Friday, 14 February 2025

बंदीजनांच्या कुटुंबियांशी संवादासाठी ई-मुलाखत सुविधा; राज्यात 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती

 बंदीजनांच्या कुटुंबियांशी संवादासाठी ई-मुलाखत सुविधा;

राज्यात 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती

 

            मुंबईदि. 13 : बंदीजनांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई- प्रिझन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत ई- मुलाखत सुविधा 04 जुलै 2023 पासुन कार्यान्व‍ित झाली आहे. ही सुविधा सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत 01 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये बंद्यांच्या संवादासाठी राज्यात 3 लाख 16 हजार 647 ई-मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

या कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह 45 हजार 174, तळोजा मध्यवर्ती कारागृहात 43 हजार 848, ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे 36 हजार 371, मुंबई मध्यवर्ती कारागृहात 29 हजार 347, नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे 31 हजार 444, कल्याण जिल्हा कारागृहात 22 हजार 608, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे 23 हजार 860 इतक्या ई-मुलाखती झालेल्या आहेत.  राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंदीजनांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

पूर्वी मुलाखत नाव नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरुन प्रवास करुन कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पहावे लागायचे. त्यामुळे बंद्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु आता बंदीजनांसोबत मुलाखत घेण्याकरिता नातेवाईक काही दिवस आधीच ई प्रिझन  (ePrisons)  प्रणालीद्वारे नोंदणी करतात.  त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी संवाद साधता येतो.

            राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल आहेत. त्यांची परदेशातील मुलेमुली व नातेवाईकांशी ई-मुलाखत अथवा व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर सुविधा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये 1105 पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबियआई-वडीलमुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु ही सुविधा सुरु झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद होत आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेशी बंद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.

            बंदीजनांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षककारागृह व सुधारसेवापुणे यांचे 22 मार्च 2024 रोजीचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार न्यायाधीन बंद्यांना महिन्यातून चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईकमित्र व वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन ई मुलाखत सुविधा देण्यात येत आहे. बंद्यांना ही सुविधा देण्यासंबंधीच्या या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

            बंदीजनांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाईकांचा या  सुविधेकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष संवादासाठी येण्याच्या खर्चातदेखील बचत झालेली आहे. या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत पुणे येथील कारागृह व सुधारसेवेचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडेविशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.

            ही सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरिता सर्व कारागृहांच्या दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच नातेवाईक भेटीच्या ठिकाणी बंद्यांच्या नातेवाईक अथवा वकील यांना एनपीआयपी पोर्टलवर मुलाखत नोंदणी कशी करावीयाचे प्रात्यक्षिक एलईडी स्क्रीनवर व्हिडीओ क्लीपद्वारे दाखवण्यात येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांच्या नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असल्याचे कारागृह प्रशासनाने कळविले आहे. 

डाळी उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक

 डाळी उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी 

सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक

- पणन मंत्री जयकुमार रावल

नवी दिल्लीदि. 13 : डाळवर्गीय पीकांसंदर्भात क्षेत्रातील संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या सहभागाचे आवाहन करत सरकारशेतकरीसंशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास उत्पादन क्षमतेत अधिक वाढ होऊन डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भारत मंडपम येथे आयोजित भारतीय डाळी परिषदेत (IPGA-India Pulses Conclave)  केले.

भारतीय डाळी परिषदेच्या निमित्तानेमहाराष्ट्र सरकारने डाळींच्या उत्पादनात आपल्या पुढाकारावर प्रकाश टाकत  शाश्वत शेतीसंशोधनसरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रसह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे श्री रावल यांनी नमुद केले.

भारत मंडपम येथे भारतीय डाळी आणि धान्य संघटना (आयपीजीए) च्यावतीने आयोजित भारतीय डाळी परिषदेतर्फे समृद्धीसाठी डाळी - शाश्वततेसह पोषण’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

            या वेळी  केंद्रीय  नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी,  कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदीग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरेअन्न प्रक्रिया उद्योग सचिव सुब्रत गुप्ताइंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) चे अध्यक्ष बिमल कोठारीग्लोबल पल्स कॉन्फेडरेशन चे अध्यक्ष विजय अय्यंगारआपयपीजीए उपाध्यक्ष मानेक गुप्ता यावेळी उपस्थित होते.

डाळींच्या शाश्वत उत्पादनाच्या महत्त्वावर भर देत श्री. रावल यांनी  सांगितलेमहाराष्ट्र राज्य तूरहरभरामूगउडीद आणि मसूर यासारख्या डाळींच्या उत्पादनात आघाडीवर आहे. डाळी केवळ पोषण सुरक्षा पुरवतात असे नाहीतर डाळी उत्पादनामुळे मातीचे पोषणही सुधारतेपाण्याचा कमी वापर होतो आणि यामुळे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासही मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. रावल यांनी सांगितले कीमहाराष्ट्राने शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेती तंत्रांच्या वापराद्वारे डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. राज्य सरकारने संशोधन संस्थांबरोबर समन्वय साधून नवीन डाळींच्या जाती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावेयासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. भारत डाळ’ योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना प्रथिनयुक्त अन्न पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यात सुरू केली आहे.

0000

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी

 मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील

१ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी

- मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. १३ : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आलीअशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व)हायवेआनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठामानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठादहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूधपॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूधडबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

००००

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

 डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

 

मुंबई, दि. १३ : राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठ कामकाजासंदर्भात सादरीकरण केले.

बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीनाविन्यपूर्ण अभ्यासक्रमप्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पनासेंटर ऑफ हॅपिनेसभावी योजनाशैक्षणिक वेळापत्रकशाळांशी संवादविद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधास्वच्छ भारत अभियान, 'विकसित भारतउपक्रमआदिवासी विद्यार्थी उत्थान योजनाक्रीडा संस्कृतीला चालना आदी विषयांवर चर्चा झाली.  

डॉ होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयसिडनहॅम महाविद्यालयमाध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालयशासकीय विज्ञान संस्था यांसह ६ संस्थांचा समावेश आहे.  

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये हे देखील उपस्थित होते.

 

Thursday, 13 February 2025

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ आदर्श निर्माण करेल,pl share

 धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षामीटर टॅक्सी चालक

कल्याणकारी मंडळ आदर्श निर्माण करेल

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १३: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत.  या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे,  या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षामीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  हे मंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेलअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कल्याणकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत श्री. सरनाईक  बोलत होते.

              परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की२७ जानेवारी २०२५ रोजी आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.

            राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क व ३०० रुपये  वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने  चालकांना सभासद नोंदणी करता येईल. स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होणार आहे.

            तसेच ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत १० हजार रुपये  सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमाअपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.

             कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

उत्कृष्ट रिक्षाटॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षाटॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईलअसेही श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले. बैठकीला परिवहन आयुक्त  विवेक भीमनवार यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार

 नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृतीगट स्थापन करण्याचे निर्देश

कॅन्सर रुग्णांवर उपचार व संशोधन क्षेत्रासाठी केंद्र महत्त्वपूर्ण

 

नागपूरदि.13 : पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनापुरतेच मर्यादित होते. आता ते कॅन्सर सारख्या आजारावर उपचार तसेच शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतात सद्यस्थितीत अवघी 24 सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्राची आवश्यकता आहे. नागपूर येथे विविध वैद्यकीय व अभियांत्रिकी पायाभूत संस्था असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर येथे सायक्लोट्रॉन केंद्राच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरव्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल, प्रो.किशोर भूरचंडीएम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभियेआयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाणनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे संचालक वैद्यकीय संचालक डॉ.आनंद पाठकमुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर उपस्थित होते.

नागपूरमध्ये व्हीएनआयटीएम्सशासकीय वैद्यकीय महाविद्यालयइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या  आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या पायाभूत संस्था आहेत. यादृष्टीने विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्यभारतासाठी महत्वाचे ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जीजलशुद्धीकरणआरोग्यऊर्जा अन्य प्रक्रिया सारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालने सक्षम होण्यास मदत होईलअसे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सादरीकरणात सांगितले.

संशोधनवैद्यकीय क्षेत्रासह कॅन्सरवरील उपचारभौतिक विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरेलअसे व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल यांनी सांगितले. मध्य भारतातील आवश्यक अशा या केंद्राच्या उभारणीसाठी व्हीएनआयटी सर्वतोपरी योगदान देईल. व्हीएनआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्सभौतिकशास्त्ररसायनशास्त्र या क्षेत्रात रस घेणारे संशोधक पुढे आले आहेत. असे श्री. पटेल यांनी सांगितले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक यांनी मध्य भारतासह विदर्भ-मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांना याद्वारे होणाऱ्या लाभासंदर्भात सादरीकरण केले.

काही लोकांना महाकुंभात घाण आणि कचरा दिसला.

 काही लोकांना महाकुंभात घाण आणि कचरा दिसला.


काही लोकांना महाकुंभात रस्त्यावरील अडथळे आणि ट्रॅफिक जाम दिसले.


काही लोकांना महाकुंभात आध्यात्मिकता आणि दिव्यता दिसली.


काही लोकांना महाकुंभात त्यांच्या आई-वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न साकार झालेले दिसले.


पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका पण  हिंदूने कोणाच्या ज्यूस, रोटी किंवा चहात थुंकले नाही.


पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने इतर धर्मांच्या अस्तित्वाला आव्हान देत त्यांच्या वंशसंहाराचा नारा दिला नाही.


पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने रस्त्यावर, ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर प्रार्थना करून इतरांना त्रास दिला नाही.


पण कोणालाच दिसले नाही की महाकुंभात कोणतेही वेगळे घाट नव्हते—ना दलितांसाठी, ना ब्राह्मणांसाठी, ना जाटांसाठी, ना अग्रवालांसाठी. सर्व हिंदूंनी एकत्र स्नान केले, कुठलाही जातिभेद न होता!


पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एकही हिंदू उपाशी किंवा भरकटलेला राहिला नाही.


पण कोणालाच दिसले नाही की एवढ्या कोटी हिंदू महाकुंभात आले, तरीही कुठल्याही इतर धर्माच्या धार्मिक स्थळांवर नमाज किंवा प्रार्थनेच्या वेळी दगडफेक झाली नाही.


पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने कोणत्याही परदेशी व्यक्तीला धर्मांतरासाठी भाग पाडले नाही, किंवा कोणाच्याही जमिनीवर दावा केला नाही.


हे सगळ्यांनी पाहिले पाहिजे...


WA वरची पोस्ट आवडली, पटली 👍

Share करतोय 🙏

Featured post

Lakshvedhi