Wednesday, 19 February 2025

विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया

 विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे ब्राझीलच्या शिष्टमंडळास आवाहन

 

मुंबईदि. 19 - महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर असून महाराष्ट्राप्रमाणेच गोयास मध्ये देखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयासने सोबत येऊन विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूयाअसे आवाहन राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गोयासच्या शिष्टमंडळास केले.

ब्राझीलच्या गोयास राज्याचे गव्हर्नर ई. रोनाल्डो रामोस काईडो यांच्या नेतृत्वाखालील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी विविध विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.

मंत्री श्री.रावल म्हणाले भारत आणि त्यातही महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. यामुळे जग भारताकडे आश्वासकतेने पाहत आहेत. महाराष्ट्रात विविध उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऑरगॅनिक शेतीकडे वळत आहेत. ब्राझील प्रमाणेच साखर उत्पादनामध्ये देखील महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात इथेनॉल तयार करण्यावर भर दिला जात आहे. येथील आंबाकेळीडाळिंब आदी फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून येथे प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी देखील मोठा वाव आहे. महाराष्ट्र आणि गोयास राज्यामध्ये माहितीतंत्रज्ञानबाजारपेठ अशा विविध क्षेत्रात आदान प्रदान होऊन द्विपक्षीय परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. यासाठी सामंजस्य करार करून परस्पर सहकार्याची क्षेत्रे निश्चित करूअसे श्री. रावल यांनी सांगितले. 

गोयास चे गव्हर्नर श्री.काईडो यांनी गोयास आणि महाराष्ट्रादरम्यान असलेल्या विविध क्षेत्रातील साम्यावर भाष्य करून ऑरगॅनिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. साखर उद्योगइथेनॉल उत्पादन आदींसह विविध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली. 

महिला आत्मनिर्भरतेचा "नागपूर पॅटर्न",pl share

 महिला आत्मनिर्भरतेचा "नागपूर पॅटर्न"

सचिव डॉ. अनुपकुमार यादव

 

मुंबईदि. 19 : राज्यातील महिलांचा आर्थिकसामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महिला व बाल विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे. नागपूर मधील हजार महिलांनी एकत्र येऊन 30 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ या महिलांना  उद्योग सुरू करण्या मदत करणार असूनयासाठी शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली आहे.

डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले कीमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणा-या नागपूर मधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे. 3 हजार महिला या 30 लाख रुपये निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत. तसेच दुसऱ्या महिलांनाही या पैशातून  छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देत आहेत. एखादी दुर्घटना घडली तर मदत करत आहेत. भांडवलावर मिळणा-या व्याजावर ही सोसायटी पुढे कार्यरत राहणार आहे. अशा पद्धतीने ज्या महिला पुढे येतील त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग "सपोर्ट सिस्टिम" देखील उभी करणार आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे डॉ.अनुपकुमार यादव यांना सांगितले.

 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत

 

महिला काटकसर  करून आपल्या घरच्या गरजा पूर्ण करत असते. किराणा सामान भरणेमुलांची फी किंवा औषधे यांच्यावरच पैसे खर्च होत असतात. या योजनेतील लाभार्थी ग्रामीण क्षेत्रातील जास्त प्रमाणावर आहेत.  किराणा सामान तसेच इतर छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे खरेदी होत असल्याने गावातल्या छोट्या व्यापा-यांना देखील याचा अपरोक्ष लाभ होतो. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) सुमारे 1.5 लाख व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानामार्फत सुमारे 6 लाख याप्रमाणे सुमारे 7.5 लाख महिला बचत गट ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित येऊन निधी उभा करुन महिलांना विविध उद्यमशील उपक्रम राबविण्यास सदर योजनेमूळे शक्य होत आहे. या सर्व बाबींमुळे ग्रामीण भागामध्ये निधीचा इनफ्लो वाढणार असून ग्रामीण भागामध्ये सर्क्यूलर अर्थव्यवस्थेस चालना मिळून ती बळकट होईल. त्यामुळे ग्रामीण भागामध्येच गरजांची पूर्तता होणार असल्याने शहराकडे होणारे स्थंलातरण थांबण्यास मदत होईल, असे डॉ.अनुपकुमार यादव यांनी सांगितले आहे.

 

गरजवंताना सहाय्य

 

राज्यातील ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागामधीलत्याचप्रमाणे शहरातील (गरीब महिलांना) झोपडपट्टी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळत आहे. अशा प्रकारे समाजातील गरजू महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेमूळे त्यांची आर्थिक उन्नती होऊन त्या आर्थिकद्ष्टया सक्षम होतील.

महिला सदर योजनेच्या अटी शर्तीनसुार काही लाभार्थी अपात्र असल्याने त्या स्वत:हून लाभ परत करत आहेत. अशा प्रकारे या योजनेकरिता अपात्र असलेल्या इतर लाभार्थी महिलांना स्वत:हून लाभ परत करावयाचा असल्यास अथवा यापुढे त्यांना लाभ नको असल्यास त्याबाबत सूविधा उपलब्ध करण्यात आली आहे

शिवकालीन, प्राचिन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ

 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याहस्ते राज्यातील शिवकालीनप्राचिन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ

शिवाजी महाराजांनी दुरदृष्टीने पाणी साठवण तलावांची निर्मिती केली

                                         - मंत्री संजय राठोड

 

 किटा कापरा येथे गाळ काढण्याचा राज्यस्तरीय शुभारंभ

 शिव जयंती निमित्त हजार तलावातून गाळ काढणार

 

यवतमाळदि.19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात 33  तलाव बांधले. आजही त्या तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरीसामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजेहा महाराजांचा तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. अत्यंत दुरदृष्टीने महाराजांनी पाणी साठविण्याचे काम केलेअसे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलावबंधारेप्राचिन तलावगावतळे व पाणी पुरविण्यासाठी वापरण्यात येणारे सद्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहिम मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने राज्यभर राबविण्यात येत आहे. आज शिवजयंतीच्या दिवशी या मोहिमेचा यवतमाळ जिल्ह्यातील किटा कापरा येथून राज्यस्तरीय शुभारंभ झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियामुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्कीकिटा कापराच्या सरपंच अनिता ढोलेउपसरपंच मेघा तराळजिल्हा जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहेपराग पिंगळेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरेजिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडेतहसिलदार योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

शिव जयंती निमित्त सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेची आज राज्यात एकाचवेळी सुरुवात झाली. राज्यात एक हजार तलावातून गाळ काढण्याचा उद्देश आम्ही ठेवला आहे. शिवाजी महाराजांनी शेतकरीशेतमजूर आनंदी कसा राहीलं यासाठी धोरण राबविले. त्यांनी त्याकाळात बांधलेले तलाव सुस्थितीत तर आहेचत्या तलावात आजही भरपूर पाणी असल्याचे आपण पाहतो. महाराजांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन तलावांची निर्मिती केली. महाराजांचे पाणी साठवणुकीचे काम या मोहिमेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे श्री.राठोड म्हणाले.

मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने 'गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवारही योजना राबविली जात आहे. ठराविक कालावधीसाठी राबविण्यात येणारी ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर घेतला. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद देखील केली. ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करुन घेतले. पुर्वी तलावांमधील गाळ काढण्याची तरतूद होती. आता नालेबंधारे यातील गाळ काढण्याची बाब देखील समाविष्ठ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उपयुक्त गाळ उपलब्ध होतीलअसे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

शिव जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंत्री श्री.राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन केला. किटा कापरा येथील तलावातून गाळ काढून त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेतजमिनीत पसरविण्यासाठी देण्यात आला. शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी शासन अर्थसहाय्य देत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी केले.

 

माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत कार्यक्रम संपन्न pl share

 सिडको’चे हक्काचे घर मिळालेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून अभिनंदन


'माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत कार्यक्रम संपन्न


 


मुंबई, दि. 19 : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी 21 हजार 399 नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीत सहभागी झालेले नागरिक उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.


पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटलसेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.


उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.


एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभसंदेश वाचून दाखविण्यात आला.


0000

प्रत्येकाने एक आठवडा राष्ट्रकार्यासाठी दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल

 प्रत्येकाने एक आठवडा  राष्ट्रकार्यासाठी  दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल

: राज्यपाल राधाकृष्णन

 

सेवांकुर भारत प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद :

 राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

मुंबईदि. 19 देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क आरोग्य व वैद्यकीय सेवा देणाऱ्या  'सेवांकुर भारत' प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकाने एक आठवडा देशकार्यासाठी दिला तर भारताला गतवैभव प्राप्त करता येईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

                डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या 'सेवांकुर भारत : वन वीक फॉर द नेशन' या विविध राज्यांमधील वैद्यकीय सेवा कार्यावर आधारित लघुपटाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी (दि. 19) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

                वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण व आदिवासी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यास त्यांचे अनुभवविश्व व्यापक होईल असे नमूद करून या संदर्भात आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाला या प्रकल्पाला सहकार्य करण्याबाबत सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाशी अनेक वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जोडले जातील व ग्रामीण भागात सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होतील असे राज्यपालांनी सांगितले. या प्रकल्पात सहभागी सर्व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.

                'त्वदियाय कार्याय बद्धा कटीयम' हे वाक्य मातृभूमीसाठी सेवा करण्याची प्रेरणा देणारे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघविचारातून प्रेरणा मिळत आली आहे असे राज्यपालांनी सांगितले.  

                यावेळी 'स्वयम टॉक्स' या लघुपट निर्माण करणाऱ्या संस्थेचे संस्थापक नवीन काळे, सहसंस्थापक आशय महाजन व लेखक दिग्दर्शक ओंकार ढोरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वयमचे जॅकी पटेल यांनी सेवांकुर भारत लघुपट निर्मितीला अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.  उद्योजक गोविंद गोयल यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

                कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश कुलकर्णी, अधिष्टाता डॅा स्वाती शिरडकर,  सचिव डॉ अश्विनीकुमार तुपकरी तसेच प्रतिष्ठानचे सदस्य व युवा डॉक्टर्स उपस्थित होते.

 

राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ.आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता

 राज्यातील ग्रामीण रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र इ.आरोग्य संस्थामध्ये

दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

 मुंबईदि.19 : राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार 70 पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्रेप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. यामधील ज्या आरोग्य केंद्रांचे 75 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहेअशा 86 आरोग्य संस्थांकरिता 837 नियमित पदे व 1233 कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील 47 उपकेंद्रे, 16 प्राथमिक आरोग्य केंद्रेपाच ग्रामीण रुग्णालयेदोन ट्रॉमा केअर युनिटचार स्त्री रुग्णालये, 10 उपजिल्हा रुग्णालये आणि दोन जिल्हा रुग्णालये अशा विविध 86 आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यात आली आहे. तसेच टप्याटप्याने सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिकारी MBBS पदाच्या प्रतीक्षा यादीतील 408 व BAMS गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील 25 डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सूचित केले आहे.

००००

विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा

 विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी 'जय शिवाजीजय भारतपदयात्रा

- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

 

डॉ. मांडविया म्हणालेदेशाच्या स्वाभिमानासमोर संकट होते अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचासन्मानाचा नारा दिला तसेच जनतेच्या कल्याणाची मोहीम चालवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाचे नवयुवक विकसित भारताचा संकल्प घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येतेआदर्श शासन कसे चालवता येतेदेशाच्या सन्मानासाठी मान न झुकविता कसे लढता येऊ शकते हा वारसा दिला आहे.

शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्थाअष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्याच प्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी 'जय शिवाजीजय भारत'  पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेअसेही डॉ. मांडविया म्हणाले.

श्रीमती खडसे म्हणाल्याछत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक श्रद्धास्थानआस्था आहे. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी लाखो युवकांना सोबत घेतले. त्याचप्रमाणे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्माणासाठीचा संकल्प युवकांनी करावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

                श्री. भरणे म्हणालेछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारल्यास अंगात एक ऊर्जा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपल्या जीवनात वाटचाल ठेवली पाहिजे. या आदर्शाची उजळणी 'जय शिवाजीजय भारतपदयात्रा उपक्रमामुळे होणार आहे. राज्यातील युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनही खंबीरपणे उभे आहेअसेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय डॉ. चंद्रकांत फुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसलेपुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमारपिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त शेखर सिंहक्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे,  क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव अनिल डिग्गीकरराष्ट्रीय छात्र सेनाराष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीक्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थीमहाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

या पदयात्रेचे सीओईपी कॉलेज मैदान ते एस.एस.पी.एम.एस. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जंगली महाराज रस्ता ते झाशीची राणी पुतळामार्गे खंडूजीबाबा चौकछत्रपती संभाजी महाराज पुतळा ते फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग या मार्गाने आयोजन करण्यात आले.

या पदयात्रेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस,केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मांडवियाकेंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसेश्री. मोहोळराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटीलक्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. भरणेसांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

0000

 

 

 

.

Featured post

Lakshvedhi