Tuesday, 18 February 2025

धरणगाव - चोपडा तालुक्यांना जोडणाऱ्या खेडीभोकरी-भोकर पुलाच्या कामाच्या खर्चास मान्यता

 धरणगाव - चोपडा तालुक्यांना जोडणाऱ्या

खेडीभोकरी-भोकर पुलाच्या कामाच्या खर्चास मान्यता

 

मुंबई दि. १८ :  जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव व चोपडा तालुक्यांना जोडणारा खेडीभोकरी ते भोकर हा तापी नदीवरील महत्त्वाचा फूल आहे. या पुलाच्या कामाच्या खर्चास जलसंपदा (विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ)आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जलसंपदा मंत्री  महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलआमदार मंगेश चव्हाणजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूरतापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकरजलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक आदी उपस्थित होते.

तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर  या पुलाची लांबी ८८४ मीटररुंदी १० मीटर आणि उंची २७ मीटर इतकी आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. प्रवास जलद गतीने होईल असे यावेळी सांगण्यात आले.

भूसंपादनाच्या प्रकरणातील तडजोडी प्रकरणातील रक्कमा तातडीने द्याव्यात

 भूसंपादनाच्या प्रकरणातील तडजोडी प्रकरणातील रक्कमा तातडीने द्याव्यात

-         जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

तापी व कोकण विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत २३ विषयांना मान्यता

 

मुंबईदि. १८ :-  पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या भूसंदर्भ प्रकरणांमध्ये पॅरिटीच्या आधारावर केलेल्या तडजोड प्रकरणातील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने दिली जावी, असे निर्देश जलसंपदा (विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ)आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व कोकण खोरे पाटबंधारे विभाग नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरकोकण पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोलेतापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर,  जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणालेपाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन महत्त्वाची बाब आहे. भूसंपादन प्रक्रियेवर बराचसा  निधी खर्च होत असल्याने भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. भूसंपादनसाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने तातडीने करावी. आवश्यक निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ७० व्या बैठकीत १६  विषयांना तर कोकण पाटबंधारे  विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८७ बैठकीत ७ विषयांना मान्यता देण्यात आली.

००००

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे

 शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

राज्याच्या घराघरातमनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

 

मुंबईदि. 18 :- "छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याचीदिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

उपमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतातछत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यशौर्यधैर्यपराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहेयापुढेही तशीच राहीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसलेस्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असूनशिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरातमनामनात साजरा होऊ देअशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

 अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 18 : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे सागरी मत्स्योत्पादनामध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवासमंत्री नितेश राणे यांनी केले.

            मंत्रालयात आज राज्याच्या सागरी क्षेत्रात शास्वत मासेमारी टिकून राहण्याकरिता अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना झालीतसेच या कक्षाची बैठक ही झाली. यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते.

            सागरी सुरक्षेसाठी किनारपट्टीच्या भागात ड्रोनद्वारे गस्त सुरु केल्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले कीपरप्रांतिय मासेमारी नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच एलईडी मासेमारी विषयी कठोर कारवाई करणे आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे हित जपणे ही शासनाची भूमिका आहे. त्यानुसार या अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सागरी किनाऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची माहिती घेऊन त्याची उपलब्धता सूनिश्चित करण्याचे कामही या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या कक्षातील सर्वच सदस्यांनी जबाबदारीने आणि सहकार्याने काम करावे अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मंत्री श्री. राणे म्हणले कीया अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरक्षा आणि मासेमारीस एक शिस्त येईल. तसेच अवैध हलचालींवरही नियंत्रण आणणे आणि कडक कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत हीच विभागाची भूमिका आहे. त्यासाठी या अंमलबजावमी कक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. तसेच किनाऱ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात यावी. याबाबतचा कृती आराखडा तयार करून येत्या तीन महिन्यांमध्ये किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त होतील, असे पहावे अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मत्स्य व्यवसाय विभागाच्या या अंमलबजावणी कक्षामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त  अध्यक्ष असणार आहेत. तर पालघरठाणेमुंबई शहरमुंबई उपनगररायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारीपोलिस अधिक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव हे सदस्य असणार आहेत. तसेच मत्स्यव्यवसाय (सागरी) सहआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत.

            राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परप्रांतिय अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणेकक्षाची संरचनासंविधानिक चौकट व निधीची तरतूद यांचा अभ्यास करणेपरप्रांतीय अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन याबाबत शासनास उपाययोजना सुचवणे यासाठी हा कक्ष काम करणार आहे.

            तसेच राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये 24 तास गस्त घालणेसागरी कायद्याची अंमलबजावणी करणेगस्ती दरम्यान निदर्शनास येणाऱ्या अनधिकृत नौकांवर सागरी कायद्यानुसार कार्यवाही करणेनौका जप्त करणेत्यावरील मासळीचा लिलाव करणेड्रोनद्वारे गस्ती दरम्यान टिपण्यात आलेली छायाचित्रे व व्हीडिओ यांची तपासणी करुन अनधिकृत नौकांची माहिती घेणे व त्यांच्यावर सागरी कायद्यातील तरतुदीन्वये कार्यवाही करणेअनधिकृत नौकांना लावण्यात आलेल्या दंडाच्या वसुलीबाबत नियोजन करणेअवरुद्ध व जप्त करण्यात आलेल्या नौकांवर देखरेख ठेवणेआकस्मिक व गोपनीय पद्धतीने मासळी  उतरविणाऱ्या बंदरावरसमुद्रात धाडी टाकण्याबाबत  नियोजन करणेतसेच सागरी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व कामे करणे याप्रमाणे हा अंमलबजावणी कक्ष काम करणार आहे.

            अंमलबजावणी कक्षाच्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेसह आयुक्त (सागरी) महेश देवरेमहाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्रामउपसचिव किशोर जकातेयासह कोकण विभागातील मत्स्य व्यवसाय सह आयुक्त आणि विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

00000


येत्या 28 फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन

 येत्या 28 फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिर आणि

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांचे मुंबईकरांना आमंत्रण

 

मुंबईदि. 18 : मुंबईच्या मध्यवर्ती भागी असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुन्हा नव्याने 28 फेब्रुवारी 2025 पासून नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसलेकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार अनिल देसाईआमदार महेश सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता होत आहे. या मुंबईतील अतिशय भव्य आणि सुशोभित असलेल्या नाट्यगृह आणि अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकरांना येण्याचे आमंत्रण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेपूर्वी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउपसचिव नंदा राऊत आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

बोधचिन्हाचे अनावरण करतांना लोक कलाअभिजात कलादृश्यात्मक कला आणि दृकश्राव्य कला अशा सर्व प्रकारच्या कलांचे हक्काचे माहेरघर असलेल्या तसेच नाट्यगृहांची सुविधा देणाऱ्या अकादमीचे प्रतिबिंब असलेले नवे व आकर्षक बोधचिन्ह तयार करण्यात आले असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

पु.ल.देशपांडे कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमीच्या अनेक पिढ्या घडविल्या असल्याचे सांगून मंत्री ॲड शेलार म्हणाले कीया अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची जशी सोय आहेत्याचप्रमाणे उपजत कला गुण असलेल्या कलाकारांना त्यांचे कला बळ मिळण्याची सुद्धा अकादमी मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कला सादरीकरणकलाशिक्षणकलाआस्वादनकलासंवर्धन आणि कलाविषयक रोजगार निर्मिती अशा बहुविध सुविधा अकादमीत एकाच ठिकाणी आता उपलब्ध होणार आहेत. कलाक्षेत्रातील 20 वेगवेगळे प्रमाणपत्र व पदवीका अभ्यासक्रम येथे लवकरच सुरु होणार असून त्याचा फायदा नवोदित कलाकारांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड शेलार म्हणाले कीसंकुलातील रवींद्र नाट्यमंदिर2 लघु नाट्यगृह आणि 5 प्रदर्शन दालने तसेच 15 तालीम दालने यांच्यामुळे कलाकारांची कायमच मोठी सोय झाली आहे. त्याचबरोबर आता ही दोन्ही नाट्यगृहे नव्या रूपातअत्याधुनिक सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था व अंतर्गत सजावट करण्यात आली असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

000

उन्नत पॉडकार’ वाहतूक नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल

 उन्नत पॉडकार’ वाहतूक नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल

-         परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १८ : गुजरातमधील वडोदरा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात "उन्नत पॉडकार " वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल. ही निश्चितच नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरणार आहेअसा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते वडोदरा येथे जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते.

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये " स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली " प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

नुट्रान ईव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार " वाहतूक व्यवस्था पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने या पॉड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात.

मंत्री सरनाईक यांनी " उन्नत पॉडकार " वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे " उन्नत पॉडकार " वाहतूक यंत्रणेचा समावेश होईलअसेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

 यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांमध्ये या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले.

००००

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटलमेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौ. मीटर जमीनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली आहे. त्यानुसार ही जमीन वार्षिक १ रुपया या नाममात्र दराने भाडेपट्टयाने देण्यास मंजूरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्णरुग्णांचे नातेवाईकरुग्णवाहिकारुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सूकर होणार आहे. 

Featured post

Lakshvedhi