Saturday, 15 February 2025

नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात -

  

नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी

 आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई दि. १४:  नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या  कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणवन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर  मिळवाव्यातअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीस बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेमुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठकप्रसाद नार्वेकरकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेराज्यातील अवर्षण प्रवण भागाला  सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाची कामे लांबल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्यामुळे या प्रकल्पांची कामे विहित मुदतीत सुरू होणे आवश्यक असल्याने आवश्यक प्रक्रिया विभागाने सुरू करावी. या  कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. आराखड्यानुसार कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत असेही निर्देशही विखे पाटील यांनी दिले.

००००

जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा

 जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांसाठी

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. १४ :  जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांना धरणकालवे बंधारे बांधणे यासह या क्षेत्रातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रक्षशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने सर्वसमावेशक असा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावाअशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) तसेच कोयना वीजनिर्मिती प्रकल्प (हायड्रो प्रोजेक्ट) यांनी सादरीकरण केले.  यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेमुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठकप्रसाद नार्वेकरकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमेरीचे  महासंचालक श्री. मांदाडेमुख्य अभियंता सुदर्शन पगार व श्री. चोपडे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेजलसंपदा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अवगत असणे काळाची गरज आहे.  यासाठी तीन वर्षातून एकदा प्रत्येक अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीने प्रत्येक कॅलेंडर वर्षात प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करावा.  तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार कराव्यात.

यावेळी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)यांत्रिकी विभागजलविद्युत प्रकल्पगुणनियंत्रण मंडळधरण सुरक्षितता कामे याचाही आढावा घेण्यात आला.

०००

पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत

 पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गोदावरी खोरे नियामक मंडळाच्या बैठकीत १२ कामांना मान्यता

मुंबई दि. १४ :  पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ती स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेतअशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियमाक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमुख्य अभियंता विजय घोगरेश्री. गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेमहामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे  मार्गी लागतील. या वाढीव उत्पन्नातून उपसा सिंचन  योजनांचा  देखभाल  दुरुस्तीचा खर्च भागवणे शक्य होईल. उत्पन्न  वाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी. या जागांची मोजणी करून घ्यावीअसेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेकोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये  रूपांतर करण्यासाठी याचे सर्व्हेक्षण करावे. हे काम  कालबद्ध रीतीने करावे. नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती गतीने पूर्ण करावीत. महामंडळासाठी कायदा सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गोदावरी नियामक मंडळाच्या ८४ व्या बैठकीत १२ कामांना मान्यता देण्यात आली. 

मालमत्तांचे व्यवस्थापन, निधी स्रोत बळकटीकरणासाठी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करावी

 मालमत्तांचे व्यवस्थापननिधी स्रोत बळकटीकरणासाठी

वित्तीय सल्लागाराची नेमणूक करावी

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

·         कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या बैठकीत १५ कामांना मान्यता

 

मुंबई दि. १४:   पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजननिधी स्त्रोत बळकटीकरण व उभारणीव्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी  दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११२ वी बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,  मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेमहामंडळाच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी विनावापर स्थावर मालमत्ता आहेत. याची माहिती संकलित होणे  आवश्यक आहे. अशी माहिती संकलित झाल्यास या मालमत्तेचे व्यवस्थापन व त्यातून महामंडळास नियमित उत्पन्न  मिळवण्यासाठी सल्लागाराची मदत होईल. 

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेनियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली कामे कालबध्द रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. या कामांचे सुयोग्य व सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जावी. गोदावरी नियामक मंडळाच्या ११२ व्या बैठकीत १५ कामांना मान्यता देण्यात आली. महामंडळासाठी  कायदा सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचनाही मंत्री  श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

 आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

 

मुंबईदि.१४  :  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवारदि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध येथे 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमअर्थात 'ट्रेन द टीचर्सया कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असूनकौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून त्याच अंतर्गतट्रेन द टीचर्स'हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारीटाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाछत्रपती संभाजीनगरशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाअमरावतीराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थामुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूमसंभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे असूनदि. १७ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

 ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

 

मुंबई, दि.14 : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारताच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या ४० देशांतील या नेत्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील असे सांगून युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा विनियोग समाजासाठी करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

जागतिक युवकांच्या या फोरममध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोनटेनीस दिग्गज रॉजर फेडरर आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून युवकांनी सर्वसमावेशक विकासासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभूएमडीनफा कॅपिटलगौरव मेहतासंस्थापकधर्मा लाइफ आणि अन्य युवा नेते उपस्थित होते.

0000

राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची गोंडवाना विद्यापीठाला सूचना

 राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची

 गोंडवाना विद्यापीठाला सूचना

 

मुंबई, दि.१४ : राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. १४) गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाचा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेतला.

कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी राज्यपालांपुढे दोन्ही विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात सादरीकरण केले. 

इटलीजर्मनीजपान आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी राज्यपालांनी कुलगुरुंना केली.  

राज्यपालांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणीआदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजनाकमवा आणि शिका योजना,  नव्या शैक्षणिक परिसराचा विकासविद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकृषी विद्यापीठासोबत सहकार्यआदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण करणे आदी विषयांवर चर्चा केली व सूचना केल्या.

कुलगुरु बोकारे यांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीरोजगारक्षम अभ्यासक्रमशैक्षणिक वेळापत्रकविद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधाभाषांतर प्रकल्पविद्यार्थी तक्रार निवारण कक्ष,  स्वच्छ भारत अभियान, 'विकसित भारतउपक्रमक्रीडा स्पर्धा आदी विषयांवर सादरीकरण केले.  

            सादरीकरणाच्या दुसऱ्या भागात राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षातील उपक्रमांची राज्यपालांना  माहिती दिली तसेच संशोधन आणि विकास कार्याबद्दल अवगत केले.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक तयार करून ते पुरेसे अगोदर प्रसिद्ध करावेप्रत्येक परीक्षांच्या सत्रनिहाय तारखा जाहीर कराव्या तसेच परीक्षांचे निकाल ३० दिवसांमध्ये लावावे असे सांगताना दीक्षांत समारंभाची तारीख देखील विद्यापीठांनी अगोदरच जाहीर करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सैन्यदलात अधिकाधिक युवकांनी भरती होण्यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवावे अशी सूचना देखील राज्यपालांनी यावेळी केली. 

            सादरीकरणाच्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडेगोंडवाना विद्यापीठाचे  प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi