Friday, 14 February 2025

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

 मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने

मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. 12 : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सकाळ ग्रुपचे बॉबी निंबाळकर आदी उपस्थित होते.

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगित तत्वावर राबवण्यात यावा. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने मूल्यमापन करावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये किती आणि कशी वाढ झाली आहे, मच्छिमारांना कशा प्रकारे फायदा झाला याचा या मूल्यमापनामध्ये समावेश असावा. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागाने त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मंत्री श्री. राणे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर हे 2026 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा आणि तो तातडीने राबवण्याचे नियोजन करण्यात यावे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्यतः किनारपट्टीच्या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. जेणेकरून किनारपट्टीच्या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येईल. वाढवण बंदरासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती राज्यातूनच पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. तरी याविषयीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मच्छिमारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शाश्वत मासेमारी व्यवसाय, पर्यावरण स्नेही मच्छिमारी, मच्छिमारांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांची सुरक्षा,  अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असणार आहे.

0000

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

 मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणासंस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणाअधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेचबालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेलहे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेतत्याचे विवरण खालील प्रमाणे -

 महसूल विभाग: ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी

पोलीस विभाग: जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी

 शालेय शिक्षण विभाग: प्रत्येक महसूली विभागातून १ शाळाअशा ६ शाळांचा गौरव

 महिला व बालविकास विभाग: एकूण ९८ अधिकारी व कर्मचारीतसेच संस्था यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.


बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’

 बाल हक्क संरक्षणासाठी बालरक्षा अभियान

राबवणार -  अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह

मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

 

मुंबईता. १२ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच बालस्नेही पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली. 

मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालकशिक्षकपोलिससामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्कसमन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून हे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी आयोग प्रयत्नशिल आहे. बहुतांश प्रकरणात आरोपी हा पिडीत बालकांच्या ओळखीतला असतो. तक्रार करण्याची भितीसामाजिक दबाव यामुळे अनेक प्रकरणे दडपली जात असल्याचे निदर्शनात येते. या प्रकरणात तक्रार करण्याचे प्रमाण वाढावेशाळांमध्ये बाल अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रभावी प्रतिसाद प्रणाली उभारणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पालकशिक्षकपोलिससामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क आणि समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे आहे यासाठी आयोग बालरक्षा अभियान राबवित असल्याची माहिती अध्यक्षा शहा यांनी दिली.

या अभियानाचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:०० वाजतासह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे व विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी बालरक्षा अभियान’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपर पोस्टर्सचे अनावरणबालकांच्या तक्रार निवारणासाठी विकसित व सुधारित बालस्नेही चिराग ॲप’ लाँच केले जाणार आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई शहरमुंबई उपनगरठाणे,नागपूरअकोलानाशिकपुणेछत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यात शिक्षकपालकपालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी व निवडक विद्यार्थी यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ७,००० जणांना बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्देश बालकांच्या सुरक्षिततेविषयी शिक्षक व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणेशालेय वातावरण अधिक सुरक्षित बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणेबालकांच्या हक्कांचे संरक्षणतक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे, असे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास सुधारित प्रस्ताव सादर करावा

 ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास

सुधारित प्रस्ताव सादर करावा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश

१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत

कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

 

नवी दिल्ली दि. 12 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटेकृषी आयुक्त सुरज मांढरेसाखर आयुक्त कुणाल खेमणारकेंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आत्तापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या ४०% अथवा कमाल रु. ३५ लाख अनुदान देण्यात येते.

उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत विनंती केली.

या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरीऊस तोडणी मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनेत सुधारणा करून सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी निर्देश दिले. या सुधारित प्रस्तावास केंद्र शासनाची त्वरित मान्यता देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग

 पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी

येरवडा-कात्रज भुयारी मार्ग

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 12 : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग 'ट्वीन टनलपद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले. पुण्यासोबतच नाशिकनागपूर व छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटीरांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 'अर्बन ग्रोथ सेंटरकरिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्गपुणे सातारा आणि पुणे - नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नवीन शहर नियोजन करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविकास योजना तयार करताना लागणारा कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्तेमलनिस्सारणपाणीपुरवठाविज पुरवठास्मशान भूमीदफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुणे व नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलछत्रपती संभाजी नगर प्राधिकरणाच्या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटनागपूरच्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात. प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

विकास योजनेत रस्ते 18 मीटर रुंदीचे करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविकासयोजनांचे नियोजन करताना चांगल्या दर्जाची सल्लागार एजन्सी नियुक्त करावी. प्राधिकरणांनी भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावायासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रकल्प कार्यान्वित करावे. पाण्याची उपलब्धता बघूनच बांधकाम परवानगी देण्यात यावी.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सोंडापार येथील प्राधिकरणाच्या प्रस्तावित कार्यालय आणि कर्मचारी निवासी संकुलाची व्यवहार्यता तपासावी. नागपूर शहरात फुलांचे मार्केट तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासकीय जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव ठेवावी. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास योजना तयार करावी. नाशिक प्रदेशात ''स्पिरीच्युअल सिटीकरण्यासाठी जमीन संपादित करावी.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळदुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे 500 बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाहीयाची काळजी घ्यावी. पुणे, राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहराजवळील औद्योगिक क्षेत्र व पर्यटन क्षेत्रांचा विचार करावा. त्यानुसार आपली विकास योजना तयार करावी यावी. प्राधिकरणाने शहराजवळील असलेले औद्योगिक क्षेत्रपर्यटन स्थळे यांना जोडणारे प्रशस्त रस्ते तयार करावे.

नाशिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. माणिक गुरचळ, पुण्याच्या बैठकीत महानगर आयुक्त योगेश म्हसेनागपूरच्या बैठकीत महानगर आयुक्त संजय मीना आणि छत्रपती संभाजी नगरच्या बैठकीत महानगर आयुक्त दिलीप गावडे यांनी सादरीकरण केले. बैठकीला नगरविकासगृहनिर्माण तसेच प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/


 


महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

 महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

 महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावेयासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

भिवंडी निजामपूर महानगर पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावातसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावापिण्याचे पाणीस्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकररईस शेखसचिव अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेबचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके


विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार


- माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार


मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पण


मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे उद्घाटन


 


            मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील 'किऑक्स' मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तक ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयमध्ये, त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.


उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.


पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देवून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील वाचक, विद्यार्थी, ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. स्पर्धा परीक्षांची माहिती आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. मुंबई उपनगर, मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.


ॲड. शेलार म्हणाले की, ग्रंथ म्हणजे प्रत्येकाचे जीवन संपन्न करणारे एक दालन आहे. प्रत्येकाला जगण्याची दिशा देणाऱ्या ग्रंथांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत किंवा जगभरातील प्रभावी लोक महान साहित्यिक होते.


पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. आता मराठी भाषा जगभराच्या विद्यापीठात शिकवली जाणार आहे. विविध विद्यापीठात मराठी भाषा अध्ययन केंद्र सुरू होतील. शासकीय कामकाजात देखील मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. नुकतीच राज्यात पहिली हॅकेथॉन स्पर्धा जाहीर करण्यात आली असून बहुभाषिक पद्धतीने सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअपना संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी पारितोषिक देखील ठेवण्यात आले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.


  सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, प्रकाश गंगाधरे, लेखक चंद्रकांत भोंजाळ, बृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या मंजिरी वैद्य यांना 'ग्रंथ मित्र' पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.


            दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठ' या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' या विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभव' या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारी चे कार्यक्रम


  दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यात' या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमान' या विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेताना' या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेती' या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर 'कोवळ्या पालेभाज्या' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधून' या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.


  या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.


०००


संध्या गरवारे/विसंअ/ जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.

            दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठया विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळप्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळेप्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रया विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभवया विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारी चे कार्यक्रम

  दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यातया विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमानया विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेतानाया विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेतीया विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुकेमालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर 'कोवळ्या पालेभाज्याया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधूनया कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.  कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

  या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi