Saturday, 15 February 2025

l नाविन्यपूर्ण उपक्रम l एकात्मिक व द्‌विभाषिक पाठ्यपुस्तके :

 l  नाविन्यपूर्ण उपक्रम

l  एकात्मिक  द्विभाषिक पाठ्यपुस्तके :

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता  ली ते  वीची मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके एकात्मिक  द्विभाषिक पद्धतीने तयार करण्यात आलीया पुस्तकामधील सर्व विषयांचा अभ्यास हा तीन भागांमध्ये विभागण्यात आलाजेणेकरून विद्यार्थ्यांनी एकच भाग शाळेत नेऊन त्याचा अभ्यास करणे अपेक्षित होतेतसेच या पुस्तकांमधील गणित  विज्ञान या विषयांच्या संज्ञा  संकल्पनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने या विषयाची पुस्तके

द्विभाषिक करण्यात आलीहा पथदर्शी प्रकल्प राज्यातील ६६ ब्लॉकमध्ये राबवण्यात आला होतात्यामध्ये सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहचवण्यात आलीकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला याचे सर्वेक्षण करता  आल्यामुळे मागील वर्षी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आलीया काळात बहुतांशी शाळा सुरु झाल्या  नंतर बंद झाल्याया वर्षी म्हणजे शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात येऊन तो राज्यातील १०१ ब्लॉकमध्ये विस्तारित करण्यात आला.

l  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी  उर्दू माध्यमाच्या ४८८ शाळांची निवड करण्यात आलीया शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम  पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०२१-२२ मध्ये `सृजन बालभारती` या नावाने एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात तयार करण्यात आली होतीया पाठ्यपुस्तकांचे वाटप टप्प्याटप्प्याने या ४८८ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले  येत आहे

नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात -

  

नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी

 आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई दि. १४:  नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या  कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणवन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर  मिळवाव्यातअशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीस बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेमुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठकप्रसाद नार्वेकरकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेराज्यातील अवर्षण प्रवण भागाला  सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाची कामे लांबल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्यामुळे या प्रकल्पांची कामे विहित मुदतीत सुरू होणे आवश्यक असल्याने आवश्यक प्रक्रिया विभागाने सुरू करावी. या  कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. आराखड्यानुसार कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत असेही निर्देशही विखे पाटील यांनी दिले.

००००

जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा

 जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांसाठी

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि. १४ :  जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांना धरणकालवे बंधारे बांधणे यासह या क्षेत्रातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रक्षशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने सर्वसमावेशक असा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावाअशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) तसेच कोयना वीजनिर्मिती प्रकल्प (हायड्रो प्रोजेक्ट) यांनी सादरीकरण केले.  यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेमुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठकप्रसाद नार्वेकरकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमेरीचे  महासंचालक श्री. मांदाडेमुख्य अभियंता सुदर्शन पगार व श्री. चोपडे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेजलसंपदा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अवगत असणे काळाची गरज आहे.  यासाठी तीन वर्षातून एकदा प्रत्येक अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीने प्रत्येक कॅलेंडर वर्षात प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करावा.  तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार कराव्यात.

यावेळी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)यांत्रिकी विभागजलविद्युत प्रकल्पगुणनियंत्रण मंडळधरण सुरक्षितता कामे याचाही आढावा घेण्यात आला.

०००

पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत

 पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गोदावरी खोरे नियामक मंडळाच्या बैठकीत १२ कामांना मान्यता

मुंबई दि. १४ :  पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ती स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेतअशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियमाक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमुख्य अभियंता विजय घोगरेश्री. गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेमहामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे  मार्गी लागतील. या वाढीव उत्पन्नातून उपसा सिंचन  योजनांचा  देखभाल  दुरुस्तीचा खर्च भागवणे शक्य होईल. उत्पन्न  वाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी. या जागांची मोजणी करून घ्यावीअसेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेकोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये  रूपांतर करण्यासाठी याचे सर्व्हेक्षण करावे. हे काम  कालबद्ध रीतीने करावे. नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती गतीने पूर्ण करावीत. महामंडळासाठी कायदा सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गोदावरी नियामक मंडळाच्या ८४ व्या बैठकीत १२ कामांना मान्यता देण्यात आली. 

मालमत्तांचे व्यवस्थापन, निधी स्रोत बळकटीकरणासाठी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करावी

 मालमत्तांचे व्यवस्थापननिधी स्रोत बळकटीकरणासाठी

वित्तीय सल्लागाराची नेमणूक करावी

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

·         कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या बैठकीत १५ कामांना मान्यता

 

मुंबई दि. १४:   पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजननिधी स्त्रोत बळकटीकरण व उभारणीव्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी  दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११२ वी बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेकृष्णा  खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,  मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेमहामंडळाच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी विनावापर स्थावर मालमत्ता आहेत. याची माहिती संकलित होणे  आवश्यक आहे. अशी माहिती संकलित झाल्यास या मालमत्तेचे व्यवस्थापन व त्यातून महामंडळास नियमित उत्पन्न  मिळवण्यासाठी सल्लागाराची मदत होईल. 

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेनियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली कामे कालबध्द रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. या कामांचे सुयोग्य व सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जावी. गोदावरी नियामक मंडळाच्या ११२ व्या बैठकीत १५ कामांना मान्यता देण्यात आली. महामंडळासाठी  कायदा सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचनाही मंत्री  श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

 आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

 

मुंबईदि.१४  :  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवारदि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध येथे 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमअर्थात 'ट्रेन द टीचर्सया कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असूनकौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून त्याच अंतर्गतट्रेन द टीचर्स'हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारीटाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाछत्रपती संभाजीनगरशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाअमरावतीराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थामुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूमसंभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे असूनदि. १७ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

 ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

 

मुंबई, दि.14 : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारताच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या ४० देशांतील या नेत्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील असे सांगून युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा विनियोग समाजासाठी करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

जागतिक युवकांच्या या फोरममध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोनटेनीस दिग्गज रॉजर फेडरर आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून युवकांनी सर्वसमावेशक विकासासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभूएमडीनफा कॅपिटलगौरव मेहतासंस्थापकधर्मा लाइफ आणि अन्य युवा नेते उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi