Thursday, 13 February 2025

दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

 दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आयुष्मान भारत योजना व पीसीपीएनडी कायद्याबाबत आढावा बैठक

 

 मुंबईदि. 12 : विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी तपासणी करण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची मोहीमस्तरावर तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाहीयासाठी नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

मंत्रालय येथे आरोग्य विषयक विविध विषयांच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाणआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर आरोग्य विभागाचे सचिव विरेन्द्र सिंहतसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीसर्व मंडळांचे उपसंचालकजिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीमहापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी करण्यात येते. या तपासणी दरम्यान आरोग्य विषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने राज्यातील 0 ते 18 वयोगटातील साधारण दोन कोटी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. तसेच या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतीलत्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी व उपचारांचे नियमीत मॉनिटरींग होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने तयार केलेले ॲपची माहिती घेण्यात यावी. तसेच आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांची येत्या आठ दिवसांत सर्व माहिती अद्ययावत करून मोहिमस्तरावर या तपासणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. यासाठी शालेय आणि महिला व बाल विकास विभाग यांचे देखील सहकार्य घेण्यात यावेअशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या.

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आरोग्यविषयक महात्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून राज्यतील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याबाबत नियोजन करण्यात यावे. या अनुषंगाने आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर आयुष्मान कार्ड काढण्याचे काम हाती घ्यावे व या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावाअसेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत (पीसीपीएनडीटी) नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. या कायद्याची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्यपोलीस यंत्रणाविधी तज्ज्ञ व सामाजिक संस्था यांच्या मदतीने भरारी पथके नियुक्त करण्यात यावीअसे निर्देश ही श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. आपत्कालीन सेवांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

 लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

 

मुंबईदि. १२ : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाहीतर आमच्या जगण्याचा आधार आहे"असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच " ही योजना कधीही बंद पडणार नाही" अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने "जीवाची मुंबईश्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचंअसा प्रश्न होता. पण लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला, असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत "लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईलयाचाही विचार करतोय," असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हतीतर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. "आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतंपण आता आम्ही त्यातून प्रवासही केला," असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, "सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत." यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "या मागणीचा जरुर विचार करू," असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन "रसिकाश्रय" संस्थेने केले. "या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. "मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहीलहे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

000

महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे

 महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने

जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम

 

मुंबई दि. 12 : गरजू महिलांना उद्योगपूरक साधने पुरविण्याच्या सहाय्यासोबतच उद्योग कायम टिकविणे आणि वाढविणे यासाठी आर्थिक साक्षरही करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांनी गरजू महिलांना उद्योगपूरक वस्तुंच्या वितरणाबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी अभिनंदन केले.

जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत १५७ महिलांना चर्चगेट येथील वालचंद हिराचंद हॉल येथे उद्योगपूरक वस्तुंचे वितरण महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक अनु अग्रवालबॉबकार्डचे (बँक ऑफ बडोदाची उपकंपनी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र रायमानव संसाधन प्रमुख रवी खन्नासीएसआरचे विभागीय अधिकारी विपुल बरोटयुनायटेड वे मुंबईचे उपाध्यक्ष अनिल परमारमुख्य कार्यकारी अधिकारी सना शेखव्यवस्थापकीय सहायक चिन्मय पाटील यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीव्यावसायिक शिक्षण आणि उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या महिलांना आर्थिक परिस्थिती अभावी उद्योग सुरू करता येत नाही. अशा महिलांना बॉबकार्ड उद्योगपूरक वस्तु देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास सहकार्य करीत आहे. यानंतर त्यांना प्रशिक्षण देणेही महत्वाचे आहेत्यांना भविष्यात उद्योगवाढीसाठी आर्थिक साक्षर करणेगुंतवणुकीचे आणि बचतीच्या पर्यायांची माहिती देणे महत्वाचे असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

 या अंतर्गत या १५७ महिलांना पुढील सहा महिने व्यवसाय कौशल्यउद्योजकता याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

०००

*आंतरराष्ट्रीय मराठी कला महोत्सव २०२५* 🏵 *आभाळाखालची शाळा फाउंडेशन पुणे आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कला महोत्सव.*

 📢 *जगभरातल्या सर्व मराठी बांधवांसाठी* 🌟


🏵  *आंतरराष्ट्रीय मराठी कला महोत्सव २०२५*  🏵


*आभाळाखालची शाळा फाउंडेशन पुणे आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कला महोत्सव.*  


*जगभरातील प्रत्येक मराठी कलावंताला* (परदेशात राहणाऱ्यांसाठी सुद्धा) यात सहभागी होता येणार आहे.

*गट क्र. १ :* वय वर्ष ०५ ते १५. 

*गट क्र. २ :* वय वर्ष १६ ते २५. 

*गट क्र. ३ :* वय वर्ष २६ ते ४०. 

*गट क्र. ४ :* वय ४१ वर्षापुढील सर्व मराठी कलावंत या गटात भाग घेऊ शकतात. 


*या कलामहोत्सवात आपण पुढील 2 विभागात भाग घेऊ शकता*

१) गायन

२) वादन 

🔰 *कलामहोत्सवातील विविध स्पर्धा* 🔰

*गायन* 

१) मराठी गाणे, 

२) नाट्यगीत 

३) भावगीत, 

४) लोकगीत, 

५) भक्तीगीत, 

६) चित्रपट गीत,  

७) अभंग, 

८) पोवाडा 

*वादन*

९) कोणतेही वाद्य वादन

१०) तबला, पेटी, सतार, सरोद, बासरी, पखवाज, ई .


🔰 *नियम आणि अटी* 🔰  


१) आपल्याला आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी चार मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा.व्हिडिओच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नाव आपण कोणत्या शहरातून आहात आणि कोणत्या देशातून आहात याची माहिती सांगावी. आणि मग व्हिडिओला सुरुवात करावी.

२) आपला चार मिनिटांचा व्हिडिओ तयार करून, तो प्रायव्हेट ठेवून त्याची लिंक गूगल फॉर्म मध्ये टाकावी.


✅ आपले नाव

✅ वय

✅ स्पर्धेचा विभाग

✅ देश व शहराचे नाव सांगायचे आहे.(आपला फोन नंबर लिहिताना देशाच्या फोन कोडसह लिहायचा आहे.)


३) काही मान्यवर मराठी कलाप्रेमी (विशेष समिती) हे या कार्यक्रमाचे अवलोकन आणि परीक्षण करतील. आणि त्यानंतर निर्णय घोषित करतील.

४) स्पर्धेसाठी आपण पाठवलेले व्हिडिओ हे अभाळाखलची शाळा या you tube चॅनल टाकण्यात येतील ज्यामुळे जगभरातील सर्व रसिकांना त्याचा आनंदही घेता येईल आणि ईतर स्पर्धकांना देखील आपले व्हिडिओ बघता येतील. ज्यांची साठी तयारी असेल त्यांनीच या स्पर्धेत भाग घ्यावा.

  

४) स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील *गुगल फॉर्म* वर आपली माहिती लवकरात लवकर भरावी.

५) कार्यक्रमाचं दिनांक आणि वेळ आपल्याला लवकरच कळवली जाईल.


*Last Date of participation:* 25 feb 2025.


*Google Form Link:* https://forms.gle/y6VN3j2U6AqYZEFG7  


५) या कला महोत्सवात सुमारे ५५ देशांमधील मराठी कलावंत देखील सहभागी होणार आहेत हे विशेष.


६) तीन दिवस हा महोत्सव सुरू राहील त्यासंबंधी वेळोवेळी आपल्याला WhatsApp वरून सूचना  पाठवल्या जातील. 


✅ *हि माहिती आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया हॅण्डल वरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तसेचपरदेशी मराठी बांधवांपर्यंत, कलाप्रेमीपर्यंत पोहचवावी.*

  

✅ सर्व सहभागी आणि यशस्वी कलावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रमाणपत्र देण्यात येईल.


✅ या कला महोत्सवात जगभरातील मराठी व्यक्ती भाग घेऊ शकतील.

✅ आपल्या संपर्कातील असणाऱ्या परदेशातील तसेच महाराष्ट्रातील सर्व कलावंतांपर्यंत हि माहिती आपण पोहचवावी हि विनंती. 🙏


*अधिक माहितीसाठी  संपर्क :* 

*+917620921098*

*श्री. दिलीप पुराणिक,*

*अध्यक्ष*

*आभाळाखालची शाळा फाउंडेशन पुणे,*

जीवनातील खरे सत्य!*

 *जीवनातील खरे सत्य!*

 

