश कोटेचाभारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य. जयंत देवपुजारीपद्मश्री देवेंद्र त्रिगुणावैद्य. राकेश शर्मादेश का प्रकृति परीक्षण अभियानाचे सचिव डॉ. आशुतोष गुप्तासच्चिदानंद प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून 26 नोव्हेंबर 2024 रोजी देश का प्रकृति परीक्षण हे अभियान जाहीर करण्यात आले. या अभियानाचा पहिला टप्पा 25 डिसेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या अभियान कालावधीत आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकृती परिक्षण केले. या एक महिन्याच्या कालावधीत या अभियानाच्या अनुषंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एका महिन्यात सर्वाधिक प्रतिज्ञा व डिजिटल प्रमाणपत्र दाखविणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन फोटो अल्बम व समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा व्हिडीओ अल्बम तयार करण्यात आला. आयुष मंत्रालयाची व्याप्ती वाढवून आयुर्वेदाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी धन्वंतरी दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचप्रमाणे जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. तसेच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात ‘एआय’ चा वापर करण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.

            धन्वंतरी पुरस्कारार्थी तसेच आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या विविध पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आयुर्वेद, योगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियान राबविण्यात आले. त्याचपद्धतीने राज्याच्या अर्थसंकल्पातदेखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.  

धन्वंतरी पुरस्कारार्थी :

            1. वैद्य माया राम उनियाल 2. वैद्य ताराचंद शर्मा3. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना रुपये 5 लाखाचा धनादेश व स्मृती चिन्हकलश व सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याचप्रमाणे देश का प्रकृती परिक्षण अभियानाच्या कालावधीत :

1. एका महिन्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 2. एका आठवड्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 3. 24 तासांत आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 4. डिजिटल प्रमाणपत्र दाखवणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम / पिन बॅज घातलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम. 5. समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम.

या पाच बाबींसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे जाहीर करून त्याबाबतचे प्रमाणपत्र या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले.

यासोबतच देश का प्रकृति परीक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा व देशातील आयुर्वेदिक महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले तर आभार सच्चिदानंद प्रसाद यांनी मानले.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/

वीडियो रेखा गुप्ता दिल्ली CM का बताकर शेयर किया जा रहा है जो गलत है वीडियो Savyasachi gurukul कर्नाटक का है

Old video of RSS worker Rekha gupta, now Delhi .वीडियो रेखा गुप्ता दिल्ली CM का बताकर शेयर किया जा रहा है जो गलत है  

 वीडियो
Savyasachi gurukul 
कर्नाटक का है

Featured post

Lakshvedhi