सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 February 2025
एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा
एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा
-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 14 : मराठी चित्रपटांसाठी एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक झाली.
राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देण्याबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा, असे निर्देश ॲड. शेलार यांनी दिले.
रायगड किल्लासंवर्धन आराखडा अंमलबजावणी लवकरच
रायगड किल्लासंवर्धन आराखडा अंमलबजावणी लवकरच
-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 14 : रायगड किल्ला संवर्धन व परिसराच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा अभ्यास करून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
रायगड किल्ला संवर्धन व परिसर विकास यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, रायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार रायगड किल्ला व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. याचा सखोल अभ्यास करून सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.
०००
तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक
तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या
जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक
- सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार
मुंबई दि. १४ : तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
मंत्रालय येथील दालनात बैठक झाली.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सीमार्फत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरु आहे. यामध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध नियोजन घेण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले.
यासंदर्भात सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन कामाची आखणी करण्यात येईल असेही ॲड शेलार यांनी सांगितले
साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी
साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा
नाशिक, दि. १४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, गोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघात, सुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्रीमती फरांदे यांनीही विविध सूचना केल्या, तर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
०००००
l नाविन्यपूर्ण उपक्रम l एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके :
l नाविन्यपूर्ण उपक्रम
l एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके :
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता १ ली ते ७ वीची मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके एकात्मिक व द्विभाषिक पद्धतीने तयार करण्यात आली. या पुस्तकामधील सर्व विषयांचा अभ्यास हा तीन भागांमध्ये विभागण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांनी एकच भाग शाळेत नेऊन त्याचा अभ्यास करणे अपेक्षित होते. तसेच या पुस्तकांमधील गणित व विज्ञान या विषयांच्या संज्ञा व संकल्पनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने या विषयाची पुस्तके
द्विभाषिक करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील ६६ ब्लॉकमध्ये राबवण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहचवण्यात आली. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला याचे सर्वेक्षण करता न आल्यामुळे मागील वर्षी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली. या काळात बहुतांशी शाळा सुरु झाल्या व नंतर बंद झाल्या. या वर्षी म्हणजे शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात येऊन तो राज्यातील १०१ ब्लॉकमध्ये विस्तारित करण्यात आला.
l राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ४८८ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०२१-२२ मध्ये `सृजन बालभारती` या नावाने एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात तयार करण्यात आली होती. या पाठ्यपुस्तकांचे वाटप टप्प्याटप्प्याने या ४८८ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले व येत आहे
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