45000 कोटींची संपत्ती असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे निधन होण्यापूर्वीचे शेवटचे शब्द:* मी व्यावसायिक जगतात यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे. माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने एक यश आहे. मात्र, मला कामाशिवाय आनंद नव्हता. पैसा हे फक्त एक सत्य आहे जे मी वापरतो. या क्षणी हॉस्पिटलच्या पलंगावर पडून आणि माझ्या संपूर्ण आयुष्याकडे वळून पाहताना मला जाणवते की ज्या ओळखीचा आणि पैशाचा मला अभिमान होता, तो क्षीण आणि निरुपयोगी आहे.* तुम्ही कोणाला तरी कामावर घेऊ शकता. तुमची कार चालवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी. परंतु, तुम्ही दु:ख सहन करून मरण्यासाठी कोणाला कामावर ठेवू शकत नाही.* हरवलेल्या भौतिक वस्तू सापडू शकतात. पण एक गोष्ट अशी आहे जी हरवल्यावर कधीच सापडत नाही - आणि ती म्हणजे "आयुष्य"* आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी कालांतराने आपण त्या दिवसाला सामोरे जातो जेव्हा हृदय थांबेल.* *तुमच्या कुटुंबावर, जोडीदारावर आणि मित्रांवर प्रेम करा. ...🙏त्यांच्याशी चांगले वागा, त्यांची फसवणूक करू नका, कधीही अप्रामाणिक किंवा विश्वासघातकी होऊ नका.* *जसे जसे आपण मोठे आणि शहाणे होत जातो तसतसे आपल्याला हळूहळू लक्षात येते की 300 रुपये किंवा 3000 रुपये किंवा 2-4 लाख रुपये किमतीचे घड्याळ तीच वेळ सांगते.* *आमच्याकडे 100 किंवा 500 चे पाकीट असो - आत सर्व काही सारखेच असते.* *आपण 5 लाख किमतीची कार चालवतो किंवा 50 लाखांची कार चालवतो. मार्ग आणि अंतर सारखेच आहेत आणि आपण त्याच गंतव्यस्थानावर पोहोचतो.* *आपण 300 स्क्वेअर फूट किंवा 3000 स्क्वेअर फूटच्या घरात राहतो - सर्वत्र एकटेपणा सारखाच असतो.* *तुम्हाला कळेल की तुमचा खरा आंतरिक आनंद यात नाही* 

*या जगाच्या भौतिक गोष्टींमधून बाहेर या.* 

*तुम्ही फर्स्ट क्लास किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये उड्डाण करा, जर विमान खाली गेले तर तुम्ही त्याच्याबरोबर खाली जाणार आहात.* 

*म्हणूनच.. मला आशा आहे बंधू आणि भगिनींना ,तुम्हाला हे समजले असेल की तुमचे मित्र व आप्तेष्ट असतील , ज्यांच्याशी तुम्ही गप्पा मारता, हसता, गाता, आनंद व्यक्त करता,....जीवनाचा हाच खरा आनंद आहे. !!* 

*जीवनातील एक निर्विवाद सत्य:* *तुमच्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका. त्यांना आनंदी राहायला शिकवा. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना वस्तूंची मोल कळेल,फक्त किंमत नाही.* *जीवन म्हणजे काय❓* *जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन ठिकाणे आहेत:* *-रुग्णालय जेल आणि  स्मशानभूमी* 

*रुग्णालयात तुम्हाला समजेल की आरोग्यापेक्षा काहीही चांगले नाही.* *स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे हे तुरुंगात तुम्हाला दिसेल.* *आणि स्मशानभूमीत तुम्हाला कळेल की जीवन काहीच नाही.* *आज आपण ज्या जमिनीवर चालतो ती उद्या आपली असणार नाही. * *आतापासून नम्र होऊ या आणि जे काही मिळाले त्याबद्दल देवाचे आभार मानूया.* *

असेही अवलिया

 *


Wednesday, 12 February 2025

*उसळ-चपातीचे ऋण.......!!*

 *उसळ-चपातीचे ऋण.......!!*



एकदा भीमसेन जोशी (अण्णा)  गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!"

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. 

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..! 


अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते. 


रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर  अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..


साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -


"इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.


स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली".


"उसळ-चपाती पाहिजे काय?", असं  तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.


रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"


"घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"


"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. 


रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?"


रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..


रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.


*हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असलेला माणूस.....*

-----🙏🙏सुप्रभात🙏🙏-----

पत्रकार विकास शहा , शिराळा तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

Featured post

Lakshvedhi