Saturday, 15 February 2025

नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात

 नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी

 आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई दि. १४:  नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या  कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणवन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर  मिळवाव्यातअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीस बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेमुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठकप्रसाद नार्वेकरकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेराज्यातील अवर्षण प्रवण भागाला  सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाची कामे लांबल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्यामुळे या प्रकल्पांची कामे विहित मुदतीत सुरू होणे आवश्यक असल्याने आवश्यक प्रक्रिया विभागाने सुरू करावी. या  कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. आराखड्यानुसार कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत असेही निर्देशही विखे पाटील यांनी दिले.

राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची गोंडवाना विद्यापीठाला सूचना

 राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची

 गोंडवाना विद्यापीठाला सूचना

 

मुंबई, दि.१४ : राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. १४) गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाचा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेतला.

कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी राज्यपालांपुढे दोन्ही विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात सादरीकरण केले. 

इटलीजर्मनीजपान आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी राज्यपालांनी कुलगुरुंना केली.  

राज्यपालांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणीआदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजनाकमवा आणि शिका योजना,  नव्या शैक्षणिक परिसराचा विकासविद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकृषी विद्यापीठासोबत सहकार्यआदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण करणे आदी विषयांवर चर्चा केली व सूचना केल्या.

कुलगुरु बोकारे यांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीरोजगारक्षम अभ्यासक्रमशैक्षणिक वेळापत्रकविद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधाभाषांतर प्रकल्पविद्यार्थी तक्रार निवारण कक्ष,  स्वच्छ भारत अभियान, 'विकसित भारतउपक्रमक्रीडा स्पर्धा आदी विषयांवर सादरीकरण केले.  

            सादरीकरणाच्या दुसऱ्या भागात राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षातील उपक्रमांची राज्यपालांना  माहिती दिली तसेच संशोधन आणि विकास कार्याबद्दल अवगत केले.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक तयार करून ते पुरेसे अगोदर प्रसिद्ध करावेप्रत्येक परीक्षांच्या सत्रनिहाय तारखा जाहीर कराव्या तसेच परीक्षांचे निकाल ३० दिवसांमध्ये लावावे असे सांगताना दीक्षांत समारंभाची तारीख देखील विद्यापीठांनी अगोदरच जाहीर करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सैन्यदलात अधिकाधिक युवकांनी भरती होण्यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवावे अशी सूचना देखील राज्यपालांनी यावेळी केली. 

            सादरीकरणाच्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडेगोंडवाना विद्यापीठाचे  प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण उपस्थित होते.

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य

 दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. १४ : सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणेतसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षाशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडनहिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसकबीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा,इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते,  जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवानवरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघरितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समुहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधनबचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीभारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅसवीज वापरयोग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरलेसिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की१४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये  विद्यार्थीतरूणवाहन चालकक्लिनरकर्मचारीशेतकरीनिवासी संस्थाग्रामपंचायतीस्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्वफायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सायक्लोथॉनवॉकेथॉनचित्रकला स्पर्धाइंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

०००

प्लास्टिक के बदले


 

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा

 रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा;


रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश


 मुंबई, दि. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.


महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.


 या स्पर्धेत सादर होणारी ४५ नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येतील. विनामुल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.


महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आलेली आहे. अंतिम फेरीतील सर्व नाटके प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार आहेत. 


६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिले नाटक 'पंचमवेद' हे १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.०० वाजता रंगशारदा नाट्यगृह येथे सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सुमारे १२०० पेक्षाहून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.


राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघाचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

प्रसिद्ध डॉक्टरने **लिपिड प्रोफाइल** समजावण्यासाठी एक अप्रतिम गोष्ट सांगितली.

 **लिपिड प्रोफाइल - सुंदर स्पष्टीकरण**  


एक प्रसिद्ध डॉक्टरने **लिपिड प्रोफाइल** समजावण्यासाठी एक अप्रतिम गोष्ट सांगितली.  


**कल्पना करा की आपले शरीर एक छोटेसे गाव आहे.**  

या गावातील मुख्य उपद्रवी घटक म्हणजे **कोलेस्टेरॉल**.  

याला मदत करणारा प्रमुख साथीदार म्हणजे **ट्रायग्लिसराइड**.  

त्यांचे काम गावाच्या रस्त्यांवर फिरणे, अडथळे निर्माण करणे आणि वाहतूक खोळंबा करणे आहे.  


**या गावाचे केंद्र म्हणजे आपले हृदय.**  

सर्व रस्ते हृदयाकडे जातात.  

जेव्हा या उपद्रवी घटकांची संख्या वाढते, तेव्हा ते **हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात**.  


परंतु गावात **पोलीस फोर्स** देखील आहे.  

**एचडीएल (HDL)** हा **सद्भावना पोलीस** आहे, जो या उपद्रवी घटकांना पकडतो आणि **यकृतात** (liver) टाकतो, जे नंतर त्यांना शरीरातून बाहेर टाकते.  


पण गावात एक **वाईट पोलीस एलडीएल (LDL)** देखील आहे.  

एलडीएल हा **सत्तेचा हव्यास असलेला अधिकारी आहे**, जो **उपद्रवी घटकांना सोडवतो आणि पुन्हा रस्त्यावर पाठवतो**.  


जर **एचडीएल (सद्भावना पोलीस)** कमी असतील आणि **एलडीएल (वाईट पोलीस)** जास्त असतील, तर गावात **अराजकता पसरते** आणि **हृदयविकाराचा धोका वाढतो**.  


### मग उपाय काय?  

**उपद्रवी घटक कमी करायचे आणि चांगल्या पोलिसांची संख्या वाढवायची?**  


##### **चालायला सुरुवात करा!**  

**प्रत्येक पावलाने चांगल्या पोलिसांची संख्या (HDL) वाढेल आणि वाईट पोलीस (LDL) व उपद्रवी घटक (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड) कमी होतील.**  

त्यामुळे **आपले गाव (शरीर) निरोगी होईल आणि हृदय मजबूत राहील!**  


### **त्यामुळे चालत राहा, चालत राहा आणि चालत राहा!**  

### **हॅपी सीनियर सिटीझन्स वीक!**  


---


### **काय कमी करावे?**  

1. मीठ  

2. साखर  

3. पांढरा मैदा  

4. दुग्धजन्य पदार्थ  

5. प्रक्रिया केलेले अन्न  


### **कोणते अन्न खावे?**  

1. भाजीपाला  

2. कडधान्ये  

3. शेंगा  

4. सुकामेवा  

5. थंड दाबलेले तेल (ऑलिव्ह, नारळ, इ.)  

6. फळे  


---


### **ही तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा:**  

1. **आपले वय**  

2. **आपला भूतकाळ**  

3. **आपल्या तक्रारी**  


### **या गोष्टी आवर्जून जपा:**  

1. **आपले कुटुंब**  

2. **आपले मित्र**  

3. **आपले सकारात्मक विचार**  

4. **स्वच्छ व आनंदी घर**  


### **या तीन गोष्टी अंगीकारा:**  

1. **नेहमी हसत राहा**  

2. **नियमित शारीरिक हालचाल करा**  

3. **वजनावर नियंत्रण ठेवा**  


---


### **सहा जीवनशैली सवयी ज्या पाळल्या पाहिजेत:**  

1. तहान लागेपर्यंत थांबू नका, नियमित पाणी प्या.  

2. दमल्यावरच विश्रांती घेऊ नका, वेळच्या वेळी आराम करा.  

3. आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जाऊ नका, नियमित तपासणी करा.  

4. चमत्काराच्या प्रतीक्षेत राहू नका, देवावर श्रद्धा ठेवा.  

5. स्वतःवर विश्वास ठेवा.  

6. नेहमी सकारात्मक राहा आणि उज्ज्वल भविष्याचा विचार करा.  


---


### **आपल्याकडे ४७ ते ९० वयोगटातील मित्र आहेत का?**  

तर **हा संदेश त्यांना जरूर पाठवा!**  


**🌹हॅपी सीनियर सिटीझन्स वीक!🎉**  

**सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा!**

मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...

 *मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*


   आजकाल सुरू झालेली एक विचित्र परंपरा म्हणजे रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का?


 *भारतीय धर्मग्रंथ हे चुकीचे मानतात*.. 


आज आम्ही तुम्हाला असे करणे किती *मोठे नुकसान* आहे हे सांगणार आहोत.कारण मोठा अनर्थ* घडू शकतो..


आजकाल कुणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो की, रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस १२ वाजता म्हणजेच निशीथ काल (भूत काळ) मध्ये साजरा करतात. , निशीथ काल ही रात्रीची वेळ असते जी *सामान्यतः मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान असते*. सामान्य लोक याला *मध्यरात्र* किंवा अध्यरात्र म्हणतात.


शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिशाच यांचा काळ आहे. या काळात ही शक्ती अत्यंत मजबूत होते.


आपण कोठेही राहतो, अशा अनेक शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु ज्यांचा आपल्यावर अनेकदा *विपरित* परिणाम होतो.


 ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते.आणि आपण दिशाहीन होतो. हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.  अशा भुताटकीच्या काळात केक कापून, दारू आणि मांस सेवन केल्याने अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव दार ठोठावते असते.


वर्षातील काही दिवस जसे की दिवाळी, ४ नवरात्री, जन्माष्टमी आणि शिवरात्री वगळता, निशीथ काल महानशीठ काल बनतो आणि शुभ परिणाम देतो, तर इतर वेळी तो हानिकारक प्रभाव देतो.


*शास्त्रानुसार रात्री केलेल्या मनोकामना प्रतिकूल परिणाम देतात.आणि धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराचे आवाहन करण्यासारखे मानले जाते.*


*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि हा काळ ऋषीमुनींच्या तपश्चर्येचाही असतो.त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतेपासून मुक्त असते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्योदयानंतरच शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्या वेळी दिलेल्या शुभेच्छा निष्फळ ठरतात. शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी हानिकारक ठरतात.*


🙏🏻 *कृपया हा लेख तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा*🙏🏻

*🌹💐सर्वांना शुभेच्छा 💐🌹*

Featured post

Lakshvedhi