Thursday, 13 February 2025

पासष्टी (६५) पार करतांना* *सर्वांनी अवर्जुन वाचाच*...

 *पासष्टी (६५)  पार करतांना* 

*सर्वांनी अवर्जुन वाचाच*...


एकदा एका साठी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या  वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे.


१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.


२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.


३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 


४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.


५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी  एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.


६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.


७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.


८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.


९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.


१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.


११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.


१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.


१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा *आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन  चिंता करत बसत*


*आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा*


१४..आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.


खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?


१५.आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.


१६.आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण


१७.आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल


*🌹खूप खूप शुभेच्छा (६०-७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l* 🌹


            *राम    कृष्ण    हरी*

अलमट्टी धरणात पूर्ण संचय पातळी पाणी साठ्यास महाराष्ट्र राज्याचा विरोध

 अलमट्टी धरणात पूर्ण संचय पातळी

पाणी साठ्यास महाराष्ट्र राज्याचा विरोध

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

मुंबईदि. १२  :  कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सुनावणीदरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या ५२४.२५ मीटर पूर्ण संचय पातळीस महाराष्ट्र राज्याने विरोध केला असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले कीशासनाने National Institute of Hydrology, Roorkee या  संस्थेस  अलमट्टी धरण  उंचीवाढीमुळे पुराचा परिणाम होतो का याबाबत अभ्यास करण्याचे काम दिले आहे. या संस्थेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात आक्षेप उपस्थित करण्यात येईल.

अलमट्टी धरणाची सध्याची पूर्ण संचय पातळी (full reservoir level) ५१९.६० मीटर आहे. अलमट्टी धरणात येणाऱ्या गाळामुळे महाराष्ट्र राज्याचा भूभाग पाण्यात जातो असा आक्षेप असल्याने लवादाने M/s Tojo Vikas International Pvt. Ltd. या संस्थेला गाळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

लवादाने डिसेंबर-२०१० मध्ये निवाडा (award) अंतिम केला. यामध्ये अलमट्टी धरणाची पूर्ण संचय पातळी ५२४.२५६ मीटर करण्याची परवानगी दिली आहे. या लवाद निवाड्याला आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध याचिकांद्वारे आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवाद-२ चा निवाडा अधिसूचित करण्यास स्थगिती दिली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

लवादाने २९ नोव्हेंबर २०१३ रोजी निवाडा अंतिम केला असून तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे केंद्रशासनाने अद्यापि अधिसूचित केलेला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत कर्नाटक राज्याला अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटर पूर्ण संचय पातळीपर्यंत वाढवणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजनेची महाविद्यालयांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करा : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार मुंबई, दि.१२: "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले राज्यातील विविध शासकीय विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट करता येतील. मंत्रालय येथील दालनात मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार झाला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रसाद कारंडे, राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई विद्यापीठ व राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे 200 पेक्षा अधिक महाविद्यालय यामध्ये समाविष्ट होतील अशी आशा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. यानुसार, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK)” स्थापन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून, त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या Common Cost Norms नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येत आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील संबंधित प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान पात्रतेनुसार युवक-युवती पात्र आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेकरिता संपूर्ण राज्य अनुदानित प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या निधीमधून योजना सुरु करण्यात आली असल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले. या योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्यिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले. 0000 संध्या गरवारे/विसंअ/

 केलेल्या Common Cost Norms नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येत आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील संबंधित प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान पात्रतेनुसार युवक-युवती पात्र आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेकरिता संपूर्ण राज्य अनुदानित प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या निधीमधून योजना सुरु करण्यात आली असल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्यिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले

उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी ‘एसओपी’ तयार करावी

 उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षमता वाढीसाठी ‘एसओपी’ तयार करावी

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे  कालमर्यादेत पूर्ण करावीत

 

मुंबई दि. १२ :  गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या उपसा सिंचन योजना अधिक कार्यक्षमतेने सुरू राहाव्यात यासाठी या योजनांचे पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. या योजनांच्या कार्यक्षमता  वाढीच्या अनुषंगाने एसओपी तयार करावीअसे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील विविध विषयाबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलआमदार सर्वश्री सुभाष देशमुखअब्दुल सत्तारअभिजीत पाटीलविनय कोरे,  अशोकराव मानेराहुल कुलसंभाजीराव पाटील निलंगेकरसुरेश धसराणा जगजितसिंहअभिमन्यू पवारविजयसिंह पंडितआशुतोष काळे उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री  श्री. विखे पाटील म्हणालेसन्माननीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात मागणी केलेली कामे ही लोकहिताची असतात. या कामांच्या मंजुरीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा व जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याने ही कामे कालबध्द रीतीने  पूर्ण झाली पाहिजेत. ज्या योजनांच्या कामासाठी  सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे त्याचा प्रस्ताव सादर करावा. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणेदुरुस्ती करणे या कामात तज्ञांचे मत घ्यावे. पूर संरक्षक भिंत बांधणे बाबत सर्व्हे करावा. राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने अनेक  योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांची कामे गतीने व दर्जेदार व्हावीत. ही कामे जलद गतीने होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावाअशा सूचना श्री. विखे-पाटील यांनी  दिल्या. योजनांसाठी आवश्यक भूसंपादन कालमर्यादेत होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीस अपर मुख्य सचिव दिपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोलेगोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरामणवारजलसंपदा सह सचिव संजीव टाटूअभय पाठकउपसचिव प्रवीण कोल्हे यांच्यासह  कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोलीतील बिनशेतीसाऱ्यास पात्र जमिनी नियमित कराव्यात - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. 12 : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाणाबाहेरील क वर्ग (बिनशेतीसाऱ्यास पात्र) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धारणाधिकार क गावठाण जमिनींचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीस गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अवश्यांत पंडा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गावठाण बाहेर क वर्ग जमिनीचे 4615 मालमत्ता पत्रक बनविण्यात आले आहेत. यापैकी 1500 हून अधिक प्रकरणी मोजणी झालेली नसून नगररचना विभागाची परवानगी नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 2019 मध्ये स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी मोजणी झालेल्या जमिनींवरील स्थगिती उठवून मोजणी न झालेल्या जमिनीची मोजणी करुन ती नियमित करणे अशा दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ज्या जमिनीची मोजणी झाली नाही त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वैयक्तिक मोजणी करुन घ्यावी. याच्या शुल्कापोटी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा आणि या जमिनी विक्रीपत्र करणे व हस्तांतरीत करण्यासाठी नियमित करुन घ्याव्यात, असे निर्देश श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिले.

 गडचिरोलीतील बिनशेतीसाऱ्यास पात्र जमिनी नियमित कराव्यात

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 12 : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाणाबाहेरील क वर्ग (बिनशेतीसाऱ्यास पात्र) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यातअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धारणाधिकार क गावठाण जमिनींचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीस गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वालगडचिरोलीचे जिल्हाधिकारी अवश्यांत पंडा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गावठाण बाहेर क वर्ग जमिनीचे 4615 मालमत्ता पत्रक बनविण्यात आले आहेत. यापैकी 1500 हून अधिक प्रकरणी मोजणी झालेली नसून नगररचना विभागाची परवानगी नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 2019 मध्ये स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी मोजणी झालेल्या जमिनींवरील स्थगिती उठवून मोजणी न झालेल्या जमिनीची मोजणी करुन ती नियमित करणे अशा दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया करावी लागेलअशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

ज्या जमिनीची मोजणी झाली नाही त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वैयक्तिक मोजणी करुन घ्यावी. याच्या शुल्कापोटी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा आणि या जमिनी विक्रीपत्र करणे व हस्तांतरीत करण्यासाठी नियमित करुन घ्याव्यातअसे निर्देश श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिले.


जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली

 जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली

-         महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 12 : जन्म-मृत्यू नोंदणी करताना संबंधित व्यक्ती भारताचे नागरिक असल्याची खात्री करुन दाखला देण्याबाबत गृह विभागामार्फत लवकरच आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणास स्थगिती आणल्याबाबत ॲड. सरिता सैंदाणे यांच्या निवेदनासंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यावेळी उपस्थित होते.

जन्म नोंदणी होणे आवश्यक असल्याने याबाबत गृह विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच याबाबतची आदर्श कार्यप्रणाली निश्चित होईलअसे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’! व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

 दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ऑनलाईन जागर’!

व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 12 : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.  या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवीलेखककलाकारगायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन,  गायनलोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंगपोवाडेनाट्यछटालघुकथागायन,  भारुड आदी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. चला तर मग, करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद’ या पोर्टलवर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.

आपले व्हिडिओ इथे पाठवा

ईमेल: dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा

या व्हॉट्सअँप क्रमांकावर. ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६.

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावेअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल -

👉 महासंवाद - https://mahasamvad.in/  

👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 

👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 

👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 

👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR

0000

Featured post

Lakshvedhi